Search This Blog

Tuesday, 5 May 2026

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या 750 व्या जयंतीनिमित्त ‘ज्ञानियांचा राजा – मोगरा’ कार्यक्रमाचे आयोजन


संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या 750 व्या जयंतीनिमित्त ज्ञानियांचा राजा – मोगरा’ कार्यक्रमाचे आयोजन

Ø आध्यात्मिक व सांस्कृतिक उपक्रमातून संत विचारांचा जागर

चंद्रपूरदि. 05 : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या 750 व्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राज्यभर विविध आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहेत्याच अनुषंगाने 6 मे रोजी सायंकाळी 6 वाजता प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृह येथे ज्ञानियांचा राजा – मोगरा हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

संत ज्ञानेश्वर माऊली यांनी ‘भावार्थदीपिका’ अर्थात ‘ज्ञानेश्वरी’ या ग्रंथाद्वारे भगवद्गीतेचा सोपा व सुगम मराठी भावार्थ लोकांपर्यंत पोहोचवलात्यांच्या कार्यातून समताबंधुभावभक्ती आणि मानवतेचा संदेश समाजात रुजलावारकरी संप्रदायातील त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे मानले जाते आणि आजच्या काळातही त्यांच्या विचारांची प्रेरणा समाजाला मार्गदर्शक ठरत आहे.

या कार्यक्रमात प्रबोधनकार गणेश शिंदे यांचे संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या जीवनकार्यावर आधारित विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहेत्यांच्या व्याख्यानातून संतांच्या अध्यात्मदृष्टिकोनाचा सखोल उलगडा तसेच समाजप्रबोधनातील त्यांच्या योगदानावर प्रकाश टाकण्यात येणार आहेयाशिवाय अभंगभजन व इतर सांस्कृतिक सादरीकरणांद्वारे कार्यक्रम अधिक रंगतदार होणार आहे.

सदर कार्यक्रम राज्याचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲडआशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉकिरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत आहेसांस्कृतिक कार्य संचालनालयमहाराष्ट्र राज्यमुंबई यांच्या वतीने या कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन करण्यात आले असूनराज्याच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा गौरव व प्रसार करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.

चंद्रपूर व परिसरातील नागरिकवारकरी बांधवविद्यार्थी आणि रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावाअसे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत करण्यात आले आहे.

००००००

No comments:

Post a Comment