Search This Blog

Monday, 13 April 2026

16 एप्रिल रोजी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

 16 एप्रिल रोजी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

चंद्रपूर, दि.13 :  पर्यावरण व वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे ह्या 16 एप्रिल 2026 रेाजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

16 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन, सकाळी 11 वा. चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन, दुर्गापूर येथे प्रदूषणसंबंधी पाहणी व जनतेच्या भेटी,  दुपारी 12 वा. बेलसणी येथे आगमन व कोल वॉशरी यांची पाहणी, दुपारी 12.30 ते 2.30 आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या निवासस्थानी राखीव, दुपारी 2.30 वा.  भिवापूर येथे आगमन व झरपट नदी प्रदूषण सद्यस्थिती बाबत पाहणी, दुपारी 3 वा. नियोजन भवन येथे चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदुषण प्रश्नांबाबत शासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक, 3.30   वा . चंद्रपूर जिल्ह्यातील पशुपालकांच्या प्रश्नांबाबत शासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक, दुपारी 4 वा. गडचांदूर कडे प्रयाण, सायंकाळी 5 वाजता गडचांदूर येथे आगमन व अल्ट्राटेक सिमेंट, माणिकगड, येथे प्रदूषण संबंधी पाहणी व जनतेच्या भेटी,  सायंकाळी 6 वा. बॉटनिकल गार्डन, विसापूर कडे प्रयाण, सायं. 7 वा. बॉटनिकल गार्डन येथे चंद्रपूर जिल्ह्यातील महत्वाच्या  व्यक्तींसोबत प्रदूषणावरील उपाययोजनाबाबत चर्चा व राखीव, रात्री 7.30 वा. ताडोबा राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर कडे प्रयाण, रात्री 9 वा. ताडोबा राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर येथे राखीव.

००००००

No comments:

Post a Comment