Search This Blog

Sunday, 18 August 2024

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत 19 व 20 ऑगस्ट रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

 

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत 19 व 20 ऑगस्ट रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

चंद्रपूर दि. 18 : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाद्वारे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून या योजनेअंतर्गत 12 पास विद्यार्थ्यांना प्रतिमाह 6 हजार रुपये, आय.टी.आय./ पदविका विद्यार्थ्यांना 8 हजार रुपये तर पदवीधर/ पदव्युत्तर विद्यार्थ्यांना दरमहा 10 हजार रुपये विद्यावेतन देण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत उमेदवारांना कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच जिल्हा परिषद, चंद्रपूर येथे 19 व 20 ऑगस्ट रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून इच्छुक उमेदवारांनी या रोजगार मेळाव्यात ऑफलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) श्याम वाखर्डे यांनी केले आहे.

0000000

No comments:

Post a Comment