Search This Blog

Wednesday, 4 March 2026

6 मार्च रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन


 

6 मार्च रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

चंद्रपूर, दि. 04 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध व्हावी, या हेतूने आठवडयाच्या प्रत्येक शुक्रवारी प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्याचा उपक्रम ठरविण्यात आला आहे. या अनुषंगाने 6 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय भवन चंद्रपूर येथे प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजीत करण्यात येत आहे

            जिल्ह्यातील 10 वी, 12 वी, आय.टी.आय. पदविका, पदवी इत्यादी उमेदवारांना विविध क्षेत्रात निर्माण होत असलेल्या रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने, जिल्ह्यातील नामांकीत उद्योजकांचा थेट नोकरी इच्छुक उमेदवारांशी संपर्क करण्याच्या हेतूने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. मेळाव्याकरीता उमेदवारांनी आधारकार्ड व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्राचे तसेच रिझ्यूमच्या प्रतीसह (कमीत कमी तीन प्रती) उपस्थित राहावे.

तरी अधिक माहितीकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर दूरध्वनी क्रमांक 07172 – 252295 यावर संपर्क करावा. जिल्ह्यातील जास्तीत जास्त उद्योजकांनी प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये सहभागी होण्याकरिता www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नोंदणी करावी तसेच रिक्त पदे अधिसूचीत करावी, असे आवाहन सहायक आयुक्त, यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment