Search This Blog

Monday 30 March 2020

शिधापत्रिकाधारकांना एकत्रित 3 महिन्यांचे धान्य मिळेल : डॉ.कुणाल खेमनार

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला निर्णय
चंद्रपूर,दि. 25 मार्च: कोरोना (कोविड-19) विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशामध्येच संचारबंदी लागू झाली आहे. जिल्ह्यात सुद्धा संचारबंदी लागू असून जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने वगळता सर्वच दुकाने बंद करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना नियमित धान्य वितरण सुरू आहे.परंतु, या धान्य दुकानांमध्ये शिधापत्रिकाधारकांनी गर्दी करू नये. यासाठी एप्रिल,मे व जून 2020 या तीन महिन्याचे एकत्रित धान्य वितरण होणार आहे.
जिल्ह्यांमध्ये धान्य वाटप करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू करण्यात येणार आहे.अन्नधान्याची उचल करण्यासाठी अतिरिक्त वाहने यांची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे.शिधापत्रिकाधारकांनी धान्य घेतांना गर्दी होवू नये तसेच धान्य दुकानासमोर 1 मीटरचे अंतर राखुनच धान्य वितरण केल्या जात आहे तसेच धान्य घेण्यासाठी येणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना हॅन्ड वॉश तसेच सॅनीटायझर वापरूनच धान्य वितरण करण्यात येत आहे. अशी खबरदारी प्रशासनाअंतर्गत घेण्यात येत आहे.
शिधापत्रिकाधारकांना एप्रिलमध्येच तीन महिन्यांचे धान्य एकत्रित उपलब्ध करून देण्यात येत आहे. तरी सर्व शिधापत्रिकाधारकांनी अन्नधान्याची उचल करूण पावती अवश्य घ्यावी,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment