Search This Blog

Friday, 24 April 2020

सरकारी,सहकारी व धार्मिक संस्थांकडून जिल्हा सहाय्यता निधीला हातभार


आतापर्यंत 63 लक्ष रुपये जमा; प्रशासनाचे मदतीचे आवाहन
चंद्रपूर,दि.24 एप्रिल:  देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोना विषाणूच्या या संकटावर मात करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्यापरीने गरजू लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करीत असून या संकटावर मात करण्यासाठी आवश्यक निधी कोविड-19 या माध्यमातून जमा केला जात आहे.
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मदत निधीचे जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनास उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
आज प्रामुख्याने प्रधानमंत्री सहायता निधीमध्ये संचालक, जन शिक्षण संस्था चंद्रपुर यांच्यावतीने रु.25 हजाराचा धनादेश देण्यात आला.चिमूरचे तहसीलदार संजय नागटिळक यांच्याकडून जिल्हा सहायता निधीस रु.25 हजाराचा धनादेश देण्यात आला. तर सुशिलाबाई मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क  पडोली चंद्रपुरच्या वतीने रु.70 हजार 770, विदर्भ महिला क्रेडिट को-ऑपरेटिव्ह  सोसायटी वरोराच्या वतीने रु.10 हजार, श्री. सद्गुरू आडकूजी महाराज ग्रामीण बिगर शेती सह. पतसंस्था नागभीड व शंकर गौरकार चंद्रपूर यांच्याकडून प्रत्येकी रु. 11 हजाराचा धनादेश सहायता निधीस देण्यात आला.
      त्यासोबतच मुख्यमंत्री सहायता निधी कोविंड-19 या स्वतंत्र बँक खात्यामध्ये चंद्रपूर शिवसेना महानगरप्रमुख श्री.प्रमोद पाटील यांच्याकडून रु.1 लक्ष 11 हजार 111, तर इन्फंट जेसस इंग्लिश पब्लिक हायस्कूल, राजुराच्या वतीने रु.51 हजाराचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधी देण्यात आला.
मदत करायचीय ? 'या' बँक खात्यात पैसे जमा करा !
      कलेक्टर चंद्रपूर कोव्हिड-19 या नावाने जिल्ह्यातील अग्रणी बँक ऑफ इंडियामध्ये ‍ स्वतंत्र खाते उघडण्यात आले असून खाते क्रमांक  960310210000048  असून यासाठी आयएफएससी कोड  BKIDOOO9603  असा आहे. जिल्ह्यातील उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वंयसेवी संस्था,धार्मिक संस्था राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात त्या सर्व संस्था आणि नागरिकांनी सढळ हाताने मदतीची रक्कम जमा  करावी  असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment