Search This Blog

Wednesday, 22 April 2020

चला धावूया जिल्ह्याच्या मदतीला सहाय्यता निधीमध्ये आतापर्यंत 62 लक्ष


चंद्रपूर दि.22 एप्रिल :कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना पाठबळ म्हणून  जिल्हा सहायता निधीच्या स्वतंत्र बँक खात्यात  दानशूर व्यक्ती व संस्थांनी योगदान द्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार  यांनी केले होते. त्याला अनुसरून गेल्या काही दिवसांपासून या निधीकडे आर्थिक मदत जमा करण्याचा ओघ सुरू झाला आहे. आज नानाजी बोंढाले वरोरा यांच्याकडून रु.20 हजाराचा धनादेश प्रधानमंत्री सहायता निधीस देण्यात आला.
            आज प्रामुख्याने अथर्व कॉलनी विकास समिती चंद्रपूरच्या वतीने रु.11 हजार तर सदाशिव पचारे चंद्रपूर यांच्याकडून रु.25 हजाराचा धनादेश जिल्हा सहायता निधीस देण्यात आला.
            त्या सोबतच मुख्यमंत्री सहायता निधी कोविंड-19 या स्वतंत्र बँक खात्यामध्ये एसीसी चांदा सिमेंट वर्क एम्प्लॉईज युनियन च्या वतीने रु.10 लक्ष 2 हजार तर प्रेसिडेंट मराठा सिमेंट वर्क कामगार संघटना यांच्यावतीने रु.8 लक्ष 39 हजार 773, चंद्रपूर जिल्हा सहकारी स्वस्त धान्य दुकानदार संघ चंद्रपूर यांच्याकडून रु.40 हजार, तर अतुल एचपी गॅस पोंभुर्णा यांचेकडून रु.10 हजाराचा धनादेश देण्यात आला.
कोरोना: मदत करायचीय ? 'या' बँक खात्यात पैसे जमा करा !
कलेक्टर चंद्रपूर कोव्हिड-19 या नावाने जिल्ह्यातील अग्रणी बँक ऑफ इंडियामध्ये ‍ स्वतंत्र खाते उघडण्यात आले असून खाते क्रमांक  960310210000048  असून यासाठी आयएफएससी कोड  BKIDOOO9603  असा आहे. जिल्ह्यातील उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वंयसेवी संस्था,धार्मिक संस्था राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात त्या सर्व संस्था आणि नागरिकांनी सढळ हाताने मदतीची रक्कम जमा  करावी  असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.
000000

No comments:

Post a Comment