Search This Blog

Monday, 20 April 2020

जिल्हा सहाय्यता निधीत आतापर्यंत 61 लक्ष रुपये जमा


प्रशासनातर्फे मदतीचे आवाहन
चंद्रपूर, दि. 20 एप्रिल : देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोना विषाणूच्या या संकटावर मात करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्यापरिने गरजू लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करीत असून या संकटावर मात करण्यासाठी आवश्यक निधी कोविड-19 या माध्यमातून जमा केला जात आहे.
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मदत निधीचे जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनास उत्तम प्रतिसाद मिळत असून, आजपर्यंत सुमारे 61 लक्ष रुपयांचा निधी जिल्हाधिकारी सहाय्यता निधीसाठी उपलब्ध झाला आहे. जिल्हा सहायता  निधीच्या स्वतंत्र बँक खात्यात दानशूर व्यक्ती व संस्थानी सामोरे येऊन योगदान दिले आहे.
आज प्रामुख्याने महिला को ऑपरेटिव्ह सहकारी संस्था नवरगावच्या वतीने रु.1 लक्ष, श्रीमती विनोदिनी मून यांच्याकडून रु.22 हजार, रुचिता रेगुडंवार त्यांच्याकडून रु.11 हजार तर विजय चिताडे चंद्रपूर यांच्याकडून रु.10 हजाराचा धनादेश जिल्हा सहाय्यता निधीस देण्यात आला.
त्यासोबतच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 या स्वतंत्र बँक खात्यामध्ये अंत्योदय स्वयंरोजगार सेवा सह.संस्था चंद्रपूर च्या वतीने रु.25 हजार, अशोक रामटेके चंद्रपूर यांच्याकडून रु.16 हजार 500, श्रीमती रेखा मगरे यांच्याकडून रु.11 हजार, प्रमोद विधाते, लिलावती पालनवार चंद्रपूर यांच्याकडून प्रत्येकी रु.10 हजार इतका मदतनिधी देण्यात आला. तर  झुल्लुरवार ट्रान्सपोर्ट कंपनी चंद्रपूरच्या वतीने रु.21 हजाराचा धनादेश प्रधानमंत्री सहायता निधीस देण्यात आला.
कलेक्टर चंद्रपूर कोव्हिड-19 या नावाने जिल्ह्यातील अग्रणी बँक ऑफ इंडियामध्ये ‍ स्वतंत्र खाते उघडण्यात आले असून खाते क्रमांक  960310210000048  असून यासाठी आयएफएससी कोड  BKIDOOO9603  असा आहे. जिल्ह्यातील उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वंयसेवी संस्था,धार्मिक संस्था राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात त्या सर्व  संस्था आणि नागरिकांनी  सढळ  हाताने मदतीची रक्कम जमा  करावी  असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment