Search This Blog

Thursday, 16 October 2025

दिव्यांगाप्रती संवेदनशीलता जागृती एकदिवशीय कार्यशाळा



दिव्यांगाप्रती संवेदनशीलता जागृती एकदिवशीय  कार्यशाळा

चंद्रपूरदि. 16 : दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 कलम 39 अन्वये दिव्यांगाप्रती संवेदनशिलता जागृती एकदिवशीय कार्यशाळा जिल्हा परिषद येथे नुकतीच घेण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्या हस्ते करण्यात आलेयावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागरजिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुधीर इंगळेउपमुख्य कार्यकारी अधिकारी नुतन सावंतजिल्हा आरोग्य अधिकारी डॉअशोक कटारे आदी उपस्थित होते.

यावेळी पुलकित सिंह यांनी दिव्यांगाचे शिक्षणआरोग्यपुनर्वसनवैयक्तिक लाभाच्या योजना राबविणे याबाबत मार्गदर्शन केले. सुधीर इगंळे यांनी दिव्यांगांच्या संबधित असलेले कायदे विषयक मार्गदर्शन केलेनुतन सावंत यांनी बिंदुनामावली अंर्तगत नियुक्तीबढतीबदलीनियुक्ती व दिव्यांगाना टक्के आरक्षणाबाबतडॉअशोक कटारे यांनी  आरोग्य तथा  वैश्विक ओळखपत्र युडीआयडी कार्ड बद्दल माहिती दिलीतसेच रफीक शेख यांनी व्यवसायिक पुनर्वसनाबाबत तर उपशिक्षणाधिकारी विशाल देशमुख यांनी समग्र शिक्षण याबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी धनंजय साळवे यांनी केलेसंचालन संजय पैचे यांनी केले तर आभार केशव दुर्गे यांनी मानलेसदर कार्यशाळेस अधिकारी व दिव्यांग शाळेतील कर्मचारी उपस्थित होते.

०००००००

No comments:

Post a Comment