धान विक्रीकरीता शेतक-यांनी नोंदणी करावी
चंद्रपूर, दि. 21 : आधारभुत किंमत खरेदी योजना पणन हंगाम 2026-27 मध्ये म.रा. सह. आदिवासी विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालय, चंद्रपूर अंतर्गत जिल्हयातील चिमूर, वरोरा, भद्रावती, सिंदेवाही, नागभिड, गोंडपिपरी, पोंभुर्णा व राजुरा या तालुक्यामध्ये आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे 34 व महामंडळाचे 1 असे एकूण 35 खरेदी केंद्र मंजुर करण्यात आले आहेत.
खरीप पणन हंगाम 2026-27 मधील धान विक्रीकरीता शेतकऱ्यांना नाव नोंदणीचा कालावधी 1 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर 2026 पर्यंत निश्चित केला आहे. याकरीता ई-पीक पहाणी केलेल्या शेतकऱ्यांकडून नाव नोंदणी करण्यात येणार असून सर्व शेतकऱ्यांनी दिलेल्या मुदतीत ई-पीक पहाणी करून घ्यावी. आधारभुत किंमत खरेदी योजनेचा लाभ घेण्यास इच्छूक असलेल्या सर्व शेतकऱ्यांनी शासनाने ठरवून दिलेल्या खरेदी केंद्रावर उपस्थित राहून ऑनलाईन नोंदणी करावी.
आवश्यक कागदपत्रे : आधार कार्ड, बँक पासबुक, 7/12 उतारा, नमुना 8 अ, आधार संलग्न मोबाईल क्रमांक, ॲग्रीस्टॅक संकेतस्थळावरील फार्मर आयडी, ई-केवायसी केलेले बँक पासबुक व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित खरेदी केंद्रावर सादर करावीत व योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक कार्यालय चंद्रपूर यांनी केले आहे.
००००००
No comments:
Post a Comment