Search This Blog

Monday, 4 May 2020

जिल्हा सहाय्यता निधीला जिल्ह्यातील 250 सहकारी संस्थांची मदत


प्रशासनाचे मदतीचे आवाहन;
आतापर्यंत 69 लक्ष रुपये जमा
चंद्रपूर दि. 4 मे:  देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोना विषाणूच्या या संकटावर मात करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्यापरिने गरजू लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करीत असून या संकटावर मात करण्यासाठी आवश्यक निधी कोविड-19 या माध्यमातून जमा केला जात आहे.
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मदत निधीचे जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनास  उत्तम प्रतिसाद मिळत असून या आवाहनास  प्रतिसाद देत अनेक संस्था,व्यक्ती यांनी जिल्हा सहायता निधीच्या खात्यात देणग्या देणे सुरू केले आहे.
आज प्रामुख्याने अशोक खाडिलकर यांच्याकडून रु.11 हजार 111, विकास मसराम (सर्व नेत्रचिकित्सा अधिकारी जिल्हा सामान्य रुग्णालय) चंद्रपूर मार्फत रु.21 हजार, सिद्धार्थ रामटेके अध्यक्ष योगासन श्री वितुबाबा शिक्षण संस्था जूनासुर्ला ता.मुल यांच्यावतीने रु.20 हजार तर अध्यक्ष, जनता महाविद्यालय सेवकांची सह. पतसंस्था चंद्रपूरच्या वतीने रु.11 हजाराचा धनादेश  सहायता निधीस देण्यात आला.
त्यासोबतच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 या स्वतंत्र बँक खात्यामध्ये अध्यक्ष, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ चंद्रपूरच्या वतीने रु.1 लक्ष 51 हजार, श्रीमती आस्था गोठे त्यांच्याकडून रु.30 हजार, स्व. अॅड.जयरामराव देशमुख बहुद्देशीय न्यास संस्था राजुराच्या वतीने रु.41 हजार तर सुरेश द्वादशीवार चंद्रपूर यांच्याकडून रु.1 लक्ष रुपयाचा धनादेश सहायता निधी देण्यात आला.
मदत करायचीय ? 'या' बँक खात्यात पैसे जमा करा !
      कलेक्टर चंद्रपूर कोविड-19 या नावाने जिल्ह्यातील अग्रणी बँक ऑफ इंडियामध्ये ‍ स्वतंत्र खाते उघडण्यात आले असून खाते क्रमांक  960310210000048  असून यासाठी आयएफएससी कोड  BKIDOOO9603  असा आहे. जिल्ह्यातील उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वंयसेवी संस्था,धार्मिक संस्था राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात त्या सर्व संस्था आणि नागरिकांनी सढळ हाताने मदतीची रक्कम जमा  करावी  असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.
0000

No comments:

Post a Comment