Search This Blog

Tuesday 20 February 2018

‘ बलाची उपासना ’ महाराष्ट्राच्या मातीची परंपरा : योगगुरु बाबा रामदेव



‘ मूल ’ मध्ये दुसऱ्या दिवशीही हजारोंच्या उपस्थितीत योगसाधना

        चंद्रपूरदि.21 फेब्रुवारीमल्लखांबसारखे मर्दानी खेळाचे आकार्षण, व्यायाम शाळाचे जाळे आणि बलाची उपासना करण्याची संताची शिकवण यामुळे महराष्ट्राच्या मातीतच व्यायामाची संस्कृती रुजती  आहे, असे गौरवदृगार योगगुरु बाबा रामदेव महाराज यांनीआज काढले. मूल शहरात 20 फेब्रुवारीपासून सुरु झालेल्या योगाशिबीराला दुसऱ्या दिवशीही सर्व क्षेत्रातील मान्यवरासह हजारो नागरिकांनी उत्साहात गर्दी केली होती.
चंद्रपूर मूल संपूर्ण जिल्हयामध्ये सध्या योगसाधणेचे चैतन्य संचारले आहे. योग शिबीरासाठी देशभरातून अनेक नागरिक चंद्रपूर-मूल येथे आले असून आज पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह वर्धाचे खासदार रामदास तडस देखील योग साधनेमध्ये पूर्णवेळ सहभागी झाले होते.
योग शिक्षण देतानाच  योगगुरु यांनी आयुर्वेद आणि व्यायामाच्या अनेक अंगावर प्रकाश टाकला व सतत दोन तास त्यांनी प्रात्यक्षिक करताना आपल्या प्राचीन योग कलेची महती आणि आरोग्य जपण्यासाठी पूर्वज करीत असलेल्या उपाययोजना याबद्दल प्रबोधन केले.
आजच्या योग साधनेच्या उत्तरार्धात चंद्रपूर येथील विठ्ठल मंदिर व्यायाम शाळेच्या विद्यार्थ्यांनी मल्लखांब विद्येचे चित्तथराक प्रदर्शन केले. या मल्लखांबपटूचा बाबा रामदेव महाराज यांनी सत्कार केला. यावेळी त्यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्यासारख्या महाराष्ट्रातील अन्य अनेक थोर  संतानीच राज्यामध्ये बलाची उपासणा करण्याचे मार्गदर्शन अनेक वर्षापासून केले आहे. महाराष्ट्र हा मर्दानी खेळाला आपल्या मातीत घेऊन वाढला आहे. त्यामुळे बलाची उपासना महाराष्ट्राच्या मातीची  परंपरा आहे,असे प्रतिपादन केले.
महाराष्ट्रामध्ये खेळाला, व्यायामाला गावागावमध्ये प्राधान्य दिले जाते. त्यामुळे योग शिबीरांना या ठिकाणी उत्तम प्रतिसाद मिळतो. महाराष्ट्रातून योग प्रशिक्षणासाठी मोठया प्रमाणात प्रशिक्षक तयार झाले असल्याचे त्यांनी सांगीतले.

बाबा रामदेव यांच्यामुळे प्रकृती स्वास्थ  : खासदार तडस

वर्धाचे खासदार आणि सुप्रसिध्द कुस्तीपट्टू खासदार रामदास तडस हे सुध्दा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या समवेत पहाटे 5 पासून योग शिबारात शिबीरार्थी  म्हणून उपस्थितीत होते. ते नियतिम योगाभ्यास करतात. बाबा रामदेव योग शिबीराच्या उत्तरार्धात शिबीरार्थीना व्यायामाचे झालेले फायदे याबाबत संवाद साधतात. यावेळी खासदार रामदास तडस यांनी सुध्दा काही वर्षापूर्वी त्यांना झालेल्या त्रासाबदल आणि बाबा रामदेव यांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल आभार मानले. शरीर स्वास्थासाठी रामदास तडस यांनी हरिद्वार येथे जाऊन बाबा रामदेव यांच्याकडून योग-उपचार केले होते. बाबा रामदेव यांच्या योगसाधनेच्या माध्यमातून विविध आजारातून बाहेर पडलेल्या अनेक व्यक्तींनी त्यांना आलेल्या अनुभवाची माहिती दिली. यामध्ये देशभरातील शिबीरार्थीचे अनुभव ऐकता आले. 
उदया वरोरातील
कृषी प्रदर्शनीला उपस्थिती
बाबा रामदेव महाराज यांच्या उपस्थितीत 20 फेब्रुवारीला शेतकरी मेळाळा, 21 फेब्रुवारीला महिला मेळावा तर 22 फेब्रुवारीला वरोरा येथील आनंदवन चौक परिसरात जिल्हा स्तरीय कृषी मेळावा आयोजित केला आहे. सकाळी 10 वाजता या कृषी मेळावा व प्रदर्शनीचे उदघाटन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार करणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर असतील. जिल्हा परिषदेच्या कृषी सभापती अर्चना जीवतोडे या मेळाव्याच्या स्वागताध्यक्ष आहेत.
000

जे विकते ते पिकवायला शिका... योगगुरू रामदेव महाराज यांची शेतकऱ्यांना सूचना




रामदेव महाराज यांनी द्रोणाचार्याच्या भूमिकेतून
शेतक-यांना मार्गदर्शन करावे : मुनगंटीवार

चंद्रपूर दि. 20 फेब्रुवारी -  चंद्रपूर व विदर्भ परिसरातील शेतकऱ्यांनी एका पिकावर न राहता आता वनौषधी आणि दुग्ध उत्पादनाकडे वळावे. मला वनौषधींची गरज आहे. मी खरेदी करायला तयार आहे. त्यामुळे जे विकल्या जाते ते पिकवायला सुरूवात करून स्वत:ला व देशाला बळकट करण्याचे आवाहन योगगुरू बाबा रामदेव महाराज यांनी आज येथे केले.
          चंद्रपूर तालुक्यातील मुल येथे 2021 व 22 असे तीन दिवस बाबा रामदेव महाराज यांचे योगाभ्यास शिबीराचे आयोजन राज्याचे वित्तनियोजन व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. 20 फेब्रुवारीला दुपारच्या सत्रात आयोजीत शेतकरी मेळाव्याला ते संबोधीत करीत होते. या मेळाव्याला चंद्रपूर-गडचिरोली जिल्हातील हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती होती. मेळाव्याच्या व्यासपीठावर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर,वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेलखासदार अशोक नेतेजिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळेमहापौर अंजली घोटेकरबल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीष शर्मामाजी आमदार अतुल देशकर यांची उपस्थिती होती.
          यावेळी रामदेव महाराज यांनी शेतक-यांशी संवाद साधला. हा देश ऋषी आणि कृषीचा आहे. त्यामुळे आज बदलत्या काळात देशाचा सन्मान आणि महत्व टिकवून ठेवायचे असेल तर काही बदल शेतीतही करणे गरजेचे आहे. मला माझे पुढचे आयुष्य शेतक-यांच्या उत्थानासाठी खर्च करायचे आहे. त्यामुळे आता जे काही मला विकायचे आहे. त्यासाठी लागणारा कच्चा माल आपल्या शेतात घ्यायला सुरुवात करा. एका पिकावर आता शेतक-यांचे भले होणार नाही. त्यामुळे जे विकायचे आहेजे विकले जाणार आहे तेच पिकवायला शिकाअसे आग्रही आवाहन त्यांनी केले.
          आपल्या विविध उत्पादनासाठी कोरफोड(अलवेरा)मधगुडवेलअशा कितीतरी उत्पादनाची आवश्यकता आहे. ज्या चंद्रपूर व परिसरात सहज पिकवणे शक्य आहे. पतंजली सध्या 1 कोटी शेतक-यांशी विविध वनौषधी उत्पादनातून जुळले गेले आहे. 2025 पर्यंत 5 कोटी शेतक-यांशी जुळण्याची आमची रणनिती असून वरील उत्पादन तुम्ही शेतीत घ्या. मी सर्व उत्पादन योग्य बाजार भावात थेट शेतातून खरेदी करायला तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

          नागपूरमधील मिहानमध्ये मोठया क्षमतेचे संत्रा प्रक्रीया उद्योग उभा केला आहे. विदर्भातील एकही  संत्र यामुळे वाया जाणार नाही. मात्र मी त्या ठिकाणी तयार केलेल्या प्रक्रिया उद्योगाला मोठया प्रमाणात संत्र्याशिवाय अलवेराआवळा आदींची गरज आहे. शेतक-यांच्या भरीव व आवश्यक  उत्पादनाच्या माध्यमातून भारताला महासत्ता बनविण्याचा पतंजलीचा मानस असून पुढील काळात दुग्ध उत्पादनातही आमची कंपनी आपला वाटा वाढवणार आहे. त्यामुळे दुध मोठया संख्येने लागणार आहे. शेतक-यांनी दुग्ध व्यवसायाच्या जोड धंदयाला आपलेसे करावेअसेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
          आगामी काळात सर्व विदेशी कंपन्यांना परत फिरावे लागेले. पतंजलीच्या दर्जा व सामाजिक भानामुळे ही बाब शक्य आहे. त्यामुळे आपला पैसा आपल्याच भल्यासाठी वापरायचा आहे. शेतक-यांनी या बदलाचे पाईक व्हावेअसेही त्यांनी शेवटी सांगितले. आपल्या भाषणाच्या उत्तरार्धात त्यांनी उपस्थित शेतकरी जनसमुदायाला योग शिक्षणही दिले.
          तत्पूर्वी शेतक-यांच्या मेळाव्याला संबोधित करतांना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवारी यांनी चंद्रपूर जिल्हयाची विविध क्षेत्रातील वेगळेपण रामदेव महाराज यांच्या पुढे मांडले. गेल्या काही वर्षात चंद्रपूरमध्ये पायाभूत सुविधामध्ये बदल झाले असून कृषीरोजगार सिंचन याकडे विविध प्रकल्पातून लक्ष वेधल्याची त्यांनी सांगितले. विसापूर जवळ तयार करण्यात येत असलेल्या बॉटनिकल गार्डनमध्ये विविध वनोषधीवनस्पती यांचा अभ्यास होणार आहे. पतंजलीच्या माध्यमातून या ठिकाणी रामदेव महाराज यांनी एखादे संशोधन केंद्र उभारावेअसे आवाहन त्यांनी केले. या परिसरातील शेतकरी एकलव्यांसारखा मेहनती असून या शेतक-यांना द्रोणाचार्य बनून मार्गदर्शन करावेअसे आवाहनही त्यांनी केले.
          यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी उपस्थितांना संबोधीत करतांना स्वत:च्या कर्तृत्वावर कोटयावधीचा व्यवसाय करुन दाखवणा-या रामदेव महाराज यांनी त्यांच्या या कौशल्‍याचे ज्ञान गरीब शेतक-यांना दयावेअसे आवाहन केले. जगात जे यशस्वी ठरले आहे . त्या योगगुरूच्या  मार्गदर्शनाचा निश्चितच येथील शेतक-यांना लाभ होईलअसे स्पष्ट केले.
          खासदार अशोक नेते यांनी चंद्रपूर प्रमाणेच मोठया प्रमाणात गडचिरोली जिल्हा वनाच्छादित असून येथील वनौषधीला देखील पतंजलीने न्याय दयावा. या भागात उद्योगव्यवसाय वाढावाअसे आवाहन केले.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सुत्रसंचालन केले. यावेळी जिल्हयातील गुणवंत शेतक-यांचा सन्मानही करण्यात आला. या कार्यक्रमाला शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते .    
                                      0000

चंद्रपूर जिल्हयातील वनौषधी व खाद्यान्नाला शाश्वत बाजारपेठ देणार : योगगुरू रामदेव महाराज



ना.मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात  चंद्रपूर जिल्हयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा

चंद्रपूर दि 20 फेबुवारी : पतंजलीच्या विविध विक्री केंद्रातून चंद्रपूर जिल्हयातील दर्जेदार तांदुळ विकल्या जातील. तसेच पतंजलीला आवश्यक असणाऱ्या विविध वनौषधी शेतकऱ्यांनी शेतात घेतल्या तर या कंपनीमार्फत चंद्रपूर जिल्हा व परिसरातील वनौषधी व खाद्यान्नाला शाश्वत बाजारपेठ उपलब्ध केली जाईल, असे आश्वासन योगगुरू आणि पतंजलीच्या माध्यमातून कोट्यवधींचा उद्योग उभारणारे बाबा रामदेव महाराज यांनी आज येथे दिले.
बाबा रामदेव महाराज यांच्या सोबत जिल्हयातील शीर्ष अधिकाऱ्याशी मंगळवारी शेतकरी मेळाव्या पूर्वी चर्चा झाली. पुढील महिन्यात 2 मार्चला या संदर्भात पंतजलीच्या मुख्यालयात चर्चा होणार आहे. आपल्या पुढील 3 दिवसाच्या वास्तव्यात हे खाद्यान्न व वनौषधीची तपासणी देखील बाबा रामदेव यांच्या नेतृत्वातील चमू करणार आहे. या बैठकीमुळे शाश्वत बाजारपेठच्या  मुदयावर यशस्वी तोडगा निघण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
       या बैठकीला पालकमंत्र्यासह केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहीरखासदार अशोक नेतेवनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेलजिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळेजिल्हाधिकारी आशुतोष सलिलमुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर,ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे संचालक तथा मुख्य वनसंरक्षक मुकूल त्रिवेदीमुख्य वनसंरक्षक विजय शेळकेउपसंचालक (बफर) गजेंद्र नरवणेउपवनसंक्षक गजेंद्र हिरेजिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ.अण्णासाहेब हसनाबादेप्रकल्प संचालक (आत्मा)डॉ.विद्या मानकरजिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी एस.एस.किरवेउपविभागीय कृषी अधिकारी नंदकुमार घोडमारे यांची उपस्थिती. ही बैठक मूल येथील अजय गोगुलवार यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती.
            बैठकीमध्ये अधिका-यांनी वनपरिसरात व शेतीमध्ये होणा-या पिकांची व वनऔषधीची माहिती या वेळेस दिली. चंद्रपूर जिल्हयामध्ये हजारो शेतकरी सेंद्रीय पध्दतीने धानाचे उत्पादन घेतात. सेंद्रीय तांदुळ विषमुक्त तांदुळ म्हणून प्रयोग शाळेने मान्यता दिली आहे. त्यामुळे या तांदळाची विक्री पतंजलीमार्फत करण्यात यावीअशी मागणी कृषी विभागाच्या अधिका-यांनी यावेळी केली. पतंजलीव्दारे किमान आधारभूत किंमत ठरविण्यात यावी. शेतक-यांना सेंद्रीय धानाचे उत्पादन घेण्याबाबत सांगण्यात येईलअसे अधिका-यांनी स्पष्ट केले.
            यावेळी वनविभागाच्या अधिका-यांनी अर्जूनसालमोहाफूलकोरफळ (अलवेरा)सेंद्रीय हळदमोहा सरबतमोहा जामसफेद मुसळी आदी वनऔषधी पासून तयार करण्यात आलेल्या उत्पन्नाबाबत माहिती दिली. यावेळी पूजेच्या सामानामध्ये अगरबत्तीसाठी चंद्रपूर व गडचिरोली परिसरातील बांबूला प्राधान्य देण्याचा प्रस्तावही वनविभागाच्या अधिका-यांनी ठेवला आहे. रामदेव महाराज यांनी यावेळी अधिका-यांच्या प्रस्तावाचे स्वागत केले असून कोरफळ (अलवेरा) व मध याबाबतच्या कराराला तात्काळ मुर्तस्वरुप दिले जाईलअसे आश्वासन दिले. तथापिपुढील दोन दिवसात रामदेव महाराज यांच्या सोबत आलेल्या तज्ज्ञाच्या चमू व स्वत: रामदेव महाराज सर्व वनौषधी व वनापासून बनविलेल्या खाद्यांची स्वत: तपासणी करणार आहेत. त्यांनी यावेळी मध खरेदीसाठी आपण आजच तयार असून याबाबतची यंत्रणा जिल्हयात उभी करण्याची सूचना वित्तनियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार  यांनी केली. या बैठकीमध्ये आलेल्या विविध प्रस्तावावर पुढील महिन्याच्या 2 ताखरेला पतजंलीच्या मुख्य कार्यालयात बैठक होणार असून यामध्ये निर्णय घेतले जाणार आहे.
                                                                        0000

Sunday 11 February 2018

जिल्‍हयातील तरूणांसाठी मोठया प्रमाणावर रोजगाराच्‍या संधी उपलब्‍ध करणे हेच आपले ध्‍येय – सुधीर मुनगंटीवार






बल्‍लारपूर येथे डायमंड कटींग प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन संपन्‍न
दरवर्षी 1 हजार तरुणांना प्रशिक्षण व रोजगाराची हमी

चंद्रपूर, दि.11 फेब्रुवारी- चंद्रपूर जिल्‍हयातील तरूणांना मोठया प्रमाणावर रोजगार उपलब्‍ध करणे ही आपली प्राथमिकता आहे. त्‍यादृष्‍टीने रोजगाराभिमुख विविध उपक्रम आपण सुरू करीत आहोत. बल्‍लारपुरात डायमंड कटींग प्रशिक्षण केंद्राच्‍या माध्‍यमातून दर महिन्‍याला प्रशिक्षणार्थ्याला 20 हजारावर रोजगार देण्‍याचा व तीन वर्षात 3 हजार तरूण त्‍या माध्‍यमातून प्रशिक्षीत करण्‍याचा आमचा मानस आहे. प्रतीवर्ष 1 हजार तरूण या प्रशिक्षण केंद्रातून बाहेर पडतील. या आधीही पोंभूर्णा आणि आगरझरी या ठिकाणी अगरबत्‍ती प्रकल्‍प आम्‍ही सुरू केला आहे. तैवान सरकारच्‍या सहकार्याने टूथपीक निर्मीतीचा कारखाना तयार करण्‍यासाठी करार करण्‍यात आला आहे. या जिल्‍हयात तरूणांसाठी रोजगाराच्‍या मोठया प्रमाणावर संधी उपलब्‍ध करून देत या जिल्‍हयाला विकासाच्‍या मार्गावर अग्रेसर करणे हेच आपले ध्‍येय असल्‍याचे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूरचे जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
दिनांक 11 फेब्रुवारी रोजी बल्‍लारपूर येथे डायमंड कटींग प्रशिक्षण केंद्राच्‍या उदघाटन समारंभात वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. ते पुढे म्‍हणालेतरूणांसाठी आर्थिक स्‍वातंत्र्याच्‍या अभियानाला सुरूवात आम्‍ही या जिल्‍हयात केली आहे. चांदा ते बांदा हा उपक्रम रोजगाराभिमुख आहे. याचे कौतुक निती आयोगाने सुध्‍दा केले आहे. चंद्रपूर जिल्‍हयात राजूरा येथे विमानतळ विकासासाठी 1200 एकर जागा उपलब्‍ध झाली आहे. बल्‍लारपूर येथे पोलिस प्रशिक्षण केंद्र सुध्‍दा सुरू होणार आहे. हिंगणघाटचे श्री.मोहता यांच्‍या मदतीने बल्‍लारपूर येथे महिलांना कापड निर्मीती  करण्याचे प्रशिक्षण व त्यांना रोजगार देण्याचा करार करण्यात आला आहे.
यावेळी मंचावर महाराष्‍ट्र वनविकास महामंडळाचे अध्‍यक्ष चंदनसिंह चंदेलबल्‍लारपूरचे नगराध्‍यक्ष हरीश शर्माउपाध्‍यक्षा सौ. मिना चौधरीमाजी आमदार जैनुद्दीन जव्‍हेरीशिवचंद व्‍दीवेदीभय्याजी येरमेसौ. रेणुका दुधेएन.डी. जेम्‍स या संस्‍थेचे प्रमुख निलेश गुल्‍हाने आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती. प्रास्‍ताविक जिल्हा कौशल्य विकास अधिकारी भय्याजी येरमे यांनी केले.  यावेळी आपल्‍या मनोगतात बोलताना निलेश गुल्‍हाने म्‍हणालेडायमंड उद्योगामध्‍ये मी गेले 15 वर्षे काम करीत आहे. डायमंड कटींग प्रशिक्षण केंद्र उभे करण्‍याची माझी तिव्र इच्‍छा होती.  सूरत, मुंबईमध्ये हि-यांचे व्यापारी मोठया संख्येने आहेत. मात्र त्यांना प्रशिक्षित तरुण मिळत नाही. रोजगारांची 100 टक्के हमी असून किमान 20 हजार रुपये रोजगार मिळू शकतो.  सुधीरभाऊंनी या प्रक्रियेत मला दिलेल्‍या पाठींब्‍यामुळे व सहकार्यामुळे हे केंद्र उभे राहू शकले. महाराष्‍ट्र राज्‍य कौशल्‍य विकास सोसायटी अंतर्गत प्रमोद महाजन कौशल्‍य व उद्योजकता विकास अभियानाअंतर्गत सदर केंद्राचे उद्घाटन आकाश लिडबेस्‍वप्‍नील पेंढारकरसचिन वासेकरविक्‍की उडाणे या विद्यार्थ्‍यांचे हस्‍ते करण्‍यात आले. सदर डायमंड प्रशिक्षण केंद्र हे दादाभाई नौरोजी वार्डातील दादाभाई पॉटरीज येथे आहे.
यावेळी बोलताना बल्‍लारपूरचे नगराध्‍यक्ष हरीश शर्मा म्‍हणालेगेल्‍या तीन वर्षात 138 कोटीहून अधीक निधी बल्‍लारपूरच्‍या विकासासाठी सुधीरभाऊंनी खेचून आणला आहे. आरोग्‍य सेवा बळकट करण्‍यावर त्‍यांनी प्रामुख्‍याने बळ दिले आहे. त्‍यांनी आणलेली प्रत्‍येक योजना महत्‍वपूर्ण असून रोजगार निर्मीतीच्‍या दृष्‍टीने आपले महत्‍व अधोरेखित करणारी आहे. पायाभूत सुविधाआरोग्‍यरोजगारशिक्षण या घटनकांवर लक्ष्‍य केंद्रीत करत सुधीरभाऊंनी या जिल्‍हयाला प्रगतीच्‍या मार्गावर अग्रेसर केल्‍याचे ते म्हणाले. वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल यांनी सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेल्या या पुढाकाराचे कौतुक केले. सूरत, मुंबई येथे या ठिकाणी प्रशिक्षण घेतलेल्या मुलांना नोकरी मिळणार आहे. तथापि, सुधीरभाऊंनी मनावर घेतले तर काही ही-याचे व्यापारी चंद्रपूर व बल्लारपूरमध्ये येऊ शकतात, त्यासाठी प्रयत्न करावे.  कार्यक्रमाला बल्‍लारपूर श्‍हारातील नागरिकांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे संचालन काशिनाथ सिंग यांनी केले तर आभार स्वप्ना पंचलवार यांनी मानले.

डायमंड कटींग आणि प्रोसेसींग नेमके काय आहे ?
डायमंड कटींग आणि प्रोसेसींग याबाबतचे रहिवासी प्रशिक्षण 4 महिन्‍यात देण्‍यात येणार आहे. या प्रशिक्षणादरम्‍यान भोजन व निवास व्‍यवस्‍था निःशुल्‍क आहे. एन.डी. जेम्‍स ही कंपनी मुलांना हि-यांना पैलू पाडण्‍याचे प्रशिक्षण देणार आहे. सोबतच या ठिकाणी प्रशिक्षण घेतल्यानंतर सुरत तसेच मुंबई येथे रोजगार देण्‍याची हमी सुध्‍दा देणार आहे. पुढील तीन वर्षात 3 हजार मुलांना प्रशिक्षण व रोजगार देण्‍याचे निश्चित करण्‍यात आले आहे. महाराष्‍ट्रात अशा प्रकारे हमी देवून प्रशिक्षण देणारा हा पहिलाच प्रयोग आहे.  या प्रशिक्षणासाठी जिल्हा कौशल्य विकास विभागाकडून उमेदवार पाठविण्यात येते. या प्रशिक्षणाच्या निवडीसाठी सुशिक्षित बेरोजगारांनी जिल्हा कौशल्य विकास विभागांशी संपर्क साधावा.
                                                                000

Saturday 10 February 2018

ताडोबा हे पर्यावरणाचे चालते बोलते विद्यापीठ करणार- ना.मुनगंटीवार





आगरझरी येथील देखण्या बटरफ्लाय वर्ल्डचे लोकार्पण

       चंद्रपूर, दि.10 फेब्रुवारी- मुबलक पराक्रमी वाघ, शेकडो अन्य वन्यजीव, विपूल वनसंपदा, पक्षांच्या शेकडो प्रजाती आणि आयुष्यावर प्रेम करायला शिकविणारे मनमोहक फुलपाखरांचे जग ताडोबातून परत जाणा-या प्रत्येक पर्यटकाला आपण पर्यावरणाचे देणे लागतो, हे निश्चितच शिकवेल. त्यामुळे येणा-या काळात ताडोबा हे आपल्या विविध पर्यावरणपूरक उपक्रमातून पर्यावरणाचे चालते बोलते विद्यापीठ म्हणून पुढे येईल, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले.
            ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातंर्गत आगरझरी येथे उभारण्यात आलेल्या बहुरंगी बटरफ्लाय वर्ल्डचे त्यांनी आज लोकार्पण केले. या लोकार्पण सोहळयानंतर फुलपाखरांमध्ये रमलेल्या जंगला शेजारील शाळांमधील विद्यार्थ्यांना व पर्यावरण प्रेमींना संबोधित करतांना त्यांनी ताडोबा येथील पराक्रमी वाघांच्या उपलब्धते सोबतच विविध माहितीपूर्ण प्रकल्पांनी नव्या स्वरुपात पर्यटकांपुढे लवकरच येईल, असे सूतोवाच केले. पुढच्या दोन वर्षात ताडोबा पर्यटनाच्या नकाशावरील पहिल्या पसंतीचे स्थळ असेल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.  आज आगरझरीच्या बटरफ्लाय वर्ल्डचा लोकार्पण सोहळा संपन्न झाल्यानंतर त्यांनी या प्रकल्पामुळे ज्या गावांना रोजगार मिळत आहे. त्या गावांच्या नागरिकासोबत संवाद साधला. चंद्रपूरमध्ये एखादा उद्योगपती जितका रोजगार निर्माण करु शकत नाही. तितका मोठा रोजगार पराक्रमी वाघांमुळे मिळत आहे. यामध्ये उत्तरोत्तर वाढच होईल. त्यासाठीच आगरझरी व परिसरात येत्या काळामध्ये वाघ बघायला येणा-या पर्यटकांना मोठया प्रमाणात पर्यावरणाचे धडे देणारे, पर्यावरणावर प्रेम करायला शिकवणारे आणि पर्यावरणाबद्दल शिक्षित करणारे अनेक प्रकल्प बघायला मिळतील, असे स्पष्ट केले.
            फुलपाखरु प्रत्येकाच्या लहानातील आकर्षण असते आणि ते कधीच संपत नाही. अगदी 14 दिवसांचे जिवनक्रम असणारे फुलपाखरु देखील जगाला आनंदाने जगण्याचे संदेश देवून जाते. या ठिकाणी वन विभाग हजारो फुलपाखरांना जनतेसाठी उपलब्ध करणार आहे. हे फुलपाखरु उद्यान व त्याच्या शेजारी बनणारे माहिती केंद्र यापूर्वी उभारण्यात आलेले विद्यार्थ्यांसाठीचे प्रशिक्षण केंद्र येथे येणा-या पर्यटकाला निश्चितच आवडेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.  पर्यटनातून स्थानिकांना रोजगार देण्याचे काम करीत असून चंद्रपूर जिल्हयाची ओळख पर्यटनावर आधारीत रोजगार निर्मितीचा जिल्हा म्हणून व्हावी. हा आपला ध्यास असून त्यासाठीच ताडोबाच्या विकासाकडे विशेष लक्ष देत असल्याचे त्यांनी सांगितले.
          या कार्यक्रमाला पदमापूर, आगरझरी, अडेगांव, उडीयाटोला, मोहर्ली या शाळेचे विद्यार्थी मोठया संख्येने आले होते. या विद्यार्थ्यांनी पालकमंत्र्यांसोबत बटरफ्लाय वर्ल्डची पाहणी केली. त्यांच्यासोबत फोटोही काढला. यावेळी पालकमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या पालकाच्या भूमीकेत येत त्यांच्या अभ्यासाचीही चौकशी केली. नवीन फुलपाखरांचे उद्यान आवडल्याची पावती यावेळी विद्यार्थ्यांनी दिली. लहान मुलांना आवडेल अशा पध्दतीची मांडणी या ठिकाणी करण्यात आली असून  या फुलपाखरु पार्कमध्ये फुलपाखरांबद्दलच्या अनेक प्रजाती बघायला मिळणार आहेतफुलपाखरांच्या जीवनपटाची शास्त्रीय माहितीचा खजीना उपलब्ध करण्यात आला आहे. काचेच्या घरांमध्ये फुलपाखरांचा मुक्त विहार, लहान मुलांना खेळण्यासाठी विपूल जागा, विविध कारंजी व लटकतेपुल, मचान सवारी अशा अनेक पर्यटनाच्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे हा संपूर्ण प्रकल्प स्थानिक गावक-यांकडून चालविल्या जाणार आहे. नागरिकांनी या नव्या प्रकल्पाला भेट दयावी, असे आवाहन ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामार्फत करण्यात आले आहे. आज झालेल्या लोकार्पण सोहळयाच्या व्यासपीठावर पालकमंत्र्यांसोबत वन‍ विकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, मनपा स्थाई समितीचे सभापती राहुल पावडे, जिल्हा परिषदेचे सभापती ब्रिजभुषण पाझारे, वनविकास महामंडळाचे व्यवस्थापक उमेश अग्रवाल, मुख्य वनसंरक्षक मुकूल त्रिवेदी, ताडोबा प्रकल्पाचे उपसंचालक गजेंद्र नरवणे, डॉ.किशोर मानकर आदी उपस्थित होते. यावेळी उपविभागीय वनअधिकारी श्री.शिंदे व त्यांच्या सहका-यांचा उत्कृष्ट कार्यासाठी सत्कार करण्यात आला.
                                                            0000 

दुग्ध उत्पादनात धवलक्रांती घडविण्याची चंद्रपूरला उत्तम संधी- ना.हंसराज अहीर


मन झोकून काम करण्याचे अधिका-यांना आवाहन

            चंदंद्रपूर, दि.10 फेब्रुवारी- केंद्र व राज्यातील सहभागी असणा-या सर्व सत्ताधा-यांना विदर्भामध्ये शेतक-याच्या परिस्थितीत बदल घडविण्यासाठी शेतीवर आधारीत उद्योग वाढावे, असे वाटते. त्यामुळेच मदरडेअरी सारखी यंत्रणा चंद्रपूरमध्ये दाखल झाली असून दुग्ध उत्पादनात क्रांती करण्याची ही एकमेव संधी समजून झोकून देत अधिका-यांनी काम करावे, असे आवाहन केद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आज येथे केले. शासकीय विश्रामगृहामध्ये आज आयोजित मदर डेअरीचे अधिकारी, दुध संकलन केंद्र संचालक यांच्या बैठकीत त्यांनी जिल्हयात सुरु असलेल्या मदर डेअरीच्या उपक्रमाचा आढावा घेतला. सद्या 15 हजार लिटर दुध संकलनाचे काम जिल्हयात सुरु असून यामध्ये उतरोत्तर वाढ करण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.
            यावेळी त्यांनी मदर डेअरी व दुध उत्पादक संकलन केंद्राच्या संचालकांच्या समस्या जाणून घेतल्या. खाजगीरित्या गायी खरेदी करण्यासाठी अनेक कुटूंबांना प्रोत्साहीत करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले. यासाठी इन्सुरन्स कंपनीनी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.  उत्तम प्रतीच्या दुधाळू जनावरांची उपलब्धता जिल्हयात होईल, यासाठी पशुसंवर्धन विभागाने लक्ष वेधावे, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हयामध्ये दुधाळू जनावरांच्या संदर्भातील शासकीय योजना लोकापर्यंत पोहचतील पशुधन मोठया प्रमाणात विविध शासकीय योजनेमधून उपलब्ध होईल. यासाठी पशुसंवर्धन विभागाने प्रयत्न करावे, असेही त्यांनी सांगितले. दुधात फॅट कमी असण्याबाबत यावेळी चर्चा उपस्थित झाली. यावेळी अहीर यांनी पशुवैद्यकीय अधिका-यांनी उपलब्ध पशुधनाच्या आरोग्य व दुध वाढीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात यावे. तसेच उत्तम दर्जाचा चारा उत्पादनाबाबत शेतक-यांना गती दयायला सांगण्याचे स्पष्ट केले.
            जिल्हयामध्ये दुग्ध व्यवसाय करण्यास इच्छूक असणा-या शेतकरी कुटूंबांना मुद्रा योजनेमधून कर्ज उपलब्ध करुन देण्याबाबत त्यांनी जिल्हा अग्रणी बँकेच्या अधिका-यांनी सांगितले. केंद्र शासनाच्या मुद्रा योजनामध्ये महाराष्ट्राने आघाडी घेतली असून चंद्रपूर जिल्हयामध्ये सर्वाधिक कर्ज उपलब्ध करुन देण्याच्या विक्रमाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सर्व बँकांनी याबाबतीत कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करावे. तसेच ज्या ठिकाणी महिलांकडून कर्जाची मागणी झाली. त्या ठिकाणी प्राधान्याने त्यांना कर्ज उपलब्ध करुन दयावे. दुध उत्पादनातील बँकांच्या कर्जाला निश्चितच परतफेड मोठया प्रमाणात मिळेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.  
            यावेळी त्यांनी मदर डेअरीमुळे दुध उत्पादनात वाढ झाल्याबद्दल कौतुकही केले.
            यावेळी महानगरपालिकेचे उपमहापौर अनिल फुलझेले, जिल्हा परिषद सभापती अर्चना जिवतोडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक झा, नाबार्डचे टाले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी देशपांडे, विजय राऊत, राजू घरोटे, पाटील उपस्थित होते.       
                                                             0000

Thursday 8 February 2018

ना.सुधीर मुनगंटीवार यांचा दौरा कार्यक्रम


 चंद्रपूर, दि.8 फेब्रुवारी- राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार हे 10 व 11 फेब्रुवारी  2018 रोजी चंद्रपूर जिल्हयाच्या दौ-यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
            10 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.45 वाजता नागपूर येथून चंद्रपूरकडे प्रयाण करुन चंद्रपूर येथे दुपारी 12.15 वाजता आगमन व राखीव. दुपारी 3 वाजता आगरझरी येथील बटरफ्लाय उद्यान उदघाटन समारंभास उपस्थिती. त्यानंतर सायं.5.30 वाजता भारतरत्न डॉ.एपीचे अब्दुल कलाम उद्यान चंद्रपूर येथे चंद्रपूर शहर अंतर्गत रस्त्यांवरील स्ट्रीट लाईटचे लोकार्पण.  सायं.7.30 वाजता घुग्गुस येथे पालकमंत्री चषक कार्यक्रमास उपस्थित राहून चंद्रपूर येथे मुक्काम राहणार आहे.
            तर 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता इंदिरा नगर येथे संकल्प संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनाल चंद्रपूर येथे रामदेव बाबा यांच्या कार्यक्रमाबाबत कोअर टिमच्या बैठकीस उपस्थित. त्यानंतर दुपारी 3 ते 5 या वेळात श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनाल चंद्रपूर येथे रामदेव बाबा यांच्या कार्यक्रमाच्या व्यवस्थेबाबत बैठकीस उपस्थित राहून सायं.5.30 वाजता नागपूरकडे प्रयाण करतील.
                                                                        000