Search This Blog

Friday, 21 June 2024

जिल्ह्याकरीता पाच गोदाम बांधकाम करण्याचे उद्दिष्ट

 

जिल्ह्याकरीता पाच गोदाम बांधकाम करण्याचे उद्दिष्ट

Ø 5 जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 21 : राष्ट्रीय अन्न सुरक्षा भात व कडधान्य तसेच राष्ट्रीय खादयतेल अभियान सन 2024-25  करीता गोदाम बांधकासाठी अर्ज मागविण्यात आले आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा भात पिकासाठी 2, कडधान्यासाठी 2 तसेच  राष्ट्रीय खादयतेल अभियान अंतर्गत 1 असे एकूण 5 गोदाम बांधकामाचे जिल्हयास लक्षांक प्राप्त आहे. ज्या ठिकाणी भात, कडधान्य व गळीतधान्य पिके घेतली जातात तथापी गोदामाची व्यवस्था नाही, अशा ठिकाणी गोदाम बांधकाम करावे. 250 मे. टन क्षमतेचे गोदाम बांधकाम करण्यासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा जास्तीत जास्त 12 लक्ष 50 हजार, यापैकी जी रक्कम कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय राहील.

 सदर बाब बँक कर्जाशी निगडीत असून केंद्र शासनाच्या ग्रामीण भंडारण योजना/नाबार्डच्या मार्गदर्शक सूचना लागु राहतील. सदर घटकासाठी शेतकरी उत्पादक संघ/कंपनी (FPO/FPC) यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात 5 जुलै 2024 पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने केले आहे.

०००००

No comments:

Post a Comment