Search This Blog

Monday, 13 October 2025

सैनिक कल्याण विभागात सरळसेवेतील लिपिक टंकलेखक (गट-क) पदांची भरती


सैनिक कल्याण विभागात सरळसेवेतील लिपिक टंकलेखक (गट-क) पदांची भरती

चंद्रपूर, दि. 13 :   सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील लिपिक टंकलेखक (गट क) एकूण ७२ पदाकरीता फक्त माजी सैनिक उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. वरील पदांपैकी 1 पद हे अपंग संवर्गातून किमान 40 टक्के अपंगत्व असलेल्या उमेदवारामधून दिव्यांगत्वाच्या प्रकारांनुसार कर्तव्ये व जबाबदारीचा विचार करून गुणवत्ता/ उपलब्धतेनुसार भरण्यात येईल.

सदर भरती प्रक्रिया टिसीएस-आयओएन यांचे मार्फत होणार आहे. प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. पात्र उमेदवारांना वेब-बेस्ड (Web-based) ऑन लाईन अर्ज www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर (Resources Tab ---> Recruitment Tab येथे 14 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजतापासून 5 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी 23.59  वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक राहील. त्यानंतर सदर वेबलिंक बंद होईल, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment