Search This Blog

Wednesday, 15 April 2026

अनुसूचित जातीच्या नवउद्योजकांसाठी मार्जिन मनी योजना लाभदायक

 

अनुसूचित जातीच्या नवउद्योजकांसाठी मार्जिन मनी योजना लाभदायक

Ø डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह

चंद्रपूर, दि. 15 : अनुसुचित जातींमध्ये अलिकडच्या काळात उद्योगांविषयी जनजागृती होत असून नवउद्योजकांकरीता शासनाची मार्जिन मनी योजना अतिशय लाभदायक आहे. अनुसुचित जातीतील उद्योजकांनी या योजनेचा लाभ घेऊन स्वतःचा विकास करावा, असे प्रतिपादन जिल्हा उद्योग केंद्राचे उपमहाव्यवस्थापक श्री. खरमाटे यांनी केले.

सामाजिक न्याय विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा अग्रणी बँकेचे प्रतिक गोंडाणे, बँक ऑफ महाराष्ट्राचे पंकज भैसारे, बँक ऑफ इंडियाचे आर. के. सिन्हा, समाज कल्याणचे सहाय्यक लेखाधिकारी दिपक धात्रक, बँक ऑफ महाराष्ट्राचे अक्षय सातकर, इंडियन ओवरसिस बँकेचे कार्तिक खोब्रागडे, समाज कल्याण निरीक्षक मनोज माकोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

उपस्थित बँकेच्या अधिकाऱ्यांनी मार्जिन मनी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणी यावर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन बार्टीचे प्रकल्प अधिकारी सचिन फुलझेले यांनी तर आभार समाज कल्याण निरीक्षक मनोज माकोडे यांनी मानले. कार्यक्रमाला बहुसंख्य नवउद्योजकांसह सहाय्यक आयुक्त विनोद मोहतुरे यांच्या मार्गदर्शनात समाज कल्याण कार्यालयाचे निरीक्षक मनोजकुमार माकोडे, पुनम आसेगावकर, श्वेता लक्कावार, कनिष्ठ लिपीक संदिप वाढई, गणेश खोटे, सुरज डांगे, राहुल आकुलवार, सचिन राऊत, अमोल गोहणे, राहुल अंड्रसकर, वैशाली ठाकरे, उषा मुंढे, उषा लोणकर, आदी उपस्थित होते.

००००००

No comments:

Post a Comment