Search This Blog

Wednesday, 3 September 2025

‘विमुक्त दिवस जागर’ निमित्त विविध उपक्रम


 विमुक्त दिवस जागर निमित्त विविध उपक्रम

Ø इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे आयोजन

चंद्रपूरदि. 3 : इतर मागास बहुजन कल्याण विभाग आणि अखिल भारतीय विमुक्त घुमंतु जनजाती वेलफेअर संघदिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने डॉबाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे भटके विमुक्त दिवस जागर कार्यक्रम उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते करण्यात आलेयावेळी ते म्हणालेभटक्या-विमुक्त समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या प्रबोधनासाठी अशा कार्यक्रमांची गरज आहेकार्यक्रमात सेटलमेंट आणि 1952 चा गुन्हेगार कायदा यावर आधारित वक्तृत्व स्पर्धाभटक्या विमुक्त समाजाचा इतिहासपरंपरा व सद्यस्थिती या विषयांवर चर्चा करण्यात आलीसामाजिक कार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संस्थांचा सत्कार करण्यात आला तसेच नागरिकांसाठी वैद्यकीय तपासणी व औषध वितरण शिबिराचे आयोजनही करण्यात आले.

इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत येत असलेल्या माध्यमिक आश्रमशाळा कारवा येथील प्राची वाटघुरेसलोनी वाटघुरेआचल पेंदोरआर्यन कोडापे या विद्यार्थ्यांना आयुष्यमान भारत कार्ड व जातीचे दाखला आमदार किशोर जोरगेवार यांचे हस्ते वाटप करण्यात आलेतसेच  1952 चा सेटलमेंट व गुन्हेगारी कायद्यावर आयोजित वक्तृत्व स्पर्धेत श्रीमती पन्नाबाई माध्यमिक आश्रमशाळा दमपुर मौदा येथील 10 व्या वर्गातील तिरुपती जाधव याने प्रथम क्रमांक पटकावलातसेच इतर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहचंद्रपुर येथील अभिषेक सोनवणे यांचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले समग्र वाड्मय व पुष्पगुष्छ देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे आयोजन सहायक संचालक डॉसचिन मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेयावेळी इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी रोहन कांबळेआनंदराव अंगलवारडॉनरसिंहाराव गुंजीडॉयोगेश्वर दुधपचारेअनिल बोरगमवारचंद्रशेखर कोटेवारप्रभा शिलकेकृष्णाजी नागापूरसंजय कन्नावाररंजना पारशिवेरमेश हजारेअशोक पडगीलवारआनंद बावणेआणि सहाय्यक लेखाधिकारी अंजु बालमवार यांच्यासह मोठ्या संख्येने विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील नागरीक उपस्थित होते.

००००००

No comments:

Post a Comment