चर्मकार विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि. 07 : संत रोहीदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत चर्मकार समाजातील चांभार ढोर, होलार, मोची या जातीतील समाजबांधवासाठी स्वयंरोजगाराकरिता सन 2026-27 या चालु वर्षात विशेष घटक योजना (50 हजार रुपये) व बिज भांडवल (50 हजार ते 5 लाखांपर्यंत) या योजनांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.
विशेष घटक योजनेमध्ये 25 हजार रुपये अनुदान व बिज भांडवल योजनेमध्ये 50 हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे. 18 ते 50 वयोगटातील इच्छुक व्यक्तींनी अधिक माहितीसाठी संत रोहीदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, चंद्रपूर येथील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे जिल्हा व्यवस्थापक यांनी कळविले आहे.
००००००
No comments:
Post a Comment