Search This Blog

Monday 30 November 2020

गत 24 तासात 103 कोरोनामुक्त

 


जिल्ह्यात आतापर्यंत दिड लाख कोरोना चाचण्या पुर्ण

गत 24 तासात 103 कोरोनामुक्त

193 नव्याने पॉझिटिव्ह ; तीन मृत्यू 

 

Ø  आतापर्यंत 17,832 बाधित झाले बरे

Ø  उपचार घेत असलेले बाधित 1,814

 

चंद्रपूर, दि. 30 नोव्हेंबर: जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत आरटीपीसीआरद्वारे 74 हजार 552 तर अन्टीजेन टेस्ट कीटद्वारे 75 हजार 551 असे एकूण एक लाख 50 हजार 103 नमुन्यांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. यापैकी एक लाख 27 हजार 377 नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला असून 19 हजार 948 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दोन हजार 101 नमुन्यांचा अहवाल प्रतिक्षाधीन आहे तर 677 नमुन्यांचा निष्कर्ष निघू शकलेला नाही.

जिल्ह्यात मागील 24 तासात 103 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 193 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून तीन कोरोनाबाधीताचा मृत्यू झाला आहे. सध्या एक हजार 814 बाधितांवर उपचार सुरू आहे.

आज मृत झालेल्या बाधितामध्ये चिमुर तालुक्यातील नेहारी येथील 35 वर्षीय महिला, आजाद वार्ड वरोरा येथील 65 वर्षीय पुरूष व ब्रम्हपुरी तालुक्यातील तेलवसा येथील 60 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 302 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 279, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 14, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 193 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 58, चंद्रपूर तालुक्यातील सात, बल्लारपुर तालुक्यातील 13, भद्रावती 33, ब्रम्हपुरी 17, सिंदेवाही दोन, मुल चार, सावली दोन, पोभुर्णा एक, गोंडपीपरी चार, राजुरा सहा, चिमुर सहा, वरोरा 26, कोरपना आठ, जीवती तालुक्यातील दोन व इतर जिल्ह्यातील 4 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा. वेळोवेळी हात स्वच्छ करणे तसेच सुरक्षित अंतराचे पालन करावे. कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

0000

मतदान केंद्र परिसरात कलम 144

 मतदान केंद्र परिसरात कलम 144

चंद्रपूर, दि. 30 नोव्हेंबर: नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीत 1 डिसेंबर 2020 रोजी जिल्ह्यातील 50 केंद्रावर मतदान घेण्यात येत आहे. यवेळी अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी व गैरप्रकार होऊ नये म्हणून 30 नोव्हेंबर व 1 डिसेंबर 2020 रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील 50 मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात मतदारांव्यतिरिक्त बेकायदेशीर जमाव होऊ नये म्हणून फौजदारी प्रकिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात आले आहे. यानुसार पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी काढले आहे. सदर आदेश मतदान प्रक्रीयेतील अधिकारी व कर्मचारी व मतदार यांना लागू राहणार नाही, असेही आदेशात नमुद आहे.

0000000

जिल्हा नियोजनचा निधी वेळेत खर्च करण्याची दक्षता घ्या – जिल्हाधिकारी



जिल्हा नियोजनचा निधी वेळेत खर्च करण्याची दक्षता घ्या

– जिल्हाधिकारी

चंद्रपूर, दि. 30 नोव्हेंबर : जिल्ह्यातील विकास कामांकरिता जिल्हा नियोजन समितीद्वारे 100 टक्के निधी उपलब्ध करून दिल्या जाणार असून सदर निधी विहित वेळेत खर्च करण्याची दक्षता सर्व विभागप्रमुखांनी घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज सर्व विभागप्रमुखांना दिले.

            जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सर्वसाधारण योजना, अनुसूचित जाती योजना व आदिवासी उपयोजनेच्या खर्चासंबंधी केलेल्या नियोजनाचा जिल्हाधिकारी यांनी आज नियोजन भवन येथे आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, आदिवासी विकास प्रकल्पचे प्रकल्प अधिकारी रोहन घुगे, जिल्हा नियोजन अधिकारी गजानन वायाळ प्रामुख्याने उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी गुल्हाने पुढे म्हणाले की यापुर्वी शासनाकडून केवळ 33 टक्केच निधी उपलब्ध करून देण्याच्या सुचना होत्या, आता मात्र पुर्ण 100 टक्के निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाच्या सुधारित सुचना प्राप्त झाल्या आहेत. तरी सर्व विभाग प्रमुखांनी त्यांना मंजूर करण्यात आलेला पुर्ण निधी खर्च करण्यासाठी पुढील दहा दिवसात नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.

            यावेळी समजाकल्याण विभाग, विद्युत विभागपाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम, सिंचन, आदिवासी विकास,  कृषी, आरोग्य नगरविकास  इतर विभागांचे संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

0000

Sunday 29 November 2020

गत 24 तासात चौघांचा मृत्यू


 गत 24 तासात चौघांचा मृत्यू

63 नव्याने पॉझिटिव्ह ; 80 कोरोनामुक्त

 

Ø आतापर्यंत 17,729 बाधित झाले बरे

Ø उपचार घेत असलेले बाधित 1,727

 

चंद्रपूर, दि. 29 नोव्हेंबर: जिल्ह्यात मागील 24 तासात चार कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला असून 63 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर 80 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 19 हजार 755 वर पोहोचली आहे. तसेच सुरुवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 17 हजार 729 झाली आहे. सध्या एक हजार 727 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 49 हजार 782 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 26 हजार 720 नमुने निगेटीव्ह आले आहेत. 

आज मृत झालेल्या बाधितांमध्ये भटारा ता. वरोरा येथील 65 वर्षीय पुरूष, कोहापरा ता. राजुरा येथील 75 वर्षीय महिला तसेच ब्रह्मपुरी येथील 38 वर्षीय पुरूष व 78 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 299 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 276, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 14, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

नागरिकांनी बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा. वेळोवेळी हात स्वच्छ करणे तसेच सुरक्षित अंतराचे पालन करावे. कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

0000

अवैध रेती वाहतुकीवर भरारी पथकाचा छापा

 अवैध रेती वाहतुकीवर भरारी पथकाचा छापा

 

Ø  वाहन जप्त करून दंड वसूल

 

 चंद्रपूर, दि. 29 नोव्हेंबर :-  जिल्ह्यात  अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकीवर नियंत्रण ठेवण्याकरिता भरारी पथकाद्वारे छापे टाकने सुरू आहे. दिनांक 27  नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी 2 वाजता जिल्हा खनिकर्म विभागाच्या भरारी पथकाने पोभूर्णा- बल्लारपुर मार्गावर विना परवाना  रेती वाहतूक करणार्‍या वाहन क्र. एम.एच. 34 एबी 1761 जप्त करून  तहसिलदार पोभूर्णा यांचे कडे सुपूर्दनाम्यावर सुपूर्द केले.  तसेच दि. 28 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजता  मौजा विचोडा ता. चंद्रपूर येथे  इराई नदी घाटावर  रवींद्र वाढरे रा. विचोडा यांच्या मालकीचे ट्रक्टर क्र. एम. एच. -34 एल 2001 द्वारे अवैध रेती वाहतूक करत असल्याचे आढळून आले. सदर ट्रक्टर जप्त करुन दंडात्मक कार्यवाही करण्यात येवून एक लाख 10 हजार 900 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे.

उक्त वाहनांवर  महाराष्ट्र जमीन महसूल संहिता -1966 अन्वये  पुढील  कार्यवाही करण्यात येईल, असे अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी कळविले आहे.

0000

मतदानासाठी आस्थापनांनी कर्मचाऱ्यांना मुभा द्यावी

 मतदानासाठी आस्थापनांनी कर्मचाऱ्यांना मुभा द्यावी

चंद्रपूर, दि. 29 नोव्हेंबर :-  नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी दिनांक 1 डिसेंबर 2020 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी खाजगी अस्थापना व शासकीय तथा निमशासकीय आस्थापना येथे कार्यरत मतदारांना कार्यालयीन वेळेत मतदान करता येईल. यासाठी संबंधित आस्थापनांनी त्यांच्या कार्यालयीन वेळेचे स्थानिक व्यवस्थापन करून कार्यालयीन वेळेत

मतदारांना मतदानास मुभा द्यावी असे परिपत्रक उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी संपत खलाटे यांनी निर्गमित केले आहे.

0000


Saturday 28 November 2020

गत 24 तासात 109 कोरोनामुक्त



 गत 24 तासात 109 कोरोनामुक्त

166 नव्याने पॉझिटिव्ह ; दोन मृत्यू

 

Ø  आतापर्यंत 17,649 बाधित झाले बरे

Ø  उपचार घेत असलेले बाधित 1,748

चंद्रपूर, दि. 22 नोव्हेंबर: चंद्रपूर, दि. 28 नोव्हेंबर: जिल्ह्यात मागील 24 तासात 109 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 166 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन कोरोनाबाधीताचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 19 हजार 692 वर पोहोचली आहे. तसेच सुरुवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 17 हजार 649 झाली आहे. सध्या एक हजार 748 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 48 हजार 705 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 25 हजार 354 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्या बाधितामध्ये सावली  येथील 51 वर्षीय पुरूष व आष्टी येथील 57 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 295 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 272, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 14, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

नागरिकांनी बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा. वेळोवेळी हात स्वच्छ करणे तसेच सुरक्षित अंतराचे पालन करावे. कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

 

0000000

Friday 27 November 2020

जिल्ह्यात चौघांचा मृत्यू ; 168 नव्याने पॉझिटिव्ह

 


जिल्ह्यात चौघांचा मृत्यू ; 168 नव्याने पॉझिटिव्ह

गत 24 तासात 167 कोरोनामुक्त

 

Ø  आतापर्यंत 17,540 बाधित झाले बरे

Ø  उपचार घेत असलेले बाधित 1,693

 

चंद्रपूर, दि. 27 नोव्हेंबर: जिल्ह्यात मागील 24 तासात जिल्ह्यात चार कोरोनाबाधीताचा मृत्यू झाला असून 168 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर 167 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 19 हजार 526 वर पोहोचली आहे. तसेच सुरुवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 17 हजार 540 झाली आहे. सध्या एक हजार 693 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 47 हजार 558 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 23 हजार 975 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्या बाधितामध्ये वरोरा शहराच्या शिवाजी वार्डातील 64 वर्षीय पुरूष व गांधी वार्डातील 69 वर्षीय पुरूष, भद्रावती शहरातील पंचशील नगर येथील 72 वर्षीय पुरूष तसेच नवेगाव ता. अहेरी जिल्हा गडचिरोली येथील 84 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 293 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 271, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 13, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

नागरिकांनी बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा. वेळोवेळी हात स्वच्छ करणे तसेच सुरक्षित अंतराचे पालन करावे. कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

0000

पदवीधर संघाच्या निवडणुकीसाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासन सज्ज - जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

 निवडणूक विशेष वृत्त :





 

पदवीधर संघाच्या निवडणुकीसाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासन सज्ज

-         जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

Ø  चंद्रपूर जिल्ह्यातील 3 उमेदवारांसह एकूण 19 उमेदवार रिंगणात,

Ø  जिल्ह्यात 50 मतदान केंद्रांवर 240 मतदान कर्मचारी नियुक्त

Ø  जिल्ह्यातील 32 हजार 761 पदवीधर मतदार करणार मतदान

                            

चंद्रपूर, दि. 27 नोव्हेंबर :-  नागपूर पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीसाठी दि. 1 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. याकरिता चंद्रपूर जिल्हा प्रशासन जिल्ह्यातील 32 हजार 761 मतदारांच्या मतदानाकरिता 50 केद्रांवर 240 मतदान कर्मचारी व आवश्यक सोयी सुविधांसह सज्ज झाले आहे. तरी मतदारांनी प्राधान्याने मतदान करून आपल्या अमुल्य मताचा वापर करावा व आपला हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

जिल्हा निवडणूक विभागाने पदवीधर मतदार संघाकरिता मतदान घेण्याची पुर्ण तयारी केली असून ग्रामीण व शहरी भागात प्रत्येक मतदान केंद्रावर चार कर्मचारी याप्रमाणे 50 मतदान केंद्रावर 200 कर्मचारी नियुक्त केले आहेत. तसेच  राखीव पथकात 40 कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे.  प्रत्येक मतदान केंद्रावर 1 याप्रमाणे 50 सुक्ष्म निरिक्षक तसेच 10 राखीव असे 60 सुक्ष्म निरिक्षक मतदान प्रक्रियेसाठी  काम करणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर सुरक्षिततेसाठी पोलीस दल नियुक्त आहे. सर्व मतदान केंद्रावर पाणी, शौचालय, वीज, अंपगासाठी रॅमची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांना नेण्यासाठी 75 वाहन उपलब्ध असून प्रत्येक मतदान केंद्रावर सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस उपलब्ध असणार आहे. तसेच कोविड पार्श्वभूमिवर निवडणूक विभागाने सर्व मतदान केंद्रावर हात स्वच्छ करायला साबन, सॅनिटायझर,  पीपीई किट, हॅन्डग्लोव्हस, फेस मास्क, थर्मल गन इ. साहित्य उपलब्ध करून दिले असून प्रत्येक केंद्रावर दोन हेल्थ वर्कर तसेच तालुकास्तरावर वैद्यकीय चमु तैनात केली असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (निवडणूक) संपत खलाटे यांनी दिली आहे.

पदवीधर मतदार संघासाठी 1 डिसेंबर रोजी मतदान होणार असून मतदानाची वेळ सकाळी 8 ते  सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे.

जिल्ह्यातील मतदान केंद्र व पदवीधर मतदार

चंद्रपूर जिल्ह्यातील तालुकानिहाय मतदान केंद्रांची संख्या पुढीलप्रमाणे असून व मतदारांची एकूण संख्या कंसात दर्शविली आहे. वरोरा तालुक्यातील मतदान केंद्र 6 (एकूण मतदार 2953), चिमुर 4(2080), नागभिड 3 (2391), ब्रम्हपुरी 5 (3161), सिंदेवाही 2 (1484), भद्रावती 4 (2671), चंद्रपूर 13 (8401), मुल 2 (1448), सावली 1 (959), बल्लारपूर 4 (2476),  राजुरा 2 (1812), कोरपना/जिवती 2 (1752), पोंभुर्णा 1 (427), गोंडपिपरी 1 (743) असे चंद्रपूर जिल्ह्यात एकुण 50 मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे. तर जिल्हयात 22 हजार 33 पुरुष व 10 हजार 733 महिला आणि 5 इतर  असे एकुण 32 हजार 761 पदवीधर मतदार आहे. 

 

नागपूर पदवीधर मतदार संघात  नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे.   विभागीय आयुक्त हे  या मतदार संघाचे  नोंदणी  अधिकारी  तर जिल्हाधिकारी हे सहाय्यक   मतदार नोंदणी अधिकारी आहेत. 

चंद्रपूर जिल्ह्यातून सुनिता मनोहर पाटील- अपक्ष, डॉ. प्रकाश शंकर रामटेके-अपक्ष, शरद शामराव जिवतोडे-अपक्ष, नागपूर जिल्ह्यातून अभिजित गोंविदराव  वंजारी- भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस , संदीप दिवाकर जोशी- भारतीय जनता पार्टी,राजेंद्रकुमार  दादाजी चौधरी- रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया, राहुल महादेवराव वानखेडे-वंचित बहुजन आघाडी,  अतुलकुमार दादा खोब्रागडे- अपक्ष,  अमित केशवराव मेश्राम- अपक्ष, प्रशांत  भास्करराव डेकाटे- अपक्ष, नितीन दिलीपराव रोंघे-अपक्ष, मोहम्मद शकिर अहमद – अपक्ष, प्रा.डॉ. विनोद  तुळशीराम  राऊत-अपक्ष, बबन उर्फ अजय शरदराव तायवाडे –अपक्ष, वर्धा जिल्हयातून नितेश बाळकृष्णाजी कराळे- अपक्ष, राजेंद्र सुखदेवजी भुतडा- अपक्ष, प्रा. संगिता  श्रीकांत बढे- अपक्ष, भंडारा जिल्हयातून संजय रघुनाथ नासरे-अपक्ष, गोंदिया जिल्हयातून विरेंद्र कस्तुरचंद जयस्वाल-अपक्ष  असे 19 उमेदवार आपले भाग्य आजमावत आहे.

उमेदवारांच्या प्रचारास 2 दिवस राहिले असून प्रचारतोफा 29 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता थांबणार आहेत.

                                                            0000

ग्रामविकास आराखड्यात लोकांच्या गरजेला महत्व द्यावे – राहुल कर्डिले


 

ग्रामविकास आराखड्यात लोकांच्या गरजेला महत्व द्यावे

 –   राहुल कर्डिले

 

चंद्रपूर,दि. 27 नोव्हेबर : ‘आमचं गाव, आमचा विकास’ उपक्रमांतर्गत ग्रामपंचायतीचा विकास आराखडा तयार करतांना स्थानिक गावातील लोकांच्या गरजा लक्षात घेवून प्रत्यक्ष विकासाशी संबंधीत कामांचा आराखड्यात समावेश करावा, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यातील खातेप्रमुखांना दिल्या आहेत.

            जिल्हा परिषद खातेप्रमुख, राज्य शासनाच्या विभागांचे जिल्हास्तरीय विभागप्रमुख व जिल्ह्यातील शैक्षणिक व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांचे ग्रामपंचायत विकास आराखड्यासंबंधीचे एक दिवसीय प्रशिक्षण काल चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कर्डिले बोलत होते. कार्यशाळेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) कपीलनाथ कलोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय पचारे, कृषी विकास अधिकारी शंकर किरवे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अविनाश बांगडे, ग्रामीण पाणी पुरवठाचे कार्यकारी अभियंता गिरीश बारसागडे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अविनाश सोमनाथे, जि.प.चे कॅफो अशोक मानकर शिक्षण विभागाचे उल्हास नरड, अरूण काकडे, श्री रत्नपारखी प्रामुख्याने उपस्थित होते.

            मुख्य कार्यकारी अधिकारी कर्डिले यांनी पुढे बोलतांना सांगितले की कमी खर्चात अधिक परिणाम देणाऱ्या  उपक्रमांचा विकास आराखड्यात समावेश असावा. यात 100 टक्के लसीकरण, स्वच्छ व कचरा विरहीत ग्रामपंचायत, शाळा व अंगणवाडीमध्ये 100 टकके पट नोंदणी व उपस्थिती, गावातील सर्व क्षेत्र पिकाखाली आणणे, शोषखड्ड्यांचा व परसबागांचा वापर करून गावातील सांडपाण्याचे व्यवस्थापन करणे, स्वच्छतागृह व शौचालयांच्या वापराबाबत जाणीव जागृती करणे इ. कामे तसेच शिक्षण, आरोग्य व उपजीविका या मानव विकास निर्देशांक वाढविणाऱ्या बाबींवर देखील भर देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

            गावाच्या विकासासाठी इतर विभागाच्या योजनांसोबत सांगड घालून सर्वसमावेशक विकास आराखडा तयार व्हावा म्हणून कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कपीलनाथ कलोडे यांनी प्रास्ताविकेतून केली.

            यावेळी यशदा येथील चमूने उपस्थितांना सादरीकरणाद्वारे प्रशिक्षण दिले.

            प्रशिक्षणाला विविध विभागाचे संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

000

चंद्रपूर म.न.पा. निवृत्तीवेतनधारकांना सूचना

 चंद्रपूर म.न.पा. निवृत्तीवेतनधारकांना सूचना

Ø  हयातीचा दाखला सादर करण्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ.
        

       चंद्रपूर,दि. 27 नोव्हेबर : चंद्रपूर महानगर पालीकेचे सेवानिवृत्त कर्मचारी तथा कुटुंबनिवृत्तीधारक यांना पेन्शनकरिता दरवर्षी माहे नोव्हेंबर महिन्यात हयात असल्याचे प्रमाणपत्र कार्यालयात सादर करावे लागते. आतापर्यंत 758 सेवानिवृत्त कर्मचारी तथा कुटुंबनिवृत्तीधारकांपैकी 588 पेन्शनधारकांनी हयातीचे प्रमाणपत्र सादर केलेले आहे. उर्वरीत 170 कर्मचाऱ्यांचे हयातीचे प्रमाणपत्र प्राप्त झालेले नाही.

         सद्या कोरोना रोगाचा प्रादुर्भाव सुरु असल्यामुळे बरेचशे सेवानिवृत्त कर्मचारी तथा कुटुंबनिवृत्तीधारक हे बाहेरगावी अडकुन असल्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच काहीची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना हयातीचे प्रमाणपत्र कार्यालयात सादर करण्यास विलंब होऊ शकतो. करिता महाराष्ट्र शासनाचे 8 ऑक्टोबर 2020 चे परिपत्रकान्वये निवृत्ती वेतन धारकांना तसेच  ज्यांचे  वय 1 ऑक्टोबर 2020 रोजी 80 वर्ष पुर्ण होत आहे, अशा निवृत्तीवेतन धारकांना 31 डिसेबर 2020 पावेतो हयातीचा दाखला सादर करण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे.
          तरी चंद्रपूर शहर महानगरपालिकायेथील सर्व सेवानिवृत्त कर्मचारी व कुटुंबनिवृत्तीधारक यांनी सदर हयातीचा दाखला भारतीय स्टेट बँक मुख्य शाखा चंद्रपुर येथुन प्रमाणित करुन लेखा विभागात किंवा ई-मेल आयडी cafo.cmc@gmail.com वर दि. 31 डिसेंबर 2020 पर्यंत सादर करावा, असे असे आवाहन महानगरपालिकेवे मुख्य लेखाधिकारी संतोष कंदेवार यांनी कळविले आहे.

0000

शेतीवर आधारीत उद्योगाकरिता ऑनलाईन प्रशिक्षण

 शेतीवर आधारीत उद्योगाकरिता ऑनलाईन प्रशिक्षण

            चंद्रपूर,दि. 27 नोव्हेबर महाराष्ट्र  उद्योजकता  विकास केंद्राद्वारे इयत्ती दहावी पास  व 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवक युवतीकरीता दि. 10 ते 23 डिसेंबर 2020 या  कालावधीमध्ये शेतीवर आधारीत उद्योग, प्रशिक्षण कार्यक्रम ऑनलाईन आयोजित  करण्यात आले आहे.

            महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र ही उद्योग संचालनालयाअंतर्गत  कार्यरत  व  महाराष्ट्र  शासन  पुरस्कृत  स्वायत प्रशिक्षण संस्था असन या संस्थेचा मख्य उद्देश  विविध  प्रकारचे  प्रशिक्षण आयोजित करून जास्तीत जास्त लोकाना  स्वत:चा उद्योगव्यवसाय  सुरू करणेकरिता  प्रेरित  करणे  व उद्योजकतेला  पुरक असे वातावरण निर्मित करणे हा आहे.

             सदर कार्याशाळेत शेतीवर व अन्न प्रक्रियावर आधारीत विविध उद्योगसंधी, डिजीटल मार्केटिंग, ॲग्रीकल्चर प्रॉडक्ट पॅकेजिंग, दुग्ध व्यवसाय व दुग्ध प्रक्रिया उद्योग, फळ प्रक्रिया, पशुसंवर्धन इ. उद्योगातील संधी, उद्योजकता व उद्योजकीय प्रेरणा प्रशिक्षण, संभाषण कौशल्य, संकलण व आकलन कौशल्य, सर्जनशीलता, नाविन्यपूर्तता व समस्या निराकारण, संघटनाचे प्रकार शासकीय कार्यालयातील विविध योजना, बाजारपेठ  पाहणी, साधने व तंत्रज्ञान, उत्पादक निवड, उद्योगासाठी लागणारे परवाने नाहरकत प्रमाणपत्र व नोंदणी, जीएसटी नोंदणी, उद्योगाचे व्यवस्थापन, विपणन व्यवस्थापन, उत्पादन व कच्चा माल यांचे व्यवस्थापन, उत्पादन, नियंत्रण व नियोजन, आर्थिक व्यवस्थापन, खेळते भांडवल व्यवस्थापन, प्रकल्प अहवाल, ऑनलाईन कर्ज प्रक्रीया व कृती आराखडा तयार करुन अंमलबजावणी  करणे इत्यादी विषयांवर ऑनलाईनद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

    सदर प्रशिक्षणात ऑनलाईन प्रवेश घेण्याकरीता इच्छुक युवक युवतीनी www.mced.co.in या संकेतस्थळावर दि. 9 डिसेबर  2020 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र  उद्योजकता  विकास केंद्राचे  प्रकल्प अधिकारी के. व्ही. राठोड  मो.न. ९४०३०७८७७३, ०७७२-274416 व   कार्यक्रम आयोजक मिलिंद कुंभारे मो. न. ९०११६६७७१७ यांच्याशी संपर्क साधावा.

0000000

Thursday 26 November 2020

नागरिकांनी कुष्ठरोग तपासणी अभियानास सहकार्य करावे



नागरिकांनी कुष्ठरोग तपासणी अभियानास सहकार्य करावे

- जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

Ø  21 लाखावर नागरिकांची होणार तपासणी

Ø  1487  वैद्यकीय टिम कार्यरत

Ø  दि. 1 ते 16 डिसेंबर कालावधीत घरोघरी तपासणी करणार

चंद्रपूर, दि. 26 नोव्हेंबर :-  राष्ट्रिय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत दिनांक 1 डिसेंबर ते 16 डिसेंबर 2020 या कालावधीत आरोग्य विभागाचे कर्मचारी  घरोघरी जाऊन नागरिकांची कुष्ठरोग व क्षयरोग तपासणी करणार आहेत.  रोगाचे निदान झाल्यास रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामिण रुग्णालय येथे मोफत औषधोपचार मिळणार आहे तरी नागरिकांनी या कुष्ठरोग व क्षयरोग तपासणी अभियानास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

राष्ट्रिय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत आज दिनांक २६.११.२०२० रोजी मा.जिल्हाअधिकारी , यांच्या अध्यक्षतेखाली विसकलमी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे जिल्हास्तरीय समन्वय समितीची सभा पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कार्डिले, पोलीस उपअधिक्षक शेखर देशमुख, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, डॉ. सुधीर मेश्राम, डॉ. प्रतिक बोरकर, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. संदिप गेडाम, डॉ. प्रकाश साठे, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ . ए.एस.खंडारे, डॉ.हेमचंद कन्नाके, श्रीनीवास मूळावार, भास्कर सोनारकर व आरोग्य विभागाचे ईतर अधिकारी उपस्थित होते.

 सदर मोहिमेचा उद्देश समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधुन त्यांना बहुविध औषधोपचाराखाली आणणे,  नवीन सांसर्गिक कुष्ठरुग्ण शोधुन बहुविध औषधोपचाराद्वारे संसर्गाची साखळी खंडित करुन होणारा प्रसार कमी करणे,  समाजात कुष्ठरोगा विषयी जनजागृती करणे असा आहे. तसेच  सदर मोहिमेत क्षयरोगाच्या निदाना अभावी अद्यापही वंचित असणाऱ्या क्षयरुग्णाचा शोध घेऊन त्यांना क्षयरोग औषधोपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

 जिल्हयामध्ये सन २०२०-२१ या वर्षात दिनांक ०१/१२/२०२० ते १६/१२/२०२० या कालावधीत जिल्हयातील ग्रामिण व शहरी भागामध्ये आशा स्वयंसेवीका , पुरुष स्वयंसेवक व आरोग्य कर्मचारी यांचे मार्फत सर्व कुटूंबातील प्रत्येक व्यक्तिींची कुष्ठरोग व क्षयरोगाची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे . तद्नंतर संशयीत कुष्ठरुग्णांची व क्षयरुग्णांची तपासणी करून निदान प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी यांचे मार्फत करण्यात  येणार आहे. जिल्हयात सदर मोहिमे करीता शहरी व ग्रामिण भागातील एकुण 21 लाख 13 हजार 276 लोकसंख्येकरिता एकुण 1487  टिम कार्यरत राहणार असल्याची माहिती सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. संदिप गेडाम यांनी यावेळी दिली.

जिल्हाधिकारी यांनी यावेळी जिल्हा अवयवदान समन्वय समिती, लसीकरण मोहिम, बोगस डॉक्टर शोध मोहिम या समित्यांचा देखील आढावा घेतला.

0000

चंद्रपूर विधानसभा मतदार यादी पुनरिक्षण : 30 नोव्हेंबरपुर्वी आक्षेप नोंदवा

 चंद्रपूर विधानसभा मतदार यादी पुनरिक्षण : 30 नोव्हेंबरपुर्वी आक्षेप नोंदवा

मय्यत, स्थलांतरीत, दुबार मतदारांची यादी मतदान केंद्रावर प्रसिद्ध

 चंद्रपूर, दि. 26 नोव्हेंबर :-  भारत निवडणुक आयोगाची 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारीत विधानसभा मतदार संघाच्या छायाचित्र याद्यांचा सखोल पुनरिक्षण कार्यक्रम सुरु आहे.  त्याअनुषंगाने मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी मतदार यादीचे पुननिरीक्षण करुन मय्यत/स्थालांतरीत/दुबार मतदारांची  तयार केलेली यादी मतदान केंद्रावर तसेच तहसिल कार्यालय, चंद्रपूर येथे प्रसिध्द करण्यात आलेली आहे. लोक प्रतिनिधत्व अधिनियम 1950 च्या कलम 22 अन्वये सदर यादीतील मतदारांचे नाव मतदार यादीतुन वगळणे आवश्यक आहे.

            वरील संदर्भात ज्या मतदारांना काही आक्षेप असल्यास त्यांनी दिनांक 30 नोव्हेंबर 2020 पुर्वी तहसिल कार्यालय, चंद्रपूर येथे कार्यालयीन दिवशी व वेळेस  आक्षेप सादर करावे. सदर मुदतीमध्ये कोणाचेही लेखी म्हणने व रहीवाशी पुरावा प्राप्त  झाले नाही,  तर सदर यादीतील स्थलांतरीत/मय्यत/दुबार मतदारांची नावे  वगळण्यास काही हरकत नाही असे गृहीत धरुन मतदार यादीतुन सदर मतदाराचे नावे वगळण्यात येईल, असे 71- चंद्रपूर विधानसभा मतदार संघाचे सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार चंद्रपूर यांनी कळविले आहे.

0000

गत 24 तासात 252 कोरोनामुक्त

 


गत 24 तासात 252 कोरोनामुक्त

155 नव्याने पॉझिटिव्ह ; दोन मृत्यू

 

Ø  आतापर्यंत 17,373 बाधित झाले बरे

Ø  उपचार घेत असलेले बाधित 1,696

 

चंद्रपूर, दि. 26 नोव्हेंबर: जिल्ह्यात मागील 24 तासात 252 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 155 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन कोरोनाबाधीताचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 19 हजार 358 वर पोहोचली आहे. तसेच सुरुवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 17 हजार 373 झाली आहे. सध्या एक हजार 696 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 46 हजार 440 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 22 हजार 859 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्या बाधितामध्ये वरोरा तालुक्यातील सोयता येथील 72 वर्षीय पुरूष व घोट चार्मोशी जिल्हा गडचिरोली येथील 65 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 289 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 268, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 12, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

नागरिकांनी बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा. वेळोवेळी हात स्वच्छ करणे तसेच सुरक्षित अंतराचे पालन करावे. कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

0000

Wednesday 25 November 2020

गत 24 तासात 226 नव्याने पॉझिटिव्ह


 गत 24 तासात 226 नव्याने पॉझिटिव्ह

211 कोरोनामुक्त

 

Ø  आतापर्यंत 17,121 बाधित झाले बरे

Ø  उपचार घेत असलेले बाधित 1,795

 

चंद्रपूर, दि. 25 नोव्हेंबर: जिल्ह्यात मागील 24 तासात 226 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे तर 211 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 19 हजार 203 वर पोहोचली आहे. तसेच सुरुवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 17 हजार 121 झाली आहे. सध्या एक हजार 795 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 44 हजार 922 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 21 हजार 610 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत 287 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 267, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 11, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

नागरिकांनी बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा. वेळोवेळी हात स्वच्छ करणे तसेच सुरक्षित अंतराचे पालन करावे. कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

0000

दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजनेच्या लाभार्थ्यांना भरपाईची सूचना

 दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजनेच्या लाभार्थ्यांना भरपाईची सूचना

चंद्रपूर दि.25 नोव्हेंबर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे कार्यरत असलेली कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना जमीन वाटप करण्यात आली होती. या योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थी यांनी त्यांचेकडे प्रलंबित किंवा थकीत असलेल्या कर्जाच्या रकमेची भरपाई त्वरीत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, चंद्रपूर, येथे करावी, असे निवेदन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी केले आहे.  

0000