Search This Blog

Monday, 7 October 2024

बाबुपेठ येथील मूक बधीर निवासी शाळेची मान्यता रद्द

 बाबुपेठ येथील मूक बधीर निवासी शाळेची मान्यता रद्द

Ø विद्यार्थ्यांनी इतर मुकबधिर शाळेत प्रवेश घेण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. : मुक व बधीर शैक्षणिक औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचंद्रपूर द्वारा संचालित बाबुपेठ येथील मुक बधीर निवासी वसतीगृहात 23 ऑक्टोबर 2023 रोजी अल्पवयीन मुकबधीर विद्यार्थींनीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराबाबत, पुणे येथील दिव्यांग कल्याण आयुक्तालयाचे आयुक्त यांच्या 30 ऑगस्ट 2024 च्या आदेशानुसार सदर शाळेची मान्यता रद्द करण्यात आली आहे.

मूक बधीर निवासी विद्यालयबाबुपेठ, चंद्रपूर या मूक बधीर प्रवर्गाच्या विशेष शाळेस दिव्यांग व्यक्ती (समान संधीहक्काचे संरक्षण आणि संपूर्ण सहभाग) अधिनियम 1995 मधिल कलम 51 व 52 नुसार 100 निवासी अनुदानित विद्यार्थी संख्येवर प्रदान करण्यात आलेले नोंदणी प्रमाणपत्र, दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधिल कलम 52 च्या तरतुदीनुसार 30 ऑगस्ट 2024 पासून रद्द करण्यात आलेले आहे.

त्यानुसार सदर शाळेची मान्यता रद्द केली असल्याने येथील विद्यार्थ्यांनी नजीकच्या मुकबधिर प्रवर्गाच्या इतर शाळेत तात्काळ प्रवेश घेण्यात यावा. तशा प्रकारच्या सुचना जिल्ह्यातील सर्व शाळांला देण्यात आल्या आहेत. तसेच प्रवेशाबाबत काही अडचणी आल्यास जि.प. समाजकल्याण या कार्यालयाशी आणि दुरध्वनी क्रमांक  0717/2255933 वर संपर्क करावा, असे जिल्हा समाज कल्याण अधिकारीसुरेश पेंदाम यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment