Search This Blog

Tuesday, 8 September 2026

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह, आधार व स्वयंम योजनेतंर्गत प्रवेशासाठी मुद्दतवाढ

 

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह, आधार व स्वयंम योजनेतंर्गत प्रवेशासाठी मुद्दतवाढ

चंद्रपूर, दि. 08 : शैक्षणिक सत्र 2026-27 करिता इतर मागास प्रवर्गातील मुला/मुलींसाठी शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या मुलां-मुलींच्या वसतिगृहांमध्ये तसेच आधार व स्वयंम योजनेतंर्गत 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.

शासनाच्या https://hmasnew.mahait.org या ऑनलाईन पोर्टलवर शासकीय वसतीगृह असलेल्या जिल्ह्यासाठी वसतीगृह, पंडित दिनदयाल स्वयंम व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी 12 वी नंतरच्या व्यवसायिक व बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या, पदवी आणि पदव्युतर अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी 15 सप्टेंबर 2026 पर्यंत अर्ज भरावा. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रिंट व आवश्यक कागदपत्रे संबंधित वसतिगृहास विहीत मुदतीत सादर करावी. तसेच शासकीय वसतीगृहासाठी पात्र असलेल्या तथापि गुणवत्तेनुसार व वसतीगृहाच्या क्षमतेअभावी वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज पंडित दिनदयाल स्वयंम व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी विचारात घेतले जातील.

शासकीय वसतीगृह उपलब्ध नसलेल्या जिल्ह्यासाठी पंडित दिनदयाल स्वयंम योजना व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनांचे अर्ज https://hmasnew.mahait.org या ऑनलाईन पोर्टलवर दि. 15 सप्टेंबर 2026 पर्यंत भरून ऑनलाईन भरलेला अर्जाची प्रिंट व आवश्यक कागदपत्रे संबंधीत वसतिगृहास विहीत मुदतीत सादर करावी.

अधिक माहितीकरीता इमाव, विमाप्र व विजाभज मुलां-मुलींचे शासकीय वसतीगृह, चंद्रपूर, येथील गृहपाल तसेच सहाय्यक संचालक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक डॉ. सचिन मडावी यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment