Search This Blog

Wednesday 30 June 2021

जिल्ह्यात 24 तासात 24 कोरोनामुक्त

 

जिल्ह्यात 24 तासात 24 कोरोनामुक्त, 15 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यु

चंद्रपूर,दि. 30  जून :  गत 24 तासात जिल्ह्यात 24 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर 15 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच एका बाधिताचा जिल्हयात मृत्यू झाला आहे.

            आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार बाधित आलेल्या 15 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 3, चंद्रपूर तालुका 0, बल्लारपूर 1, भद्रावती 0, ब्रम्हपुरी 0 , नागभीड 0, सिंदेवाही 0, मूल 4, सावली 0, पोंभूर्णा 0, गोंडपिपरी 0, राजूरा 1, चिमूर 0 , वरोरा 2, कोरपना 4, जिवती 0 व इतर ठिकाणच्या 0 रुग्णांचा समावेश आहे. आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील एका पुरुषाचा समावेश आहे.

 जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 84 हजार 679 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 82 हजार 932 झाली आहे. सध्या 219 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 5 लाख 59 हजार 193 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 4 लाख 71 हजार 717 नमुने निगेटीव्ह आले आहेत.  जिल्ह्यात आतापर्यंत 1528बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

हत्तीरोग दूरीकरणाकरीता जिल्हा प्रशासन सज्ज


हत्तीरोग दूरीकरणाकरीता जिल्हा प्रशासन सज्ज

Ø 1 जुलैपासून आरोग्य विभाग राबविणार विशेष मोहिम

चंद्रपूर दि. 30 जून : राष्ट्रीय किटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दि. 1 ते 15 जुलै 2021 या कालावधीत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांच्या मार्गदर्शनाखाली हत्तीरोग दूरीकरणाकरीता सार्वत्रिक औषधोपचार विशेष मोहिम संपूर्ण जिल्हयात राबविण्यात येत आहे.

हत्तीरोग हा क्युलेक्स डासाच्या मादीपासून संक्रमीत होणारा दुर्लक्षित आजार आहे. या  आजारामुळे रुग्ण दगावत नसला तरी, हत्तीसारखे हात, पाय सुजणे, स्तनांवर सुज येणे, अंडवृध्दी होणे अशा प्रकारच्या शारिरीक विकृती येऊ शकतात. हत्तीरोग हा शरीर विद्रूप करून अकार्यक्षम करणारा आजार असून  रोग झाल्यानंतर त्यावर कोणताही परीणामकारक उपाय नाही. हत्तीरोग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक औषधांचे वर्षातून किमान एकदा सेवन करणे आवश्यक आहे.

सार्वत्रिक हत्तीरोग औषधोपचार मोहिमेंतर्गत दोन वर्षाखालील बालके, गर्भवती माता, एक आठवड्यापर्यंतच्या स्तनदा माता व अतीगंभीर आजारी व्यक्ती यांना वगळून संपूर्ण समुदायाला जेवणानंतर वयोमानानुसार तसेच उंचीनुसार अलबेंडाझोल व आयव्हरमेक्टीन, डी.ई.सी. या औषधांची मात्रा प्रत्यक्ष खाऊ घालण्यात येणार आहेत. याकरीता संपूर्ण जिल्हयात 3945 एवढे मनुष्यबळ घरोघरी जाऊन, व्यापारी संस्थाने, शासकीय-निमशासकीय कार्यालये, कारखाने ई. ठिकाणी भोजन अवकाशात, वयोगटानुसार प्रत्यक्ष गोळया खाऊ घालणार असून पर्यवेक्षणाची जबाबदारी 904 मनुष्यबळावर सोपविण्यात आली आहे. 

तसेच हत्तीरोग दूरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेस सर्व मान्यवर पदाधिकारी, शासकीय-निमशासकीय अधिकारी, सर्व वैद्यकीय व्यावसायिक, महिला मंडळ, बचत गट, सेवाभावी संस्था, शिक्षण संस्था यांनी हत्तीरोगाचे समुळ उच्चाटनाकरीता सामाजिक बांधीलकी जपत सहकार्य करावे. आरोग्य कर्मचाऱ्यांसमक्ष दिलेल्या हत्तीरोग विरोधी औषधाचे सेवन करून हत्तीरोगाच्या निर्मुलनास हातभार लावावा. असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रतिक बोरकर यांनी कळविले आहे.

 

         प्रशासनाचे आवाहन : जिल्हयातील हत्तीरोगाचे सद्यस्थितीचे अवलोकन करता दि. 1 ते 15 जुलै 2021 या कालावधीत होऊ घातलेल्या हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेत जनतेने सहभाग दर्शवावा तसेच जिल्हयातील शासकीय-निमशासकीय संस्थांनी हत्तीरोगाचे समुळ उच्चाटनाकरीता सामाजिक बांधीलकी जपत सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने तसेच  मुख्य कार्यकारी अधिकारी  राहुल कार्डीले यांनी केले आहे.

 

00000

पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

 


पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Ø  विविध विकास कामांचे करणार भूमिपूजन

चंद्रपूर दि.30 जून : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

गुरुवार, दि. 1 जुलै 2021 रोजी, सकाळी 10:30 वाजता शासकीय विश्रामगृह, सिंदेवाही येथे आगमन व राखीव. सकाळी 11 वाजता आयटीआय परिसर येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सिंदेवाही इमारतीचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11:30 वाजता नगरपंचायत सिंदेवाहीच्या वतीने आयोजित शहरातील सिमेंट रस्त्यांचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11:45 वाजता पंचायत समिती, सिंदेवाहीकरीता आमदार निधीतून प्राप्त शववाहिनीचे लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12:30 ते 1 वाजेपर्यंतचा वेळ राखीव राहील.

दुपारी 1 वाजता अंतरगाव ता. सिंदेवाही येथे आगमन व विविध विकासकामांचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 2 वाजता नवरगाव ता. सिंदेवाही येथे आगमन व विविध विकासकामांचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 3:30 वाजता रत्नापूर ता. सिंदेवाही येथे आगमन व विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. सायंकाळी 4:30 वाजता रत्नापूर ता. सिंदेवाही येथून चंद्रपूरकडे प्रयाण करतील. सायंकाळी 6 वाजता शासकीय विश्रामगृह,चंद्रपूर येथे आगमन व राखीव. रात्री 8 वाजता हिराई विश्रामगृह, उर्जानगर, चंद्रपुर येथे आगमन व मुक्काम.

शुक्रवार, दि. 2 जुलै 2021 रोजी  सकाळी 9:15 वाजता चंद्रपूर येथून राजुराकडे प्रयाण करतील. सकाळी 9:45 वाजता शासकीय विश्रामगृह, राजुरा येथे आगमन व राखीव. सकाळी 10 वाजता राजुरा येथून कोरपनाकडे प्रयाण करतील. सकाळी 11 वाजता कन्हाळगाव ता. कोरपना येथे आगमन व एलडब्ल्यूई अंतर्गत कन्हाळगाव ते येलापुर रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11:30 वाजता कोरपना येथे आगमन व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन कार्यालयाचे लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. दुपारी 12:30 वाजता अमलनाला, गडचांदूर येथे आगमन व अमलनाला सौंदर्यीकरण कामाचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1 ते 1:30 वाजेपर्यंतचा वेळ राखीव राहील. दुपारी 1:30 वाजता गडचांदूर येथून चंद्रपूरकडे प्रयाण करतील. दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे आगमन व जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात कोविड-19, डेल्टा प्लस यासंदर्भात अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक. दुपारी 2:30 वाजता चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण करतील.

00000

Tuesday 29 June 2021

कोविड काळात विविध उपाययोजना करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही - विजय वडेट्टीवार

 


कोविड काळात विविध उपाययोजना करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही - विजय वडेट्टीवार

Ø नागपूर व पुणे  विभागीय आयुक्तांना 28 कोटी 80 लाखांचा निधी

Ø  पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने चंद्रपूरसाठी 6.50 कोटी

चंद्रपूर, दि. 29 : राज्यामध्ये कोविड -19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन विविध उपाययोजना राबवित आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून नागपूर विभागीय आयुक्तांना 13 कोटी  व पुणे विभागीय आयुक्तांना 15 कोटी 80 लाख  96 हजार असा एकूण 28 कोटी 80 लाख 96 हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. नागपूर विभागात चंद्रपूर आणि वर्धा या दोन जिल्ह्यांना प्रत्येकी 6 कोटी 50 लाखांचा निधी उपलब्ध होणार आहे.

कोविड -19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चालू आर्थिक वर्षांमध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीची मानके व बाबींनुसार करावयाचा खर्च भागविण्यासाठी विभागीय आयुक्त नागपूर व पुणे यांच्याकडून प्राप्त झालेल्या शिफारशी व राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या बाबी विचारात घेऊन श्री. वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने निधी मंजूर करण्यात आला असून या बाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. 

विभागवार माहिती देताना श्री वडेट्टीवार यांनी सांगितले की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यासाठी प्रत्येकी 6 कोटी 50 लाख असे एकूण 13 कोटी रुपये नागपूर विभागीय आयुक्त यांना तर पुणे विभागीय आयुक्त यांना 15 कोटी 80 लाख  96 हजार असा एकूण 28 कोटी 80 लाख 96 हजार इतका निधी  वितरीत करण्यात आला आहे.

या निधीमधून कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी आणि बाधित झालेल्या व्यक्तींसाठी विलगीकरण कक्ष स्थापन करणे, तात्पुरती निवासी व्यवस्था करणे, अन्न, कपडे वैद्यकीय देखभाल, नमुने गोळा करण्यावरील खर्च तपासणी/छाननीसाठी सहाय्य, रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध, शासनाच्या अतिरिक्त चाचणी प्रयोगशाळा स्थापन करण्याचा खर्च व उपयोग्य वस्तू, अग्निशमन, पोलिस, स्थानिक स्वराज्य संस्था व आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांच्या वैयक्तीक संरक्षणासाठी प्रतिरोधक साधनांचा खर्च तसेच व्हेंटीलेटर, हवा शुद्धीकरण यंत्र, थर्मल स्कॅनर्स व इतर साधनांसाठी खर्च करण्यासाठी हा निधी देण्यात आला असल्याची माहिती श्री. वडेट्टीवार यांनी दिली.

            येणाऱ्या काळात कोरोनाला हद्दपार करण्यासाठी ज्या उपाययोजना आवश्यक असतील, त्या शासन स्तरावर तत्परतेने राबविल्या जातील. यासाठी निधीची कमतरता पडू देणार असेही  श्री. वडेट्टीवार यांनी सांगितले.

000

तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 


तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूर दि. 29 जून: केंद्र शासनाच्या युवक कल्याण योजनेअंतर्गत तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार सन-2020 करीता नामांकनाचे प्रस्ताव मागविण्यात येत आहे. जिल्ह्यातील खेळाडूंनी दि. 15 जून ते 5 जुलै 2021 या कालावधीत आवश्यक माहिती, कागदपत्रे, प्रमाणपत्रे, कात्रणे इत्यादीसह नामांकन प्रस्ताव सादर करावयाचे आहे.

नामांकने सादर करणाऱ्या खेळाडूंची कामगिरी मागील तीन वर्षातील म्हणजेच सन 2018, 2019 व 2020 मधील असणे आवश्यक आहे.  तसेच साहसी उपक्रम हे जमिनीवरील, समुद्रावरील व हवेमधील असावे. खेळाडूंची कामगिरी अतिउत्कृष्ट असणे आवश्यक आहे.  तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार सन-2020 करीता नामांकने प्रस्ताव केंद्र शासनास सादर करावयाचे आहेत.

तरी उपरोक्त आवश्यक माहितीसह तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार सन-2021 करीता  जिल्ह्यातील खेळाडूंनी आपली नामांकने प्रस्ताव दिलेल्या विहित कालावधीत https://dbtyas-youth.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने सादर करावी. तसेच आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे या कार्यालयाच्या desk10.dsys-mh@gov.in किंवा dsysdesk10@gmail.com या ई-मेलवर पाठविण्यात यावी. सदर प्रस्तावाची एक प्रत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे सादर करावी, असे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी कळविले आहे.

00000

24 तासात एकही मृत्यु नाही, 112 कोरोनामुक्त

 

24 तासात एकही मृत्यु नाही, 112 कोरोनामुक्त

Ø 13 पॉझिटिव्ह, ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 229

चंद्रपूर,दि. 29 जून : गत 24 तासात जिल्ह्यात 112 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 13 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्हयात मंगळवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. बाधित आलेल्या 13 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 5, चंद्रपूर तालुका 1, बल्लारपूर 1, भद्रावती 1, ब्रम्हपुरी 1, नागभीड 0, सिंदेवाही 0, मूल 0, सावली 1, पोंभूर्णा 1, गोंडपिपरी 0, राजूरा 2, चिमूर 0, वरोरा 0, कोरपना 0, जिवती 0 व इतर ठिकाणच्या 0 रुग्णांचा समावेश आहे.


जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 84 हजार 664 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 82 हजार 908 झाली आहे. सध्या 229  बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 5 लाख 56 हजार 682 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 4 लाख 69 हजार 295 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1527 बाधितांचे मृत्यू  झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

‘तौक्ते’ वादळग्रस्तांसाठी 170 कोटी 72 लाखांचा निधी मंजूर

 


‘तौक्ते’ वादळग्रस्तांसाठी 170 कोटी 72 लाखांचा निधी मंजूर

Ø मदत व पूनर्वसन मंत्री वडेट्टीवारांच्या पुढाकारामुळे दिलासा

चंद्रपूर दि, 29 : राज्यातील काही जिल्ह्यांना 16 व 17 मे 2021 रोजी ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा तडाखा बसला. या चक्रीवादळामुळे किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये तसेच राज्यातील इतर काही जिल्ह्यांमध्ये नागरिकांच्या जिविताचे व मालमत्तेचे नुकसान झाले. झालेल्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. राज्याचे मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या व्यक्तींना मदतीचे  वाटप करण्यासाठी  170 कोटी 72 लाख 73 हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.

            ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टी, उत्तर महाराष्ट्रसह संपूर्ण राज्याला प्रचंड प्रमाणात तडाखा बसून शेती आणि फळबागांचे नुकसान झाले. या भीषण परिस्थितीची माहिती मिळताच राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी वादळग्रस्त भागाची पाहणी करून नागरिकांसोबत थेट संवाद साधण्यासाठी तातडीने चार दिवसीय कोकण दौरा केला. कोकण दौऱ्यात तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करत असताना श्री. वडेट्टीवार यांनी  वादळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार त्यांच्या पाठीशी असल्याचे आश्वासन दिले होते. दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून वादळग्रस्तांना तातडीच्या मदतीची विनंती केली होती. या अनुषंगाने महसूल व वन विभागाने निधी मंजुरीचा शासन निर्णय निर्गमित केला आहे.

       ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे  बहुवार्षिक पिकांचे नुकसान, मृत जनावरांसाठी मदत, पूर्णतः नष्ट किंवा अंशतः पडझड झालेली कच्ची किंवा पक्की घरे, मत्स्य बोटी व जाळ्यासाठी अर्थसहाय्य, मत्स्यबीज, शेतीसाठी अर्थसहाय्य, दुकानदार व टपरीधारक यांना नुकसानीसाठी मदत व इतर अनुदेय बाबींकरीता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून एकूण 170 कोटी 72 लाख 73 हजार इतका निधी विभागीय आयुक्त यांच्यामार्फत जिल्ह्यांना वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. सदर निधी तातडीने वाटप करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहेत.

मंजूर निधीमध्ये सर्वाधिक कोकण विभागासाठी 152 कोटी 48 लाख 28 हजार रुपये, नाशिक विभागासाठी 10 कोटी 97 लाख 67 हजार, अमरावती विभागासाठी तीन कोटी 57 लाख 37 हजार, पुणे विभागासाठी तीन कोटी 24 लाख 25 हजार, नागपूर विभागासाठी 44 लाख 26 हजार रुपये, औरंगाबाद विभागासाठी 90 हजार याप्रमाणे एकूण 170 कोटी 72 लाख 73 हजार इतका निधी मंजूर झाला आहे.

000000

Monday 28 June 2021

सोमवारी एकही मृत्यु नाही, 65 कोरोनामुक्त तर सात पॉझिटिव्ह


सोमवारी एकही मृत्यु नाही, 65 कोरोनामुक्त तर सात पॉझिटिव्ह

चंद्रपूर,दि. 28 जून : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या तसेच मृत्युच्या संख्येत लक्षणीय घट होत आहे. गत 24 तासात जिल्ह्यात 65 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर सात जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्हयात सोमवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.

बाधित आलेल्या सात रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 3, चंद्रपूर तालुका 0, बल्लारपूर 0, भद्रावती 0, ब्रम्हपुरी 0, नागभीड 0, सिंदेवाही 0, मूल 2, सावली 1, पोंभूर्णा 0, गोंडपिपरी 1, राजूरा 0, चिमूर 0, वरोरा 0, कोरपना 0, जिवती 0 व इतर ठिकाणच्या 0 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 84 हजार 651  वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 82 हजार 796 झाली आहे. सध्या 328 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 5 लाख 54 हजार 188 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 4 लाख 66 हजार 585 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1527 बाधितांचे मृत्यू  झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

परदेश शिष्यवृत्ती अर्जासाठी 30 जून पर्यंत मुदतवाढ


परदेश शिष्यवृत्ती अर्जासाठी 30 जून पर्यंत मुदतवाढ

चंद्रपूर दि.28 जून: अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात पदव्यत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पीएचडी) अध्ययन करण्यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत आर्थिक मदत करण्यात येते. या योजनेअंतर्गत सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाकरीता विद्यार्थ्यांकडून परदेशी शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात येत असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत 18 जून 2021 पर्यंत होती. यात शासनाने मुदतवाढ दिली असून सदर मुदतवाढ दि. 30 जून 2021 पर्यंत आहे.

सामाजिक न्याय विभागामार्फत परदेशात अध्ययनासाठी प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. पदव्यत्तर पदवी आणि पीएचडीसाठी जागतिक स्तरावर तीनशेच्या आतील रॅंकमध्ये परदेशात शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या 75 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते.

सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून अर्जाची प्रत डाऊनलोड करून हा अर्ज swfs.applications.2122@gmail.com या मेलवर दि. 30 जून 2021 पर्यंत पाठवावा. तसेच अर्जाची हार्डकॉपी पोस्टाद्वारे समाजकल्याण आयुक्तालय, चर्च पथ, महाराष्ट्र राज्य, पुणे-411001 या पत्त्यावर सादर करावे.

या योजनेच्या अटी, शर्ती व लाभाचे स्वरूप पूर्वीप्रमाणेच अनुज्ञेय असतील. अर्जाचा नमूना व सविस्तर माहितीसाठी  www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर रोजगार या लिंकवर भेट द्यावी, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे आयुक्त,डॉ. प्रशांत नारनवरे, व नागपूर,समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी केले आहे.

00000

Sunday 27 June 2021

जिल्ह्यात 24 तासात 54 कोरोनामुक्त

 


जिल्ह्यात 24 तासात 54 कोरोनामुक्त, 10 पॉझिटिव्ह तर मृत्यु

चंद्रपूर,दि. 27  जून :  गत 24 तासात जिल्ह्यात 54 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर 10 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत.  तसेच 1 बाधिताचा जिल्हयात मृत्यू झाला आहे.

 आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार बाधित आलेल्या 10 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 1, चंद्रपूर तालुका 1, बल्लारपूर 0, भद्रावती 0, ब्रम्हपुरी 0 , नागभिड 0, सिंदेवाही 0, मूल 2, सावली 0, पोंभूर्णा 0, गोंडपिपरी 1, राजूरा 0, चिमूर 0 , वरोरा 1, कोरपना 4, जिवती 0 व इतर ठिकाणच्या 0 रुग्णांचा समावेश आहे.

 आज मृत झालेल्यांमध्ये राजूरा तालुक्यातील 1 पुरुषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 84 हजार 644  वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 82 हजार 731 झाली आहे. सध्या 386 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 5 लाख 52 हजार 899 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 4 लाख 65 हजार 355 नमुने निगेटीव्ह आले आहेत.  जिल्ह्यात आतापर्यंत 1527 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापरवारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावास्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावीव प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावेअसे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

Saturday 26 June 2021

सोमवारपासून बाजारपेठेची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत

 

सोमवारपासून बाजारपेठेची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत

Ø  टाळेबंदी संदर्भात नवीन नियमावली जाहीर

Ø  बिगर अत्यावश्यक सेवेतील दुकाने / आस्थापना शनिवार, रविवार पूर्णपणे बंद

Ø  लग्न समारंभासाठी 50 व्यक्ति तर अंत्यविधी करीता 20 जणांची परवानगी

चंद्रपूर, दि.26 जून : राज्यातील काही जिल्ह्यात कोरोना विषाणूचा 'डेल्टा प्लस' हा नवीन प्रकार आढळून आल्याने त्याचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्याकरीता निर्बंध अधिक कडक करण्यासंदर्भात आदेशित केले आहे. स्तर-3 मधील तरतुदीनुसार चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात सोमवार दिनांक 28 जून 2021 पासून बाजारपेठेची वेळ ( अत्यावश्यक व बिगर अत्यावश्यक सेवेतील दुकाने /आस्थापना ) आता सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. तसेच बिगर अत्यावश्यक सेवेतील दुकाने शनिवार आणि रविवारी पूर्णपणे बंद राहणार आहे.

 या गोष्टी राहतील सुरू :

अत्यावश्यक व बिगर अत्यावश्यक सेवेतील दुकाने / आस्थापना दररोज सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. सार्वजनिक स्थळे, खुली मैदाने, चालणे, सायकलींग दररोज सकाळी 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत सुरु राहतील. सर्व प्रकारची खासगी कार्यालये सोमवार ते शुक्रवार सांयकाळी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील. क्रीडा, खेळ, बाहेर मोकळया जागेत सकाळी 5 ते सकाळी 9 आणि सांयकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत सुरु राहतील. कोरोनाविषयक कामे करणाऱ्या आस्थापना, कृषी, बँक, मान्सुनपूर्व कामाशी संबंधीत यंत्रणा व आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधीत यंत्रणा, कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरु राहतील. चित्रीकरण सांयकाळी 5 वाजेनंतर बाहेर हालचालीस बंदी राहील. बांधकाम, शेती विषयक कामकाज सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील. जमावबंदी सांयकाळी 5 वाजेपर्यंत तर संचारबंदी सायंकाळी 5 नंतर लागु राहील.

तसेच ई-कॉमर्स, सार्वजनिक क्षेत्रातील बस वाहतुक, माल वाहतूक (जास्तीत जास्त 3 व्यक्ती), आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक (खाजगी कार, टॅक्सी, बस व ट्रेन) नियमितपणे पूर्ण वेळ सुरू राहील. तथापि प्रवासी जर स्तर-5 मधील भागातून येत असेल तर ई-पास आवश्यक राहील. याशिवाय उत्पादन निर्यात प्रदान उद्योग नियमितपणे सुरू राहतील. उत्पादन क्षेत्र, जीवनावश्यक वस्तूंची उत्पादन करणारे युनिट (जीवनावश्यक वस्तू व त्याकरिता लागणारा कच्चामाल उत्पादक पॅकेजिंग व संपूर्ण साखळीतील सेवा ), निरंतर प्रक्रिया उद्योग, राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वस्तूंचे उत्पादन, डाटा सेंटर/ क्लाऊड सर्विस प्रदाता / माहिती व तंत्रज्ञान सेवा संबंधी, गुंतागुंतीचे पायाभूत सेवा व उद्योग, कोविड वर्तणूक विषयक नियमांचे पालन करुन नियमितपणे पूर्ण वेळ सुरू राहतील.

 50 टक्के क्षमतेने या बाबी राहतील सुरू :

रेस्टॉरेंट सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 4 या वेळेत 50 टक्के क्षमतेनूसार Dining साठी सुरु राहतील. तथापी सायंकाळी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत केवळ पार्सल सुविधा/ घरपोच सुविधा देता येईल. तसेच शनिवार व रविवार Dining पुर्णपणे बंद राहील व केवळ पार्सल सुविधा/ घरपोच सुविधा देता येईल. शासकीय कार्यालय उपस्थिती, सामाजिक, सांस्कृतिक मनोरंजन कार्यक्रम, सभा, निवडणुक, स्थानिक प्राधिकरण व सहकारी संस्था यांची आमसभा (सभागृहाच्या 50 टक्के आसन क्षमतेने) सुरु राहतील. व्यायामशाळा / सलून / केस कर्तनालय / ब्यूटी पार्लर / स्पा/ वेलनेस सेंटर (अपॉइंटमेंट घेणे आवश्यक). उत्पादन क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा व निरंतर प्रक्रिया उद्योग, निर्यात प्रदान उद्योग, इतर उत्पादन क्षेत्रातील उद्योग व सेवा वगळता इतर उद्योग 50 टक्के क्षमतेने सुरू राहील. लग्न समारंभाकरीता केवळ 50 जणांची उपस्थिती तर अंत्यविधी 20 व्यक्तिंच्या मर्यादेत करण्याची मुभा देण्यात आली आहे.

मॉल्स / सिनेमागृहे ( मल्टीप्लेक्स, सिंगल स्क्रिन) नाट्यगृहे संपुर्णत: बंद राहील.

वरील बाबींकरीता कोरोना विषयक वर्तणुकीचे पालन करणे बंधनकारक राहील. संपूर्ण चंद्रपूर जिल्हयातील मनपा, शहरी व ग्रामीण भागामध्ये कलम 144 अंतर्गत सकाळी 5 ते संध्याकाळी 5 या कालावधीत जमावबंदी लागू राहील. तसेच संध्याकाळी 5 ते सकाळी 5 या कालावधीत संचारबंदी लागू राहील सदर कालावधीमध्ये कोणत्याही व्यक्तीस मुक्तसंचार करण्यास मनाई असेल.

यात नियमितपणे मास्कचा वापर, सामाजिक अंतराचे पालन, आस्थापना / दुकानांच्या प्रवेशद्वाराजवळ ग्राहकांकरिता, प्रवेश करणाऱ्यांना हात धुण्याकरिता साबण किंवा हँड सॅनिटायझर ठेवणे आवश्यक राहील. शक्यतोवर गर्दी टाळावी. येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांकरिता एकमेकांत सामाजिक अंतर पाळले जाण्याच्या दृष्टीने सामाजिक अंतरावर वर्तुळे तयार करणे यासारख्या बाबी कराव्यात.

सदर नियमांचे उल्लंघन केल्यास कोरोना महामारीची आपत्ती जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत संबंधित दुकान/आस्थापना बंद ठेवण्यात येईल. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित सभागृह,मंगल कार्यालय, लॉन, जागा यांचे मालक, व्यवस्थापक, हॉटेल रेस्टॉरंट व तत्सम आस्थापना यांचे व्यवस्थापक, मालक, दुकानदार, व्यापारी, संस्थाचालक यांचेवर पहिल्या चुकीसाठी उल्लंघनासाठी पहिला दंड रुपये पाच हजार, दुसरा दंड रुपये 10 हजार व तिसरा दंड रुपये 20 हजार याप्रमाणे तसेच कार्यक्रमाचे आयोजकांवर सुद्धा रुपये 10 हजार इतका दंड तात्काळ आकारण्यात येईल व इतरही नियमांप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल. तसेच विना मास्क आढळलेल्या व्यक्तीवर, संबधितांवर रुपये 500 इतका दंड आकारण्यात येईल.

सदर आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था , पोलीस विभाग व इतर संबंधित विभागाची राहील. कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा संघटना यांनी सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 व भारतीय दंड संहिता तसेच साथरोग कायदा 1897 अन्वये दंडनीय कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. सदर आदेश संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात दि. 28 जून 2021 पासून पुढील आदेशापर्यंत लागू राहील, असे जिल्हादंडाधिकारी अजय गुल्हाने यांच्या आदेशात नमूद आहे.

00000

86 कोरोनामुक्त, 16 पॉझिटिव्ह तर 2 मृत्यु

86 कोरोनामुक्त, 16 पॉझिटिव्ह तर 2 मृत्यु

चंद्रपूर,दि. 26 जून :  गत 24 तासात जिल्ह्यात 86 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर 16 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच 2 बाधितांचा जिल्हयात मृत्यू झाला आहे.

आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार बाधित आलेल्या  16 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील 4, चंद्रपूर तालुका 2, बल्लारपूर 1, भद्रावती 0, ब्रम्हपुरी 0, नागभिड 0, सिंदेवाही 1, मूल 0, सावली 0,  पोंभूर्णा 0,  गोंडपिपरी 0,  राजूरा 3, चिमूर 1, वरोरा 2, कोरपना 0, जिवती 0 व इतर ठिकाणच्या 2 रुग्णांचा समावेश आहे.  आज मृत झालेल्यांमध्ये बल्लारपूर तालुक्यातील 1 महिला तर गोंडपिपरी तालुक्यातील 1 पुरुषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 84 हजार 634 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 82 हजार 677 झाली आहे. सध्या 431 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 5 लाख 50 हजार 883 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 4 लाख 63 हजार 262 नमुने निगेटीव्ह आले आहेत.  जिल्ह्यात आतापर्यंत 1526 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

Friday 25 June 2021

अपर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा आढावा


अपर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा आढावा

Ø 12 प्रकरणे निकाली

चंद्रपूर,दि. 25 जून : शेतीमध्ये सततची नापिकी, कर्जबाजारीपणा व कर्जपरतफेडीचा तगादा या तीन प्रमुख कारणांपैकी शेतकरी आत्महत्या झाली असल्यास संबंधित कुटुंबाला 23 जानेवारी 2006 च्या शासन निर्णयाद्वारे आर्थिक मदत देण्यात येते. त्यानुसार जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या प्रकरणे तपासणीची बैठक अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.

जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत शेतकरी आत्महत्येच्या 28 प्रकरणांवर चर्चा झाली. यापैकी 12 प्रकरणे पात्र करून मदतीकरीता निकाली काढण्यात आली तर 12 प्रकरणे समितीने अपात्र ठरविली. चार प्रकरणे फेरतपासणीकरीता तालुकास्तरीय समितीला पाठविण्यात आले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, तहसीलदार यशवंत धाईत, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे अजय वाहाणे, कृषी कार्यालयाचे गजानन हटवार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अनिल वानखेडे, डॉ. मेश्राम आदी उपस्थित होते.

00000

शुक्रवारी एकही मृत्यु नाही, 52 कोरोनामुक्त


शुक्रवारी एकही मृत्यु नाही, 52 कोरोनामुक्त तर 13 पॉझिटिव्ह

चंद्रपूर,दि. 25 जून : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत असून बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब आहे. गत 24 तासात जिल्ह्यात 52 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर 13 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्हयात शुक्रवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.

बाधित आलेल्या 13 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 1, चंद्रपूर तालुका 0, बल्लारपूर 4, भद्रावती 0, ब्रम्हपुरी 0, नागभिड 0, सिंदेवाही 0, मूल 2, सावली 0, पोंभूर्णा 0, गोंडपिपरी 1, राजूरा 2, चिमूर 0,  वरोरा 1, कोरपना 0, जिवती 0 व इतर ठिकाणच्या 2 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 84 हजार 618  वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 82 हजार 591 झाली आहे. सध्या 503 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 5 लाख 47 हजार 706 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 4 लाख 60 हजार 382 नमुने निगेटीव्ह आले आहेत.  जिल्ह्यात आतापर्यंत 1524 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

समाजकल्याण आयुक्तांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर संगणक अभ्यासिकेचे लोकार्पण


 

समाजकल्याण आयुक्तांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर संगणक अभ्यासिकेचे लोकार्पण   

चंद्रपूर दि.25 जून : समाजकल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते सामाजिक न्याय भवनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संगणक अभ्यासिकेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, नागपूर समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, जिल्हा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष सचिन कलंत्री, उपायुक्त तथा सदस्य विजय वाकुलकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी समाज कल्याण विभागाच्या कार्यालयाची पाहणी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सफाई कर्मचाऱ्यांकडून कार्यालय परिसरात नियमितपणे साफसफाई करून घ्यावी व परिसरात स्वच्छता राखावी. तसेच सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून लाभार्यांना त्वरीत लाभ देण्यासाठी प्रयत्नशील राहावे, अशाही सुचना त्यांनी केल्या. जिल्हयात कोविड विषाणूच्या पार्श्वभुमीवर करण्यात आलेल्या उपाययोजंनाची माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी दिली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कार्यालय परिसरात वृक्षारोपण  करण्यात आले व मुलांच्या वसतिगृहाची पाहणी केली.

            सामाजिक न्याय विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या विविध योजनांची चित्रफीत सादर करण्यात आली. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

00000

कोरोनामुक्त गाव करण्यासाठी ‘मिशन मोडवर’ नियोजन करा - जिल्हाधिकारी अजय गुल्हाने


 

कोरोनामुक्त गाव करण्यासाठी ‘मिशन मोडवर’ नियोजन करा

                           - जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

Ø लसीकरणासाठी प्रत्येक गावापर्यंत पोहचण्याचे निर्देश

चंद्रपूर,दि. 25 जून : ‘कोरोनामुक्त गाव’ ही संकल्पना राज्य शासनाने सुरु केली आहे. याची प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने वरिष्ठ स्तरावरून नियमित आढावा घेण्यात येतो. कोरोनाविरुध्दच्या लढाईत जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे गावापर्यंत पोहचून कोरोनमुक्त गाव करण्यासाठी ‘मिशन मोडवर’ नियोजन करा, अशा सुचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोव्हीड-19 बाबत आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मनपा आयुक्त राजेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, पोलिस उपअधिक्षक शेखर देशमुख, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम आदी उपस्थित होते.

तिस-या लाटेचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर गावांचे 100 टक्के लसीकरण होणे गरजेचे आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने म्हणाले, सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र असे असले तरी गाफील राहून चालणार नाही. कोरोनाविरुध्दच्या लढाईत लसीकरण हा महत्वाचा टप्पा आहे. त्यामुळे गावापर्यंत पोहचा. गावनिहाय लसीकरणासाठी पात्र लोकसंख्या किती, लसींचे किती डोज आवश्यक आहे, उपलब्ध साठ्याचे वितरण आदी बाबींचे नियोजन करा. जेथे लसीकरणासाठी कमी प्रतिसाद आहे, तेथे जास्त लक्ष केंद्रीत करून स्थानिक लोकप्रतिनिधी आणि गावस्तरावरील कर्मचा-यांच्या माध्यमातून जनजागृती करा. लसीकरणासाठी वेगवेगळ्या गटांची (व्यापारी, उद्योजक, मजूरवर्ग, विद्यार्थी, सुपर स्प्रेडर आदी) निर्मिती केली तर ते जास्त सोयीचे होते, असे त्यांनी सांगितले.

लसीच्या उपलब्धतेबाबत नागरिकांना माहिती द्या. लसीकरण सत्र सुरू आहे किंवा आज लसीकरण होणार नाही, याची पूर्वकल्पना नागरिकांना अवश्य द्या. नगर परिषद क्षेत्रातसुध्दा मुख्याधिकारी आणि त्यांच्या अधिनस्त कर्मचा-यांनी तहसीलदारांच्या समन्वयातून टीमचे गठन करावे. तसेच वॉर्डावॉर्डात जावून लसीकरण आणि म्युकरमायकोसीसबाबत जनजागृती करावी. कोविडमुळे पालक गमाविलेल्या बालकांना शासनाकडून मदत देण्यात येणार आहे. अशा बालकांचे संरक्षण करणे आणि त्यांचे हक्क मिळवून देणे, यासाठी गांभिर्याने प्रयत्न करा. लसीकरणासंदर्भात सर्व उपविभागीय अधिका-यांनी तालुकास्तरावर आठवड्यातून किमान दोन वेळा कृती दलाची बैठक आयोजित करावी. यापुढे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला तर त्यांना केवळ कोविड केअर सेंटर किंवा शासकीय विलगीकरण केंद्रातच ठेवण्याच्या शासनाच्या सुचना आहेत. तसेच कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी टेस्टिंग, ट्रेसिंग आणि ट्रॅकिंगची व्यवस्था आणखी मजबूत करा, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.   

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राठोड यांनी डेल्टा प्लस विषाणूबाबत माहिती दिली. तसेच याबाबत जागरूक राहून प्रतिबंधात्मक उपाययोजना गांभिर्याने करण्याबाबत अवगत केले.

बैठकीला मनपा वैद्यकीय अधिकारी  डॉ. नयना उत्तरवार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद सोमकुवर यांच्यासह दूरदृश्य प्रणालीद्वारे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, न.प.मुख्याधिकारी, वैद्यकीय अधिक्षक आदी उपस्थित होते.

00000