Search This Blog

Friday, 25 July 2025

4 ऑगस्ट रोजी लोकशाही दिन


4 ऑगस्ट रोजी लोकशाही दिन

चंद्रपूर, दि. 25 : सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन तर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुका स्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.

ऑगस्ट महिण्याचा पहिला सोमवार दि. 4 ऑगस्ट रोजी येत असल्याने लोकशाही दिनाचे आयोजन दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे करण्यात येईल. जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार सादर करतांना विहीत नमुन्यातील तक्रार अर्जासोबत तालुका लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाची प्रत तसेच 15 दिवस आधी 2 प्रतीत अर्ज सादर करावा, व तक्रार / निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी, तद्नंतरच तक्रार अर्ज स्विकारण्यात येईल, असे प्रशासनाने कळविले आाहे.

००००००

No comments:

Post a Comment