Search This Blog

Tuesday, 18 March 2025

प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे लायसन्स कॅम्पचे आयोजन


 प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे लायसन्स कॅम्पचे आयोजन

चंद्रपूर, दि.18 मार्च : प्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूर तर्फे शिबीर कार्यालयाचे कामकाज सुरू करण्यात येत आहे. सदर कॅम्प मध्ये शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्के अनुज्ञप्ती पुर्वनियोजित ऑनलाईन नियुक्ती नुसार देण्यात येणार आहेत. याबाबतचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.

          शिबीर ठिकाण : 1) दि. 24 मार्च रोजी आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन वरोरा,  2) दि. 25 मार्च रोजी एन.एच. महाविद्यालय, ब्रम्हपुरी, 3) दि. 26 मार्च रोजी शासकीय विश्रामगृह, चिमूर, 4) दि. 27 मार्च रोजी शासकीय विश्रामगृह, गोंडपिंपरी, 5) दि. 28 मार्च रोजी शरद पवार महाविद्यालय, गडचांदुर येथे आयोजन करण्यात येईल,  याची नोंद चंद्रपूर जिल्हयातील नागरिकांनी घ्यावी, असे प्रादेशक परिवहन अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

०००००

No comments:

Post a Comment