Search This Blog

Thursday 30 September 2021

गुरुवारी जिल्ह्यात 2 कोरोनामुक्त, 1 पॉझिटिव्ह

 

गुरुवारी जिल्ह्यात 2 कोरोनामुक्त, 1 पॉझिटिव्ह

Ø ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 29

चंद्रपूर, दि. 30 सप्टेंबर : गत 24 तासात जिल्ह्यात 2 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 1 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात गुरुवारी एकाही बाधिताचा  मृत्यू झाला नाही.

आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 1 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 0, चंद्रपूर तालुका 0, बल्लारपूर 1, भद्रावती 0, ब्रम्हपुरी 0, नागभीड 0, सिंदेवाही 0, मुल 0, सावली 0, पोंभूर्णा 0, गोंडपिपरी 0, राजूरा 0, चिमूर 0, वरोरा 0, कोरपना 0, जिवती 0 व इतर  ठिकाणच्या 0 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 734 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 164 झाली आहे. सध्या 29 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 7 लाख 2 हजार 33 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 6 लाख 11 हजार 814 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1541 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

 

       


पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

चंद्रपूर दि. 30 सप्टेंबर : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

            शनिवार, दि. 2 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता पालेबारसा, ता. सावली जि. चंद्रपूर येथे आगमन व महात्मा गांधी जयंतीनिमित्त पालकमंत्री यांच्या संकल्पनेतून आयोजित ‘समस्या मुक्त गाव अभियान’ कार्यक्रमांस उपस्थित. सायंकाळी 4 वाजता पालेबारसा येथून सावलीकडे प्रयाण. सायंकाळी 4.30  वाजता वनविभाग कार्यालय, सावली येथे आगमन व वनविभागातर्फे आयोजित वन्यजीव सप्ताह कार्यक्रमास उपस्थित. सायंकाळी 6 वाजता सावली येथून गडचिरोलीकडे प्रयाण.

रविवार दि. 3 ऑक्टोबर 2021 रोजी दुपारी 2.45 वाजता शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे आगमन व तालुक्यातील विकास कामांबाबत आढावा बैठक. सायंकाळी 6 वाजता ब्रह्मपुरी येथून नागपूरकडे प्रयाण.

मंगळवार दि. 5 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 10.45 वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे आगमन. सकाळी 11 वाजता पोलिस ग्राउंड, चंद्रपूर येथे राज्य शासनाकडून प्राप्त अद्यावत रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित. सकाळी 11.30 वाजता धान खरेदी संदर्भात करावयाच्या पूर्वतयारीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक. दुपारी 12.15 वाजता रब्बी पिकाचे क्षेत्र वाढविण्यासाठी सिंचाई, कृषी, वीज यासह बी-बियाणे कंपन्यासोबत आढावा बैठक. दुपारी 1 वाजता घरकुल व डाटा एंट्री ऑपरेटर संदर्भात आढावा बैठक. दुपारी 1.45  वाजता वणी- वरोरा- माढेळी बायपास रस्त्याकरीता भूसंपादनाबाबत आढावा बैठक. दुपारी 2.30 ते 3 वाजेपर्यंतचा वेळ राखीव. दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील

वीस कलमी सभागृहात, अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत संबंधित अधिकाऱ्यांसमवेत  बैठक. सायंकाळी 6 वाजता चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण.

00000

शेतकरी आत्महत्येची 13 प्रकरणे मदतीकरीता निकाली

 




शेतकरी आत्महत्येची 13 प्रकरणे मदतीकरीता निकाली

Ø अपर जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा

चंद्रपूर,दि. 30 : शेतीमध्ये सततची नापिकी, कर्जबाजारीपणा व कर्जपरतफेडीचा तगादा या तीन प्रमुख कारणांपैकी शेतकरी आत्महत्या झाली असल्यास संबंधित कुटुंबाला 23 जानेवारी 2006 च्या शासन निर्णयाद्वारे आर्थिक मदत देण्यात येते. त्यानुसार जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या प्रकरणे तपासणीची बैठक अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.

जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत शेतकरी आत्महत्येच्या 16 प्रकरणांवर चर्चा झाली. यापैकी 13 प्रकरणे पात्र करून मदतीकरीता निकाली काढण्यात आली तर 3 प्रकरणे समितीने अपात्र ठरविली.

‘ते’ आत्महत्याग्रस्त कुटुंब मदतीस पात्र : भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील शेतकरी आत्महत्या केलेले कुटुंब मदतीसाठी पात्र करण्यात आले आहे. सदरचा निर्णय जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत घेण्यात आला. संबंधित शेतक-यावर आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे 35 हजार रुपये कर्ज व त्यावरील 7385 रुपये व्याज असे एकूण 42385 रुपयांचे कर्ज होते.   

बैठकीला अपर जिल्हाधिकारी यांच्यासह तहसीलदार यशवंत धाईत, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अनिल वानखेडे, डॉ. मेश्राम, जिल्हा उपनिबंधक कार्यालय, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

000000

35 रक्तदान शिबिरातून 1411 रक्तपिशव्यांचे संकलन

 

35 रक्तदान शिबिरातून 1411 रक्तपिशव्यांचे संकलन

Ø जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने रक्तदान शिबिरांचे आयोजन

चंद्रपूर दि.30 सप्टेंबर: 1 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय स्वेच्छिक रक्तदान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जिल्ह्यात रक्ताची गरज लक्षात घेता जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केलेल्या आवाहनाला औद्योगिक समुहांनी प्रतिसाद देत रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यास सुरवात केली आहे. तसेच सप्टेंबर महिन्यात विविध ठिकाणी झालेल्या 35 शिबिरातून 1411 रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आल्याची माहिती रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. अनंत हजारे यांनी दिली.

            जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी रक्तदान चळवळीत सहभाग नोंदवून युद्धस्तरावर अनेक उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. याकरीता सर्व औद्योगिक समूहांच्या व्यवस्थापकांसोबत त्यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठका आयोजित केल्या. जिल्ह्यातील विविध उद्योगसमूहांना रक्तदान चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत औद्योगिक समूहांनी रक्तदान शिबिराचे आयोजन सुरू केले आहे. या रक्तदान शिबिराला जिल्हाधिकारी स्वतः उपस्थित राहून तेथील शिबीर आयोजक व रक्तदात्यांना प्रोत्साहन देत आहे.

तसेच जिल्ह्यामध्ये वर्षभर रक्तदान शिबिराचे आयोजन व्हावे, याकरीता सर्व शासकीय, निमशासकीय विभागाला तसेच राष्ट्रीयकृत बँकाना सातत्याने आवाहन करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने चंद्रपूर महानगरपालिका तसेच सार्वजनिक बांधकाम विभागात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. औद्योगिक क्षेत्रात माहे सप्टेंबर महिन्यात  9  उद्योगसमूहांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले. यात आतापर्यंत एकूण 525 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.

सप्टेंबर महिन्यात एकूण 35 रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. यात एकूण 1411 रक्तपिशव्यांचे रक्तसंकलन करण्यात आले आहे. या रक्तसंकलनामध्ये  जिल्ह्यातील सर्व सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सेवाभावी संस्थेने तसेच स्वच्छिक रक्तदात्यांनी सहभाग घेतला. याकरीता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नितनवरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत व रक्त संक्रमण अधिकारी डॉ. अनंत हजारे यांचे सहकार्य लाभले आहे.

00000


Wednesday 29 September 2021

बुधवारी जिल्ह्यात 2 कोरोनामुक्त, 2 पॉझिटिव्ह


बुधवारी  जिल्ह्यात 2 कोरोनामुक्त, 2 पॉझिटिव्ह

Ø ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 30

चंद्रपूर, दि. 29 सप्टेंबर : गत 24 तासात जिल्ह्यात 2 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 2 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात बुधवारी एकाही बाधिताचा  मृत्यू झाला नाही.

आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 2 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 1, चंद्रपूर तालुका 0, बल्लारपूर 0, भद्रावती 1, ब्रम्हपुरी 0, नागभीड 0, सिंदेवाही 0, मुल 0, सावली 0, पोंभूर्णा 0, गोंडपिपरी 0, राजूरा 0, चिमूर 0, वरोरा 0, कोरपना 0, जिवती 0 व इतर  ठिकाणच्या 0 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 733 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 162 झाली आहे. सध्या 30 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 7 लाख 757 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 6 लाख 10 हजार 642 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1541 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

नवयुवक-युवतींनी देशरक्षणासाठी पुढे येऊन शौर्य परंपरेची ज्योत तेवत ठेवावी - कॅप्टन दीपक लिमसे


नवयुवक-युवतींनी देशरक्षणासाठी पुढे येऊन शौर्य परंपरेची ज्योत तेवत ठेवावी

- कॅप्टन दीपक लिमसे

Ø 29 सप्टेंबर शौर्य दिन म्हणून साजरा

चंद्रपूर दि. 29 सप्टेंबर : देशासाठी बलिदान करण्याची तसेच शौर्याची व त्यागाची परंपरा आपल्या राज्याला लाभलेली आहे. या परंपरेला अनुसरून देशाच्या अखंडत्वासाठी महाराष्ट्रातील तिन्ही दलातील अनेक जवान आणि अधिकाऱ्यांनी आपले सर्वोच्च बलिदान दिले आहे. शौर्याची हीच परंपरा कायम ठेवून नवयुव-युवतींनी देश रक्षणासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन दीपक लिमसे यांनी केले.

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात आयोजित शौर्य दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कॅप्टन सुखविंदर सिंह सहोता तसेच वीर पत्नी व वीर माता-पिता, माजी सैनिक प्रामुख्याने उपस्थित होते.

पुढे श्री. लिमसे म्हणाले, सर्व आजी-माजी सैनिकांच्या आणि शहीद जवानांच्या मागे राहिलेल्या वीरपत्नी व वीर माता-पित्यांना विनम्र वंदन तसेच त्यांच्या शौर्याची आणि बलिदानाची ज्योत समाजामध्ये सतत तेवत ठेवण्यासाठी 29 सप्टेंबर हा दिवस शौर्य दिवस म्हणून साजरा केला जातो. नवयुवक-युवतींनी देशरक्षणासाठी पुढे येऊन महाराष्ट्राच्या शौर्य परंपरेची ज्योत पुढेही तेवत ठेवावी. भविष्यात पाऊल ठेवणारा प्रत्येक नवयुवक-युवती  ज्ञान, बुद्धी, देशभक्ती व सकारात्मक ऊर्जेने भरलेल्या समाजातील एक आदर्श असेल व भविष्यामध्ये चंद्रपूरचे नाव प्रकाशित करेल, उंच स्थानावर ठेवलेल्या दिव्यासारखे तुम्ही सर्व प्रकाशमान व्हा व इतरांना देखील प्रकाशित करा, असेही ते म्हणाले.

भारतीय सैन्याची अभिमानास्पद कामगिरी व त्यांच्या शौर्याची गाथा राज्यातील सर्व जनतेपर्यंत व्यापक प्रसिध्दीद्वारे पोचविण्यासाठी तसेच माजी सैनिकांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 29 सप्टेंबर हा दिवस शौर्य दिन म्हणून साजरा करण्याचे राज्य शासनाने निश्चित केले आहे. त्याचे औचित्य साधून जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात  शौर्य दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी कॅप्टन दीपक लिमसे व कॅप्टन सुखविंदर सिंह सहोता यांच्या हस्ते वीरनारी अरुणा सुनील रामटेके, वीरमाता पार्वती वसंतराव डाहुले व वीरपिता श्री. वसंतराव डाहुले, वीरमाता श्रीमती छाया बाळकृष्णा नवले व वीरपिता बाळकृष्णा नवले तर नायब सुभेदार शंकर गणपती मेंगरे (शौर्य चक्र) यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

00000

Tuesday 28 September 2021

मंगळवारी जिल्ह्यात 5 कोरोनामुक्त, 4 पॉझिटिव्ह


मंगळवारी  जिल्ह्यात 5 कोरोनामुक्त, 4 पॉझिटिव्ह

Ø ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 30

चंद्रपूर, दि. 28 सप्टेंबर : गत 24 तासात जिल्ह्यात 5 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 4 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात मंगळवारी एकाही बाधिताचा  मृत्यू झाला नाही.

आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 4 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 1, चंद्रपूर तालुका 2, बल्लारपूर 1, भद्रावती 0, ब्रम्हपुरी 0, नागभीड 0, सिंदेवाही 0, मुल 0, सावली 0, पोंभूर्णा 0, गोंडपिपरी 0, राजूरा 0, चिमूर 0, वरोरा 0, कोरपना 0, जिवती 0 व इतर  ठिकाणच्या 0 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 731 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 160 झाली आहे. सध्या 30 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 6 लाख 99 हजार 449 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 6 लाख 9 हजार 384 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1541 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

जिल्ह्यात नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभुमीवर कलम 36 लागू

 जिल्ह्यात  नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभुमीवर कलम 36 लागू

चंद्रपूर दि. 28 सप्टेंबर : जिल्ह्यात 7 ऑक्टोंबर 2021  पासून नवरात्र उत्सवास सुरुवात होत आहे.

दरम्यान धम्मचक्र प्रवर्तन दिन, रावण दहन, शस्त्रपूजन व इतर कार्यक्रम येत असल्याने त्यादृष्टीने जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून दि. 6 ऑक्टोंबरच्या रात्री 12 वाजतापासून दि. 19 ऑक्टोंबर 2021 च्या रात्री 12 वाजेपर्यंतच्या कालावधीत महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 36 लागू करण्यात आले आहे.

या कालावधीत सार्वजनिक  शांततेला व सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये, तसेच सार्वजनिक ठिकाणी वागणुकीबाबत, वाद्य वाजविण्याबाबत, सभेचे आयोजन व मिरवणूक काढण्याबाबत, त्याठिकाणी रस्ते निश्चित करण्याबाबत, लाऊडस्पीकर वापरण्याबाबत योग्य निर्बंध व निर्देश देण्याचे अधिकार चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी व त्यांच्यापेक्षा कनिष्ठ दर्जाचे अधिकारी यांना प्रदान करण्यात येत आहे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी  कळविले आहे.

हे आहेत अधिकार:

मिरवणूक व सभेच्या ठिकाणी त्यातील लोकांच्या वागणुकीबाबत योग्य निर्देश देण्याचे अधिकार, मिरवणुकीचा रस्ता व वेळ निर्धारित करणे तसेच धार्मिक पूजास्थानाच्या जवळ लोकांच्या वागणुकीस निर्बंध घालण्याचे अधिकार, मिरवणुकीस बाधा होणार नाही याबाबतचे आदेश तसेच धार्मिक पूजास्थळी लोकांच्या वागणुकीवर निर्बंध घालण्याचे अधिकार,  सार्वजनिक रस्त्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी वाद्य वाजवणे, गाणी गाणे, ढोल ताशे वाजविणे इत्यादी निर्बंध घालण्याचे अधिकार, रस्ते व इतर सर्व सार्वजनिक ठिकाणी सुव्यवस्था ठेवण्यासाठी निर्देश देण्याचे अधिकार, सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर लाऊड स्पीकर वाजविण्यावर निर्बंध तसेच मर्यादा घालण्याचे अधिकार, तसेच कलम 33, 35 ते 40 व 45 मुंबई पोलिस अधिनियमान्वये काढण्यात आलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे व सूचना देण्याचे अधिकार प्रदान करण्यात येत आहे.

सदर आदेश लागू असतांना सभा, मिरवणुकीत वाद्य वाजवणे, लाऊडस्पीकर वाजविणे, मिरवणुकीत नारे लावणे, मिरवणुकीचा रस्ता व वेळ निर्धारित करण्यासाठी संबंधित ठाणे अंमलदार यांची परवानगी घ्यावी. सर्व बाबतीत पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच त्यांच्यापेक्षा कनिष्ठ दर्जाचे सर्व पोलिस अधिकारी यांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करावे. सदर आदेश दि. 6 ऑक्टोंबरचे रात्री 12 वाजेपासुन दि. 19 ऑक्टोंबर 2021 च्या रात्री 12 वाजेपर्यंतच्या कालावधीपर्यंत अंमलात राहील.

00000

गांधी जयंतीपासून जिल्ह्यात ‘समस्या मुक्त गाव’ अभियान


गांधी जयंतीपासून जिल्ह्यात ‘समस्या मुक्त गाव’ अभियान

v पालकमंत्र्यांच्या हस्ते पालेबारसा येथे शुभारंभ

चंद्रपूर, दि. 28 :  ‘खेड्याकडे चला’ असा संदेश राष्ट्रपिता महात्मा गांधींनी दिला होता. त्याचे औचित्य साधून पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या संकल्पनेतून ‘समस्या मुक्त अभियान’ राबविण्यात येणार आहे. गावातील समस्या गावातच सोडविण्यासाठी संपूर्ण प्रशासन 2 ऑक्टोबर रोजी सावली तालुक्यातील पालेबारसा उपस्थित राहणार असून या अभियानाचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.

या अभियानामध्ये पालेबारसा गावासोबतच परिसरातील मंगरमेंढा,सायखेडा,उसरपार चक, उसरपार तुकुम, जानकापूर, बारसागड, मेहा खुर्द, सावंगी दीक्षित, असोला चक, भानापूर या गावातील नागरिकांच्या समस्या सोडविल्या जाणार आहेत. हा कार्यक्रम पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत होणार असून कार्यक्रमास जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, पोलिस अधीक्षक अरविंद साळवे तसेच इतर जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

त्यासोबतच उपविभाग व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित राहणार असून वरील नमूद गावातील नागरिकांनी लेखी स्वरूपात आपल्या समस्या या अभियानाच्या माध्यमातून मांडणे आवश्यक आहे. या अभियानामध्ये गावातील काही पात्र लाभार्थ्यांना सेवा/लाभाचे वाटप पालकमंत्री यांच्या उपस्थितीत होणार आहे. पालेबारसा व परिसरातील नागरिकांनी    दि. 2 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 10 वाजता इंदिरा गांधी विद्यालय, पालेबारसा येथे उपस्थित राहून आपल्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन करण्यात येत आहे.

00000

Sunday 26 September 2021

फिरत्या मोबाईल रुग्णालयाद्वारे आठवडाभरात 1400 रुग्णांची तपासणी



फिरत्या मोबाईल रुग्णालयाद्वारे आठवडाभरात 1400 रुग्णांची तपासणी

Ø पालकमंत्र्यांच्या पुढाकारातून नागरिकांना घरपोच आरोग्य सुविधा

चंद्रपूर दि. 26 सप्टेंबर : ब्रम्हपुरी, सिंदेवाही व सावली तालुक्यासाठी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकारामुळे आयसीआयसीआय बँक फाउंडेशनच्या वतीने तीन फिरते मोबाईल रुग्णालय नागरीकांच्या सेवेसाठी उपलब्ध झाले आहे. आठवडाभरात या फिरत्या मोबाईल रुग्णालयाद्वारे 1403 नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. यात ब्रम्हपूरी तालुक्यातील 552 नागरीक, सिंदेवाही तालुक्यातील 488 आणि सावली तालुक्यात 363 नागरिकांचा समावेश आहे.

ब्रम्हपुरी येथे आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज फिरत्या रुग्णालयाचे (मोबाइल क्लिनीक व्हॅन) पालकमंत्र्यांच्या हस्ते 17 सप्टेंबर रोजी लोकार्पण करण्यात आले होते. दुस-या दिवसापासून सदर तीनही फिरत्या रुग्णालयाद्वारे गावागावात जाऊन नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. आठवडाभरात 14 गावांमध्ये 1403 नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. यात ब्रम्हपूरी तालुक्यातील एकूण 552 जणांचा समावेश असून  किराडी येथील 122 नागरिकांची तपासणी, चिकटबोर्डा येथील 88 जण, एकारा येथील 122, सेलदा येथील 29, मुरपार येथील 75 आणि सायगाव तुकूम येथील 116 जणांची तपासणी करण्यात आली. सिंदेवाही तालुक्यातील पवनचक येथील 82, पवनपार येथील 107, गुंजेवाही येथील 95, कोठा येथील 101, तांबेगाढी – मेंढा येथील 103 असे एकूण 488 तर सावली तालुक्यातील करोडा येथील 50, कोंदेकाल येथील 92, पेढगाव येथील 59, आरोली येथील 72 आणि जाम येथील 90 असे एकूण 363 जणांनी तपासणी करण्यात आली.  

फिरत्या मोबाईल व्हॅनमध्ये एक डॉक्टर, परिचारिका व हेल्पर उपस्थित असून ताप, सर्दी, खोकला, अंगदुखणे, मधूमेह व रक्तदाब तपासणी तसेच ॲन्टीजन तपासणी केली जाते.

मोबाइल ट्रेकिंग सिस्टीम व ॲपचीही सुविधा:

आयसीआयसीआय बँक फाउंडेशनच्या वतीने मेडिकेअर हेल्थ सर्व्हीसेस मार्फत या फिरत्या दवाखान्यामध्ये मोबाइल ट्रेकिंग सिस्टीम व ॲपचीही सुविधा विकसित करण्यात आली आहे. या सिस्टीममध्ये व्हॅनमधील स्वच्छतेसह दररोज होणाऱ्या तपासण्याचा तपशिल, व्हॅन किती किलोमीटर फिरते याचा तपशिल आहे. डॉक्टर-पेशन्ट ॲप हे देखील रुग्णांच्या उपयोगी पडणारे ॲप असून क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर व ॲप डाऊनलोड केल्यानंतर रुग्णांची सर्व माहिती भरल्यास सदर माहिती डॉक्टरांच्या मोबाइलवर जाते.

00000

रविवारी जिल्ह्यात 3 कोरोनामुक्त, 6 पॉझिटिव्ह

रविवारी  जिल्ह्यात 3 कोरोनामुक्त, 6 पॉझिटिव्ह

Ø ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 28

चंद्रपूर, दि. 26 सप्टेंबर : गत 24 तासात जिल्ह्यात 3 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 6 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात रविवारी एकाही बाधिताचा  मृत्यू झाला नाही.

आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 6 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 4, चंद्रपूर तालुका 0, बल्लारपूर 2, भद्रावती 0, ब्रम्हपुरी 0, नागभीड 0, सिंदेवाही 0, मुल 0, सावली 0, पोंभूर्णा 0, गोंडपिपरी 0, राजूरा 0, चिमूर 0, वरोरा 0, कोरपना 0, जिवती 0 व इतर  ठिकाणच्या 0 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 722 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 153 झाली आहे. सध्या 28 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 6 लाख 97 हजार 895 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 6 लाख 7 हजार 772 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1541 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

ई-पीक पाहणी संदर्भात जिल्हाधिकारी ‘ऑनफिल्ड’





ई-पीक पाहणी संदर्भात जिल्हाधिकारी ‘ऑनफिल्ड’

Ø सुट्टीच्या दिवशी पाच तालुक्यांचा दौरा ; शेतक-यांशी संवाद

चंद्रपूर दि. 26 सप्टेंबर : राज्यात 15 ऑगस्ट 2021 पासून ई-पीक पाहणी ॲपद्वारे पिकांच्या नोंदी घेण्यास सुरवात झाली आहे. आपल्या शेतातील शेतमालाच्या नोंदी स्वत: शेतक-यांनी घेऊन सदर ॲपवर अपलोड करावयाच्या आहेत. यासंदर्भात शेतक-यांच्या शंकांचे निराकरण करणे, त्यांना ॲपद्वारे नोंदी घेण्यासाठी प्रवृत्त करणे तसेच प्रत्यक्ष शेतक-यांशी संवाद साधण्यासाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी शनिवार आणि रविवार असे दोन दिवस पाच तालुक्यांचा दौरा केला.

यात भद्रावती, वरोरा, नागभीड, सिंदेवाही आणि मूल या तालुक्यात ई-पीक पाहणीसंदर्भात जिल्हाधिका-यांनी ‘ऑनफिल्ड’ आढावा घेतला. वरोरा तालुक्यात जिल्हाधिका-यांनी सालोरी, पिंपळगाव आणि खांबाडा गावांना भेटी देऊन ई – पीक पाहणीचे प्रात्यक्षिक बघितले. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे, उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, तहसीलदार रोशन मकवाने-सोळंके, नायब तहसीलदार मधुकर काळे, मंडळ अधिकारी, तलाठी तसेच सालोरी येथील सहदेव रामन्ना, पिंपळगाव येथील गणेश ठाकरे आणि खांबाडा येथील शेतकरी रमेश मेश्राम उपस्थित होते.

शेतक-यांशी संवाद साधतांना जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने म्हणाले, शासनाने सुरू केलेल्या या महत्वाकांक्षी प्रकल्पात सर्व शेतकरी बांधवांनी आपला उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवावा. तसेच युद्धपातळीवर हे काम पूर्ण करण्यास शासकीय यंत्रणेस सहकार्य करावे. आपल्या गावाची 100 टक्के पीक पाहणी ही ई - पीक पाहणी ॲपवर  30 सप्टेंबर पर्यंत नोंदवून घ्यावी. प्रत्येक शेतक-याने आपल्या पिकांची नोंद स्वत: घेऊन ॲपवर अपलोड करणे अपेक्षित आहे. ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्कचा प्रश्न असल्यामुळे ज्या मोबाईलचे नेटवर्क आहे, त्याचा उपयोग करावा. एका ॲन्ड्राईड मोबाईलवरून 20 शेतक-यांच्या नोंदी घेता येते, असे जिल्हाधिका-यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले, तरुण पिढी ॲन्ड्राईड मोबाईलचा वापर करीत असल्यामुळे गावातील तरुणांनी ई-पीक पाहणी करण्यास मदत करावी. विशेष म्हणजे आपल्या आई-वडीलांना या कामात मुलांची मदत मिळेल तसेच त्यांची शेतीशी नाळ जुळविणे शक्य होईल. त्यामुळे गावस्तरीय यंत्रणेने तसेच स्थानिक सरपंच व लोकप्रतिनिधींनी यासाठी आपल्या गावातील तरुणांना प्रोत्साहित करावे. तलाठ्यांनी या कामी गावातील युवक व युवतीचे स्वतंत्र गट बनवून त्यांच्या मदतीने येत्या 3 दिवसांत जास्तीतजास्त शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन त्यांनी केले.

        जिल्हाधिका-यांनी भद्रावती तालुक्यातील मौजा कोंढा, टाकळी व नंदोरी या गावांमध्ये, मूल तालुक्यात राजोली, डोंगरगाव आणि चिखली येथे तर सिंदेवाही तालुक्यात पळसगाव जाट, मेंढामाल, लोणवाही व किन्ही या गावात ई-पीक पाहणी संदर्भात भेट दिली. तालुक्यातील सर्व शेतक-यांचा पीक पेरा ई- पीक पाहणी ॲपद्वारे पूर्ण करण्याच्या सुचना त्यांनी यंत्रणेला दिल्या. ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे उभारण्यात येत असलेल्या ऑक्सीजन प्लॉटचीसुध्दा जिल्हाधिका-यांनी पाहणी करून सदर काम तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश वैद्यकीय अधिक्षक यांना दिले.

यावेळी उपविभागीय अधिकारी प्रकाश संपकाळ, तहसीलदार गणेश जगदळे, तालुका कृषी अधिकारी श्री. महल्ले, मुख्याधिकारी डॉ. सुप्रिया राठोड यांच्यासह गावातील सरपंच, पोलिस पाटील तसेच तलाठी व मंडळ अधिकारीसुद्धा उपस्थित होते.

असे आहेत ई – पीक पाहणी ॲपचे फायदे : 15 ऑगस्ट 2021 पासून राज्यात ई-पीक पाहणी ॲपद्वारे पिकांच्या नोंदी घेण्यास सुरूवात झाली आहे. या ॲपमुळे पिकांचे अचूक क्षेत्र वेळेत समजणार असून आर्थिक पाहणी, भविष्यातील कृषी नियोजन करणे शक्य होईल. नैसर्गिक आपत्तीत शेतक-यांना वेळेत अचूकपणे नुकसान भरपाई देण्यास देणे तसेच पीक कर्जाचा लाभ देणे सुलभ होईल. शिवाय स्वत:च्या पिकांची नोंद स्वत: केल्याचे मानसिक समाधान मिळून आपण केलेली नोंद लगेच सातबारावर पाहता येईल. कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यास सदर ॲप उपयुक्त आहे.

00000000

Thursday 23 September 2021

जिल्ह्यात मस्कऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर कलम 36 लागू

 जिल्ह्यात मस्कऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर कलम 36 लागू

चंद्रपूर दि. 23 सप्टेंबर : शुक्रवार दि. 24 सप्टेंबर  ते 4 ऑक्टोंबर 2021 पर्यंत मस्कऱ्या

गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून दि. 23 सप्टेंबरच्या रात्री 12 वाजतापासून दि. 5 ऑक्टोंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंतच्या  कालावधीत महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 36 लागू करण्यात आले आहे.

या कालावधीत सार्वजनिक  शांततेला व सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये, तसेच सार्वजनिक ठिकाणी वागणुकीबाबत, वाद्य वाजविण्याबाबत, सभेचे आयोजन व मिरवणूक काढण्याबाबत, त्याठिकाणी रस्ते निश्चित करण्याबाबत, लाऊड स्पीकर वापरण्याबाबत योग्य निर्बंध व निर्देश देण्याचे अधिकार चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी व त्याच्यांपेक्षा कनिष्ठ दर्जाचे अधिकारी यांना प्रदान करण्यात येत आहे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी  कळविले आहे.

हे आहेत अधिकार:

मिरवणूक व सभेच्या ठिकाणी त्यातील लोकांच्या वागणुकीबाबत योग्य निर्देश देण्याचे अधिकार, मिरवणुकीचा रस्ता व वेळ निर्धारित करणे तसेच धार्मिक पूजास्थानाच्या जवळ लोकांच्या वागणुकीस निर्बंध घालण्याचे अधिकार, मिरवणुकीस बाधा होणार नाही याबाबतचे आदेश तसेच धार्मिक पूजा स्थळी लोकांच्या वागणुकीवर निर्बंध घालण्याचे अधिकार,  सार्वजनिक रस्त्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी वाद्य वाजवणे, गाणी गाणे, ढोल ताशे वाजविणे इत्यादी निर्बंध घालण्याचे अधिकार, रस्ते व इतर सर्व सार्वजनिक ठिकाणी सुव्यवस्था ठेवण्यासाठी निर्देश देण्याचे अधिकार, सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर लाऊड स्पीकर

वाजविण्यावर निर्बंध तसेच मर्यादा घालण्याचे अधिकार, तसेच कलम 33, 35 ते 40 व 45 मुंबई पोलिस अधिनियमान्वये काढण्यात आलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे व सूचना देण्याचे अधिकार प्रदान करण्यात येत आहे.

सदर आदेश लागू असतांना सभा, मिरवणुकीत वाद्य वाजवणे, लाऊड स्पीकर वाजविणे, मिरवणुकीत नारे लावणे, मिरवणुकीचा रस्ता व वेळ निर्धारित करण्यासाठी संबंधित ठाणे अंमलदार यांची परवानगी घ्यावी. सर्व बाबतीत पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच त्यांच्यापेक्षा कनिष्ठ दर्जाचे सर्व पोलिस अधिकारी यांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करावे. सदर आदेश दि. 23 सप्टेंबरचे रात्री 12 वाजेपासुन दि. 5 ऑक्टोंबर 2021 च्या रात्री 12 वाजेपर्यंतच्या कालावधीपर्यंत अंमलात राहील.

00000

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, 2 कोरोनामुक्त


जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, 2 कोरोनामुक्त

Ø ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 24

चंद्रपूर, दि. 23 सप्टेंबर :  जिल्ह्यात गुरुवारी (दि.23) एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. गत 24 तासात जिल्ह्यात 2 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर गुरुवारी एकाही बाधिताचा  मृत्यू झाला नाही.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 710 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 145  झाली  आहे. सध्या 24 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 6 लाख 94 हजार 243  नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 6 लाख 4 हजार 17  नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1541 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

Wednesday 22 September 2021

ब्रम्हपूरी व सिंदेवाही पंचायत समितीच्या इमारत बांधकामासाठी 25 कोटींची प्रशासकीय मान्यता


ब्रम्हपूरी व सिंदेवाही पंचायत समितीच्या इमारत बांधकामासाठी 25 कोटींची प्रशासकीय मान्यता

Ø पालकमंत्री विजय वडेट्टीवारांच्या पाठपुराव्याला यश

चंद्रपूर दि. 22 सप्टेंबर : ब्रम्हपूरी व सिंदेवाही येथील पंचायत समितीची इमारत जुनी झाली असून अशा परिस्थितीत तेथे काम करणे गैरसोयीचे आहे. त्यामुळे या दोन्ही पंचायत समितीच्या इमारतींचे नवीन बांधकाम करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, असे निर्देश राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले होते. सदर प्रस्ताव शासनाकडे प्राप्त होताच पालकमंत्र्यांनी त्याचा सतत पाठपुरावा  केला. त्यांच्या प्रयत्नाला यश आले दोन्ही इमारतींच्या बांधकामासाठी 25 कोटींची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.

ब्रम्हपूरी येथील पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारत बांधकामास 12 कोटी 45 लक्ष 19 रुपये तर सिंदेवाही येथील पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारत बांधकामास 12 कोटी 36 लक्ष 42 हजार रुपयाच्या अंदाजपत्रकीय कामास ग्रामविकास विभागाने 20 सप्टेंबरच्या आदेशान्वये निधीसह प्रशासकीय मान्यता दिली आहे. दोन्ही ठिकाणी नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा पालकमंत्र्यांचा मानस आहे.

         ब्रम्हपूरी व सिंदेवाही येथील पंचायत समितीची इमारती 1958 साली बांधली होती. सदर इमारतीचे बांधकाम जीर्ण झाल्यामूळे व सदर इमारत ही प्रशासकीय कामाच्या दृष्टीने अपुरी असल्याने कामकाजाच्या दृष्टीने गैरसोयीची आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करणे आवश्यक होते. त्यामुळे विजय वडेटटीवार यांनी कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, जिल्हा परिषद चंद्रपूर यांना अंदाजपत्रकासह प्रस्ताव सादर करण्यास सांगितले. त्यानुसार कार्यकारी अभियंता यांनी रितसर प्रस्ताव तयार करून सन 2017 मध्ये शासनाकडे पाठविला होता.

या दोन्ही कामास प्रशासकीय मान्यता मिळत नसल्याचे बघून श्री. वडेटटीवार यांनी विधानसभेत तारांकीत प्रश्न, लक्षेवधी आदी माध्यमातून तत्कालीन शासनाचे लक्ष वेधले होते. तरीसुध्दा या कामास त्यावेळेस मान्यता मिळालेली नव्हती. राज्यात नवीन सरकार स्थापन होताच श्री. वडेट्टीवार यांनी दोन्ही पंचायती समितीच्या इमारत बांधकाम करण्याच्या प्रस्तावास मान्यता मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांच्या प्रयत्नाला यश प्राप्त झाले असून ब्रम्हपूरी व सिंदेवाही येथील पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारत बांधकामास प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे.

ब्रम्हपूरी आणि सिंदेवाही या दोन्ही पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामामध्ये  तळमजल्याचे बांधकाम 80.67 चौ.मी, पहिल्या मजल्याचे 485.34 चौ.मी., दुस-या मजल्याचे 485.34 चौ.मी. असे प्रत्येकी एकूण 1051.35 चौ.मी. बांधकामाचा समावेश आहे. यामध्ये ग्रीन बिल्डींग संकल्पना अंमलात येणार आहे. या क्षेत्राच्या विकासासाठी कृतीबध्द विकास आराखडा तयार करण्यात आला असून करोडो रूपयांची विकासकामे सुरू आहेत तर काही कामे लवकरच सुरू होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री वडेट्टीवार यांनी दिली.

00000000 

जिल्ह्यात 24 तासात 4 कोरोनामुक्त, 4 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यु


जिल्ह्यात 24 तासात 4 कोरोनामुक्त, 4 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यु

Ø ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 26

चंद्रपूर, दि. 22 सप्टेंबर : गत 24 तासात जिल्ह्यात 4 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 4 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. बुधवारी जिल्ह्यात एका बाधिताचा  मृत्यू झाला आहे.

आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 4 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 1, चंद्रपूर तालुका 1, बल्लारपूर 0, भद्रावती 2, ब्रम्हपुरी 0, नागभीड 0, सिंदेवाही 0, मुल 0, सावली 0, पोंभूर्णा 0, गोंडपिपरी 0, राजूरा 0, चिमूर 0, वरोरा 0, कोरपना 0, जिवती 0 व इतर  ठिकाणच्या 0 रुग्णांचा समावेश आहे. आज मृत झालेल्या मध्ये भद्रावती तालुक्यातील एका पुरुषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 710 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 143 झाली आहे. सध्या 26 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 6 लाख 92 हजार 798 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 6 लाख 2 हजार 716  नमुने निगेटीव्ह आले आहेत.  जिल्ह्यात आतापर्यंत 1541 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

Tuesday 21 September 2021

मंगळवारी जिल्ह्यात 4 कोरोनामुक्त, 1 पॉझिटिव्ह


मंगळवारी  जिल्ह्यात 4 कोरोनामुक्त, 1 पॉझिटिव्ह

Ø ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 27

चंद्रपूर, दि. 21 सप्टेंबर : गत 24 तासात जिल्ह्यात 4 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 1 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात मंगळवारी एकाही बाधिताचा  मृत्यू झाला नाही.

आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 1 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 1, चंद्रपूर तालुका 0, बल्लारपूर 0, भद्रावती 0, ब्रम्हपुरी 0, नागभीड 0, सिंदेवाही 0, मुल 0, सावली 0, पोंभूर्णा 0, गोंडपिपरी 0, राजूरा 0, चिमूर 0, वरोरा 0, कोरपना 0, जिवती 0 व इतर  ठिकाणच्या 0 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 706 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 139 झाली आहे. सध्या 27 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 6 लाख 91 हजार 770  नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 6 लाख 1 हजार 788 नमुने निगेटीव्ह आले आहेत.  जिल्ह्यात आतापर्यंत 1540 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

जिल्हयातील शेतकऱ्यांनी करडई पिकाची लागवड करावी - पालकमंत्री विजय वडेट्टीवार


जिल्हयातील शेतकऱ्यांनी करडई पिकाची लागवड करावी

- पालकमंत्री विजय वडेट्टीवार

Ø जिल्ह्यात 5 हजार एकर क्षेत्रावर करडई पिकाची लागवड व विक्रीचे नियोजन

चंद्रपूर दि. 21 सप्टेंबर : चंद्रपूर जिल्ह्यात तेलबिया उत्पादन प्रक्रिया व विक्री प्रकल्पांतर्गत, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि चंद्रपूर जिल्हा कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने रब्बी हंगामात करडई पिकाचे 5 हजार एकर पर्यंत लागवड व विक्रीचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती- भटक्या जमाती (ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी) या प्रवर्गातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

शेतकऱ्यांना करडई लागवड प्रोत्साहन म्हणून प्रती एकर 2200 रुपये निविष्ठेकरीता मिळणार आहेत. यामध्ये आपल्या गावातील गट, कंपनी व वैयक्तिक शेतकऱ्यांनी क्लस्टर तयार करून लागवड करणे अपेक्षित आहे. शेतकऱ्यांनी https://mahajyoti.org.in/en/notice-board/ या लिंकवर बियाण्यांकरीता नोंदणी करावी. जिल्ह्यामध्ये करडई तेलाची चांगली मागणी असून आरोग्यासाठी करडई तेलाचे वेगळे महत्त्व आहे. करडई पिकाचे वन्य प्राण्यांपासून नुकसान होत नाही, तसेच या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव कमी असतो. जिल्ह्यात भात तसेच सोयाबीन पिकाची काढणी झाल्यानंतर कमीतकमी पाण्यावर येणारे हे पीक असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी करडई पिकाची लागवड करावी.

अर्जदार शेतकऱ्यांनी किमान 1 एकर क्षेत्रावर पेरणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी कोणतीही कमाल मर्यादा नाही. त्यासोबतच करडई पिकाची खरेदी करण्याची हमी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेअंतर्गत राहील.

अधिक माहितीकरीता शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, आत्मा विभागाचे एटीएम व बिटीएम यांच्याकडे प्रत्यक्ष माहिती जाणून घ्यावी  किंवा महाज्योतीचे समन्वयक श्री. पचारे 9579851794 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बराटे यांनी कळविले आहे.

00000