Search This Blog

Tuesday, 28 April 2026

योग्यता प्रमाणपत्र व अनुज्ञप्ती चाचणी वेळेत बदल


योग्यता प्रमाणपत्र व अनुज्ञप्ती चाचणी वेळेत बदल

चंद्रपूर, दि. 28 :  जिल्ह्यात उन्हाची तिव्रता व वाढते तापमान पाहता प्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूरतर्फे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण व अनुज्ञप्ती चाचणीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. योग्यता प्रमाणपत्र नुतणीकरण व चाचणी आता सकाळी 7 ते दुपारी 12 आणि दुपारी 4 ते 6 या वेळे दरम्यान घेण्यात येणार आहे. दुपारी 12 ते 4 या दरम्यान नुतणीकरण व चाचणी बंद राहील.

तसेच ज्या पुर्वनियोजीत मुलाखती आहेत, त्या उपरोक्त वेळेत घेण्यात येईल, याची नोंद नागरिकांनी घ्यावी, असे चंद्रपूर प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment