Search This Blog

Sunday, 2 August 2020

आज पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर


आज पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार

चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

आशा वर्कर महिलांचा आज सन्मान

चंद्रपूर, दि. 2  ऑगस्ट : महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास, बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार दिनांक 3 ऑगस्ट सोमवार रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. रक्षाबंधनाच्या पर्वावर कोरोना काळातील आशा वर्कर यांच्या कार्याला पालकमंत्री आशा सुरक्षा सुविधा कार्यक्रमातंर्गत ते सन्मानित करणार आहेत.

3 ऑगस्ट सोमवार रोजी सकाळी 8:30 वाजता कमलाई निवास रामदास पेठ नागपूर वरून चंद्रपूर कडे प्रयाण करतील. सकाळी 10:30 वाजता नियोजन भवन चंद्रपूर येथे आगमन होऊन त्यांचा वेळ राखीव असणार आहे. सकाळी 11 वाजता पालकमंत्री आशा सुरक्षा सुविधा कार्यक्रमास नियोजन भवन येथे उपस्थित राहतील. दुपारी एक वाजता चंद्रपूर वरून नागपूरकडे प्रयाण करतील व दुपारी तीन वाजता कमलाई निवास रामदास पेठ नागपूर येथे आगमन होऊन त्यांचा मुक्काम असणार आहे.

00000

No comments:

Post a Comment