Search This Blog

Thursday 30 April 2020

जिल्हयातील 13 हजार 739 मजुरांशी प्रशासनाकडून संपर्क साधणे सुरू


मुंबई- पुण्यातील विद्यार्थीप्रवाशांचा घरी परतण्याचा मार्ग मोकळा
चंद्रपूर, दि.30 एप्रिल : लॉकडाऊनमध्ये जवळपास 19 राज्यांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील 13 हजारावर मजूर अडकले आहेत. तसेच राज्यात व राज्याबाहेर हजारो यात्रेकरूविद्यार्थीप्रवासीअडकले आहेत. या सर्वांना जिल्ह्यात पोहचण्यासाठीच्या उपाय योजना जिल्हा प्रशासनाने सुरू केल्या आहेत.
 यासंदर्भात आज जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी एका व्हिडीओ संदेशाद्वारे राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार बाहेर राज्यात व राज्याच्या कानाकोपऱ्यात अडकलेल्या नागरिकांना कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही अशा पद्धतीने जिल्ह्यात परत आणण्यासाठी संपर्क साधला जात आहे. येणाऱ्या प्रत्येक नागरिकांमुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचणार नाही याची काळजी घेतली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
 चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वाधिक मजूर हे तेलंगाना राज्यात आहे. मजुरांची तेलंगाना मधील सध्या उपलब्ध असणारी आकडेवारी 10 हजार 558 आहे. त्यापाठोपाठ आंध्रप्रदेश मध्ये जवळपास 2643 नागरिक अडकले आहेत. जिल्हा प्रशासनाकडे आतापर्यंत दिल्लीगुजरातराजस्थानपंजाब ,उत्तर प्रदेशबिहारझारखंडओरिसा ,पश्चिम बंगालमध्य प्रदेशछत्तीसगडकर्नाटककेरळदमनतामिळनाडूहरियाणागोवा,आदी राज्यांमध्ये अडकलेल्या मजुरांची माहिती आहे.      याशिवाय राज्य शासनाने परवानगी दिल्यानंतर चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्राशिवाय अन्य ठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांसाठी 24 तास संपर्क करण्यासाठी हेल्पलाइन नंबर जाहीर केले आहेत. जिल्हा प्रशासनाने यासाठी पाच दूरध्वनी लाईन सुरू केल्या असून 07172-274166,67,68,69,70 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.तसेच सोबतच राज्यातील पुणे-मुंबई व इतर शहरांमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना घरी पोहोचण्यासाठी वरील क्रमांकावर आपली माहिती देण्याचे स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यामध्ये अडकलेल्या नागरिकांनी आपल्या भागात जाताना संबंधित तहसीलदारांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चंद्रपूर महानगरासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे संपर्क साधणे आवश्यक आहे. प्रवासी व नागरिकांनी ज्या राज्यात जायचे आहे. त्याबाबतची संपूर्ण माहिती संबंधित तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी व आयुक्त महानगर पालिका यांच्याकडे दयावी. त्यानंतर जिथे जायचे आहे त्या ठिकाणासाठी परवाना घेणेतसेच प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा जिल्हा सामान्य रुग्णालयातून वैद्यकीय दाखला घेणे आवश्यक आहे. बाहेर राज्यातून  
महाराष्ट्रातील अन्य शहरातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाने देखील हीच प्रक्रिया लक्षात घेणे आवश्यक आहे. स्वतःच्या वाहनावर परवानगी लावणे, तपासणी करणाऱ्या पोलिसांना सहकार्य करणे व आपल्या शहरात आल्यानंतर प्रत्येकाने 14 दिवसांसाठी होम कॉरेन्टाईन होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
00000

कोरोना आजार जनसामान्यांना कळण्यासाठी चंद्रपूरमध्ये प्रश्नमंजुषा


चंद्रपुर,दि.30 एप्रिल: जिल्ह्यातील सामान्यातील सामान्य नागरिकांना कोरोना आजार कळावाकोरोना आजाराची वैशिष्ट्येप्रतिबंधात्मक उपाय व नागरिकांच्या मनामध्ये असणारे सर्वसामान्य प्रश्नउत्तरा संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत ऑनलाइन प्रश्नमंजुषाचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा कोरोना नियंत्रण तथा सहाय्यता कक्षजिल्हाधिकारी कार्यालयचंद्रपूर तर्फे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कोरोना बाबत विविध जनजागृती अभियान राबवीत आहे. सदरअभियानाचा मुख्य उद्देश प्रत्येक नागरिकांना कोरोना बद्दल माहिती होणे हा आहे. याचाच एक भाग ऑनलाईन कोरोना जनजागृती-प्रश्नमंजुषा हा आहे. या प्रश्नमंजुषा मध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावेअसे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
असे होता येणार सहभागी:
ऑनलाईन प्रश्नमंजुषा फॉर्म आपण मोबाईलसंगणक द्वारे सबमिट करू शकता. सदर प्रश्नमंजुषा मध्ये कोणतीही व्यक्ती भाग घेऊ शकते. प्रश्नमंजुषा मध्ये भाग घेण्याकरिता https://forms.gle/8vGMTDLmKSj8P1qV6  या लिंक वरून कोविड-19 जनजागृती प्रश्नमंजुषा फॉर्म सबमिट करावयाचा आहे. 60 टक्के पेक्षा जास्त गुण  प्राप्त करणाऱ्यास या कार्यालयाकडून जिल्हाधिकारी चंद्रपूर व  मुख्य कार्यकारी अधिकारी  चंद्रपूर  यांचे स्वाक्षरीचे ऑनलाईन प्रमाणपत्र आपले ईमेल वर प्राप्त होईल. फॉर्म सबमिट केल्यानंतर लगेचच  व्हिव स्कोर मध्ये आपले गुण व आपले ईमेल मध्ये आपण निवडलेल्या प्रश्नाचे उत्तरे पाहू शकता.
            प्रश्नमंजुषेची  लिंक chanda.nic.in तसेच www.zpchandrapur.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर आणि  District Corona Control Cell या फेसबुक पेजवर उपलब्ध आहे.
00000

कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांनी प्रयत्न करावे : डॉ.उदय पाटील


चंद्रपूर,दि.30 एप्रिल: जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामामध्ये गुलाबी बोंड अळी व्यवस्थापनाच्या दृष्टीने प्रयत्न करावे,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.उदय पाटील यांनी केले आहे.
गतवर्षी लांबलेल्या पावसामुळे अधिक उत्पादनासाठी शेतक-यांनी कापूस पीक जानेवारीच्या पुढे तसेच शेतात ठेवलेले होते. वाढीव पावसामुळे लावलेला कापूस हंगाम त्याचबरोबर सिंचनाची सोय असलेल्या काही ठिकाणी अद्यापही कापूस पीक शेतात तसेच राहिल्याने किडीस नियमित खादय पुरवठा होऊन किडीचा जीवनक्रम अखंडीत पुढे चालू राहील. परीणामतः पुढील हंगामात या किडीचा पुन्हा मोठा प्रादुर्भाव होऊ शकतो. सतर्कतेच्या दृष्टीने वरील बाबींकडे दुर्लक्ष न करता आगामी कापूस हंगाम सुरू होण्यापूर्वीपासूनच शेतकऱ्यांमध्ये प्रभावीपणे जनजागृती करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने येणाऱ्या खरीप हंगामामध्ये गुलाबी बोडअळी व्यवस्थापनाच्या दृष्टीने प्रमुख मुद्यांबाबत ग्रामस्तरावरून विविध प्रसार माध्यमांव्दारे प्रचार व प्रसिद्दी करून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती घडवून आणावी.
असे करावे गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन:
शेवटच्या वेचनी नंतर शेतातील पऱ्हाट्यांचे श्रेडररोटाव्हेटर सारख्या यंत्राद्वारे लहान तुकडे करून शेतात गाडणे किंवा त्यांचा वापर शेताबाहेर कंपोस्ट तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना उद्युक्त करणे.उन्हाळयामध्ये (एप्रिल-मे महिन्यात) जमिनीची खोल नांगरट करणे.कापूस पिकाची पुर्वहंगामी (मे-मधील) लागवड टाळणे.गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विविध संकरीत वाणांची लागवड न करता गावनिहाय एकच वाणाची व एकाच वेळी लागवड करणे.
शिफारस केलेल्या कमी कालावधीत पक्व होणाऱ्या बीटी कापूस अथवा सरळ वाणांची वेळेतच म्हणजे जून महिन्यात जमिनीत पुरेसा ओलावा आल्यानंतर पेरणी करणे.किडीच्या जीवनक्रमात अडथळा निर्माण करण्यासाठी पिकांची फेरपालट करणे.
कपाशीच्या सभोवती नॉन बीटी (रेफ्युजी) कपाशीची लागवड करणे.नत्र खताचा वापर जास्त झाल्यास पिकाची कायिक वाढ होऊन गुलाबी बोंड अळोचा प्रादुर्भाव वाढतो.म्हणून जास्तीच्या नत्र खताचा वापर न करता मृद परिक्षण करून त्याच्या आधारावर खतांच्या मात्रेचा अवलंब करणे.
आपल्या जिल्हयातील जिनींग मिल्समध्ये फेरोमन सापळे लावून मास ट्रॅपिंग करणे.असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ.उदय पाटील यांनी केले आहे.
00000

शेतकऱ्यांनी कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घ्यावा: डॉ.उदय पाटील


चंद्रपूर,दि.30 एप्रिल: उन्नत शेती-समृध्द शेतकरी मोहिम अंतर्गत कृषि यांत्रिकीकरण योजना सन 2020-21 या आर्थिक वर्षाकरीता इच्छुक शेतकऱ्यांकडून बी.बी.एफ यंत्रपेरणी यंत्र सीड ड्रील) व धान रोवणी यंत्र (पॅडी ट्रान्सप्लांन्टर) अनुदानावर खरेदी करण्यासाठी विहीत नमुण्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्जाचा नमुना संबंधित तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालयात व या विभागाचे अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. सदर अर्जात यथायोग्य परिपुर्ण माहिती भरूनअर्ज आपले गाव स्तरावरील कृषि सहाय्यक किंवा कृषि पर्यवेक्षक किंवा मंडळ कृषि अधिकारी किंवा तालुका कृषि अधिकारी यांचेकडे सादर करावेत.
अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषि विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा अथवा कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in संकेतस्थळावरून याबाबत माहिती घ्यावी. शेतकऱ्यांनी सदर यंत्रांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी केले आहे.
00000

Wednesday 29 April 2020

महिनाभरात जिल्ह्यात पोहचलेल्या नागरिकांवर प्रशासनाची करडी नजर


एका महिन्यात 33 हजार नागरिक स्वगृही दाखल
Ø  जिल्ह्यात एकही पॉझिटिव नागरिक नाही
Ø  आजारी असेल तर तपासणी करा धोका पत्करू नका
Ø  प्रशासनाच्या आरोग्य तपासणी व चौकशीला प्रतिसाद देण्याचे आवाहन
Ø  101 पैकी 88 नमुने निगेटिव्ह; 13 प्रतिक्षेत
Ø  132 नागरिक तपासणीसाठी इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाइनमध्ये
Ø  जिल्हाभरात सारी व आयएलआयची तपासणी
Ø  मुख्यालया बाहेरील कर्मचाऱ्यांनी तातडीने रुजू व्हावे
Ø  कोटा शहरातील 39 विद्यार्थी परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू
Ø  यवतमाळनागपूरभंडारा जिल्ह्याच्या सीमेवर गस्त वाढवली
Ø  महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रमाला अल्प उपस्थिती ठेवा
Ø  पोलीसांचे रुट मार्च
चंद्रपूर,दि. 29 एप्रिल : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या महिन्याभरात बाहेर राज्यातअन्य जिल्ह्यांमध्ये शिक्षण नोकरी व रोजगारासाठी बाहेर असणाऱ्या जवळपास 33 हजारावर नागरिकांची नोंद गेल्या महिन्याभरात झाली आहे. लॉकडाउननंतर परवानगी घेऊन नागरिक आले आहेत. यापैकी 31 हजार 138 नागरिकांनी 14 दिवसांचा विलगीकरनाचा अर्थात होम कॉरेन्टाइनचा कालावधी पूर्ण केलाय. 2550 नागरिक सध्या हा कालावधी पूर्ण करीत आहे. बाहेरून येणाऱ्या नागरिकांकडूनच धोका असल्याने माहिती लपवू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
बाहेरून येणाऱ्या नागरिकांबाबत पोलीस प्रशासन अतिशय सक्त असून प्रत्येकाची तपासणी केली जात आहे ही तपासणी आपल्या स्वतःसाठी व कुटुंबासाठी आवश्यक आहे त्यामुळे सगळ्याच यंत्रणेला चुकवून जरी कोणीही जिल्ह्याच्या कोणत्याही भागात वा शहरात पोहोचले असेल तर सामाजिक दायित्व म्हणून स्वतःची माहिती आरोग्य विभागाला देण्याबाबतचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या 07172-270669 या क्रमांकावर किंवा हॅलोचांदाच्या टोल फ्री क्रमांक 155-398 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लॉकडाऊन लागल्यापासून अनेक कर्मचारी कार्यालयात पोहोचले नाही.अशा कर्मचाऱ्यांनी तातडीने आपापल्या कार्यालयात रुजू होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश काढले आहेत. या काळात नियमित कामकाज सुरू करण्यात यावे संबंधित पोलिस विभागाची परवानगी घेऊन कर्तव्य स्थळी रुजू व्हावेअसे आवाहन करण्यात आले आहे.
 दरम्यानकोटा येथे विविध परीक्षांची तयारी करण्यासाठी गेलेले जिल्ह्यातील 39 विद्यार्थी अडकून पडले आहे. या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी राज्य शासनाने तयारी सुरू केली असून त्याचा लाभ चंद्रपूर येथील विद्यार्थ्यांनाही मिळेल अशी अपेक्षा आहे.
 नागपूर यवतमाळ हे 2 जिल्हे रेड झोन मध्ये असून भंडारा जिल्ह्यांमध्ये देखील रुग्ण आढळले आहे. त्यामुळे या जिल्ह्याच्या श्रीमान वरून प्रवेश करताना विनापरवाना कोणालाही आत प्रवेश केल्या जात नाही. नाकाबंदी आणखी कडक करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने पोलिसांना दिले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे यासाठी पोलीसांचा रुट मार्च काढण्यात आला.
जिल्हाभरात सारी व आयएलआयची तपासणी:
कोरोना सोबतच आयएलआय आणि सारी यांचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रशासनातर्फे युद्धस्तरावर ॲक्शन प्लॅन राबविली जात आहे. प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली वस्ती,डेपोटेकडीझोनमध्ये नगरपरिषद कर्मचारीशिक्षक,अंगणवाडी सेविका,आशा वर्कर,आरोग्यसेविका तथा विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची शहराचे सर्वेक्षण करण्यासाठी नेमणूक करून वार्डनिहाय पथकाचे गठन करण्यात आले आहे. बल्लारपूर शहरामध्ये आज घरोघरी जाऊन सर्दीखोकला,ताप,घसा दुखीअसणाऱ्या तसेच बाहेर देशातून बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांचा सर्वे करून नोंदी घेण्यात आले. प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांची फॉर्म नंबर 8 मध्ये माहिती भरून आरोग्य विभागाकडे पाठवून त्यांची तपासणी करण्यात येत असून त्यांना क्वॉरेन्टाईन करण्यात येत आहे. तसेच व्यापारीदुकानदारठोक तसेच चिल्लर भाजी विक्रेते यांची थर्मल स्कॅनरद्वारे टेंपरेचर तपासणी मोहीम सुद्धा राबविण्यात येत आहे. बल्लारपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी विपिन मुद्धा यांच्या मार्गदर्शनाखाली हि सर्वे मोहीम चालू आहे.
केशरी शिधापत्रिकाधारकांना धान्य वाटप सुरू:
जिल्ह्यामध्ये एपीएल अर्थात केशरी शिधापत्रिकांची संख्या 47 हजार 373 आहे. जिल्ह्यात 24 एप्रिल पासून केशरी शिधापत्रिकाधारकांना प्रतिव्यक्ती 8 रुपये दराने 3 किलो गहू व प्रतिव्यक्ती 12 रुपये दराने 2 किलो तांदूळ वाटप सुरू आहे. आतापर्यंत 748.23 क्विंटल गहू तर 498.07 क्विंटल तांदूळ वाटप झाले आहे. गहू व तांदूळाचे एकूण 1246.30 क्विंटल वाटप झाले आहे. केशरी शिधापत्रिकाधारकांनी आपल्या धान्याची उचल करावीअसे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्किन यांनी केले आहे.
मुख्यालया बाहेरील कर्मचाऱ्यांनी तातडीने रुजू व्हावे:
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कार्यालयात गर्दी होऊ नये यासाठी अधिकारी-कर्मचारी  यांना आळीपाळीने (रोटेशन) पद्धतीने कार्यालयात बोलवावे. या शासन निर्णयाप्रमाणे केवळ कार्यालयातील एकूण अधिकारी,कर्मचारी यांना उपस्थित राहण्यापासून सूट अनुज्ञेय होती. जिल्हादंडाधिकारी यांनी काढलेल्या आदेशान्वये कोविड-19चा प्रभाव रोखण्याकरिता संचारबंदीचे आदेश पारित केले असल्याने अधिकारीकर्मचारी यांना मुख्यालय न सोडता मुख्यालयात हजर राहणे अगत्याचे आहे.
जे अधिकारीकर्मचारी कार्यालय प्रमुखाची किंवा  कार्यालयाची परवानगी न घेता संचारबंदी आदेशाचे व शासन निर्णयाचे उल्लंघन करून मुख्यालय सोडून बाहेरगावी गेलेले आहेत. त्यांनी कलम 188 व 271 भा.दं.वि.व कलम 37 (3) व 135 महाराष्ट्र पोलीस कायदा तसेच कलम 2,3,4 साथीचे रोग प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केले आहे व त्याद्वारे ते शिक्षेस पात्र असून अशा अधिकारीकर्मचाऱ्यांकडून सदर कायदेशीर तरतुदींच्या अनुषंगाने खुलासा प्राप्त करावा व त्यांचेवर  नियमानुसार कार्यवाही करावी. असे एका परिपत्रकाद्वारे जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यात 29 एप्रिल रोजी कोरोना संसर्ग संशयित म्हणून 109 नागरिकांची नोंद करण्यात आली असुन यातील  101 स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 88 नमुने निगेटिव्ह निघाले आहेत तर 13 नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत विदेशातूनराज्याबाहेरून व जिल्हा बाहेरून आलेल्या नागरिकांची संख्या 33 हजार 688 आहे. यापैकी 2 हजार 550 नागरिक निगराणीखाली आहेत. तर 14 दिवसांच्या होम कॉरेन्टाईन पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या 31 हजार 138 आहे. जिल्ह्यामध्ये इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाईन करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या 132 आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत यांनी दिली आहे.
नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांविरुध्द जिल्हा प्रशासनाने कारवाई करत जिल्ह्यातील 292 प्रकरणात एकूण 15 लाख 70 हजार 870 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये नियमांचे पालन न करणाऱ्या  58 नागरिकांना अटक करण्यात आली आहे. तर 1 हजार 35 वाहने जप्त केली आहेत.प्रशासनाने वेळोवेळी जारी केलेले नियम व सुचनांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द आणखी कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
00000

जिल्ह्यात कोरोना संकटात सहाय्यता निधीला मदत करण्याचे आवाहन


आतापर्यंत जिल्ह्यात 68 लाख जमा
चंद्रपूर दि. 29 एप्रिल : देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोना विषाणूच्या या संकटावर मात करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्यापरिने गरजू लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करीत असून या संकटावर मात करण्यासाठी आवश्यक निधी कोविड-19 या माध्यमातून जमा केला जात आहे.
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मदत निधीचे जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनास  उत्तम प्रतिसाद मिळत असून या आवाहनास  प्रतिसाद देत अनेक संस्था, व्यक्ती यांनी जिल्हा सहायता निधीच्या खात्यात देणग्या देणे सुरू केले आहे.
आज प्रामुख्याने डी.आर.लिखार चंद्रपूर यांच्याकडून रु.51 हजारदि लिटल फ्लॉवर कॉन्व्हेंटनगीनबागचंद्रपूर यांच्यावतीने रु.11 हजारइनरव्हील क्लब ऑफ चांदाफोर्ट चंद्रपूर यांच्याकडून रु.15 हजार ,दिपाली चिंतावार यांच्याकडून रु.5 हजारकर्मवीर कर्मचारी सह.पतसंस्था नागभीडच्या वतीने रु.11 हजार तर सेवा सह. संस्था सास्तीविश्वशांती विद्यालय कर्मचारी सह. पतसंस्था सावली व शेतकरी सहकारी भातगिरणी संस्थासावलीच्या वतीने प्रत्येकी रु.5 हजाराचा धनादेश जिल्हा सहायता निधीस देण्यात आला.
मदतीसाठी  बँक खात्यात पैसे जमा करा !
      कलेक्टर चंद्रपूर कोव्हिड-19 या नावाने जिल्ह्यातील अग्रणी बँक ऑफ इंडियामध्ये ‍ स्वतंत्र खाते उघडण्यात आले असून खाते क्रमांक  960310210000048  असून यासाठी आयएफएससी कोड  BKIDOOO9603  असा आहे. जिल्ह्यातील उद्योजककंपन्यांचे प्रमुखस्वंयसेवी संस्था,धार्मिक संस्था राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात त्या सर्व संस्था आणि नागरिकांनी सढळ हाताने मदतीची रक्कम जमा  करावी  असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.
0000

शारीरिक अंतर राखण्यासाठी शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खते गटांमार्फत खरेदी करावीत


कोरोनाच्या संकटात कृषी निविष्ठा पुरवठ्यासाठी विभागाचा सल्ला
चंद्रपूर,दि.29 एप्रिल: कृषि विभागातील अधिकारी,कर्मचाऱ्यांनी ग्राम पातळीवर समन्वयक म्हणून काम केल्यास कृषि सेवा केंद्र आणि शेतकरी गट यांचे माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांचे शेतावर बी-बियाणे, खते, अवजारे, औषधे (कृषी निविष्ठा) पुरवठा करणे शक्य आहे. अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी दिली आहे.
खरीप हंगाम 2020 सुरू होत असल्याने शेतकऱ्यांना बियाणेखते आणि किटकनाशके यांचा पुरवठा वेळेमध्ये होणे अत्यंत आवश्यक आहे. राज्यामध्ये कोरोना विषाणूच्या पाश्वभुमीवर सर्व जिल्ह्यामध्ये  संचारबंदी जाहीर करण्यात आलेली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी कृषि सेवा केंद्रावर येऊन बियाणेखते व किटकनाशकांची खरेदी केल्यास जास्त गर्दी होऊ शकते आणि फिजीकल डिस्टन्सिंग न पाळले गेल्यामुळे कोरोना विषाणूंचा  फैलाव मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. त्यामुळे जसे शेतकरी गटांमार्फत भाजीपाल्याचा पुरवठा शहरांमध्ये कृषि विभागाच्या समन्वयाने करण्यात आला त्याच धर्तीवर कृषि निविष्ठांचा पुरवठा कृषि सेवा केंद्र आणि शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपणी यांचा समन्वय करावयाचा आहे. ग्रामपातळीवर शेतकऱ्यांना कृषी निविष्ठांचा पुरवठा करण्याकरिता शेतकऱ्यांनी पुढील प्रमाणे कार्यवाही करावी.असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे.
शेतक-यांनी त्यांच्या भागात असलेल्या आणि त्यांना सोयीच्या गटांकडे त्यांची नोंदणी करून घ्यावी. नोंदणी करून घेतांना आत्मा अंतर्गत ज्या गटांची नोंदणी झालेली आहे.त्याच गटांकडे नोंदणी होईल असे पाहावे.त्यानिमित्ताने 100 टक्के शेतकऱ्यांची नोंदणी कोणत्या ना कोणत्या गटाकडे करणे शक्य होईल.
शेतकऱ्यांनी त्यांचे नावपत्तासर्वे नंबर/गट नंबरमोबाईल क्रमांकआधार क्रमांकत्यांना ज्या कृषि सेवा केंद्रामधुन निविष्ठा खरेदी करावयाच्या आहेत. त्यांच्या नावासहत्यांना खरीप हंगामामध्ये आवश्यक असणारे विविध पिकांचे बियाणेखतेकिटकनाशके यांची मागणी गटाकडे करावी.
क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी, कर्मचारी यांनी उत्पादक शेतकऱ्यांचे गट पिकनिहाय तयार करून शेतकऱ्यांना गटाव्दारे आवश्यक बियाणे नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करावे. ही सर्व कार्यवाही क्षेत्रीय स्तरावरील कृषि सहाय्यककृषि पर्यवेक्षकमंडळ कृषि अधिकारी व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी समन्वयक म्हणून करावी.
निविष्ठांची नोंदणी गटांकडे झाल्यानंतर गटप्रमुखानेच बियाणे/खते/किटकनाशके खरेदी करावी. जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना विक्री केंद्रावर जावे लागणार नाही.
ज्या विक्रेत्यांना शक्य आहे. अशा विक्रेत्यांनी मोबाईल अॅप तयार करून शेतकऱ्यांची मागणी नोंदवून घ्यावी आणि मोठी मागणी असल्यास मागणीप्रमाणे बियाणेखते व किटकनाशके शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत पोहच करावेत.
कृषि सेवा केंद्र ते शेतकरी गट या वाहतूकी करीता कृषि व आत्मा विभागाच्या अधिकारी/ कर्मचाऱ्यांनी समन्वयक म्हणून काम करावे. या वाहतुकीकरीता आवश्यक असणारे परवाने संबंधित तालुका कृषि अधिकारी यांनी गटांकरीता उपलब्ध करून दयावेत.
मंडळ कृषि अधिकारीकृषि पर्यवेक्षक किंवा कृषि सहाय्यक व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) यांचे मार्फत व्हिडीओ कॉलव्दारे शेतकरी आणि कृषि निविष्ठा विक्रेता यांचा समन्वय घडवुन आणावा जेणेकरून सदर निविष्ठा  खरेदी व्यवहारामध्ये पारदर्शकता राहुन शेतकऱ्यांची फसवणुक होणार नाही. शेतकऱ्यांनी त्यांना हव्या असलेल्या आणि वाजवी दरामध्ये निविष्ठांचा पुरवठा करणाऱ्या निविष्ठा विक्रेत्याकडुन निविष्ठा खरेदी करण्यासाठी नोंदणी करावी.
शेतकरी व निविष्ठा विक्रेता यामधील आर्थिक बाबी शेतकरी गटामार्फत पारदर्शक पध्दतीने हाताळण्यात याव्यात. या करीता कृषि विभागाच्या अधिकाऱ्याने मार्गदर्शन करावे.
निविष्ठा पुरवठ्याबाबत तालुका स्तरावर कालबध्द कार्यक्रम आखण्यात येत आहे. दिनांक 31  मे 2020 पुर्वी अथवा पेरणी हंगाम सुरू होण्यापुर्वी शेतकऱ्यांना सर्व निविष्ठांचा पुरवठा होईल असे नियोजन करण्यात येत आहे.
00000

शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी ऑनलाईन वेबिनारचे आयोजन


चंद्रपूर, दि.29 एप्रिल: नवनवे तंत्र, शिकण्याचे व शिकवण्याचे मंत्र शिक्षकांना अवगत असावे यासाठी  जिल्हा परिषद चंद्रपूर व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, चंद्रपूरच्या  वतीने  शिक्षकांना समृद्ध करण्यासाठी विविध विषयावर ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.
लॉकडाऊन व संचारबंदीमुळे शाळांना व शिक्षकांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हा सर्वांसाठी आव्हानात्मक काळ आहे. अशा  काळात शिक्षकांनी अधिक क्रियाशील असणे गरजेचे आहे. येणाऱ्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी शिक्षकांनी अधिक सक्षम व्हायला हवे.
या ऑनलाईन वेबिनारमध्ये इंग्रजी विषयाच्या शिक्षकांसाठी ही विशेष पर्वणी आहे. इंग्रजी विषयाची भीती व त्याविषयी उदासीनता बघता शिक्षकांमध्ये या विषयासंबंधी अधिक आत्मविश्वास यावा व इंग्रजी वर्ग व भाषा सहज बोलता यावी हा दुरदृष्टीकोन ठेऊन या चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
असे असणार वेबिनारचे तात्पुरते वेळापत्रक:
इनअॅबलिंग स्किल्स रिसर्च अँड माय प्रोफेशन या विषयावर 30 एप्रिल रोजी दुपारी 12:30 ला डॉ.शुब्रा रॉय नागपूर हे मार्गदर्शन करणार आहे. प्लॅनिंग अॅंड मॅनेजिंग टिएजी मीटिंग या विषयावर 1 मे रोजी दुपारी 12:30 ला सुयोग दीक्षित नाशिक हे मार्गदर्शन करणार आहे. ऍक्टिव्हिटीज फोर लर्नर या विषयावर 2 मे रोजी दुपारी 12:30 ला संदीप शेळवाळे मुंबई हे मार्गदर्शन करणार आहे. रिसर्च अँड माय प्रोफेशन या विषयावर 4 मे रोजी दुपारी 12:30 ला डॉ.आशिष लिंगे नागपूर हे मार्गदर्शन करणार आहे. लर्निंग बाय डिस्कवरी या विषयावर 5 मे रोजी दुपारी 12:30 ला डॉ.अनिता शर्मा शिमला हे मार्गदर्शन करणार आहे. अंडरस्टँडिंग हाऊ स्टुडंट्स लर्न या विषयावर 6 मे रोजी दुपारी 12:30 ला नितू बावडेकर कोल्हापूर हे मार्गदर्शन करणार आहे. लर्निंग प्रणाऊनसेशन इन फन वे या विषयावर 7 मे रोजी दुपारी 12:30 ला दिपक मुंबई हे मार्गदर्शन करणार आहे. लेस्ट टॉक टुगेदर या विषयावर 8 व 9 मे रोजी दुपारी 12:30 ला दीपिका गोडे नागपुर व शंकर दिगदेवतुलवार वरोरा हे मार्गदर्शन करणार आहे.
लर्निंग फॉरेन लैंग्वेज थेरपी याविषयावर 11 मे रोजी दुपारी 12:30 ला डॉ.वर्षा कुलकर्णी कराड हे मार्गदर्शन करणार आहे. तर टेक्नॉलॉजी फॉर टॅग कॉर्डिनेटर या विषयावर 12 मे रोजी दुपारी 12:30 ला नदीम खान भंडारा हे मार्गदर्शन करणार आहे. हे वेबिनार झूम कॉलिंग च्या माध्यमातून होणार आहे.
या वेबिनारमध्ये सुलभक म्हणून मुंबईपुणेकोल्हापूरनागपूरनाशिकभंडारा व शिमला येथून काम बघणार आहेत. शिक्षकांसाठी ही संधी उपलब्ध करून देणारा चंद्रपूर हा महाराष्ट्रात पहिला जिल्हा आहे. शिक्षकांनी या सत्रांचा लाभ घ्यावाअसे आवाहन शिक्षणाधिकारी प्राथमिक दिपेंद्र लोखंडे व प्राचार्यजिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,चंद्रपूर डॉ.विलास पाटील यांनी केले आहे.
00000

Tuesday 28 April 2020

नागपूर ,यवतमाळ, भंडारा जिल्ह्यातून प्रवेशाच्या 61 ठिकाणी नाकाबंदी



विनापरवाना जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांवर
सक्त कारवाई व 14 दिवस कॉरेन्टाइन करणार
Ø  जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही
Ø  लॉक डाऊन कायमच कोणतीच शिथीलता नाही
Ø  मनपानगरपालिका व ग्रामपंचायत क्षेत्रातही मास्क आवश्यक
Ø  जिल्ह्यात नव्याने येणाऱ्या प्रत्येकावर आहे लक्ष
Ø  जिल्ह्यातील नागरिकांनी उष्माघातापासून नेहमी स्वतःचा बचाव करावा
Ø  दवाखाने बंद करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करणार
Ø  वैद्यकीय सुविधा न देणाऱ्या संदर्भात 07172-251597 तक्रार करा
चंद्रपूर दि. 28 एप्रिल : चंद्रपूर जिल्हा लगतच्या नागपूरयवतमाळभंडारा जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे धोकादायक ठरणाऱ्या सीमाभागातील 61 ठिकाणी पोलिसांची नाकाबंदी कडक करण्यात आली आहे. परवानगीशिवाय जिल्ह्यामध्ये पाऊल टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर सक्त कारवाई करा. 14 दिवस कॉरेन्टाइन अनिवार्य कराअसे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत.
           जिल्हावासियांशी आज व्हिडीओ संदेश जारी करताना त्यांनी नाका-बंदीचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. जिल्हा सध्या कोरोना मुक्त असून महाराष्ट्र व देशातील अन्य ठिकाणचे वाढते आकडे लक्षात घेता कधीही ही एखाद्या रुग्णामुळे जिल्हा धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने सोबतच नागरिकांनीदेखील आपले कर्तव्य पार पाळावे. 3 मे पर्यंत घराबाहेर पडू नये. रस्त्यावर दुचाकी वाहने घेऊन फिरू नये. तसेच फारच आवश्यकता असेल तर मास्क घालूनच ओळखपत्रासह घरामधील केवळ एका सुदृढ व्यक्तीने बाहेर पडावे. ज्येष्ठ नागरिकांना घराच्या बाहेर कोणत्याच परिस्थितीत पडू देऊ नकाअसेही आवाहन त्यांनी केले आहे.
दरम्यान,महानगरातील उष्णतामान वाढायला लागले असून उष्माघाताच्या संदर्भात नागरिकांनी जागरुक राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच महानगरपालिका व नगरपालिका ग्रामपंचायत क्षेत्रात पावसाळ्यापूर्वीच्या स्वच्छतेच्या कामाला सुरुवात करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहे. महानगरपालिका नगरपालिका यासोबतच ग्रामपंचायत क्षेत्रातही नागरिकांनी मास्क बांधूनच बाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले.
जिल्ह्यातील सर्व खाजगी वैद्यकीय दवाखाने सुरु ठेवावेत. तसेच लहान मुलांच्या नियमित लसीकरणाचे काम कोणत्याच परिस्थितीत थांबता कामा नयेयासंदर्भात नागरिकांना तक्रार करायची असल्यास त्यांनी जिल्हा नियंत्रण कक्षाच्या 07172-251597 या क्रमांकावर दूरध्वनी करावाअसेही आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र दिन कार्यक्रम साधेपणाने:
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी महाराष्ट्र दिन हा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याच्या दृष्टीने निर्देश शासन परिपत्रकात दिले आहे.
यामध्ये राज्यातील मंत्रालय व सर्व जिल्हा मुख्यालयातील जिल्हाधिकारी कार्यालये या ठिकाणी एकाच वेळी सकाळी 8 वाजता फक्त ध्वजारोहण करण्यात यावे. या ठिकाणी केवळ पालकमंत्री,जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षकमुख्य कार्यकारी अधिकारीजिल्हा परिषद इतकेच पदाधिकारी,अधिकारी यांनी उपस्थित रहावे. इतर मान्यवरांना आमंत्रित करण्यात येऊ नये. कवायतीचे आयोजन करण्यात येऊ नये.विधिमंडळ मा.उच्च न्यायालय व इतर संविधानिक कार्यालयांमध्ये कमीत कमी उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात यावे. ध्वजारोहण करणारे पालकमंत्री  काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रम स्थळी उपस्थित राहू न शकल्यास जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी यांनी ध्वजारोहन करावे.
            जिल्ह्यात 28 एप्रिल रोजी कोरोना संसर्ग संशयित म्हणून 104 नागरिकांची नोंद करण्यात आली असुन यातील  96 स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 88 नमुने निगेटिव्ह निघाले आहेत तर 8 नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत विदेशातूनराज्याबाहेरून व जिल्हा बाहेरून आलेल्या नागरिकांची संख्या 33 हजार 530 आहे. यापैकी 2 हजार 677 नागरिक निगराणीखाली आहेत. तर 14 दिवसांच्या होम कॉरेन्टाईन पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या 30 हजार 853 आहे. जिल्ह्यामध्ये इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाईन करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या 128 आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत यांनी दिली आहे.
            नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांविरुध्द जिल्हा प्रशासनाने कारवाई करत जिल्ह्यातील 272 प्रकरणात एकूण 15 लाख 36 हजार 270 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
यामध्ये नियमांचे पालन न करणाऱ्या  58 नागरिकांना अटक करण्यात आली आहे. तर 1 हजार 26 वाहने जप्त केली आहेत.
प्रशासनाने वेळोवेळी जारी केलेले नियम व सुचनांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द आणखी कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
            जिल्ह्यातील नागरिकांनी कम्युनिटी किचनजेवणाची व्यवस्थासार्वजनिक स्वच्छता व सामान्य चौकशीसाठी महानगरपालिकेच्या  07172-254614 या क्रमांकावर संपर्क साधावा. कॉरेन्टाईन संदर्भात तक्रार,अडचणी माहिती इत्यादींसाठी 07172-25327507172-261226 या क्रमांकावर संपर्क साधावा. उपचारसमुपदेशनपाठपुरावाअॅम्बुलन्स हवी असल्यास जिल्हा रुग्णालयाच्या 07172-270669  या क्रमांकावर संपर्क साधावा. तर रुग्णप्रवाशांची चौकशीशहरी व ग्रामीण भागात अन्नधान्याची कमतरता व सामान्य चौकशीसाठी  07172-251597तसेच टोल फ्री क्रमांक 1077 यावरसुध्दा चौकशी करता येणार आहे. मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना अडचण असल्यास त्यांनी आरटीओच्या 07172-272555 या क्रमांकावर संपर्क करावा तसेच पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा हॅलोचांदा 155-398 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.तसेच अधिकृत माहितीसाठी डिस्ट्रिक कोरोना कंट्रोल सेल हे फेसबुक पेज तसेच @InfoChandrapur या ट्विटर हँडलला फॉलो करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
00000

बेरोजगारांनो,शासकीय योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड लिंक करा


ऑनलाइन करता येणार नोंदणी
चंद्रपूर,दि.28 एप्रिल: राज्य शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे नाव नोंदणी केलेल्या नोकरी इच्छुक बेरोजगार उमेदवारांनी विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड ऑनलाईन लिंक करण्याची आवश्यकता असून  www.mahaswayam.gov.in येथे नोंदणी करावीअशी  माहिती सहाय्यक आयुक्तजिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भैयाजी येरमे यांनी दिलेली आहे.
नोकरीसाठी सेवायोजना कार्यालयाकडे नाव नोंदणी केलेल्या बेरोजगार उमेदवारांना सर्व सेवा सुविधा ऑनलाईन पध्दतीने वेबसाइटच्या माध्यमातून देण्यात येत आहेत. राज्यभरातील वेळोवेळी आयोजीत करण्यात  येणाऱ्या विविध रोजगार मेळाव्याची सर्व माहिती मिळविणे व त्यासाठी उत्सुकता व पसंतीक्रम नोंदविणेरोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून सहभाग मिळवणेकेंद्र राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कौशल्य विकास योजना व कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्था यांची माहिती प्राप्त करणे व सहभाग घेणे. आपली शैक्षणीक पात्रता वाढ करणेपत्तासंपर्क क्रमांकई मेल यामध्ये दुरूस्ती करणे वेगवेगळ्या उद्योजकांनी वेळोवेळी अधिसुचित केलेली रिक्त पदांची माहिती मिळवून त्यासाठी उमेदवारीचा अर्ज सादर करणे इत्यादी बाबींचा त्यात समावेश करण्यात आलेला आहे.
उद्योजकाच्या मागणीनुसार उमेदवारांच्या याद्यांमध्ये समावेश होण्यासाठी नोंदणीस आधारलिंक असणे आवश्यक आहे. अनेक बाबींचा लाभ मिळविण्यासाठी प्रत्येक उमेदवाराने नोंदणीसह आधारकार्ड जोडणी करणे गरजेचे आहे. असे भैयाजी येरमे यांनी स्पष्ट केले आहे.
00000

बिल्ट कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला


मदतीचा ओघ सुरुच आतापर्यंत 67 लक्ष रुपये जमा
प्रशासनातर्फे मदतीचे आवाहन
चंद्रपूर, दि.28 एप्रिल: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना पाठबळ म्हणून  जिल्हा सहायता निधीच्या स्वतंत्र बँक खात्यात  दानशूर व्यक्ती व संस्थांनी योगदान द्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार  यांनी केले होते. त्याला अनुसरून गेल्या काही दिवसांपासून या निधीकडे आर्थिक मदत जमा करण्याचा ओघ सुरू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत 67 लक्ष रुपयाचा निधी जिल्हाधिकारी सहायता निधीसाठी उपलब्ध झाला आहे.
                आज प्रामुख्याने दिपक प्रकाश गोनेवारचंद्रपूर यांच्याकडून रु.50 हजारचंद्रपूर तालुका प्राथमिक शिक्षक सह.पतसंस्था चंद्रपूरच्या वतीने रु.41 हजारचंद्रपूर जिल्हा परिषद कर्मचारी क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी चंद्रपूरच्या वतीने रु.31 हजार,सास्ती ओपन कास्ट माईन कामगार सह.पतसंस्था सास्तीच्या वतीने रु.25 हजारबळवंत गंपावार चंद्रपूर यांच्याकडून रु. 21हजारइनरव्हील क्लब चंद्रपुर व अध्यक्ष शेतकी मजूर सहकारी संस्था आवाळपूरच्या वतीने प्रत्येकी रु.10 हजारतर वंदना गंगाधर मुक्तावरम चंद्रपूर व छत्रपती शाहू महाराज नागरी सह.पतसंस्था,चंद्रपूर यांच्यावतीने प्रत्येकी रु.20 हजाराचा धनादेश सहायता निधीस देण्यात आला.
                आज मुख्यमंत्री सहायता निधी कोविंड-19 या स्वतंत्र बँक खात्यामध्ये विलास कोंडीबा सोनटक्केचंद्रपूर यांच्याकडून रु.लक्ष 50 हजार, वासुदेव सादमवार,चंद्रपूर यांच्याकडून रु.32 हजार 233, अध्यक्ष समृद्धी मजूर संस्था,गाडेगाव यांच्यावतीने रु.10 हजार तर बिल्ट आष्टी पेपर मिल मजदूर संघटना आष्टी अंतर्गत बिल्ट ग्राफिक पेपर प्रॉडक्ट लिमिटेडच्या वतीने रु.लक्ष 33 हजार 291, अवंथा होल्डिंग लिमिटेड युनिट आष्टीच्या वतीने रु.42 हजार 880 तर बिल्ट ग्राफिक पेपर प्रॉडक्ट लिमिटेड आष्टीच्या वतीने 1लक्ष 37 हजार 828 असे एकूण लक्ष 13 हजार 999 रुपयांचा धनादेश अध्यक्ष नरेश पुगलिया यांच्यावतीने बिल्ट कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन सहाय्यता निधीस देण्यात आले.
मदत करायचीय ? 'याबँक खात्यात पैसे जमा करा !
      कलेक्टर चंद्रपूर कोव्हिड-19 या नावाने जिल्ह्यातील अग्रणी बँक ऑफ इंडियामध्ये ‍ स्वतंत्र खाते उघडण्यात आले असून खाते क्रमांक  960310210000048  असून यासाठी आयएफएससी कोड  BKIDOOO9603  असा आहे. जिल्ह्यातील उद्योजककंपन्यांचे प्रमुखस्वंयसेवी संस्था,धार्मिक संस्था राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात त्या सर्व संस्था आणि नागरिकांनी सढळ हाताने मदतीची रक्कम जमा  करावी  असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.
00000

Monday 27 April 2020

चेक पोस्टवरून विनापरवाना कोणालाही आत सोडू नका ; जिल्हा कोरोनामुक्त ठेवा : ना. वडेट्टीवार



Ø  जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही
Ø  गावात येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी करा
Ø  वैद्यकीय तपासणी इतकीच नाकाबंदी जबाबदारीची
Ø  अन्नधान्य वाटपामध्ये जिल्ह्यात समाधानकारक काम
Ø  शेल्टर होममधील नागरिकांनी दूरध्वनी संवाद साधावा
Ø  अन्य ठिकाणच्या जिल्हावासियांनी जिल्ह्यात येण्याचा प्रयत्न करू नये
Ø  शेतीच्या सर्व कामांना शारीरिक अंतर ठेवून सुरू ठेवा
Ø  अजान देतांना मशिदीमध्ये 5 पेक्षा अधिक व्यक्ती नको
Ø  केशरी कार्ड धारकांनी धान्याची उचल तत्पर करावी
Ø  लॉकडाऊन मेपर्यंत कायम असून बाहेर पडू नये
Ø  विद्यार्थ्यांना आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत आहे
चंद्रपूर, दि.27 एप्रिल : जिल्ह्यातशहरातगावाच्या कोणत्याही भागात येणाऱ्या प्रत्येकाची नोंद होत आहे. त्यामुळे वैद्यकीय तपासणी एवढी नाका-बंदी देखील महत्त्वाची आहे. पोलिसांना हे काम अतिशय कठीण व 24 तास करावे लागत आहे. मात्र हा जिल्हा कोरोनामुक्त ठेवण्यासाठी पोलीस विभागाने विनापरवाना कोणालाही जिल्हयात घेऊ नयेअसे सक्त निर्देश आज राज्याचे आपत्ती व्यवस्थापनमदत पुनर्वसनइतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.
कृषी विभागाच्या मर्यादित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक झाली. या बैठकीनंतर जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक    डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या उपस्थितीत त्यांनी जिल्ह्यातील कोरोना संक्रमणासंदर्भात सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. नागपूरयवतमाळ या 2 लगतच्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढत आहे. महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाने थैमान घातले असून या परिस्थितीत जिल्हा कोरोनामुक्त ठेवणे अतिशय जिकिरीचेजबाबदारीचे आणि कर्तव्यदक्षतेचे काम आहे.ज्याप्रमाणे वैद्यकीय अधिकारी जीव धोक्यात घालून तपासणी करत आहेत. त्याच पद्धतीने नाका-बंदी देखील केली जात आहे. मात्र ही प्रक्रिया पुढील काही दिवस अतिशय जिकरीने करणे गरजेचे आहेतेव्हा पोलिस विभागाने राज्य जिल्हा सीमांवर विनापरवाना कोणालाही आत घेऊ नयेअसे निर्देश त्यांनी आज दिले.
          अन्य जिल्ह्यातील नागरिकांची आवश्यक ती काळजी शेल्टर होममध्ये घेतली जात आहे. आपल्या जिल्ह्यातील बाहेर अडकून पडलेल्या हजारो चंद्रपूरवासियांची काळजी अन्य जिल्ह्यात अन्य राज्यात घेतली जात आहे. त्यामुळे परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत जो जिथे आहे त्यांनी तिथेच राहणे आवश्यक आहे. घरापर्यंत पोहोचण्याशिवाय अन्य काही अडचण असल्यास त्यामध्ये निश्चित मदत केली जाईल. तोडगा काढला जाईलअसे देखील त्यांनी आज स्पष्ट केले.
जिल्ह्यातील सर्व मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या. आराधना आणि आणि दान करण्याचा हा महिना असून जिल्ह्यातील सर्व मुस्लिम बांधवांनी घरीच नमाज पडून सण साजरा करावा. घोळक्याने जमा होणे,घराबाहेर पडणे किंवा मशिदीमध्ये गोळा होणे धोकादायक आहे. मशिदीमध्ये अजान देताना केवळ 3 ते 5 नागरिक हजर राहतीलशारीरिक अंतर ठेवून धार्मिक विधी पार पडतीलप्रशासनाने दिलेल्या सूचना  पाळतील अशी विनंतीही त्यांनी नागरिकांना केली आहे.
कोरोना प्रादुर्भावाच्या  काळात आज खरीप हंगामपूर्व आढावा बैठक घेतली असून शेतकऱ्यांनी शेतातील सर्व कामे शारीरिक दूरी ठेवत पूर्ण करावी. हंगाम सुरू करण्यास आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा शासन उपलब्ध करून देत असल्याचे स्पष्ट केले.
जिल्ह्यामध्ये आतापर्यंत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभ योजनेअंतर्गत नियमित अन्नधान्य वाटप 99 टक्के पूर्ण झाले आहे. तर वरील योजनेतील नागरिकांना प्रतिव्यक्ती 5 किलो तांदूळ वाटपाचे काम 96 टक्के पूर्ण झाले आहे.या सर्व नागरिकांना एप्रिल महिन्याचे अन्नधान्य वाटप पूर्ण झाले आहे.केशरी कार्ड धारकांनी धान्याची उचल तत्पर करावी.
दरम्यान, 27 एप्रिल रोजी कोरोना संसर्ग संशयित म्हणून 101 नागरिकांची नोंद करण्यात आली असून यातील  93  स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 83 नमुने निगेटिव्ह निघाले आहेत तर 10 नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत विदेशातूनराज्याबाहेरून व जिल्हा बाहेरून आलेल्या नागरिकांची संख्या 33 हजार 245 आहे. यापैकी 2 हजार 697 नागरिक निगराणीखाली आहेत. तर 14 दिवसांच्या होम कॉरेन्टाईन पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या 30 हजार 548 आहे. जिल्ह्यामध्ये इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाईन करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या 122 आहे.
000000