Search This Blog

Tuesday, 21 April 2026

शासकीय हमीभावने धान खरेदीची ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन


शासकीय हमीभावने धान खरेदीची ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

Ø अंतिम मुदत 30 जून पर्यंत

चंद्रपूर, दि. 21 :  रब्बी हंगाम 2025-26 मधील शासनाने निश्चित केलेल्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत, कृषी उत्पन्न बाजार समिती खरेदी केंद्र, चंद्रपूर येथे धान व भरडधान्य खरेदी करण्यात येणार आहे. धान प्रति क्विंटल 2369 रुपये असून शासनाने दिलेल्या निकषानुसार एफ.ए.क्यु. दर्जाचा शेतमाल खरेदी करण्यात येईल. धान खरेदीची ऑनलाईन नोंदणी शासनाच्या पोर्टलवर आधार प्रमाणीकरण करून बायोमेट्रिक पध्दतीने करण्यात आहे. त्याकरीता शेतकऱ्यांना नोंदणी साठी स्वतः हजर राहणे आवश्यक आहे.

ऑनलाईन नोंदणीची मुदत 1 एप्रिल 1 ते 30 जून 2026 पर्यंत असून चंद्रपुर व बल्लारपुर तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी बाजार समिती खरेदी केंद्रावर आधार कार्ड, बँक पासबुक, 7/12 उतारा व मोबाईल क्रमांक या आवश्यक कागदपत्रासह नोंदणी करून घ्यावी व शासकीय हमीभाव योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन चंद्रपूर बाजार समितीकडून करण्यात आले आहे.

००००००

No comments:

Post a Comment