Search This Blog

Thursday, 18 September 2025

राष्ट्रीय स्तरावरील ऑन लाइन क्विझ स्पर्धा

 

राष्ट्रीय स्तरावरील ऑन लाइन क्विझ स्पर्धा 

चंद्रपूरदि.18 :   भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व खेल मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील ऑन लाइन क्विझ  स्पर्धा  अयोजित करण्यात आली आहेमेरा युवा भारतयुवा कार्यक्रम आणि खेल मंत्रालयाच्या वतीने 1 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर 2025 या कालावधीत माय भारत (mybharat.gov.inपोर्टलवर विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग क्विझ आयोजित करण्यात येत आहेही क्विझ विशेषत: 15 ते 29 वयोगटातील तरुणासाठी  आहे.

सहभागींना 10 मिनिटांच्या कालावधीत 20 बहुपर्यायी  प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतीलही क्विझ मोफत  आहे आणि देशातील 12 प्रमुख भाषांमध्ये सोडवता येतेविजेत्यांना आकर्षक भेटवस्तू आणि  बक्षिसे दिली  जातीलतसेचसर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या तरुणांना विकसित  भारत यंग लीडर्स डायलॉगमध्ये सहभागी होऊन पंतप्रधान मोदींशी थेट संवाद साधण्याची अनोखी संधी मिळेलविजेत्यांची निवड पूर्णपणे पारदर्शक संगणक आधारित लॉटरी प्रणालीद्वारे केली जाईल. ही क्विझ एक स्पर्धा नाहीतर भारताचे भविष्य घडवण्यासाठी तरुणांच्या विचारसरणी आणि उर्जेवर लक्ष केंद्रित करण्याची एक सुवर्णसंधी आहेअसे मेरा युवा भारतजिल्हा युवा अधिकारी सुशील भड यांनी म्हटले आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी (mybharat.gov.inला भेट द्यावीज्यांनी अद्याप या पोर्टलवर नोंदणी केली नाही, त्यांनी प्रथम बटणवर क्लिक करून स्वतःची नोंदणी करावीआधीच नोंदणीकृत सहभागी, लॉग इन करून आणि विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग क्विझ क्लिक करून स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.

००००००

No comments:

Post a Comment