Search This Blog

Tuesday 31 March 2020

घरातच सुरक्षित रहा, कोणाचीच उपासमार होऊ देणार नाही पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची ग्वाही; प्रशासनाचा घेतला आढावा





Ø  जिल्ह्यात एकही पॉझिटिव रुग्ण नाही
Ø  आतापर्यंत विदेशातून आलेल्या 154 प्रवाशांची नोंद
Ø  53 प्रवासी निगराणीत100 लोकांचे कॉरेन्टाईन पूर्ण
Ø  30 हजार जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करणार
Ø  सर्व कृषी केंद्रखते यांची दुकाने उघडे राहतील
Ø  शिवभजन यंत्रणा आणखी सक्षमतेने राबविण्याचे निर्देश
Ø  महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रातील स्वयंसेवी संस्थांनी पुढे यावे
Ø  वितरणासाठी शासकीय यंत्रणेचा सहभाग घ्यावा
Ø  सरपंचपं.स. सदस्य जि.प. सदस्य यांनी प्रशासनासोबत काम करावे
Ø  जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडणार नाही
Ø  जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येकाची कसून तपासणी करा
Ø  व्हाट्सअप वरील खोट्या संदेशापासून सावध रहा
Ø  मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सढळहस्ते मदत करावी
चंद्रपूर, दि.31 मार्च : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज रोजी एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाहीही बाब अतिशय सकारात्मक असून यासाठी आरोग्य यंत्रणाजिल्हा प्रशासन व स्वतःच्या घरात राहणाऱ्या जबाबदार नागरिकांचे मी कौतुक करतो. येणाऱ्या काळामध्ये आणखी जागरूक राहून लॉकडाऊन पाळायचा आहे. या काळात कोणाच्याही घरी अन्नधान्याचा तुटवडा किंवा उपासमार होणार नाही याची काळजी प्रशासनाच्या मदतीने मी घेतो. सर्वांनी राज्य शासनाच्या निर्देशांचे पालन करावेअसे आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसनआपत्ती व्यवस्थापनइतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज येथे केले.यावेळी चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार हे देखील उपस्थित होते त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये 2 लाख 11 हजार 863 रुपयाचा धनादेश पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या स्वाधीन केला.
ना.विजय वडेट्टीवार यांनी आज जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनारजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिलेमहानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते यांच्यासह जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत केलेल्या काटेकोर कामाचे कौतुक केले. मात्र एकीकडे लॉकडाऊन असताना कोणत्याच परिस्थितीत अन्नधान्याचा पुरवठा किंवा तयार अन्न पुरविण्याच्या प्रक्रियेतील त्रुटीमुळे उपासमार होणार नाही. याची काळजी घेण्याची सूचना त्यांनी केली. यावेळी एप्रिल नंतर आपण स्वतः वैयक्तीकरित्या 30 हजार अन्नधान्याच्या किट ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही अशा लोकांना देणार असल्याचे स्पष्ट केले.
      शेतकरीशेतमजूरगरीबनिराश्रितबेघर, विमनस्क अशा सगळ्या लोकांच्या रोजच्या भोजनाबाबत अधिक काळजी घेण्याची सूचना त्यांनी केली. महानगरात काही स्वयंसेवी संस्था पुढे आल्या आहेत. मात्र ग्रामीण भागात गावा गावातील सरपंचजिल्हा परिषद सदस्यपंचायत समिती सदस्य यांनी आपल्या परिसरात कोणी उपाशी राहणार नाहीयासाठी प्रशासनासोबत येऊन काम करावेअसे आवाहन त्यांनी केले.
अन्य राज्यातील अनेक मजूरकामगार रोजंदारी कर्मचारी बांधकामावर असणारे मजूरछोट्या-मोठ्या उद्योगात काम करणारे मजूरयांच्याकडे रेशन कार्ड नाही. मात्र रेशन कार्ड नाही म्हणून त्यांची उपासमार होता कामा नयेआपल्या राज्यातील अनेक ठिकाणी मजूर अडकून आहे.त्या त्या ठिकाणचे राज्यशासन त्यांची व्यवस्था करत आहेत. यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखरराव व अन्य मंत्र्यांची आपले बोलणे झाले आहे. अन्य राज्यातील मजूरप्रवासी व अडकून पडलेल्या सर्व नागरिकांची, विद्यार्थ्यांची कामगारांचीउपासमार होणार नाही. त्यांना योग्य मदत मिळेलयासाठी यंत्रणेने काम करावेअसे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
आरोग्य यंत्रणेने जिल्ह्यांमध्ये सुरू केलेले प्रशिक्षण व घेत असलेली काळजीतसेच आशा वर्कर पासून तर आरोग्य उपकेंद्रात प्राथमिक केंद्रामध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे त्यांनी या काळातील कर्तव्याबद्दल आभार व्यक्त केले. पुढील अनेक दिवस हा लढा आपल्याला लढायचा असून उत्तमोत्तम आरोग्य सुविधा आपल्याला मिळाव्यात यासाठी मंत्रालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मदत व पुनर्वसन मंत्रालयामार्फत आवश्यक असेल असे कितीही यंत्र खरेदी करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याची ही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात आतापर्यंत बाहेर देशातून प्रवास करून आलेल्या 100 नागरिकांचे होमकॉरेन्टाईन पूर्ण झाले आहे. 53 नागरीक अद्याप निगराणीत आहे . आत्तापर्यंत पाठवलेल्या सगळ्यांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. एकही रुग्ण पॉझिटिव्ह नाही. यासाठी आरोग्य यंत्रणापोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासन यांनी समन्वयाने सुरू केलेल्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभागाच्या समन्वयात सुरू करण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला देखील भेट दिली. जिल्ह्यांच्या सीमा बंद झाल्या असून सर्व जिल्ह्यात त्या त्या ठिकाणी नागरिकांची उत्तम व्यवस्था केली जात आहे.त्यामुळे अनावश्यक प्रवास टाळण्याचे त्यांनी आवाहन केले.सोबतच मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सढळहस्ते मदत करावी.सर्व कृषी केंद्र व खतांचा पुरवठा करणारी दुकाने उघडी ठेवावी.शिवभोजन यंत्रणा तालुका स्तरावर सक्रीय करण्यात यावी.व्हॉटसअप वरील खोट्या संदेशापासून नागरीकांनी सावध रहावे.अशा सुचना त्यांनी यावेळी केल्या.
यावेळी त्यांनी पोलिस प्रशासनाने गेल्या काही दिवसात अतिशय संयमाने काम केल्याबद्दल त्यांचेही कौतुक केले. आतापर्यंत 67 लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. विनाकारण बाहेर फिरणाऱ्याला मज्जाव करणेआवश्यक असून जनतेने या काळात गरज नसताना बाहेर पडूच नयेअसे आवाहन शेवटी त्यांनी यावेळी केले.
शहरात विविध सामाजिक संस्थांमार्फत सध्या भोजनदान चालू असून नागरिकांनी आपल्या अवतीभवती अशा पद्धतीने कोणाची उपासमार होत असल्यास महानगरपालिकेच्या   07172-254614 या क्रमांकावर संपर्क साधावा. कॉरेन्टाईन संदर्भात तक्रार अडचणी असल्यास 07172-253275, 07172-261226 या क्रमांकावर संपर्क साधावा. उपचारसमुपदेशनपाठपुरावाअॅम्बुलन्स हवी असल्यास जिल्हा रुग्णालयाच्या 07172-270669  या क्रमांकावर संपर्क साधावा. तर रुग्णप्रवाशांची चौकशीशहरी व ग्रामीण भागात अन्नधान्याची कमतरता यासाठी     07172-251597टोल फ्री क्रमांक 1077 यावर चौकशी करता येणार आहे. मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना अडचण असल्यास त्यांनी आरटीओच्या 07172-272555 या क्रमांकावर फोन करावा उद्यापासून पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा हॅलोचांदा सुरू होत असून टोल फ्री क्रमांक 155-398 वर दूरध्वनी करावाअसे आवाहन त्यांनी केले आहे.

00000

लॉकडाऊनमध्ये शाळेची फी जमा करण्यातून सूट

चंद्रपूर,दि. 31 मार्च: राज्यामध्ये 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन असल्याने या कालावधीमध्ये शाळेची फी जमा करण्यातून सूट देणेबाबत राज्य शासनाने एक परिपत्रक काढून स्पष्ट केले आहे.
राज्यातील कोरोना साथीची सध्याची परिस्थिती, लॉकडाऊन केल्यामुळे संपूर्ण हालचालीवर घालण्यात आलेली बंदी पर्यायाने नागरिकांना जाणवणारी पैशांची उपलब्धता या बाबी विचारात घेता सर्व बोर्डाच्यासर्व व्यवस्थापनाच्या शाळांना विनंती करण्यात येते कीविद्यार्थी आणि पालकांकडून शाळेची चालू वर्षाची व आगामी वर्षाची फी गोळा करताना सहानुभूती दाखविणे आवश्यक राहील.
लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये सदर फी जमा करण्याबाबत सक्ती करण्यात येऊ नये. लॉकडाऊन कालावधी संपल्यानंतर शाळेची फी जमा करण्याबाबतच्या सूचना संबंधितांना देण्याची कार्यवाही करावी.अशी माहिती राज्य शासनाने परिपत्रक जारी करून दिली आहे.
00000

नोंदणीकृत संस्था,न्यास यांनी प्रधानमंत्री सहाय्यता निधी व मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करा : चंदा ढबाले

चंद्रपूरदि. 31 मार्च : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत महत्वपूर्ण पाऊल उचलले असून सर्व देशांमध्ये लॉकडाऊन केले आहे.गरीबकष्टकरीमजूर यांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी व आवश्यक औषधोपचार पुरविण्यासाठी प्रधानमंत्री सहाय्यता निधी व मुख्यमंत्री सहाय्यता निधीला जिल्ह्यातील नोंदणीकृत संस्था व न्यास यांनी मदत करण्याचे आवाहन सहायक धर्मादाय आयुक्त चंदा ढबाले यांनी केले आहे.
मुख्यमंत्री  सहाय्यता  निधी- कोविड-19 हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले आहे. त्याचा बचत खाते क्रमांक 39239591720 आहे. यामध्ये धनादेश,डीडी अथवा ऑनलाईन निधी देऊ शकता.
या खात्यामध्ये जमा करता येणार मदत:
मुख्यमंत्री  सहाय्यता निधी-कोविड 19,बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720 स्टेट बँक ऑफ इंडिया,मुंबई मुख्य शाखाफोर्टमुंबई 400023,शाखा कोड 00300 आयएफएससी कोड SBIN0000300 या खात्यामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी मदत करता येणार आहे. सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (जी) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते.
लॉकडाऊनच्या बंधनास अधीन राहून तसेच कोरोना प्रसार प्रतिबंध करण्यासाठीच्या आवश्यक त्या आरोग्यविषयक मार्गदर्शन तत्त्वांचे पालन करून सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय चंद्रपूर अंतर्गत नोंदणीकृत सर्व संस्था व न्यास तसेच धर्मादाय रुग्णालय यांना आवाहन करण्यात येते की,गरीब व कष्टकरी तसेच मजूर यांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी त्यांना जीवनावश्यक वस्तू,अन्नधान्य आणि औषधोपचार पुरविण्यात यावे. तसेच रक्तदान शिबिर आयोजित करावे. आणि पंतप्रधान सहाय्यता निधी आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये आर्थिक स्वरूपात मदत करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास पाठविण्यात यावा असेही सहायक धर्मादाय आयुक्तांनी आवाहन केले आहे.
00000

पालकमंत्री विजय वडेट्टीवारांचा गरजवंताला मदतीचा हात

जिल्ह्यात निराश्रितांची उपासमार होऊ नये म्हणून मोफत अन्न धान्य वाटप
चंद्रपूर,दि.31 मार्च: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वत्र कडकडीत बंद आहे. अशावेळी गरजवंतांचीकष्टकऱ्यांची उपासमार होऊ नये म्हणून राज्याचे इतर मागास बहुजन कल्याणमदत व पुनर्वसनआपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्याकडून चंद्रपुर जिल्ह्यातील गरजू व गरीब कुटुंबाना 15 दिवस पुरेल इतके धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप येत्या 5 एप्रिलपासून करण्यात येणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनामार्फत अमलात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत गेले काही दिवस जिल्ह्यात संचारबंदी असल्यामुळे मजुरांच्या हाताला काम नाहीलहान व्यवसाय करणारे कारागीर व दुकानदार यांचा रोजगार बंद झाल्यामुळे त्यांना घरीच बसून राहावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या मुलाबाळांची उपासमार होऊ नयेत्यांना पोटभर अन्न उपलब्ध व्हावे म्हणून तसेच ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही अशा गरजू लोकांना पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांच्याकडून मोफत अन्न धान्य व जीवणावश्यक वस्तूचे वाटप संबधित तहसील कार्यालयाच्या माध्यमातून पालकमंत्र्यांचा मतदार क्षेत्र असलेल्या ब्रम्हपुरीसावली व सिंदेवाही या तालुक्यासाठी 15 हजार बॅग व जिल्ह्यातील उर्वरीत तालुक्यासाठी 15 हजार बॅग अशाप्रकारे 30 हजार बॅगचे वाटप करण्यात येणार आहे. हे साहित्य वाटप करण्यासाठी पालकमंत्र्यांनी संबधित तहसिल कार्यालयाचा कर्मचारीग्रामसेवक व काँग्रेसचे दोन प्रमुख कार्यकर्त्यांची तसेच चंद्रपूर शहरासाठी तहसिल कार्यालयाचा कर्मचारी व महाविकास आघाडी प्रमुख तीन कार्यकत्याची टीम तयार करण्यात आलेली आहे.ब्रम्हपुरीसिंदेवाहीसावली यासह जिल्ह्यातील तहसील कार्यालयात जीवनावश्यक धान्याचे किट उपलब्ध करण्याचं काम सुरु झाले असून येत्या 5 एप्रिल पासून त्याचे वाटप करण्यात येणार आहे. धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करताना शासनामार्फत लागू असलेले कलम 144 चे पालन व्हावे म्हणून गरजूवंतांची यादी तयार करण्याचे कामही युद्धपातळीवर सुरु आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावापासून देश वाचवण्यासाठी व देशाच्या चांगल्या आरोग्यासाठी  कठोर पाऊल उचलण्याची गरज होती. त्याचाच एक भाग म्हणून शासनाने संपूर्ण देशात लॉकडाऊन केले. संपूर्ण लॉकडाउन म्हटल्यावर सर्वच थांबलं. वाहतूक थाबलीकामधंदे थांबलेमग ज्याचे हातावर आणून पोट भरते त्यांचे कायत्यांच्या घरात चूल कशी पेटणार या विचारातून अशापरिस्थिती त्यांची उपासमार होऊ नये या उदात्त हेतूने पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या सहयोगाने व त्यांच्या मार्फतीने ब्रम्हपुरीसिंदेवाही व सावली तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व गरीब व गरजूना मोफत 10 किलो तांदूळ2 किलो तूर डाळ1 किलो खाद्य तेल200 ग्राम मिरची पावडर50 ग्राम हळद पावडर1 किलो मीठ1 डेटॉल साबण या जीवनावश्यक वस्तूचे किट वाटप करण्यात येणार आहे. शासनाकडून जे साहित्य मिळणार आहे ते साहित्य मिळेलच. त्या व्यतिरिक्त पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांच्याकडून हे साहीत्य मोफत मिळणार आहेत. समाजाने समाजाच्या कामात आले पाहिजे या उक्तीनुसार पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार हे नेहमीच कार्य करीत असून गरजूगरीबशेतकरीशेतमजूर या लोकांना मदत करण्यासाठी अग्रेसर असतात असा त्यांचा परिचय चंद्रपूर जिल्ह्यासह विदर्भात आहे.
०००००

Monday 30 March 2020

चौकशीसाठी येणाऱ्या आशा वर्कर व कर्मचाऱ्यांना योग्य माहिती दया : जिल्हाधिकारी

Ø  जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही
Ø  जिल्हा सिमांवरील नाकेबंदी कडक करणार
Ø  घराघरातून योग्य माहिती द्या ;सहकार्य करा
Ø  निराश्रितांसाठी जिल्ह्यात 31 निवारा कक्ष
Ø  मुख्यमंत्री व प्रधानमंत्री सहायता निधीला मदत करा
Ø  जीवनावश्यक कारखाना कामगारांनी कामावर रुजू व्हा
Ø  डॉक्टरांनी रुग्णसेवेत स्वतःला झोकून देण्याचे आवाहन
Ø  किरायादाराचे 1 महिन्याचे भाडे उशिरा घेण्याचे आवाहन
Ø  विनाकारण बाहेर फिरणाऱ्या 53 लोकांवर कारवाई
चंद्रपूर, दि. 30 मार्च : नागरिकांनी घराबाहेर पडू नये म्हणून आवाहन करतानाच जीवनावश्यक वस्तू त्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्यासाठी अतिशय गंभीरतेने प्रशासन प्रयत्न करत आहे. सध्या जिल्ह्यात एकही रुग्ण नाही. त्यामुळे पुढील काही दिवस नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. रुग्ण वाढल्यास लॉक डाऊनचा कालावधी वाढू शकतोअसे संकेत जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी आज दिले आहेत.
घरातील कोणी एका सुदृढ माणसाने या परिस्थितीत जीवनावश्यक वस्तूंसाठी गरज असेल तरच ओळखपत्रासह बाहेर पडावे. अन्यथा कोणीही बाहेर पडून आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य धोक्यात घालू नयेअसे आवाहन प्रशासन करत आहे. जीवनावश्यक वस्तू मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हाव्यात यासाठी उपाययोजना करताना नागरिकांनी गर्दीही करू नयेहे देखील बघावे लागत आहे.
दरम्यानजिल्ह्यांमध्ये आज एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. विदेशातून आलेल्या 28 लोकांना 14 दिवसांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. आत्तापर्यंत 95 नागरिकांनी 14 दिवसांचा होम कॉरेन्टाईन पूर्ण केले आहे. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. काल पाठवण्यात आलेल्या पैकी नमुने निगेटिव्ह आले. 1 नमुन्याचा अहवाल प्रतीक्षेत आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही.
जिल्ह्याच्या सीमा सर्व बाजूंनी बंद करण्यात आल्या आहे. येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. तसेच छोट्याशा गावापासून तर चंद्रपूर सारख्या महानगरांमध्ये मोठ्या प्रमाणात आशा वर्कर आरोग्य कर्मचारी प्रत्येक घरांमध्ये जाऊन सर्वेक्षण करत आहेत. या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे जर कुणी आजारी असेल तर त्याची माहिती कळवावी. कोरोना हा आजार योग्य उपचाराने काही दिवसांच्या कालावधीत देखील संपूर्णतः बरा होऊ शकतो. आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्येही उदाहरणे पुढे आली आहे. त्यामुळे वेळीच औषधोपचार व संपर्कात न येणे हेच यावरचे उपाय असून त्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
      जिल्ह्यामध्ये सॅनीटायझर व अन्य जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडू नये यासाठी स्थानिक स्तरावरील सर्व कारखाने सुरू करण्याचे सांगितले आहे. प्रत्येक अत्यावश्यक आस्थापनावरील प्रमुख व्यक्तीने आपल्या कर्मचाऱ्यांना ओळखपत्र देणे गरजेचे आहे. कामगारांना विनंती करण्यात येते कीज्या कामगारांचा संबंध जीवनावश्यक वस्तूंशी आहे. त्या सर्वांनी ओळखपत्र सोबत ठेवून कामावर पोहोचावे.
सध्या सर्वांना घरीच बसून राहण्याचे निर्देश दिले असल्यामुळे व व्यवहार बंद असल्यामुळे आर्थिक परिस्थिती नसलेल्या किरायेदाराकडून सध्याच घर मालकांनी किरायाची सक्ती करू नये. याचा अर्थ किराया माफ झाला असे नव्हे. तर केवळ या महिन्यासाठी घेऊ नयेहा किराया पुढील महिन्यात घ्यावा. यासोबतच त्याला घर खाली करायला सांगू नयेअसे निर्देश केंद्र शासनाकडून आले आहेत.
कोरोना आजारामुळे सध्या नागरिक दहशतीत आहेत.अशावेळी छोट्या-मोठ्या आजारांसाठी त्यांना वैद्यकीय सल्लाजुजबी उपचारही आवश्यक असतात. इंडियन मेडिकल असोसिएशनचे संबंधित सर्व डॉक्टरांनी आपले दवाखाने सुरू करण्याचे मान्य केले असून सर्वांनी रूग्ण सेवा सुरु करावीअसे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.
बाहेर राज्यातून अडकून पडलेले नागरिक, कामगार, मजूर यांनी कोणताही प्रवास न करता महानगरपालिकानगरपालिकाग्रामपंचायततसेच जिल्हास्तरावर सुरू करण्यात आलेल्या शेल्टर हाऊस अर्थात निवारा कक्षामध्ये आसरा घ्यावा. या ठिकाणी त्यांच्या राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी कोणतीही अडचण असल्यास वारंवार जाहीर करण्यात येणाऱ्या आवश्यक दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
देशभर कोरोना रुग्ण वाढत असताना काही नागरिक कोणतेही काम नसताना घराबाहेर पडत आहेत.त्या सर्वांना पुन्हा विनंती येते कीत्यांनी स्वतःच्या आरोग्यासाठी व कुटुंबासाठी घरातच राहणे योग्य राहील. पोलीस यासंदर्भात ओळखपत्र व आवश्यक माहिती घेऊन कार्यवाही करत आहे. आतापर्यंत 53 लोकांवर कार्यवाही झाली असून यापुढे विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना ताब्यात घेण्यात येईलअसेही स्पष्ट करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री सहायता निधी व प्रधानमंत्री सहायता निधी साठी मोठ्या प्रमाणात दानशूर व्यक्ती व संस्थांनी मदत करण्याचे आवाहन देखील प्रशासनाने केले आहे. यामाध्यमातून कोरोना संदर्भात लोकोपयोगी कामे हाती घेतली जात आहे. ही लढाई आणखी काही दिवस चालणार असून यासाठी सर्वांनी सहकार्य करावेअसेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

निकृष्ट दर्जाचे मासे विकणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

चंद्रपूरदि. 30 मार्च: जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी लॉकडाऊन असून या काळामध्ये निकृष्ट दर्जाचे मासे विकणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन चंद्रपूर यांनी कारवाई केली आहे.
अन्न व औषध प्रशासन चंद्रपूर या कार्यालयास प्राप्त तक्रारीच्या आधारे कार्यालयातील अन्नसुरक्षा अधिकारी अ.या. सोनटक्के यांनी दिनांक 30 मार्च रोजी चंद्रपूर शहरातील बंगाली कॅम्प भागातील मच्छी विक्रेत्यांची तपासणी केली.सदर तपासणीमध्ये राम मंदर बिस्वास हा मासे विक्रेता निकृष्ट दर्जाचे मासे ज्यामधून दुर्गंध येत होता अशा माशांची विक्री करीत असल्याचे आढळून आले.
सदर मासे खाण्यास अयोग्य असल्याने एकूण रुपये 1 हजार 200 किमतीचे मासे अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 चे कलम 38 (4) अन्वये कारवाई करण्यात आली असून हे मासे डंपिंग यार्ड येथे नेवून नष्ट करण्यात आले.
चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व अन्न व्यावसायिकांनी निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थाची साठवणूक व विक्री करू नये तसे करीत असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 अंतर्गत कारवाई करण्यात येईलअशी माहिती प्रसिद्धीपत्रकात सहायक आयुक्त (अन्न) अन्न व औषध प्रशासन,चंद्रपूर नितीन मोहिते यांनी दिली.
00000

जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांसाठी ऑनलाईन ई-पासची सुविधा

चंद्रपूर,दि.30 मार्च: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारे वाहने व अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांसाठी पोलीस यंत्रणेमार्फत ई-पास देण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन प्रणाली तयार करण्यात आली असून covid19.mhpolice.in या संकेतस्थळावर संबंधित वाहनधारकांना अर्ज करता येईल.
जिल्ह्यामध्ये लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे औषधी दुकानेदूध,भाजीपाला,अन्नधान्य इत्यादी विविध जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यास मान्यता देण्यात आली आहे.परंतु,या वाहतुकीसाठी संबंधित वाहन धारकास प्रशासनाची मान्यता घेणे आवश्यक आहे. यासाठी पोलीस  आरटीओ तसेच जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत अशा वाहनांना ई-पास देण्यात येत आहे. ही  ई-पास ऑनलाईन असल्याने covid19.mhpolice.in या संकेत स्थळावर जाऊन संबंधितांनी अर्ज करून आपले ई-पास प्राप्त करून घ्यावे. प्राप्त अर्जाची पडताळणी करून संबंधित वाहनधारकांना ऑनलाइन प्रणाली वरूनच डाउनलोड करता येणार आहे. ई-पास च्या माध्यमातून वाहनधारक वाहतूक करू शकणार आहे.

जिल्ह्यातील सर्व जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारे वाहनधारक व अत्यावश्यक सेवा देणाऱ्या संस्था  व्यक्ती covid19.mhpolice.in या संकेतस्थळावरून ई-पास साठी अर्ज करू शकतात. याठिकाणी सर्व आवश्यक माहिती भरल्यानंतर टोकन आयडी प्राप्त होतो. नंतर याचा वापर अर्जाची स्थिती तपासण्यासाठी करता येणार आहे.पोलीस यंत्रणेच्या मान्यतेनंतर टोकन आयडी वापरून ई-पास डाऊनलोड करता येईल.
या असणार ई-पासच्या सुविधा:
ई-पास मध्ये अर्जदाराची माहितीवाहन क्रमांकवैधता तारीख आणि क्यूआर कोड असणार आहे. प्रवास करताना ई-पासची सॉफ्ट तसेच हार्ड कॉपी जवळ ठेवावी.
वैध तारखेनंतर त्याचा वापर किंवा अन्य प्रकारे गैरवापर केल्यास तो दंडनीय गुन्हा मानला जाईल.
ई-पासच्या अधिक माहितीसाठी,मालवाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना अडचण असल्यास त्यांनी आरटीओच्या 07172-272555 या क्रमांकावर संपर्क करावा.
00000

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी चंद्रपूरकरांची मदत आणखी मदतीसाठी स्वयंसेवी संस्था व नागरिकांनी पुढे यावे

चंद्रपूरदि. 30 मार्च: राज्यावर कोरोना विषाणूचे संकट असल्यामुळे पूर्ण देशामध्ये लॉक डाऊन करण्यात आले आहे. यामुळे अनेक निराश्रित गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तू मिळावे यासाठी राज्यशासन व प्रशासन काम करीत आहे. तसेच आरोग्य व्यवस्था व इतर वैद्यकीय मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
मुख्यमंत्री  सहाय्यता  निधी- कोविड-19 हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले आहे. त्याचा बचत खाते क्रमांक 39239591720 आहे. 
या खात्यामध्ये जमा करता येणार मदत:
मुख्यमंत्री  सहाय्यता निधी-कोविड 19,बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720 स्टेट बँक ऑफ इंडिया,मुंबई मुख्य शाखाफोर्टमुंबई 400023,शाखा कोड 00300 आयएफएससी कोड SBIN0000300 या खात्यामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी मदत करता येणार आहे. सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (जी) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते. 
जिल्ह्यातील दुर्गापूरचे माजी सरपंच सत्यवान बेंडले यांनी दिनांक 30 मार्च रोजी रुपये 1 लाख धनादेशच्या स्वरूपात कोरोना आजारावरील नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांना  देऊन मुख्यमंत्री सहायता निधीला मदत केली.
कोरोना आजाराच्या नियंत्रणासाठी मदत करायची असल्यास त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला वरील दिलेल्या खात्यामध्ये मदत करावी. किंवा मदतीचा धनादेश जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये द्यायचा असल्यास फक्त दोनच व्यक्ती येऊन हा धनादेश द्यावा जेणेकरून गर्दी टाळल्या जाईल व आपल्याला मदतही  करता येईलअसे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
00000

जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांच्या घरांमध्ये आवश्यक दूरध्वनी क्रमांक नोंद करण्याचे आवाहन



चंद्रपूर,दि.30 मार्च: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढील नागरिक घराबाहेर निघू नयेत व त्यांना जीवनावश्यक वस्तूंची कमतरता देखील पडू नये अशा दोन्ही बाजूला प्रशासन तयारी करत आहे अशावेळी संपर्काचे साधन म्हणून जिल्ह्यांमध्ये जारी करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाच्या दूरध्वनी क्रमांकाची नोंद प्रत्येक घराघरात घ्यावीअसे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
जिल्ह्यामध्ये  संचारबंदी लागू आहे. या काळात नागरिकांना अनेक प्रश्न पडतात. घरा बाहेर कोणी पडावे व पडू नयेयापासून तर आवश्यक सुविधा व आरोग्यविषयक प्रश्नांच्या  सोडवणुकीसाठी जिल्हा व तालुका स्तरावर  विविध हेल्पलाइन जिल्हा प्रशासनाने सुरू केल्या आहेत. याशिवाय हॅलो चांदा देखील यंत्रणा सुरू झाली आहे . या सर्व सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना  कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाल्यास त्यांनी प्रशासनाने जारी केलेल्या अधिकृत दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रतिबंधक उपाय योजना म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील व तालुक्यातील  नागरिकांना क्वॉरेन्टाईन संदर्भात तक्रारअडचणीमाहिती इत्यादीसाठी  तसेच उपचार, समुपदेशन, पाठपुरावाॲम्बुलन्सरुग्णांचीप्रवाशांची,अन्नधान्य व सामान्य चौकशीसाठीकम्युनिटी किचन,जेवणाची व्यवस्थासार्वजनिक स्वच्छतासामान्य चौकशी, कायदा-सुव्यवस्था वाहतूक इत्यादी संदर्भात तक्रार व मदतीसाठी अधिकृत दूरध्वनी क्रमांक जारी केले आहे.
क्वॉरेन्टाईन संदर्भात तक्रारअडचणीमाहिती इत्यादीसाठी नियंत्रण कक्ष एकात्मिक रोग संरक्षण प्रकल्प यांना 07172-253275,07127-261226 या क्रमांकावर,  उपचार,समुपदेशनपाठपुरावा,ॲम्बुलन्स इत्यादी माहितीसाठी नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय येथे 07172-270669 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
आपत्ती व्यवस्थापन कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे रुग्णांची, प्रवाशांची, अन्नधान्य व सामान्य चौकशीसाठी 07172-251597 या दूरध्वनी क्रमांकावर. तसेच टोल फ्री क्रमांक 1077 ‌ या अधिकृत दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करु शकता.
चंद्रपूर महानगरपालिका कक्षांतर्गत कम्युनिटी किचनजेवणाची व्यवस्थासार्वजनिक स्वच्छतासामान्य चौकशी इत्यादी माहितीसाठी 07172-254614 ‌ तसेच
कायदा-सुव्यवस्था, वाहतूकसंचारबंदी इत्यादी संदर्भात तक्रार, मदतीसाठी
                          07172-273258,07172-263100 या पोलीस नियंत्रण कक्षाच्या दूरध्वनी क्रमांकावर नागरिकांनी संपर्क करावा.
जीवनावश्यक वस्तूची वाहतूक करणाऱ्या वाहनांचा परवाना काढण्यासाठी 07172-272555 या क्रमांकावर संपर्क करू शकता.
तालुकास्तरीय कोरोना नियंत्रण तथा सहाय्यता कक्षाला मदतीसाठी संपर्क करू शकता यामध्येचंद्रपुर 07172-250206, बल्लारपुर 07172-241391, राजुरा 07173-222131, भद्रावती 07175-265080, वरोरा 07176-282110, मुल 07174-220310, सावली 07174-274412, गो़डपिपरी 9119526147, पोंभुर्णा 07171-295999,9922242938, सिंदेवाही 07178-288245, चिमुर 07170-265547, नागभिड 07179-240050, ब्रम्हपुरी 07177-272073, कोरपना 07173-236658, जिवती 07173-295700 या अधिकृत दूरध्वनी क्रमांकावर मदत व चौकशीसाठी संपर्क करू शकता.
00000

कोरोना प्रादुर्भावाच्या काळामध्ये घरातील वयस्कांची अशी घ्या काळजी

चंद्रपूरदि.30 मार्च : जागतिक पातळीवरकोविड -19 ने अनेक लोकांवर परिणाम केला आहे आणि सातत्याने प्रादुर्भाव वाढतच आहे. चीन,इटलीअमेरिकाफ्रान्स या देशांमध्ये  सर्वाधिक प्रादुर्भाव झाला आहे.  या ठिकाणच्या दुर्घटनांवरून या काळात घरातील वयस्क नागरिकांची पुढील प्रमाणे काळजी घेणे आवश्यक आहे.
कमी रोगप्रतिकारक शक्ती तसेच मधुमेहउच्च रक्तदाबमूत्रपिंडाचा आजार आणि तीव्र अडथळा फुफ्फुसीय आजारासारख्या  वयस्क नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो.  तसेचवयस्क नागरिकांच्या बाबतीत जास्त मृत्यूचे प्रमाण उद्भवू शकते. 

वयस्क नागरिकांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुढील उपायांद्वारे कमी करता येऊ शकते:
हे करा :
घरीच रहाघरी अभ्यागतांना भेटणे टाळा.जर बैठक आवश्यक असेल तर सुरक्षित मीटर अंतर ठेवा,आपले हात आणि चेहरा साबणाने आणि पाण्याने धुवा,शिंकतांना व खोकतांना एकतर आपल्या हाताचा कोपरा नाकावर,तोंडावर ठेवा किंवा टिशू पेपर,रुमाल वापराखोकला किंवा शिंकल्यानंतर टिशु पेपरची योग्य विल्हेवाट लावा तसेच  आपला रुमाल धुवाघरी शिजवलेले ताजे गरम जेवण घ्या. जेणेकरून यांच्याद्वारे योग्य पौष्टिकता मिळेलप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ताज्या फळांचा ताजा रस घ्या,नियमित व्यायाम आणि ध्यान करा,दररोज लिहून दिलेली औषधे नियमितपणे घ्या,आपल्या कुटुंबातील सदस्यांशी (तुमच्याबरोबर राहत नाही)नातेवाईकमित्रांशी कॉल किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलाआवश्यक असलेल्या कुटुंबातील सदस्यांची मदत घ्या,मोतीबिंदू शस्त्रक्रिया किंवा गुडघा पुनर्स्थापने सारख्या आपल्या वैकल्पिक शस्त्रक्रिया (पुढे असल्यास) पुढे ढकला,वारंवार स्पर्श केलेल्या पृष्ठभागास जंतुनाशकांसह नियमितपणे स्वच्छ करा,आपल्या आरोग्यावर लक्ष ठेवा. जर आपल्याला तापखोकला किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर ताबडतोब जवळच्या आरोग्य सेवा सुविधेशी संपर्क साधा आणि त्यांनी दिलेल्या वैद्यकीय सल्ल्याचे पालन करा.
हे करू नका :
आपल्या उघड्या हातावर किंवा आपला चेहरा झाकल्याशिवाय खोकला किंवा शिंकू नका,जर आपल्याला ताप आणि खोकला येत असेल तर आपला संपर्क येईल अशा व्यक्ती जवळ जाऊ नका,डोळेचेहरानाक आणि जीभ याला स्पर्श करू नका,प्रभावित,आजारी लोकांच्या जवळ जाऊ नका,स्वत:च औषधोपचार करू नकाहॅन्ड शेक करू नका किंवा आपल्या मित्रांना आणि जवळच्यांना मिठी देऊ नका. दररोजच्या तपासणीसाठी किंवा पाठपुरावा करण्यासाठी रुग्णालयात जाऊ नका. शक्यतो आपल्या हेल्थकेअर प्रदात्याशी दूरध्वनी-सल्लामसलत करा,उद्यानेबाजारपेठ आणि धार्मिक स्थळांवर गर्दी असलेल्या ठिकाणी जाऊ नका,हे अती आवश्यक नसल्यास बाहेर जाऊ नका.
00000

विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना सक्तीने ताब्यात घेण्याचे प्रशासनाचे निर्देश


सर्व खासगी डॉक्टरांना दवाखाने उघडणे अनिवार्यअन्यथा कारवाई करणार
Ø  45 प्रवासी होम क्वारेन्टाईन 
Ø  प्रवासी संस्थात्मक क्वारेन्टाईन मध्ये
Ø  आयसोलेशन वॉर्डमध्ये रुग्ण
Ø  जिल्ह्यामध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही
Ø  आरोग्य विभागाचे मोठ्याप्रमाणात प्रशिक्षण सुरू
Ø  गरजेनुसार सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना सेवा द्यावी लागणार
Ø  जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कायम राहिल
Ø  अन्य राज्यातील नागरिकांनी जिथे आहे तिथेच थांबावे
Ø  राज्यातील नागरिकांनीदेखील अन्य राज्यात जिथे आहे तिथेच थांबावे
Ø  जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना टोल नाही
Ø  तालुकास्तरावर शिवभोजन सुरू करण्याचे प्रशासनाचे निर्देश
Ø  तेलंगाना,तामिळनाडू,आंध्रमध्य प्रदेश मधील अनेक नागरिक आश्रयाला
Ø  हॅलो चांदा वरूनही आता कोरोना विषयी माहिती मिळणार
Ø  महिनाभर घरमालकांनी किरायादाराला घर खाली करण्यास सांगू नये
चंद्रपूर,दि. 29 मार्च: कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसोबतच जिल्ह्यामध्ये आरोग्य यंत्रणा आणखी  सक्षम होत आहे.  मोठ्या प्रमाणावर  प्रशिक्षण सुरू असून  उद्रेकाच्या काळात  सामना करण्याची तयारी केली जात आहे. मात्र या उद्रेकाच्या मुळाशी असणारा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर निघू नयेअसे आवाहन करण्यात आले आहे. उद्यापासून पोलिसांची कारवाई सक्त होणार असून जिल्ह्यातील सर्व खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने उघडण्याबाबतही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
आज जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्या मार्गदर्शनात झालेल्या विभाग प्रमुखांच्या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिलेमहानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहितेउपजिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्यासह आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी व विभाग प्रमुख उपस्थित होते.
विनाकारण घराबाहेर पडून कोरोना आजाराला आमंत्रण देणाऱ्या नागरिकांवर आता सक्ती केली जाणार असल्याचे यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीकिराणा दुकानदारभाजीपाला विक्रेतेयांनी शासनाने दिलेले सर्व नियम व्यवस्थित पाळणे आवश्यक आहे. याबाबत मनमानी करणाऱ्यांवर देखील कारवाई करण्याचे निर्देश यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.
चंद्रपूर महानगर तसेच जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी आणि सार्वजनिक वितरण प्रणाली मध्ये काम करणारे भाजीविक्रेतेकिराणा दुकानदार व जीवनावश्यक सेवेत असणाऱ्या सर्व दुकानदारांनीव्यापाऱ्यांनी या परिस्थितीमध्ये कुठल्याही बाबीवर अडून न राहता शासनाच्या निर्देशाप्रमाणे काम करण्याचे स्पष्ट संकेत आज देण्यात आले आहे.
उद्रेकाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असल्यामुळे यावेळी सर्व नागरिकांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. डॉक्टरांनी आपले दवाखाने पूर्ववत सुरू करावे. काहींनी सामाजिक जाणीव ठेवून यामध्ये पुढाकार घेतला आहे .मात्र इंडियन मेडिकल कौन्सिलच्या सर्व सदस्यांना आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी आपले दवाखाने पूर्ववत सुरू करावे. कोणाच्या दहशती मध्ये असणाऱ्या सामान्य रुग्णांकडून नियमित स्वरूपाचे तपासणी शुल्क घ्यावेदवाखाने सुरू न करणाऱ्या डॉक्टरांवर प्रसंगी कारवाई केली जाईल ,असेही आज उच्चस्तरीय बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता एस. एस. मोरे व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्या नेतृत्वात जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आवश्यक प्रशिक्षण सुरू झाले आहे. वैद्यकीय सेवेसाठी आवश्यक असणारे मास्क आणि पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले असून आणखी काही साहित्य पोहचत आहे. लवकरच हे साहित्य उपलब्ध होणार असून जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनात 100 बेडचे अद्यावत कोरोना ट्रिटमेंट वरील वार्ड उभा झाला आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाकडून यासाठी आवश्यक असणारी कारवाई करण्याचे निर्देश आजच्या बैठकीत देण्यात आले.
संचार बंदीच्या काळामध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकाने व खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या सेवा सुरू ठेवलेल्या असून कुठल्याही वस्तूंची टंचाई नाही. त्यामुळे नागरिकांनी पण अनावश्यक कारणासाठी बाहेर पडू नये अशी देखील जिल्हाधिकारी यांनी सांगितले.परराज्यातील तसेच परजिल्ह्यातील कामगार अडकलेली आहेत. अशा कामगारांची प्रशासन व स्वयंसेवी संस्थांमार्फत काळजी घेण्यात येत आहे. अडकलेल्या कामगारांबाबतची माहिती स्थानिक लोकांनी देखील आवश्यक असणाऱ्या हेल्पलाइन क्रमांकावर द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
 मोफत भोजन हे केवळ निराश्रित, बेघर, विमनस्क लोकांसाठी आहे. त्यामुळे यासाठीचा आग्रह करण्यात येऊ नये. मोफत भोजन वितरण करताना गरजू व्यक्ती उपेक्षित राहू नयेमात्र ज्यांच्याकडे स्वयंपाकाची व्यवस्था आहे. अशा कोणत्याही व्यक्तीला या वाटपात सहभागी करण्यात येऊ नये असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील नगरपालिका,नगरपरिषद येथे शेल्टर होमची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे. त्यांना भोजनाची व वैद्यकीय मदत मिळण्यासाठी पुरेपूर प्रयत्न जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आली आहे. परराज्यातील तसेच परजिल्ह्यातील कामगार यांना मदतीची गरज असेल त्यांनी संबंधित तहसील व नगरपालिका त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे. त्यांची पूर्ण व्यवस्था मोफत करण्यात येईल. जिल्ह्यात असणाऱ्या अन्य राज्यातील नागरिकांनी घाबरून न जाता सुविधांचा योग्य वापर घ्यावा व अन्य ठिकाणी असणाऱ्या नागरिकांनी देखील त्याच ठिकाणी राहून जिल्ह्यात  पोहोचण्याचा प्रयत्न करु नये असेआवाहन करण्यात आले आहे.
कोरोनामुळे सर्वत्र बंद असल्यामुळे कोणत्याही घर मालकाने किरायादाराला घर खाली करायला सांगू नये. तसेच, एक महिन्याचे घर भाडे सध्या घेऊ नये असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
आतापर्यंतच्या काळामध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी सहकार्य केले असुन असेच सहकार्य 14 एप्रिल पर्यंत अपेक्षित असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे. प्रशासनाने भाजीदुकाने लावून दिलेली आहेत. या दुकानांमध्ये भाजी घेताना नागरिकांनी मीटरचे अंतर ठेवणे गरजेचे आहे.
प्रधानमंत्री सहायता निधी व मुख्यमंत्री सहायता निधी यामध्ये अनेक संस्थांनी लाखो रुपयांची मदत केली आहे. यामध्ये आणखी मदतीची आवश्यकता असून जिल्ह्यातील नागरिक व संस्थांनी स्वतः पुढे येऊन या कोरोनावर मात करण्यासाठी मदत करावी, असे आवाहन देखील जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
जिल्ह्यातील अनेक कामगार,नागरीक इतर राज्यांमध्ये अडकलेले आहेत अशा नागरिकांशी  जिल्हा प्रशासन दररोज संपर्क साधत आहे. हे सर्व नागरिक येथे सुरक्षित असून त्यांची पूर्ण काळजी घेण्यात येत आहे.
शहरात विविध सामाजिक संस्थांमार्फत सध्या भोजनदान चालू असून नागरिकांनी आपल्या अवतीभवती अशा पद्धतीने कोणाची उपासमार होत असल्यास महानगरपालिकेच्या              07172-254614 या क्रमांकावर संपर्क साधावा.कॉरेन्टाईन संदर्भात तक्रार अडचणी असल्यास 07172-253275, 07172-261226 या क्रमांकावर संपर्क साधावा. उपचारसमुपदेशनपाठपुरावाअॅम्बुलन्स हवी असल्यास जिल्हा रुग्णालयाच्या 07172-270669  या क्रमांकावर संपर्क साधावा. तर रुग्णप्रवाशांची चौकशीशहरी व ग्रामीण भागात अन्नधान्याची कमतरता यासाठी     07172-251597टोल फ्री क्रमांक 1077 यावर चौकशी करता येणार आहे. मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना अडचण असल्यास त्यांनी आरटीओच्या 07172-272555 या क्रमांकावर फोन करावा उद्यापासून पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा हॅलोचांदा सुरू होत असून टोल फ्री क्रमांक 155-398 वर दूरध्वनी करावाअसे आवाहन करण्यात आले आहे.
00000