Search This Blog

Wednesday 8 April 2020

मुख्यमंत्री सहाय्यता व जिल्हा सहाय्यता निधीला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद


चंद्रपूरदि.8 एप्रिल : कोरोना आजाराचा संभाव्य प्रादुर्भाव व त्यासाठीच्या उपाययोजनांसाठी  मोठ्या प्रमाणात आर्थिक  मदत आवश्यक आहे. त्यामुळेच दानशूर व्यक्ती व संस्थांनी समोर येऊन  आपले योगदान  द्यावे  असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. मुख्यमंत्री सहायता निधी प्रमाणेच चंद्रपूर जिल्ह्यासाठी जिल्हा सहाय्यता निधी कक्ष निर्माण करण्यात आला आहे.
आज प्रामुख्याने  जितेंद्र टोंगे,अध्यक्ष तंत्र शिक्षण कर्मचारी सहकारी पत संस्थेतर्फे रु.25 हजारकृषी उत्पन्न बाजार समिती तर्फे 1 लक्षसार्वजनिक बांधकाम खाते कर्म. सहकारी पत संस्थेतर्फे रु.1 लक्षसन्मित्र महिला नागरी सहकारी बँक मर्या.चंद्रपूर तर्फे 1 लक्ष रुपयेश्री. साईबाबा मंदीर निर्माण मंडळातर्फे 1 लक्ष  11 हजारमहाकाली देवस्थान 2 लक्ष 11 हजारवेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड कडून रुपये 25 लक्षचंद्रपूर  जिल्हा पाटबंधारे कर्मचारी सहकारी पतसंस्थाचंद्रपूर कडून 51 हजार रुपये सन्मित्र महिला नागरी सहकारी बँक चंद्रपूर शाखेकडून रुपये 1 लक्ष,रमेश कोतपल्लीवार कडून रु. 51 हजार तर एन.एच.गौरकार यांचेकडून रु. 21 हजार  कलेक्टर चंद्रपूर कोविड-19 या बँक खात्यात देणगीदार व संस्थाकडून जमा करण्यात आले.
            त्यासोबतच  मुख्यमंत्री सहायता निधी कोविंड-19 या स्वतंत्र खात्यामध्ये महाकाली देवस्थान तर्फे 3 लक्ष,  मा.आमदार किशोर जोरगेवार यांच्या तर्फे 2 लक्ष 11 हजार 863 , माजी खासदार नरेश पुगलिया रुपये 2 लक्षबल्लारपूर पेपर मिल मजदूर ट्रस्ट तर्फे 2 लक्ष रुपयेमहापौर राखी कंचर्लावार रुपये 1 लक्षमिलिंदकुमार भरणे (सिपेट) रुपये 3लक्षहर्षल ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्थेतर्फे रुपये 50 हजारकॅलिबर मेरकँटिले प्रा. लिमि. मार्फत रुपये 3 लक्षधनोजे कुणबी समाज मंदिर तर्फे 1 लक्ष 11 हजार,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असो. ऑफ इंजिनिअर चंद्रपूर तर्फे 1 लक्ष श्रीमती निरुपा बेंडले रुपये 1 लक्षव्यंकटेश्वरा टेम्पल ट्रस्ट मार्फत रुपये 1 लक्ष,  आनंद नागरी सहकारी बँक लिमि. तर्फे 1 लक्ष रुपये,  अंबादेवी देवस्थान वरोरा तर्फे 1 लक्षकृषी उत्पन्न बाजार समिती तर्फे 1 लक्ष,  प्रमोद उरकुडे  रु.31 हजार प्रदिप नगराळे रु.5 हजार राहुल जवादे ग्लोबल मेडीहेल्थ इन्फ्रास्ट्र्रक्चर प्रा. लि. तर्फे रु. 50 हजारपारस कांबळे,( ऊर्जा सोशल अंड कल्चरल फाउंडेशन) तर्फे रुपये 31 हजाररविंद्र भागवत तर्फे रु.  35 हजार 500 तर जेसीआय  संस्थेतर्फे रु. 21 हजार देणगी स्वरूपात देण्यात आले.
         कलेक्टर चंद्रपूर कोव्हिड-19 या नावाने जिल्ह्यातील अग्रणी बँक ऑफ इंडियामध्ये ‍ स्वतंत्र खाते उघडण्यात आले असून खाते क्रमांक  960310210000048  असून यासाठी आयएफएससी कोड BKIDOOO9603 असा आहे. जिल्ह्यातील उद्योजक,कंपन्यांचे प्रमुखस्वंयसेवी संस्था,धार्मिक संस्था राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात त्या सर्व संस्था आणि नागरिकांनी सढळ हाताने मदतीची रक्कम जमा करावी असे आवाहन जिल्हाधिकारी  यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment