Search This Blog

Friday 31 December 2021

शुक्रवारी जिल्हयात 2 बाधित, ॲक्टीव्ह रुग्ण 9

 

शुक्रवारी जिल्हयात 2 बाधित, ॲक्टीव्ह रुग्ण 9

चंद्रपूर, दि. 31 डिसेंबर : गत 24 तासात जिल्ह्यात 2 जण नव्याने बाधित झाले आहे. तर ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 9 असून जिल्ह्यात शुक्रवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात 1 तर मुल येथे 1 रुग्ण आढळला असून, चंद्रपूर, बल्लारपूर, भद्रावती, ब्रह्मपुरी, नागभिड, सिंदेवाही, सावली, पोंभूर्णा, गोंडपिपरी, राजुरा, चिमूर, वरोरा, कोरपना, जिवती व इतर  ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 888 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 336 झाली आहे. सध्या 6 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 7 लाख 98 हजार 467 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 8 हजार 520 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1543 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

3 जानेवारी पासून जिल्ह्यात जॅपनीज इन्सेफेलायटिस (मेंदूज्वर) लसीकरण मोहीम


जानेवारी पासून जिल्ह्यात जॅपनीज इन्सेफेलायटिस (मेंदूज्वर) लसीकरण मोहीम

Ø पालकांनी ते 15 वर्षे वयोगटातील पाल्यांना लसीचा डोस देण्याचे आवाहन

चंद्रपूर दि. 31 डिसेंबर : जॅपनीज इन्सेफेलायटिस (मेंदूज्वर) हा एक गंभीरअपंगत्व होण्यास कारणीभूत असणारा आजार आहे. जॅपनीज इन्सेफेलाइटिस (मेंदूज्वर) विषाणूमुळे होतो. हा आजार दूषित डासांमुळे पसरतो. या आजारांमध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण फार अधिक असते.

या आजाराच्या सुरुवातीला ते 15 दिवसांमध्ये विविध लक्षणे दिसू लागतात. थंडी वाजून ताप येणेथकवाडोकेदुखीमळमळउलटी इत्यादी लक्षणे दिसून येतात. हा आजार मेंदूमध्ये पसरून गंभीर स्वरूप धारण करू शकतो. बऱ्याच रुग्णांमध्ये झटकेफिट येणे किंवा बेशुद्धपणा होऊ शकतो. हा आजार झालेल्या 30 टक्के रुग्णांमध्ये मृत्यू होण्याची शक्यता असते. साधारणत:40 टक्के रुग्णांमध्ये आजारातून बरे झाल्यावर मेंदूला झालेल्या इजेमुळे लकवा व मतिमंदत्व असे आजार राहू शकतात. ते 15 या वयोगटातील मुले व मुलींना हा आजार होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते.

            केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सुरुवातीला ते 15 वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींचे एकाच वेळेस जे.ई. लसीच्या एका डोसने लसीकरण केले जाते. त्यानंतर नियमित लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत जे.ई. लसीचे दोन डोसपहिला डोस वयोगट ते 12 महिने व दुसरा डोस 16 ते 24 महिन्यापर्यंत दिले जातात.

ही मोहीम चंद्रपूर जिल्ह्यात जानेवारीपासून सुरू होत असून आठवड्याच्या कालावधीमध्ये राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत ते 15 वर्षे वयोगटातील जिल्ह्यातील एकूण लक्ष 58 हजार 817 ग्रामीणशहरी व महानगरपालिका क्षेत्रातील मुला-मुलींना या लसीचा एक डोस द्यावयाचा आहे. ही मोहीम पहिला आठवडा इयत्ता 1ली ते 10वीच्या शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. व पुढील दोन आठवडे गावातीलवार्डातील अंगणवाडी समाजभवनमध्ये राबविण्यात येणार आहे.

या मोहीमेत देण्यात येणाऱ्या लसीचे नाव जेनवॅक असून ही लस भारत बायोटेक या संस्थेने निर्मिती केली आहे. ही लस सुरक्षित असून लस दिल्यानंतर काही बालकांमध्ये तापइंजेक्शनच्या ठिकाणी दुखणेअंगावर पुरळकिरकिर इत्यादी लक्षणे दिसू शकतात.

चंद्रपूर जिल्ह्यात जानेवारी 2022 पासून जॅपनीज इन्सेफेलायटिस जे.ई. या आजाराच्या प्रतिबंधाकरीता लसीकरण मोहिमेला सुरुवात होत आहे. तरीसंपूर्ण जिल्ह्यातील पालकांनी आपल्या ते 15 वर्षे वयोगटातील पाल्यांना या लसीचा डोस देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000


‘ई-संजीवनी ओपीडी’च्या माध्यमातून घरबसल्या मिळवा डॉक्टरांचा मोफत सल्ला

 

‘ई-संजीवनी ओपीडी’च्या माध्यमातून घरबसल्या मिळवा डॉक्टरांचा मोफत सल्ला

Ø जिल्हयातील नागरिकांना लाभ घेण्याचे सीईओंचे आवाहन

चंद्रपूर दि. 31 डिसेंबर : भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जनतेच्या आरोग्यासाठी राष्ट्रीय टेली कन्सल्टेशन सेवेद्वारे ऑनलाइन ओपीडी सेवा सुरू केली आहे. नॅशनल टेलीकन्सल्टेशन सर्विसद्वारे रुग्णांना त्यांच्या आजारावर पाहिजे असलेला सल्ला किंवा मार्गदर्शन रुग्णालयात न जाता घरच्या-घरी मिळू शकणार आहे. त्यासाठी ई-संजीवनी ऑनलाइन ओ.पी.डी सेवा सुरू करण्यात आली आहे.

नागरीकांना सी-डॅक या संस्थेकडुन http://esanjeevaniopd.in या संकेतस्थळावरुन व गुगल प्ले-स्टोर मधुन ई-संजीवनी ओ.पी.डी.अॅप डाऊनलोड करुन त्याद्वारे थेट तज्ञ डॉक्टरांकडुन उपचार घेता येणार आहे.  तसेच वयोवृध्द रुग्ण व ग्रामीण भागात राहणाऱ्या अनेक नागरीकांना रुग्णालयात पोहचणे अवघड जाते, अशावेळी त्यांना घरी बसुनच वैद्यकिय सेवा उपलब्ध व्हावी याउद्देशाने ही सेवा सुरु करण्यात आली आहे. तरी जास्तीत जास्त नागरीकांनी ह्या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी केले आहे.

संकेतस्थळ किंवा अॅपद्वारे करा नोंदणी : नागरीकांना मोफत ऑनलाईन उपचार घेण्याकरीता http://esanjeevaniopd.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे. तसेच मोबाईलद्वारे esanjeevaniopd हे अॅप गुगल प्ले-स्टोर वरुन डाऊनलोड करून नोंदणी करता येणार आहे.

डॉक्टरांचे मिळणार प्रिस्क्रीप्शन या सेवेद्वारे तज्ञ डॉक्टरांनी उपचारांचा सल्ला दिल्यानंतर अॅपमध्ये किंवा संकेतस्थळावर त्वरीत औषधीचे प्रिस्क्रीप्शन उपलब्ध करण्यात येणार आहे. या प्रिस्क्रीप्शनची प्रिंट काटुन खाजगी मेडीकल किंवा शासकिय रुग्णालयातील औषधी विभागामधुन औषधी घेता येणार आहे.

ई-संजीवनी ओ.पी.डी.ची वेळ : ई-संजीवनी ओ.पी.डी. सकाळी 9.30 वाजेपासुन ते दुपारी 1 वाजेपर्यंत ऑनलाईन सुरु राहणार आहे. तर  दुसऱ्या सत्रात दुपारी 1.45 वाजेपासुन सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाईन सुरू राहील.  जिल्ह्यात ही सुविधा सर्व रुग्णांरीता मोफत करण्यात आली आहे. रुग्णांना मोफत सल्ला किंवा मार्गदर्शन देण्याकरीता महाराष्ट्र राज्यातून 2 हजार 753 डॉक्टर्स रजिस्टर करण्यात आले आहे. त्यामध्ये 58  तज्ञ डॉक्टर्स चंद्रपुर जिल्हयातील आहेत.

1800 आशाताई व त्यांचे समन्वयक, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी तथा ई-संजीवनी ओ.पी.डी करिता रजिस्टर असलेले 58 तज्ञ डॉक्टर यांच्या तांत्रिक अडचणीच्या निवारणाकरिता चंद्रपूर, जिल्हा रुग्णालयातील टेलीमेडिसिन सेंटरमधील फॅसिलिटी मॅनेजर दिपक खडसाने हे वरीष्ठांच्या मार्गदर्शनात काम बघतात.

जिल्ह्यातील रुग्णांना थेट तज्ञांची सेवा ई-संजीवनीमुळे घरबसल्या मिळत असल्याने जास्तीत जास्त रुग्णांनी याचा लाभ घ्यावाअसे आवाहन करण्यात आले आहे.

00000

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचे प्रतिबंधात्मक आदेश जारी

 

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचे प्रतिबंधात्मक आदेश जारी

चंद्रपूर दि. 31 डिसेंबर : जिल्ह्यात कोविड-19 विषाणूचा फैलाव होण्यास प्रतिबंध करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी जारी केले आहे.

खुल्या जागेतील किंवा बंदिस्त सभागृहातील लग्न समारंभामध्ये जास्तीत जास्त 50 व्यक्ती उपस्थित राहण्याची परवानगी राहील. बंदिस्त किंवा खुल्या जागेतील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक आणि इतर कोणत्याही कार्यक्रमांमध्ये अधिकतम 50 व्यक्तींनाच उपस्थित राहण्याची परवानगी राहील. तर अंत्यविधीच्या कार्यक्रमांमध्ये केवळ 20 व्यक्तींनाच उपस्थित राहण्याची परवानगी राहील.

चंद्रपूर जिल्ह्याच्या भागातील पर्यटन स्थळे, जी गर्दी आकर्षित करतात अशी स्थळेमोकळे मैदान, बगीचे, उद्यान व ईतर करमणुकीची ठिकाणे यामध्ये गर्दी आटोक्यात ठेवण्याकरिता संबंधित क्षेत्राचे उपविभागीय दंडाधिकारी हे फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 144 लागू करू शकतील.

या आदेशात नमूद केलेल्या निर्बंधाव्यतिरिक्त इतर सर्व निर्बंध जसे आहेत, तसेच लागू राहतील. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील यापूर्वीचे आदेशातील निर्बंध सुद्धा कायम असतील. यापूर्वी संदर्भीय आदेशान्वये वेळोवेळी निर्गमित केलेले कोरोना निर्बंध आदेश व मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.

कोविड-19 च्या प्रतिबंधासाठी वेळोवेळी निर्गमित करणारे आलेल्या आदेशाचे, मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम 188 नुसार व अन्य कायदेशीर तरतुदीनुसार कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहील.

सदर आदेश संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात दिनांक 31 डिसेंबर 2021 चे रात्री 12 वाजेपासून पुढील आदेशापर्यंत लागू राहील, असे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमित केलेल्या आदेशात नमूद आहे.

00000

जिल्हा अन्न तसेच निरोगी आहार समिती तथा जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक

 

जिल्हा अन्न तसेच निरोगी आहार समिती तथा जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक

चंद्रपूर दि. 31 डिसेंबर :  शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यांचेमार्फत राज्य व जिल्हा स्तरावर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 ची प्रभावी अंमलजबजावणी, नियंत्रण व समस्यांचे निराकरण करण्याकरीता गठीत समित्यांची पुनर्रचना करुन सुधारीत आदेश निर्गमित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने, जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी विद्यूत वरखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. 

अन्न व औषध प्रशासनाने सन 2021-22 मध्ये एकूण 135 नमुने विश्लेषणासाठी घेतले. त्यापैकी 81 नमुने प्रमाणित तर 3 नमुने कमी दर्जाचे घोषित झाले आहे. तसेच 15 नमुने (प्रतिबंधित अन्न पदार्थ) असुरक्षित घोषित असून 36 नमुन्यांचे अहवाल प्रलंबित असल्याचे तसेच अन्न व औषध प्रशासनामार्फत एकूण 6 परवाना व नोंदणीचे कॅम्प घेवून 700 नवीन अन्न परवाना व नोंदणी अर्ज प्राप्त करुन घेतले. रिपर्पज युज्ड कुकिंग ऑइल मोहिमेअंतर्गत एकूण 50 आस्थापनांच्या तपासण्या करण्यात येवून कोणत्याही अन्न आस्थापनेत टोटल पोलार कम्पाऊंड 25 पेक्षा जास्त नसल्याचे श्री.मोहिते यांनी बैठकीत सांगितले.

प्रशासनामार्फत विविध अन्न आस्थापना यांना केंद्रीय अन्न सुरक्षा मानदे प्राधिकरण, नवी दिल्ली यांचे मार्फत मानांकित ऑडीटर्सद्वारे एकूण 250 अन्न व्यवसायीकांना अन्न पदार्थ हाताळणीचे, स्वच्छतेचे तसेच कोवीड संक्रमण काळात घ्यावयाच्या काळजीबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे.

या बैठकीमध्ये अन्न व औषध प्रशासनाच्या कामकाजाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. रिपर्पज युज्ड कुकिंग ऑईलची मोहीम यशस्वीपणे राबविण्यात यावी याकरिता नवीन यंत्रसामग्री खरेदी करण्याकरीता जिल्हा नियोजन समितीअंतर्गत प्रस्ताव सादर करावा. शासकीय, निमशासकीय रेशन दुकान यांनी अन्न परवाना व नोंदणी प्राप्त करुण घेणे बंधनकारक असल्याने त्यांनी परवाना व नोंदणी करुन घ्यावी. याकरीता जिल्हा पुरवठा अधिकारी तसेच सहाय्यक आयुक्त (अन्न),अन्न व औषध प्रशासन यांनी कार्यवाही करावी, तसेच ईट राईट इंडिया मोहिमेअंतर्गत ज्या कंपन्यांमध्ये कॅन्टीन अथवा उपहारगृह आहे, अशा कंपन्यांनी केंद्रीय अन्न सुरक्षा मानदे प्राधिकरण यांचेकडील हायजीन रेटींग तसेच कॅम्पस सर्टिफिकेशन घ्यावे. याकरीता जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक, अन्न व औषध प्रशासन यांनी सदर कंपन्यांना उद्युक्त करावे, असे निर्देश  अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी दिले.

सदर बैठकीस जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक स्वप्नील राठोड, जिल्हा अन्न पुरवठा अधिकारी,सुरेंद्र दांडेकर, सचिन वालकर, डॉ. सचिन भगत,सदस्य सचिव तथा सहाय्यक आयुक्त (अन्न) नितीन मोहिते, अन्न सुरक्षा अधिकारी, प्र. भा. टोपले, प्र.अ. उमप प्रामुख्याने उपस्थित होते.

00000

मदतीसाठी शेतकरी आत्महत्येची पाच प्रकरणे पात्र


 

मदतीसाठी शेतकरी आत्महत्येची पाच प्रकरणे पात्र

Ø अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकरांनी घेतला आढावा

चंद्रपूरदि. 31 डिसेंबर : जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीमध्ये शेतकरी आत्महत्येच्या एकूण दहा प्रकरणांचा आढावा अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यापैकी पाच प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली असून तीन अपात्र तर दोन प्रकरणे फेरचौकशीसाठी पाठविण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला अतिरिक्त पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे, तहसीलदार यशवंत दाईट, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे एम.एन. हेकाड, पोलिस निरीक्षक सुनीलसिंग पवार आदी उपस्थित होते.

शेतीमध्ये सततची नापिकीकर्जबाजारीपणा व कर्ज परतफेडीचा तगादा या तीन प्रमुख कारणांपैकी शेतकरी आत्महत्या झाली असल्यास संबंधित कुटुंबाला 23 जानेवारी 2006 च्या शासन निर्णयाद्वारे आर्थिक मदत देण्यात येते. जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत शेतकरी आत्महत्येच्या 10 प्रकरणांवर चर्चा झाली. यापैकी 5 प्रकरणे पात्र करून मदतीकरीता निकाली काढण्यात आली3 प्रकरणे समितीने अपात्र ठरविली तर उर्वरित 2 प्रकरणे प्रलंबित ठेवून फेरचौकशी साठी तालुकास्तरीय समितीकडे पाठविण्यात आली.

00000

लसीकरणाची गती वाढविण्यासाठी जिल्हाधिका-यांच्या तालुक्यांना भेटी


लसीकरणाची गती वाढविण्यासाठी जिल्हाधिका-यांच्या तालुक्यांना भेटी

Ø बल्लारपूर येथे घेतला यंत्रणेचा आढावा

            चंद्रपूर दि. 31 डिसेंबर : जिल्ह्यात दुस-या डोजचे प्रमाण वाढविण्यासाठी जिल्हास्तरावरून नियमित आढावा घेण्यात येत असला तरी प्रत्यक्षात तालुका यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी तालुक्यांना भेटी देण्याचा सपाटा लावला आहे. पहिल्या दिवशी चिमूर उपविभागात विविध ठिकाणी भेटी दिल्यानंतर जिल्हाधिका-यांनी आता बल्लारपूर येथे लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला.

            बल्लारपूर येथील उपविभागीय कार्यालयात झालेल्या बैठकीला उपविभागीय अधिकारी दीप्ती सूर्यवंशी, तहसीलदार संजय राईंचवार, सहा. मुख्याधिकारी,  जयवंत काटकर, पोलीस निरीक्षक उमेश पाटील, गटशिक्षणाधिकारी श्री. लहामगे, सर्व नोडल अधिकारी तथा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

कोरोना विषाणूचा नव्या व्हेरींयटचा वाढता प्रसार लक्षात घेता शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरीकांचे  लसीकरण पुर्ण होणे अपेक्षित आहे. यासाठी तालुक्यातील नागरीकांच्या लसीकरणाबाबतची माहिती जाणून घेत तालुक्यांनी त्यांच्या क्षेत्रातील नागरीकांचे 100 टक्के लसीकरण येत्या 26 जानेवारीपर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी तालुका प्रशासनाला दिले. संबधित तालुक्यातील नागरीकांचा झालेला पहिला व दुसरा डोज तसेच अद्याप लसीकरण न झालेल्या नागरीकांची माहिती प्रत्येक दौ-यात ते जाणून घेत आहे.

शहरातील नागरिकांचे लसीकरणासाठी करण्यात आलेल्या नियोजनाबाबतची  माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.गजानन मेश्राम यांनी तर ग्रामीण भागातील 100 टक्के लसीकरण पूर्ण करण्याच्या नियोजनाबाबत सविस्तर माहिती बल्लारपूरचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम यांनी दिली.  दि. 3 जानेवारी 2022 पासून 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू करण्याच्या संदर्भातील माहितीसुध्दा त्यांनी जाणून घेतली.

00000

Thursday 30 December 2021

गुरुवारी जिल्ह्यात 1 कोरोनामुक्त, 2 बाधित

 गुरुवारी जिल्ह्यात 1 कोरोनामुक्त, 2 बाधित

Ø ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 7

चंद्रपूर, दि. 30 डिसेंबर : गत 24 तासात जिल्ह्यात एकाने कोरोनावर मात केली असून त्या रुग्णाला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 2 नवीन रुग्ण बाधीत झाले आहे. जिल्ह्यात गुरुवारी मृत्यू संख्या शून्य आहे.

आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात 1 तर राजुरा येथे 1 रुग्ण आढळला असून चंद्रपूर, बल्लारपूर, भद्रावती, ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, मुल, सावली, पोंभूर्णा, गोंडपिपरी, चिमूर, वरोरा, कोरपना, जिवती व इतर  ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 886 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 336 झाली आहे. सध्या 7 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 7 लाख 97 हजार 300 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 7 हजार 307 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1543 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

राज्याअंतर्गत रब्बी हंगामातील विविध पीक स्पर्धांचे आयोजन


राज्याअंतर्गत रब्बी हंगामातील विविध पीक स्पर्धांचे आयोजन

Ø सहभागी होण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 30 डिसेंबर:  शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती करणे व त्यांना प्रोत्साहन देणे यासाठी राज्य, जिल्हा, विभाग व तालुका पातळीवर पीक स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. तरी, शेतकरी बंधूनी रब्बी हंगाम 2021 मधील पिक स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

रब्बी हंगामातील ज्वारी, गहु, हरभरा, करडई, जवस, तीळ या सहा पिकांचा रब्बी हंगाम पीक स्पर्धेमध्ये समावेश करण्यात आला आहे. यात भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे संबंधित पिकाखालील किमान 10 आर (0.10 हेक्टर) सलग क्षेत्रावर लागवड असणे आवश्यक आहे.

पीक स्पर्धेमध्ये तालुका हा घटक निश्चित केला असून ज्या पिकाखालील संबंधित तालुक्यातील एकुण लागवड क्षेत्र 1000 हेक्टर किंवा त्याहुन अधिक आहे, अशा पिकांकरीता पीक स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. ही स्पर्धा सर्वसाधारण व आदिवासी शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेसाठी तालुका पातळीवर सर्वसाधारण गटातील किमान 10 स्पर्धक तर आदिवासी गटातील किमान 5 स्पर्धकांचा सहभाग आवश्यक असून त्याकरीता भाग घेण्यासाठी रु. 300 प्रति शेतकरी प्रति पीक याप्रमाणे प्रवेश शुल्क आकारले जाईल. तालुका पातळीवरील स्पर्धेच्या निकालावरुन पुढे जिल्हा, विभाग व राज्य पातळीवरील बक्षिसे जाहीर केली जाणार आहेत.

एक शेतकरी एकापेक्षा अधिक पिकासाठी स्पर्धेत भाग घेऊ शकेल. पुर्वी जिल्हा व राज्यपातळीवर सरसकट सर्वांना भाग घेता येत नव्हता आणि जिल्हा व राज्यपातळीवर वेगवेगळे शुल्क आकारण्यात येत होते. आता सर्व पातळीवर एकदाच थेट सहभाग घेता येणार आहे. त्यासाठी एकदाच रु. 300 प्रति शेतकरी प्रति पीक प्रवेश शुल्क भरुन पीक कापणीवरुन आलेल्या उत्पादकतेच्या आकडेवारीनुसार त्याची तालुका, जिल्हा, विभाग व राज्य पातळीवर निवड केली जाणार आहे. याशिवाय पारितोषिकाच्या रकमेमध्ये भरीव वाढ करण्यात आली आहे.

पीक स्पर्धा विजेत्यांसाठी स्पर्धा पातळीनिहाय सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षिस स्वरुप पुढीलप्रमाणे राहील.  तालुका पातळीवर पहिले बक्षिस 5 हजार रुपये, दुसरे बक्षीस 3 हजार रुपये, तिसरे बक्षीस 2 हजार रुपये राहील. जिल्हा पातळीवरील पहिले बक्षिस 10 हजार रुपये, दुसरे बक्षीस 7 हजार रुपये, तिसरे बक्षीस 5 हजार रुपये तर विभाग पातळीवर पहिले बक्षिस 25 हजार रुपये, दुसरे बक्षीस 20 हजार रुपये, तिसरे बक्षीस 15 हजार रुपये राहील. राज्य पातळीवर पहिले बक्षिस 50 हजार रुपये, दुसरे बक्षीस 40 हजार रुपये, तिसरे बक्षीस 30 हजार रुपये याप्रमाणे राहील.

रब्बी हंगाम 2021 साठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख दि.31 डिसेंबर 2021 असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिक स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

00000

नूतन वर्षाचे स्वागत अत्यंत साधेपणाने करा

 
नूतन वर्षाचे स्वागत अत्यंत साधेपणाने करा

Ø जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

चंद्रपूर, दि. 30 डिसेंबर: कोरोनाविषाणू संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये ओमिक्रॉन ही नवीन विषाणू प्रजाती आढळून आल्यामुळे संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. ओमिक्रॉन विषाणूंचे संक्रमण सामान्य नागरिकांमध्ये, रहिवाशांमध्ये फार मोठ्या तीव्रतेने पसरण्याची दाट शक्यता लक्षात घेऊन आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी घेण्यासाठी नागरिकांनी नूतन वर्षाचे स्वागत कोणताही जल्लोष न करता घरी राहून अत्यंत साधेपणाने करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने 31 डिसेंबर 2021 (वर्षअखेर) व नूतन वर्ष 2022 चे स्वागत करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

कोरोनाच्या अनुषंगाने दि. 31 डिसेंबर 2021 रोजी व दि.1 जानेवारी 2022 रोजी नववर्ष स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत शक्यतोवर घरीच साधेपणाने साजरे करावे. राज्यात दि. 25 डिसेंबर 2021 पासून रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सदर आदेशांचे पालन करण्यात यावे.

कोविड-19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता शासनाच्यावतीने देण्यात आलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. तसेच 31 डिसेंबर 2021 व नूतन वर्ष 2022 च्या स्वागताकरिता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना बंदिस्त सभागृहात उपलब्ध आसनक्षमतेच्या 50 टक्केपर्यंत तर खुल्या जागेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना उपलब्ध क्षमतेच्या 25 टक्केच्या मर्यादेत उपस्थित राहण्यास परवानगी असेल. या ठिकाणी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व सुरक्षित अंतर राखले जाईल तसेच मास्क व सॅनीटायजरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच त्या ठिकाणी निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 60 वर्षावरील नागरिकांनी व दहा वर्षाखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतोवर घराबाहेर जाणे टाळावे. तसेच 31 डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी बागेत, रस्त्यावर, अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन गर्दी न करता सोशल डिस्टंन्सींग (सामाजिक अंतर) राहील, तसेच मास्क व सॅनीटायजरचा वापर होईल,याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करू नये. तसेच मिरवणुका काढण्यात येऊ नये. नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात. अशा वेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टंन्सींगचे पालन करावे. तसेच संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे.

कोविड-19 व विशेषत्वाने ओमिक्रॉन या विषाणू प्रजातीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नगरविकास विभाग, मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील, अशा मार्गदर्शक सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

00000

Wednesday 29 December 2021

अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत शेतक-यांनी विमा कंपनीला सुचित करावे

 

अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत शेतक-यांनी विमा कंपनीला सुचित करावे

चंद्रपूर, दि. 29 डिसेंबर : राज्यात दि. 27 व 28 डिसेंबर रोजी काही ठिकाणी गारपीट, अवेळी पाऊस यामुळे खरीप हंगामातील उभ्या असलेल्या तूर, कापूस तर काही प्रमाणात काढणी झालेल्या तुरीचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर रब्बी हंगामात विमा संरक्षित गहू, हरभरा, रब्बी ज्वारी यासारख्या पिकांचे देखील नुकसान झाले आहे. याबाबत अधिसूचित महसूल मंडळातील विमाधारक शेतकऱ्यांनी संबंधित विमा कंपनीस घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत नुकसानीबाबत सूचना देणे आवश्यक असल्यामुळे याबाबतची पूर्वसूचना आपल्या संबंधित विमा कंपन्यांना द्यावी.

शेतकऱ्यांनी नुकसानीबाबत सूचना देण्यासाठी क्रॉप इन्शुरन्स ॲप, विमा कंपनी टोल फ्री क्रमांक, विमा कंपनीचा ई-मेल, विमा कंपनीचे तालुकास्तरीय कार्यालय, कृषी विभागाचे मंडल कृषी अधिकारी कार्यालय तसेच ज्या बँकेत विमा जमा केला ती बँक शाखा आदी पर्यायांचा वापर करता येईल. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी  घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत आपल्या विमा संरक्षित पिकाचे नुकसान झाले असल्यास याबाबतची पूर्वसूचना आपल्या संबंधित विमा कंपनीकडे विहित कालमर्यादेत सादर करावी, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे.

00000

बुधवारी जिल्ह्यात 1 कोरोनामुक्त, 1 बाधित

 
बुधवारी जिल्ह्यात 1 कोरोनामुक्त, 1 बाधित

Ø ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 6

चंद्रपूर, दि. 29 डिसेंबर : गत 24 तासात जिल्ह्यात एकाने कोरोनावर मात केली असून त्या रुग्णाला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 1 नवीन रुग्ण बाधीत झाला आहे. जिल्ह्यात बुधवारी मृत्यू संख्या शून्य आहे.

आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये  चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात  1 रुग्ण आढळला असून  चंद्रपूर, बल्लारपूर,भद्रावती, ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, मुल, सावली, पोंभूर्णा, गोंडपिपरी, राजुरा, चिमूर, वरोरा,  कोरपना, जिवती व इतर  ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 884 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 335 झाली आहे. सध्या 6 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 7 लाख 96 हजार 122 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 6 हजार 280 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1543 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

कोविड दिलासा पॅकेज अंतर्गत आर्थिक मदतीसाठी कलावंताकडून प्रस्ताव आमंत्रित

 

कोविड दिलासा पॅकेज अंतर्गत आर्थिक मदतीसाठी कलावंताकडून प्रस्ताव आमंत्रित

  चंद्रपूर, दि 29 डिसेंबर : जिल्ह्यातील प्रयोगात्मक कलेच्या प्रकारातील कलावंतांना कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या वतीने कोविड दिलासा पॅकेजअंतर्गत अर्थसहाय्य करण्यासाठी पात्र लाभार्थ्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहे. इच्छुक कलाकारांनी त्यांचे विहित नमुन्यातील अर्ज पुढील दहा दिवसात संबंधीत तहसिलदार यांचेमार्फत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडे सादर करावे.

          कोरोना विषाणूच्या संसर्गाने संपूर्ण राज्यात लॉकडाऊन लागू होता. तसेच,लॉकडाऊन शिथील करण्यात आल्यानंतरही सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, नाट्यगृहे, चित्रपटगृहे यांच्यावर बंदी असल्याने कलाकारांना सुमारे दीड वर्षापर्यंत कला सादरीकरण व त्यातून होणारे उत्पन्न यापासून वंचित राहावे लागले. तसेच सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित करण्यात येणारे सांस्कृतिक कार्यक्रमही या काळात स्थगित करण्यात आलेले होते. या काळात सांस्कृतिक व कलाक्षेत्रातील संघटीत व असंघटीत कलाप्रकारातील विविध कलाकार,ज्यांचे उपजीविकेचे साधन केवळ सांस्कृतिक कार्यक्रम व कला सादर करणे असे आहे, त्यांची आर्थिक कुचंबना झाल्याने संघटित व असंघटित क्षेत्रातील प्रयोगात्मक कला प्रकारातील कलाकारांना शासनाच्या वतीने एकरकमी आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय राज्य शासनाने  3 नोव्हेंबर 2021 च्या शासन निर्णयातून घेतला आहे.

पात्र एकल लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. जिल्हास्तरावरील समितीने पात्र केलेल्या कलावंतांची यादी विहित तपशीलासह संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांचेकडे सादर केल्यानंतर त्यांचेमार्फत पात्र लाभार्थांच्या बँक खात्यात अनुज्ञेय अर्थसहाय्य वर्ग करण्यात येणार आहे.

कोविड दिलासा पॅकेजसाठी एकल कलावंतांकरीता पात्रता निकष व अटी :  राज्यातील प्रयोगात्मक कलेतील केवळ कलेवर गुजराण असणारे आर्थिकदृष्टया दुर्बल कलावंत अर्ज करण्यास पात्र आहेत. त्यांचे महाराष्ट्रात 15 वर्षे वास्तव्य असावे, कलेच्या क्षेत्रात 15 वर्षे कार्यरत असावे,वार्षिक उत्पन्न रुपये 48 हजारच्या कमाल मर्यादेत असावे. केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या वृध्द कलाकार मानधन योजनेतून मानधन घेणाऱ्या लाभार्थी कलाकारांना तसेच इतर वैयक्तिक शासकीय अर्थसहाय्याच्या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देता येणार नाही.

            एकल कलावंताने अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे : 3 नोव्हेंबर 2021 च्या शासन निर्णयातील परिशिष्ट-ब-1 नुसार विहित नमुन्यातील अर्ज, महाराष्ट्रात 15 वर्षे वास्तव्याचा रहिवासी दाखला यात स्थानिक स्वराज्य संस्थेचा दाखलाही ग्राह्य राहील. तहसिलदारांकडून प्राप्त उत्पन्नाचा दाखला, कलेच्या क्षेत्रात 15 वर्षे कार्यरत असल्याबाबतचे पुरावे, आधार कार्ड व बँक खाते तपशील, शिधापत्रिका सत्यप्रत अर्जासोबत जोडावी.

           समुह लोककलापथकांचे चालक, मालक, निर्माते यांनी 3 नोव्हेंबर 2021 च्या शासन निर्णयातील परिशिष्ट-ब-2 नुसार सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडे अर्ज सादर करावा. जिल्ह्यातील जास्तीत जास्त एकल कलाकारांनी आर्थिक मदतीसाठी प्रस्ताव सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

झटपट न्यायदानातून जिल्ह्यात 7671 प्रकरणे निकाली


झटपट न्यायदानातून जिल्ह्यात 7671 प्रकरणे निकाली

Ø 2021 मध्ये तीन राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन

चंद्रपूर, दि. 29 डिसेंबर : न्यायालयात वर्षानुवर्षे प्रलंबित राहणारी प्रकरणे बघता, वेळेत न मिळणारा न्याय हा संबंधितांना एकप्रकारच्या अन्यायासारखाच वाटतो. यावर तोडगा काढण्यासाठी व नागरिकांना झटपट निकाल मिळण्यासाठी मा. सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रीय विधीसेवा, राज्य विधीसेवा प्राधिकरण यांनी दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार चंद्रपूर जिल्ह्यात 2021 मध्ये तीन राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले.

1 ऑगस्ट, 25 सप्टेंबर आणि 11 डिसेंबर 2021 या तीन दिवशी चंद्रपूर जिल्हा न्यायालय व तालुका न्यायालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून एकूण 7671 प्रकरणे निकाली काढण्यात आली. विशेष म्हणजे या प्रकरणाच्या माध्यमातून 17 कोटी 94 लक्ष रुपये मुल्याच्या वादाबाबत तडजोड करण्यात आली.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा कविता बी. अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. चंद्रपूर जिल्हा मुख्यालयासह जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरीय न्यायालयामध्ये एकाच दिवशी घेण्यात आलेल्या या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयातील प्रलंबित समझोता योग्य प्रकरणे तसेच न्यायालयात येण्याअगोदरची (प्रिलिटिगेशन) प्रकरणे ठेवण्यात आली होती.

या लोक अदालतीमध्ये नागरिक, विधिज्ञ तसेच विविध बँका, विमा, फायनान्स कंपनी यांचे अधिकारी आणि पक्षकारांनी उस्फूर्तपणे सहभाग घेऊन चांगला प्रतिसाद दिला. आपले वाद आपसी समझोत्याने निकाली काढण्याकरीता  आपसात चर्चा करून सामंजस्याची भूमिका घेत तडजोडीने वाद मिटविले. परिणामस्वरूप या लोक अदालतीमध्ये न्यायालयीन प्रलंबित 2974 प्रकरणे आणि दाखलपूर्व 4697 प्रकरणे असे एकूण 7671 प्रकरणे निकाली निघाली. सदर प्रकरणांमध्ये एकूण 17 कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या वादाबाबत तडजोड झाली. या राष्ट्रीय लोक अदालतीनिमित्त आयोजित स्पेशल ड्राईव्हमध्ये 2130 प्रकरणांचा यशस्वीरित्या निपटारा करण्यात आला.

झटपट निकाल हे लोक न्यायालयाचे वैशिष्ट्य आहे. लोक न्यायालयाचा महत्त्वाचा फायदा म्हणजे, यामध्ये प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांचा आपसी समझोत्याने व सर्व संमतीने त्वरित समक्ष निकाल केला जातो व त्या आदेशाला दिवाणी न्यायालयाच्या हुकूमनामा एवढेच महत्व असते व त्याची अंमलबजावणी सुद्धा करता येते. त्याद्वारे वेळ, पैसा, श्रमाची बचत होते. वादाचा कायमचा समोपचाराने निपटारा होतो. सर्वच पक्षांना जिंकल्याचे समाधान मिळत असल्याने भविष्यकालीन वाद टाळले जातात. या कार्यवाहीसाठी कोणतेही वेगळे शुल्क, खर्च लागत नाही.

जिल्ह्यातील तीनही राष्ट्रीय लोक अदालतीच्या यशस्वितेसाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा कविता बि. अग्रवाल, जिल्हा व सत्र न्यायाधीश विरेंद्र केदार, एस.एस.अन्सारी, प्रभाकर मोडक, प्रशांत काळे, एस.एस.मौंदेकर, के.पी.लोखंडे यांनी मार्गदर्शन केले. याकरीता सर्व न्यायाधीश, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव किरण जाधव, विविध शासकीय विभागांचे अधिकारी, चंद्रपूर जिल्हा विधिज्ञ मंडळाचे विधिज्ञ, न्यायालयीन कर्मचारी व पक्षकार यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन सहकार्य केले.

00000

Tuesday 28 December 2021

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 6


जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 6

चंद्रपूर, दि. 28 डिसेंबर: जिल्हयात मंगळवारी (दि.28) एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. तर ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 6 असून जिल्ह्यात मंगळवारी  एकाही बाधिताचा  मृत्यू  झाला नाही.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 883 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 334 झाली आहे. सध्या 6 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 7 लाख 94 हजार 771 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 4 हजार 502 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1543 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

सहा नगरपंचायतींच्या अनारक्षित करण्यात आलेल्या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

 

सहा नगरपंचायतींच्या अनारक्षित करण्यात आलेल्या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

Ø 18 जानेवारी रोजी होणार मतदान

चंद्रपूर दि. 28 डिसेंबर : सर्वोच्च न्यायालयाच्या 15 डिसेंबर 2021 च्या आदेशानुसार जिल्ह्यातील सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना, जीवती आणि सिंदेवाही- लोनवाही नगर पंचायतीच्या नागरिकांचा मागास प्रवर्गाकरीता आरक्षित असलेल्या जागा अनारक्षित करण्यात आलेल्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार या जागांवर आता मंगळवार 18 जानेवारी 2022 रोजी मतदान घेण्यात येईल.

वरील नगरपंचायतीच्या जागांसाठी नामनिर्देशनपत्र सादर करण्याचा कालावधी 29 डिसेंबर 2021 ते 3 जानेवारी 2022 सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. 1 जानेवारी (शनिवार) आणि 2 जानेवारी (रविवार) या सुट्ट्यांच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाही. दाखल झालेल्या नामनिर्देशनपत्राची छाननी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात 4 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजतापासून होईल. वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याची तारीख छाननीनंतर लगेच म्हणजे 4 जानेवारी 2022 आहे. अपील नसेल तेथे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असून अपील असल्यास अपिलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल त्या तारखेनंतर तिस-या दिवशी किंवा तत्पूर्वी.

निवडणूक चिन्ह नेमून देण्याची तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणा-या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याची तारीख, उमेदवारी मागे घेण्यासाठीच्या शेवटच्या दिवसानंतरच्या लगतच्या दिवशी राहील. उपरोक्त जागांसाठी मतदान मंगळवार दि. 18 जानेवारी 2022 रोजी सकाळी 7.30 पासून सायंकाळी 5.30 पर्यंत राहील. तसेच मतमोजणी 19 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10 वाजतापासून करण्यात येईल.

नेमण्यात आलेले निवडणूक निर्णय अधिकारी व नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची जागा :  

        सावली नगर पंचायतीकरीता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वरोराचे उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांची नेमणूक करण्यात आली आहे. (नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची जागा, निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, तहसील कार्यालय, सावली), पोंभुर्णा न.पंचायतसाठी निवडणूक निर्णय अधिकारी बल्लारपूरच्या उपविभागीय अधिकारी दिप्ती सुर्यवंशी आहेत. (नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची जागा, निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, तहसील कार्यालय, पोंभुर्णा), गोंडपिपरीकरीता निवडणूक निर्णय अधिकारी उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे (नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची जागा, निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, पं.स. सभागृह, तहसील परिसर, गोंडपिपरी), कोरपनासाठी निवडणूक निर्णय अधिकारी राजूराचे उपविभागीय अधिकारी संपत खलाटे आहे. (नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची जागा, निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, नगर पंचायत कोरपना अभ्यासिका सभागृह), जीवतीकरीता निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रपूर शहर महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल आहेत. (नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची जागा, निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, नगर पंचायत कार्यालय, जीवती) आणि सिंदेवाही - लोनवाही करीता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून चिमूरचे उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ  आहे. (नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची जागा, निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, राजीव गांधी सभागृह, तहसील कार्यालय, सिंदेवाही).

            वरील निवडणूक कार्यक्रम जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी जाहीर केला आहे.

0000000

1 जानेवारी रोजी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन

 

1 जानेवारी रोजी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन

Ø 30 डिसेंबरपर्यंत प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूर दि. 28 डिसेंबर : क्रीडा व युवक सेवा संचालनालयाअंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आभासी (ऑनलाइन) पद्धतीने दि. 1 जानेवारी 2022 या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवामध्ये लोकगीत व लोकनृत्य या 2 कलांचा समावेश राहणार आहे. लोकगीतासाठी साथ-संगत देणाऱ्यासह जास्तीत जास्त 10 स्पर्धक व लोकनृत्य या स्पर्धामध्ये 20 स्पर्धक सहभागी होऊ शकतात. सदर स्पर्धेत सहभागी होणारे स्पर्धक व साथसंगत देणा-यांचे वय 15 ते 29 या वयोगटातील असणे आवश्यक आहे. लोकनृत्य सादर करणाऱ्या संघाने पूर्व ध्वनीमुद्रित टेप अथवा रेकॉर्डिंगला परवानगी दिली जाणार नाही. तसेच लोकगीत सादर करणाऱ्या संघाचे गीत लोकनृत्य चित्रपट बाह्य असावे.

स्पर्धेसाठी प्रवेशिका दि. 30 डिसेंबर 2021 पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांच्याकडे वयाच्या दाखल्यासह सादर करावे. त्यानंतर येणाऱ्या प्रवेशिकांचा विचार केला जाणार नाही. तसेच वेळेवर कोणत्याही संघास व कलाकारास स्पर्धेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.

युवा महोत्सवाच्या अधिक माहितीकरिता कार्यालयातील आर. बी. वडते 9975591175, विजय डोबाळे 9545858975 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,चंद्रपूर येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. तसेच युवा महोत्सवामध्ये जास्तीत जास्त युवकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी केले आहे.

00000

ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार स्वाधार योजनेचा लाभ


ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार स्वाधार योजनेचा लाभ

चंद्रपूर दि. 28 डिसेंबर: अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश मिळालेला नाही. अशा विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षण घेता यावे,यासाठी भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता आदि सुविधा विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक ती रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट उपलब्ध करण्यासाठी शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केलेली आहे.

कोरोनामुळे सन 2020-21 मध्ये सर्व महाविद्यालये बंद होती. शिक्षण ऑनलाईन सुरु होते, अशा विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ द्यायचा किंवा नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला असल्याने विद्यार्थ्यांकडून सदर योजनेचे अर्जच भरुन घेण्यात आले नव्हते. कारण या योजनेसाठी 75 टक्के उपस्थिती ग्राह्य धरली जाते. नुकतीच ही अडचण शासनामार्फत दूर करण्यात आली असून ऑनलाईन शिक्षण असले तरी विद्यार्थ्यांची ऑनलाईन 75 टक्के उपस्थिती ग्राह्य धरुन सन 2020-21 या वर्षातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्याचे आदेश नुकतेच निर्गमित करण्यात आले आहे. त्यामुळे सन 2021-22 या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी सन 2020-21 व सन 2021-22 या शैक्षणिक सत्राकरीता विद्यार्थ्यांनी 31 डिसेंबर 2021 पर्यंत संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांचेकडे अर्ज सादर करावे, असे आवाहन नागपूर,समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी केले आहे.

00000

3 जानेवारी रोजी लोकशाही दिनाचे आयोजन


3 जानेवारी रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

चंद्रपूर दि. 28 डिसेंबर: सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाचे आयोजन दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी करण्यात येते. या लोकशाही दिनानिमित्त नागरिक व शेतकरी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करतात.

सोमवार, दि.3 जानेवारी 2022 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार सादर करतांना विहित नमुन्यातील तक्रार अर्जासोबत तालुका लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाची प्रत तसेच अर्ज सादर करावा. तदनंतरच तक्रार अर्ज स्वीकारण्यात येईल, तसेच निवेदन स्वीकारण्याची वेळ दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंतच्या कालावधीत राहील. या लोकशाही दिनात नागरिकांनी मास्क घालणे व सामाजिक अंतराचे पालन करणे अनिवार्य राहील, असे निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम यांनी कळविले आहे.

00000

Monday 27 December 2021

सोमवारी जिल्हयात 1 बाधित, एकूण ॲक्टीव्ह रुग्ण 6

 


सोमवारी जिल्हयात 1 बाधित, एकूण ॲक्टीव्ह रुग्ण 6

चंद्रपूर, दि. 27 डिसेंबर : गत 24 तासात जिल्ह्यात 1 जण नव्याने बाधित झाला आहे. तर ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 6 असून जिल्ह्यात सोमवारी एकाही बाधिताचा मृत्यू  झाला नाही.

आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये नागभीड येथे 1 रुग्ण आढळला असून चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्र, चंद्रपूर, बल्लारपूर, भद्रावती, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, मुल, सावली, पोंभूर्णा, गोंडपिपरी, राजुरा, चिमूर, वरोरा, कोरपना, जिवती व इतर  ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 883 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 334 झाली आहे. सध्या 6 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 7 लाख 93 हजार 502 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 3 हजार 292 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1543 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

Sunday 26 December 2021

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 5

 

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 5

चंद्रपूर, दि. 26 डिसेंबर: जिल्हयात रविवारी (दि.26) एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. तर जिल्ह्यात रविवारी  एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 882 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 334 झाली आहे. सध्या 5 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 7 लाख 93 हजार 423 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 3 हजार 199 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1543 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

कोरोनाचा विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून नियमावली जारी

 

कोरोनाचा विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून  नियमावली जारी

Ø सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा अधिक व्यक्तींना रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत एकत्र येण्यास मनाई

चंद्रपूर दि. 26 डिसेंबर: कोविड-19 ओमायक्रोन विषाणूच्या पहिला होण्यास प्रतिबंध करण्यासाठी काही प्रमाणात चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात निर्बंध लावण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आदेश निर्गमित केले आहे. यामध्ये नव्याने काही निर्बंधाचा समावेश केला आहे.

विवाह समारंभ बंद जागेमध्ये आयोजित करतेवेळी किंवा अन्य सामाजिक,राजकीय किंवा धार्मिक कार्यक्रम आणि मेळावे यामध्ये अधिकतम 100  उपस्थितांची मर्यादा पाळण्यात यावी जर असे समारंभ मोकळ्या जागे मध्ये आयोजित होत असल्यास जास्तीत जास्त 250 किंवा त्या ठिकाणच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जी संख्या कमी असेल इतक्या उपस्थितांच्या मर्यादेचे पालन करण्यात यावे.

 

वर नमूद केलेल्या कार्यक्रमा व्यतिरिक्त इतर कार्यक्रमाचे आयोजन बंद जागेमध्ये करीत असताना आसनव्यवस्था निश्चित असलेल्या ठिकाणी त्या जागेच्या 50 टक्के क्षमते इतक्या उपस्थितांच्या मर्यादेचे पालन करण्यात यावे. तसेच बंद जागेमध्ये परंतु आसन व्यवस्था निश्चित नसलेल्या ठिकाणी असे कार्यक्रम आयोजित करताना आसन व्यवस्था जागेच्या 25 टक्के क्षमतेइतक्या उपस्थितांच्या मर्यादेचे पालन करण्यात यावे.असे कार्यक्रम मोकळ्या जागेमध्ये आयोजित करत असतांना त्या जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के पेक्षा अधिक उपस्थित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

क्रीडा स्पर्धा व सामन्यांचे आयोजन करताना प्रेक्षक क्षमतेच्या अधिकतम 25% उपस्थितीची मर्यादा पाळण्यात यावी. तसेच वरील वर्गवारीत न मोडणाऱ्या इतर कुठल्याही कार्यक्रमासाठी होणाऱ्या गर्दीच्या अनुषंगाने सदर बाबत संमेलनाच्या किंवा समारंभाच्या अशा ठिकाणच्या बाबतीतील क्षमता औपचारिकपणे आधीच निश्चित केलेली नसेल तर अशा कार्यक्रमासाठी महानगरपालिका क्षेत्रासाठी मनपा,आयुक्त तर उर्वरित क्षेत्रासाठी संबंधित उपविभागीय अधिकारी यांना अशी क्षमता ठरविण्याचा व त्या अनुषंगाने परवानगी देण्याचे अधिकार असतील.

रेस्टॉरंट, जिम, स्पा, सिनेमा व नाट्यगृहे तेथील आसन क्षमतेच्या 50 टक्के मर्यादेच्या अधीन राहून सुरू ठेवण्यास मुभा राहील. परंतु तेथे एकूण आसन क्षमता व परवानगी देण्यात आलेली 50 टक्के क्षमता याबाबतचे सूचना फलक दर्शनी भागात प्रदर्शित करण्यात यावी.

सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा अधिक व्यक्तींना रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत एकत्र येण्यास मनाई राहील.

या आदेशात नमूद केलेल्या निर्बंधाव्यतिरिक्त इतर सर्व निर्बंध जसे आहेत तसेच लागू राहतील. यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेले कोरोना निर्बंध आदेश व मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.

कोविड- 19 च्या प्रतिबंधासाठी या कार्यालयाद्वारे वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांचे व मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 तसेच भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार व अन्य कायदेशीर तरतुदीनुसार कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहील.

सदर आदेश संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात दिनांक 25 डिसेंबर 2021 चे 12 वाजेपासून पुढील आदेशापर्यंत लागू राहील. असे  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कळविले आहे.

00000