Search This Blog

Friday, 15 March 2024

22 मार्च रोजी डाक अदालतीचे आयोजन

 22 मार्च रोजी डाक अदालतीचे आयोजन

चंद्रपूर, दि. 15 :  डाक विभाग, चंद्रपूरच्या संदर्भात असलेल्या तक्रारी निकाली काढण्यासाठी 22 मार्च 2024 रोजी प्रवर अधिक्षक डाकघर, चांदा विभाग येथे डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

या अदालतीमध्ये चांदा विभागातील निकाली न निघालेल्या तक्रारींचा आढावा घेतला जााईल. यात पत्र व्यवहार, स्पीड पोस्ट सेवा, काऊंटर सेवा, बचत बँक आणि मनिऑर्डर संदर्भातील तक्रारींचे निवारण करण्यात येईल. नागरिकांनी आपापल्या तक्रारी दोन प्रतिमध्ये संबंधित विभागाचे नाव, अधिका-यांचे नाव आणि पदनामसहीत 18 मार्च किंवा त्यापुर्वी प्रवर अधिक्षक डाकघर, चांदा विभाग, चंद्रपूर येथे सादर कराव्यात. यानंतर आलेल्या तक्रारींचा विचार केला जाणार नाही, असे डाक अधिक्षकांनी कळविले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment