Search This Blog

Thursday 12 November 2020

जिल्ह्यात मागील 24 तासात 168 कोरोनामुक्त


 जिल्ह्यात मागील 24 तासात 168 कोरोनामुक्त

103 नव्याने पॉझिटिव्ह एका बाधिताचा मृत्यू

Ø आतापर्यंत 14675 बाधित झाले बरे

Ø उपचार घेत असलेले बाधित 2443

Ø एकूण बाधितांची संख्या 17378

चंद्रपूरदि. 12 नोव्हेंबर : जिल्ह्यात गत 24 तासात 168 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर एका कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 103 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यांमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यांमधील 55 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 260 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 243, तेलंगाणा एकबुलडाणा एकगडचिरोली आठयवतमाळ पाचभंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या 103 बाधितांसोबत आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 17 हजार 378 वर पोहोचली आहे. तसेच 24 तासात 168 बाधित कोरोनातून बरे झाल्याने सुरुवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 14 हजार 675 झाली आहे. सध्या हजार 443 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 28 हजार 831 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख हजार 993 नमुने निगेटीव्ह आले आहे.

तालुकानिहाय बाधितांची संख्या:

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या 103 बाधितांमध्ये 61 पुरुष व 42 महिला आहेत. यात  चंद्रपूर शहर व परीसरातील 38, पोंभुर्णा तालुक्यातील एकबल्लारपूर तालुक्यातील चारचिमुर तालुक्यातील पाच,   मुल तालुक्यातील दोनगोंडपिपरी तालुक्यातील सहाकोरपना तालुक्यातील एकब्रह्मपुरी तालुक्यातील सात,  नागभीड तालुक्‍यातील तीनवरोरा तालुक्यातील सात ,भद्रावती तालुक्यातील 19, सिंदेवाही तालुक्यातील पाचराजुरा तालुक्यातील चार तर गडचिरोली येथील एक असे एकूण 103 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहर व परिसरातील जलनगरस्नेहनगरगणपती वार्डगंज वार्डदुर्गापुरपठाणपुरासंजय नगरस्वावलंबी नगरश्रीराम वार्डजटपुरा वार्डबापट नगरबाबुपेठ,तुकुमनिर्मल नगररयतवारी भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील महाराणा प्रताप वार्डसरदार पटेल वार्डभगतसिंग वार्डरविन्द्र नगर परिसरातून बाधित ठरले आहे. चिमूर तालुक्यातील नेरीमोटेगावगुरुदेव वार्ड भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.

मुल तालुक्यातील वार्ड नंबर 11, पिंपरी दीक्षित परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. गोंडपिपरी तालुक्यातील शिवाजी वार्डतळोधीवार्ड नंबर चारवार्ड नंबर 13 भागातून बाधित ठरले आहे. कोरपना तालुक्यातील गडचांदूर परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.

ब्रह्मपुरी तालुक्यातील पटेल नगरपेठ वार्डदेलनवाडीशांतीनगरविद्यानगरफॉरेस्ट कॉलनी परिसरातुन बाधित ठरले आहे. नागभीड तालुक्यातील नवखळातळोधी भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.

 

वरोरा तालुक्यातील पिंपळगावआनंदवन परीसरबोर्डाराम मंदिर वार्ड भागातून बाधित ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील माजरी कॅम्पबंगाली कॅम्पभोज वार्डगौतम नगरविजासनगुरूनगर परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.राजुरा तालुक्यातील रामपूरसाईनगर परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

00000

No comments:

Post a Comment