Search This Blog

Friday, 17 April 2020

माजी आमदार संजय धोटे यांच्याकडून प्रधानमंत्री सहाय्यता निधीस मदत


सहाय्यता निधीस मदत करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

चंद्रपूर, दि.17 एप्रिल: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना पाठबळ म्हणून  जिल्हा सहाय्यता निधीच्या स्वतंत्र बँक खात्यात दानशूर व्यक्ती व संस्थांनी योगदान द्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले होते. त्याला अनुसरून गेल्या काही दिवसांपासून या निधीकडे आर्थिक मदत जमा करण्याचा ओघ सुरू झाला आहे. त्यामुळे आज प्रामुख्याने माजी आमदार संजय धोटे यांच्याकडून प्रधानमंत्री सहाय्यता निधीस रु. 25 हजाराचा धनादेश देण्यात आला.
जिल्हा सहाय्यता निधीच्या स्वतंत्र बँक खात्यात डॉ. पुंडलिक डोंगरे यांच्याकडून रु.21 हजार, श्री स्वप्निल सावे यांचेकडून रु.41 हजाराचा धनादेश देण्यात आला. त्यासोबतच युवाशक्ती दुर्गा उपासक संस्था पोंभुर्णा,मित्रमंडळी नागरी सह. पतसंस्था सेवा सहकारी संस्था, शेरज, आदिवासी विविध कार्यकारी सह. संस्था पारडी, आदिवासी विविध कार्यकारी सह. संस्था गडचांदूर, सेवा सहकारी संस्था भोयेगाव, कढोली, विविध कार्यकारी सह. संस्था ब्रह्मपुरी, संजीवनी महिला नागरी सह.पतसंस्था मुल, ग्रामीण विकास सेवकांची सह.पतसंस्था राजोली, प्राथमिक क्रेडिट सह.संस्था कळमगव्हाणच्या वतीने प्रत्येकी रु.5 हजाराचा धनादेश जिल्हा सहायता निधीस देण्यात आला. कन्झुमर्स  को-ऑपरेटिव्ह स्टोअर्स ओ.एफ. चांदा, पंचायत समिती कर्मचारी सह.पतसंस्था वरोरा, उत्कर्ष ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था बेबांळच्या वतीने प्रत्येकी रु.10 हजार तर भारतीय ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ सेवकांची सहकारी पतसंस्था, सेवा सहकारी संस्था खैरी कडून  प्रत्येकी रु.11 हजाराचा धनादेश देण्यात आला.
 त्यासोबतच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 या स्वतंत्र बँक खात्यामध्ये युवाशक्ती दुर्गा उपासक संस्था पोंभुर्णा, विलास इंटरप्राईजेस व इलेक्ट्रिकल, अनंत ठाकरे, श्रीमती सुनीता विरूटकर, लीलावती पालनवार यांच्यावतीने प्रत्येकी रु.10 हजाराचा धनादेश सहायता निधीस देण्यात आला.
 कलेक्टर चंद्रपूर कोव्हिड-19 या नावाने जिल्ह्यातील अग्रणी बँक ऑफ इंडियामध्ये ‍ स्वतंत्र खाते उघडण्यात आले असून खाते क्रमांक  960310210000048  असून यासाठी आयएफएससी कोड  BKIDOOO9603  असा आहे. जिल्ह्यातील उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वंयसेवी संस्था,धार्मिक संस्था राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात त्या सर्व  संस्था आणि नागरिकांनी सढळ हाताने मदतीची रक्कम जमा करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
000000

No comments:

Post a Comment