Search This Blog

Monday, 14 March 2022

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 8


जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 8

चंद्रपूर, दि.14 मार्च : जिल्ह्यात सोमवारी (दि.14) एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. तर जिल्ह्यात  एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 98 हजार 953 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 97 हजार 378 झाली आहे. सध्या 8 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 लाख 87 हजार 751 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 87 हजार 604 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1567 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment