Search This Blog

Thursday, 27 June 2024

माझी वसुंधरा अभियांनातर्गत वृक्षारोपण



माझी वसुंधरा अभियांनातर्गत वृक्षारोपण

चंद्रपूर, दि. 27 : भूमी,जल, वायु, अग्नी व आकाश या निर्सगाशी संबंधित पंचतत्वावर आधारित माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत आंतरराष्ट्रीय योग दिनाचे  औचित्य साधून  उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) मिना साळुंखे  यांच्या हस्ते वटवृक्षाची लागवड करण्यात आली. तसेच बहुसंख्य ग्रामस्थांच्या उपस्थितीत सदर अभियान ग्रामपंचायत मोरवा येथे राबविण्याबाबत संकल्प करून हरित शपथ घेण्यात आली.

यावेळी सरपंच स्नेहा साव, उपसरपंच भूषण पिदूरकर, गटविकास अधिकारी धनंजय साळवे, ग्रामपंचायत सदस्य मिनाक्षी बन्सोड आदी उपस्थित होते.

००००००

No comments:

Post a Comment