Search This Blog

Sunday 6 June 2021

आजपासून बाजारपेठ नियमितपणे सुरू

 


आजपासून बाजारपेठ नियमितपणे सुरू

Ø कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व्यापा-यांनी स्वयंस्फूर्तिने सकाळी ते संध्याकाळी पर्यंतच दुकाने सुरू ठेवण्याचा घेतला निर्णय

दि.6 जून : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्य शासनाने टाळेबंदी आदेशातील निर्बंध शिथील करण्याबाबतचे आदेश जाहीर केले आहे. याअंतर्गत पाच स्तरनिहाय जाहीर करण्यात आलेल्या नियमावलीनुसार चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश स्तर-1 मध्ये होत असल्याने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात अत्यावश्यक व बिगर अत्यावश्यक दुकाने दि. 7 जून 2021 पासून सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे सोमवारपासून बाजारपेठ आता नियमित वेळेत सुरू होत असल्या तरी कोरोना साखळी तोडण्यासाठी व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व्यापा-यांनी स्वयंस्फूर्तिने आपली दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 5 पर्यंतच सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या निर्णयाचे जिल्ह्यातील सर्व व्यापारी सदस्यांनी पालन करावेअशा सूचना निर्गमित केल्या आहेत.

 नियमित वेळेत / नियमितपणे या गोष्टी राहतील सुरू :

अत्यावश्यक व बिगर अत्यावश्यक सेवेतील दुकाने / आस्थापनासार्वजनिक स्थळेखुली मैदानेचालणेसायकलींगसर्व प्रकारची खासगी कार्यालयेक्रीडाखेळचित्रीकरणसभा / निवडणूकस्थानिक प्राधिकरण व सहकारी संस्था यांची आमसभाबांधकाम शेती विषयक कामकाज नियमितपणे सुरू राहतील.

तसेच ई-कॉमर्ससार्वजनिक क्षेत्रातील बस वाहतुकमाल वाहतूक (जास्तीत जास्त 3 व्यक्ती)आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक (खाजगी कारटॅक्सीबस व ट्रेन) नियमितपणे सुरू राहील. तथापि प्रवासी जर स्तर-5 मधील भागातून येत असेल तर ई-पास आवश्यक राहील. याशिवाय उत्पादन निर्यात प्रदान उद्योग नियमितपणे सुरू राहतील. उत्पादन क्षेत्रजीवनावश्यक वस्तूची उत्पादन करणारे युनिट ( जीवनावश्यक वस्तू व त्याकरिता लागणारा कच्चामाल उत्पादक पॅकेजिंग व संपूर्ण साखळीतील सेवा) निरंतर प्रक्रिया उद्योगराष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वस्तूंचे उत्पादनडाटा सेंटर / क्लाऊड सर्विस प्रदाता/ माहिती व तंत्रज्ञान सेवा संबंधीगुंतागुंतीचे पायाभूत सेवा ‌व उद्योगउत्पादन क्षेत्रातील उद्योग व सेवा नियमितपणे सुरू राहतील.

 50 टक्के क्षमतेने या बाबी राहतील सुरू :

मॉल्ससिनेमागृह (मल्टीप्लेक्ससिंगल स्क्रीन)नाट्यगृहेरेस्टॉरेंटसामाजिकसांस्कृतिक मनोरंजन कार्यक्रमलग्न समारंभ (सभागृहाच्या 50 टक्के क्षमतेने तथापि कमाल 100 व्यक्तिंच्या मर्यादेत)व्यायामशाळासलूनकेस कर्तनालयब्यूटी पार्लर / स्पा/ वेलनेस सेंटर (अपॉइंटमेंट घेणे आवश्यक). अंत्यविधी 20 व्यक्तिंच्या मर्यादेत करण्याची मुभा देण्यात आली आहे.

वरील बाबी सुरु करण्यास मंजूरी देण्यात आली असली तरी कोरोना विषयक वर्तणुकीचे पालन करणे बंधनकारक राहील. यात नियमितपणे मास्कचा वापरसामाजिक अंतराचे पालनआस्थापना / दुकानांच्या प्रवेशद्वाराजवळ ग्राहकांकरिताप्रवेश करणाऱ्यांना हात धुण्याकरिता साबण किंवा हँड सॅनिटायझर ठेवणे आवश्यक राहील.

सदर नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित आस्थापना/ दुकाने बंद ठेवण्यात येईल. तसेच यापूर्वी निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे दंडसुद्धा आकारण्यात येईल. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीसंस्था किंवा संघटनाविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 तसेच साथरोग नियंत्रण कायदा 1897 अन्वये दंडनीय कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सदर आदेश संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात दि.7 जून 2021 पासून पुढील आदेशापर्यंत लागू राहीलअसे जिल्हादंडाधिकारी अजय गुल्हाने यांच्या आदेशात नमूद आहे.

पालकमंत्री तसेच सर्व लोकप्रतिनिधिप्रशासन आणि व्यापारी

संघटना यांच्या सहमतीने झाला निर्णय :

चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश "स्तर 1" मध्ये करण्यात आला असून शासनाच्या आदेशानुसार जवळपास सर्व व्यवहार काही अटी व निर्बंधासह जूनपासून सुरू होत आहे. तथापि अजूनही कोरोनाचा धोका कमी झाला नसल्यामुळे तसेच तज्ञांनी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवील्यामुळे जिल्ह्यात कोरोना रूग्णांच्या वाढीस प्रतिबंद करणे व या रोगाची मानवी साखळी खंडित करणे आवश्यक आहे. त्यामुळे पालकमंत्रीखासदारआमदारजिल्हा परिषद अध्यक्षमहापौरसर्व नगराध्यक्षव्यापारी संघटना यांची प्रशासनासोबत चर्चा झाल्यानंतर व्यापा-यांनी स्वयंस्फूर्तिने दुकानांच्या वेळेबाबत सकाळी ते सायंकाळी पर्यंतचा निर्णय घेतला आहे.

 

00000

No comments:

Post a Comment