Search This Blog

Saturday, 20 September 2025

लोकाभिमुख प्रशासनासाठी अतिशय गांभीर्याने काम करा






 

लोकाभिमुख प्रशासनासाठी अतिशय गांभीर्याने काम करा

Ø महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे यंत्रणेला निर्देश

चंद्रपूर दिनांक 20 : राज्यात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत महसूल विभागातर्फे सेवा पंधरवाडा  राबविण्यात येत आहे. या अंतर्गत शेतरस्त्यांचे मॅपिंग करणेत्यांचे अतिक्रमण काढणेराष्ट्रीय महामार्ग प्रमाणे रस्त्यांना क्रमांक देणेसर्वांना घरे आदी  बाबी करण्यात येणार आहे. महसूल खाात्याबद्दल नागरिकांमध्ये आदराची भावना आहे. त्याला तडा जाऊ देऊ नका. लोकाभिमुख प्रशासनासाठी अतिशय गांभिर्याने काम कराअसे निर्देश राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यंत्रणेला दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल विभागांतर्गतभुमी अभिलेखमुद्रांक नोंदणी आदी बाबींचा आढावा घेतांना ते बोलत होते. बैठकीला सर्वश्री आमदार किशोर जोरगेवारदेवराव भोंगळेकरण देवतळेजिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारेसंतोष थिटे (चिमूर)निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारीसर्व तहसीलदार आदी बैठकीला उपस्थित होते.

 सेवा पंधरवडा अंतर्गत पाणंद रस्त्यांची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत पाणंद रस्त्यांना क्रमांक देण्यात येणार आहे. राष्ट्रीय आणि राज्य महामार्गाप्रमाणेच शेतकऱ्यांच्या पाणंद रस्त्यांना क्रमांक देणारे महाराष्ट्र्र हे देशातील पहिले राज्य आहे. पुढील काळात या रस्त्यांवर अतिक्रमण होणार नाहीयाची काळजी घ्यावी. राज्याचा जीडीपी वाढवायचा असेल तर शेतकऱ्यांचे पाणंद रस्ते मोकळे होणे गरजेचे आहे. शेतात पाणीवीजरस्ता असेल तर शेती करण्याकडे ओढा वाढेल.

महसूल अधिकाऱ्यांनी गावात जाऊन लोकांच्या समस्या सोडवाव्यात. शासनाची भूमिका घेऊन प्रशासन आपल्या गावात आलेअसे गावकऱ्यांना म्हटले पाहिजे. सामान्य आणि गरीब जनतेला चांगल्या सुविधा देणे हे आपले कर्तव्य आहे. गतिमानपारदर्शक प्रशासन राबविण्यासाठी यंत्रणेने सजग असावे. शासकीय कामासाठी लोकांना कोणताही त्रास होता कामा नये. घरकुल पासून कोणीही वंचित राहू नयेएकही शेतकरी पांदण रस्त्याविना राहू नयेयाची काळजी घ्यावी. जनतेला भेटण्याचे फलक कार्यालयात लावा. लोकांशी संपर्कात रहा. शासनाच्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करा. .

पुढे महसूल मंत्री श्री. बावनकुळे म्हणालेमहानगरपालिकानगरपालिका हद्दीमध्ये ज्या झोपडपट्टी आहेतत्यांची जमीन सुद्धा नियमित करण्यात येईल. सरकारी जागेवरील सर्व घरांचा सर्वे करण्यात येणार आहे. चंद्रपूर शहरातील 55 झोपडपट्टीधारकांना कायदेशीर घरे देण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल. पुढील पाच वर्षात देशातील सर्वोत्कृष्ट महसूल खाते महाराष्ट्राचे असावेअशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. .आपल्या चांगल्या कामाचे सादरीकरण करा. महसूल विभागाच्या संकेतस्थळावर हे सादरीकरण अपलोड करा.

कृत्रिम वाळू धोरणानुसार शासकीय बांधकामात 50 टक्के वाळू अनिवार्य करण्यात आली आहे. कृत्रिम वाळू प्रकल्पासाठी  जास्तीत जास्त प्रयत्न करा. प्रत्येक जिल्ह्यात किमान 50 प्रकल्प लागले पाहिजे.  महसुली अर्धन्यायीक प्रकरणे तीन महिन्यात निकाली काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. शेतकऱ्यांनी त्वरीत फार्मर आयडी करून घ्यावी. विशेष सहाय्य योजनेचा सर्व निधी डीबीटीवर देण्यात येतो. प्रत्येक घरी जाऊन 100 टक्के डीबीटी करण्यासाठी या पंधरवड्यात यंत्रणेने घरोघरी जावेअशा सुचनाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी विभागाचे सादरीकरण केले.

चांदा महसूल मित्र चॅटबोटचे उद्घाटन : महसूल विभागाच्या विविध सेवा ऑनलाईन पध्दतीने नागरिकांना माहित व्हाव्यातयासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या चांदा महसूल मित्र चॅटबोटचे (फोन नं. 9284061588) उद्घाटन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले.

००००००००

No comments:

Post a Comment