Search This Blog

Monday 31 October 2022

वन्यजीवांमधील आजाराचे जागतिक दर्जाचे संशोधन नागपूरमध्ये व्हावे -सुधीर मुनगंटीवार




              वन्यजीवांमधील आजाराचे जागतिक दर्जाचे संशोधन

                    नागपूरमध्ये व्हावे -सुधीर मुनगंटीवार

नागपूर दि. ३१ : जगामध्ये मोठ्या प्रमाणात प्राण्यांपासून मनुष्यांमध्ये जाणारे आजार वाढत आहे. कोरोना सारख्या आजाराने त्याची दृश्य भयानकता जगाला दाखवली आहे त्यामुळे वेळीच प्रतिबंध करण्यासाठी जागतिक दर्जाचे या संदर्भातील संशोधन नागपुरात व्हावे, अशा शुभेच्छा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे दिल्या.

नागपूर (गोरेवाडा) येथील वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्रात संशोधन प्रकल्पाचे उद्घाटन वनमंत्र्यांच्याहस्ते करण्यात आले. ईशान्य भारतासह अन्य भागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील या संशोधन केंद्राचे उद्घाटन आज त्यांनी केले. यावेळी संबोधित करताना त्यांनी जागतिक दर्जाचे संशोधन या ठिकाणी होण्याची अपेक्षा व्यक्त केली.

नागपूर हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण असून या ठिकाणच्या वन्यजीव संशोधन केंद्रात होत असलेले हे संशोधन महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. वन्यजीवांपासून माणसांमध्ये येणाऱ्या आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आता मनुष्याचे आणि प्राण्यांचे वेगळे आरोग्य न बघता दोघांचेही एकच आरोग्य अशा पद्धतीने याकडे बघणे आवश्यक आहे. त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यालाच अधिक महत्त्व देणे गरजेचे आहे. मात्र या संशोधन क्षेत्रात भारताची भरारी अजून बाकी आहे. ही जबाबदारी आता नागपूरच्या केंद्राने घ्यावीयासाठी निधीची कमतरता पडणार नाहीया संशोधन केंद्राच्या सर्व अडचणी दूर करण्यात येतीलअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी भंडारा -गोंदीयाचे खासदार सुनील मेंढे,माफसुचे कुलगुरु डॉ.आशिष पातूरकरवन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक डॉ.एस.व्ही. उपाध्येप्रकल्पाचे सल्लागार डॉ. अरुण कुमार रावतवनविकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विकास गुप्तामुख्य वन्य संरक्षक वाय एल पी रावआदींची यावेळी उपस्थिती होती.

000    

विदर्भातील मत्सव्यवसाय रोजगाराभिमुख करणार : मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार



             विदर्भातील मत्सव्यवसाय रोजगाराभिमुख करणार                   

                  : मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार

             जिल्हाधिकारीसिईओ व तज्ज्ञांसोबत 'माफसूमध्ये बैठक

     नागपूर दि. 31 : विदर्भात रोजगार निर्मितीच्यादृष्टीने मत्सव्यवसायाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. जिल्हाधिकारीमुख्य कार्यकारी अधिकारी, 'माफसू 'यांनी त्या पद्धतीने कामाची दिशा ठरवून आराखडे तयार करावेत व मत्सव्यवसायाकडे बघावे ,अशी सूचना पशू व मत्स्य विद्यापीठ नागपूर येथे आयोजित बैठकीत राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य  मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केली.

विदर्भातील मत्स्यव्यवसाय विकास आणि गोड्या पाण्यातील मत्स्यपालन या विषयाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. यावेळी भंडारा -गोंदीयाचे खासदार सुनील मेंढे,माफसुचे कुलगुरु डॉ.आशिष पातूरकरपशुसंवर्धन आयुक्त एस.पी. सिंगमत्स्यव्यवसाय आयुक्त शीतल उगले,यांच्यासह पूर्व विदर्भातील वर्धा वगळता नागपूर जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकरचंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडागोंदियाच्या जिल्हाधिकारी नयना गुंडेभंडाराचे जिल्हाधिकारी विनयकुमार मून,गडचिरोली जिल्हाधिकारी संजय मिनानागपूर जिल्हा परिषदेचे सिईओ योगेश कुंभेजकरगोंदियाचे अनील पाटीलगडचिरोलीचे कुमार आशीर्वादचंद्रपूरचे विवेक जान्सनमत्स्य व्यवसायातील संशोधकतज्ञ व अधिकारी उपस्थित होते.

नागपूर विभागातील नागपूर ,भंडाराचंद्रपूरगोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये असणाऱ्या गोड्या पाण्याच्या विपुल जलसाठ्यांमध्ये मासेमारीला प्रोत्साहन देण्यासाठी अधिनियम तयार करणेकेंद्र शासनाच्या भारतीय कृषी अनुसंधान परिषद - केंद्रीय गोडेपाणी मत्स्यसंवर्धन संस्था(आयसीएआर -सीआयएफए )चे एक प्रादेशिक केंद्र चंद्रपूर येथे स्थापन करणेविदर्भ मत्स्य विकास आराखडा तयार करणेगडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथे पशुधन प्रजनन केंद्र विकसित करणे,आदी विषयांसाठी आज महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरच्या सभागृहात वरिष्ठ पातळीवर विचारमंथन झाले.

मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील सुधारणा आणि विकासासाठी विदर्भ प्रदेशात मत्स्यबीज उत्पादनासाठी क्लस्टर म्हणून विकसित केला जाऊ शकतो.येथील विपुल जलसंपत्तीमुळे राज्यांमध्ये अंतर्गत मत्स्य व्यवसाय विकसित करण्यास भरपूर वाव असल्याचे प्रतिपादन श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी त्यांनी केले.

यासाठी भारतीय कृषी अनुसंधान परिषद - केंद्रीय गोडेपाणी मत्स्यसंवर्धन संस्था (आयसीएआर -सीआयएफए) चे एक प्रादेशिक केंद्र चंद्रपूर येथे स्थापन करण्याबाबतची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात येत आहे. गोड्या पाण्यातील मत्स्यपालन संशोधन प्रशिक्षण आणि विस्तारासाठी ही एक प्रमुख संस्था आहे. सध्या कौशल्य गंगा (भुवनेश्वर)रहाराह (पश्चिम बंगाल) आनंद (गुजरात)विजयवाडा (आंध्र प्रदेश)बंगलोर (कर्नाटक)कल्याणी (पश्चिम बंगाल ) येथे प्रादेशिक केंद्र आहेत. याच प्रमाणे महाराष्ट्रात चंद्रपूर येथे हे केंद्र उभारणे आवश्यक आहे. यासाठी भारतीय कृषी अनुसंधान परिषद व केंद्रीय गोडेपाणी,मत्स्यसंवर्धन संस्थेला विनंती करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

या केंद्रामुळे राज्यातील गोड्या पाण्यातील मत्स्य पालन वेगाने वाढेल व त्या संदर्भातील प्रशिक्षण व तंत्रज्ञान या भागातील मत्स्यव्यवसायिकांना उपलब्ध होतील,असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी विदर्भ मत्स्य विकास आराखडा तयार करण्याबाबतच्या सूचनाही केल्या. महाराष्ट्र राज्याच्या एकूण भूजलयीय मस्त उत्पादनामध्ये विदर्भाचा वाटा 46 टक्के आहे. पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणात गाव तलावमालगुजारी तलावतळीजलाशयउपलब्ध आहेत. त्यामुळे विदर्भातील मत्स्य विकास आराखडा तयार करणे आवश्यक असून त्यातून हमीयुक्त रोजगार निर्मिती झाली पाहिजे असेप्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

   राज्यामध्ये सध्या समुद्रातील मासेमारीशी संबंधित भारतीय मत्स्य पालन अधिनियम 1897 वर आधारित सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 हा कायदा अस्तित्वात आहे. मात्र यामध्ये भूजल मत्स्यव्यवसाय संदर्भात तरतुदी नाहीत. त्यासाठी महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 च्या धरतीवर गोड्या पाण्यातील मासेमारी अधिनियम तयार करण्याबाबतच्या सूचना त्यांनी विद्यापीठाला केल्या. या सुधारणांमधून मत्स्य व्यवसायाला व्यावसायिक दर्जासुरक्षितता प्राप्त होईल याकडे लक्ष देण्याचे त्यांनी सांगितले.

    गडचिरोली जिल्ह्यामध्ये श्वेतक्रांती आणण्यासाठी वडसा येथील प्रकल्पाचा उपयोग झाला पाहिजे. त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची जुळवणी करणे. मदर डेअरीच्या अधिपत्यात हा जिल्हा आणणेत्यासाठी निधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

      यावेळी उपस्थित जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी वेगवेगळ्या स्तरावर अभ्यासगटाची स्थापना करणेविदर्भातील जलसाठ्यांचा सर्वंकष अभ्यास करणेजलसाठांच्या बाजूला मत्स्य व्यवसायासाठी जागा उपलब्ध करणेनागपूरमध्ये वेगळे मच्छीमार मार्केट तयार करणेमोठ्या सिंचन प्रकल्पावर मच्छीमारांसाठी पायाभूत सुविधा उभारणेमालगुजारी तलाव आणि मासेमारी सांगड घालणेलिलाव करताना जिल्हाधिकाऱ्यांचा सहभाग अधिक मध्यवर्ती करणेसमृद्धी महामार्गाला लक्षात घेऊन निर्यात युनिट तयार करणेशेतकऱ्यांना पूरक नव्हे तर पर्यायी व्यवसाय म्हणून मत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन देणेछोटी संकलन केंद्र व स्टोरेज केंद्र तयार करणेआदी सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांना केल्या.

000

 

निवृत्तीवेतन धारकांनी हयात असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे

 

         निवृत्तीवेतन धारकांनी हयात असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे

चंद्रपूर, दि. 31 ऑक्टोबर : चंद्रपूर कोषागाराअंतर्गत बँकेद्वारे निवृत्तीवेतन घेणा-या सर्व निवृत्तीवेतन धारकांची, दिनांक 1 नोव्हेंबर 2022 रोजी हयात असल्याच्या प्रमाणपत्राची यादी बँकांना पाठविण्यात आली आहे. त्यामुळे निवृत्तीवेतन धारकांनी 30 नोव्हेंबर 2022 पूर्वी बँकेत स्वत: उपस्थित राहून आपल्या नावाच्या समोरील रकान्यात मोबाईल क्रमांक, पॅन क्रमांक, आधारकार्ड क्रमांक नमूद करून स्वाक्षरी करावयाची आहे. जेणेकरून हयात असल्याचे प्रमाणपत्राची यादी कोषागार कार्यालयाला वेळीच प्राप्त होईल व त्यांचे माहे डिसेंबर 2022 पासूनचे निवृत्तीवेतन बँकेकडे वेळीच पाठविता येईल.

तसेच जे निवृत्तीवेतन धारक मनिऑर्डरद्वारा निवृत्ती वेतन घेतात, त्यांनी आपले हयात प्रमाणपत्र राजपत्रित अधिका-यांकडून प्रमाणित करून 30 नोव्हेंबरपर्यंत कोषागार कार्यालयाला पाठवावे. हयात प्रमाणपत्र 5 डिसेंबर 2022 पर्यंत प्राप्त न झाल्यास त्यांचे माहे डिसेंबर 2022 पासूनचे निवृत्तीवेतन बँकेकडे पाठविले जाणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे कोषागार अधिकारी प्रफुल वडेट्टीवार यांनी कळविले आहे.

०००००००

आदिवासी उमेदवारांकरीता स्पर्धा परिक्षेच्या तयारीबाबत प्रशिक्षण सत्र

       

        आदिवासी उमेदवारांकरीता स्पर्धा परिक्षेच्या तयारीबाबत प्रशिक्षण सत्र

Ø 21 नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 31 ऑक्टोबर : वर्ग – 3 व वर्ग – 4 पदांसाठी घेतल्या जाणा-या स्पर्धा परिक्षेची, आदिवासी उमेदवारांकडून तयारी करून घेण्याकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्राच्या वतीने साडेतीन महिन्यांचे स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले आहे. 1 डिसेंबर 2022 ते 15 मार्च 2023 या कालावधीत होणा-या प्रशिक्षण सत्राकरीता अनुसूचित जमातीतील आदिवासी उमेदवारांनी 21 नोव्हेंबर 2022 पर्यंत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय भवन, पहिला माळा, हॉल क्र. 19, चंद्रपूर येथे अर्ज सादर करावे, असे आवाहन रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी भाग्यश्री वाघमारे यांनी केले आहे.

प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना दरमहा एक हजार रुपये विद्यावेतन देय राहील. अनुसूचित जमातीच्या (एस.टी.) प्रवर्गातील आदिवासी उमेदवारांनी सदर अर्जामध्ये स्वत:चे संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक, जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता, प्रवर्ग (जात), तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर यांचा नोंदणी क्रमांक आदींचा उल्लेख करावा. अर्ज करण्याकरीता एम्प्लॉयमेंट कार्ड असणे आवश्यक आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 21 नोव्हेंबर 2022 असून 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. निवड यादी त्याच दिवशी सायंकाळी प्रसिध्द करण्यात येईल.

प्रशिक्षणाच्या अटी : उमेदवार अनुसूचित जमाती (एस.टी.) (आदिवासी) प्रवर्गातील असावा. उमेदवाराचे किमान वय 18 ते 38 दरम्यानचे असावे. उमेदवार किमान एच.एस.एस.सी परीक्षा उत्तीर्ण असावा. उमेदवाराचे नाव, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर येथे नोंदणी केलेले असावे.

आवश्यक कागदपत्रे : शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला किंवा जात वैधता प्रमाणपत्र, गुणपत्रिका (एस.एस.सी / एच.एस.एस.सी / पदवी), आधारकार्ड, जिल्हा कौशल्य विकास विभागाचे नोंदणी कार्ड.

००००००००

Friday 28 October 2022

रस्ता सुरक्षा विषयक गुणात्मक कामगिरीबाबत परिवहन आयुक्तांनी घेतला आढावा





 रस्ता सुरक्षा विषयक गुणात्मक कामगिरीबाबत परिवहन आयुक्तांनी घेतला आढावा

Ø दैनंदिन प्रशासकीय कामकाजाबाबत ही सूचना

चंद्रपूर, दि. 28 ऑक्टोबर : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूर येथे राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांच्या अध्यक्षतेखाली दि.27 ऑक्टोबर रोजी नागपूर परिवहन विभागातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. सदर बैठकीत मुख्यत्वे परिवहन विभागातील दैनंदिन प्रशासकीय कामकाज व रस्ता सुरक्षा विषयक गुणात्मक कामगिरी या दोन बाबींवर प्रकाश टाकण्यात आला.

बैठकीला नागपूर(शहर/ग्रामीण)प्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भुयार, गडचिरोलीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजयसिंह चव्हाण, भंडाऱ्याचे राजेंद्र वर्मा, चंद्रपूरचे किरण मोरे, गोंदियाचे राजवर्धन करपे, वर्धाचे समीर शेख आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

 राज्यात परिवहन विभागातील प्रशासकीय कामकाज गतिमान, सुलभ व पारदर्शक करण्याच्या उद्देशाने बहुतांश सेवा ऑनलाईन झाल्या आहेत. सदर ऑनलाईन सेवांबाबत सेवेचे लाभार्थी म्हणजेच अर्जदार यांच्याकडून समाधानकारक प्रतिसाद साध्य होतो की नाही यांची प्रत्यक्ष परिणामकारकता तपासण्याविषयी निर्देश, त्यासोबतच सेवा हमी कायद्याअंतर्गत 14 सेवांचा आढावा घेऊन कोणतेही अर्ज प्रलंबित राहणार नाही याविषयीच्या सूचना परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी दिल्या.

परिवहन आयुक्त श्री. भिमनवार यांनी मोटार वाहन कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी म्हणजे दंड वसुली व संख्यात्मक वाढ हे नसून अपघाताचे प्रमाण कमी करणे व रस्त्यावरील सुरक्षेबाबत गुणात्मक बदल घडवून आणणे याविषयी मार्गदर्शन केले. थोडक्यात विभागाच्या कामकाजाविषयी सर्वसामान्य जनतेला सकारात्मक वाटण्याच्या दृष्टीने वाटचाल करावी असे निर्देश दिले.

चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात भेटीदरम्यान परिवहन आयुक्त श्री. भिमनवार यांनी गडचिरोली  उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी अद्ययावत यंत्रणासह सुसज्ज अशा तपासणी वाहनाचे निरीक्षण केले. सदर वाहन विशेष केंद्रीय सहाय्य योजनेच्या माध्यमातून उपलब्ध केल्याबद्दल गडचिरोली चे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजयसिंह चव्हाण यांचे कौतुक केले.

00000


Friday 21 October 2022

पोलिस स्मृतीदिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन





पोलिस स्मृतीदिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते

हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन

 

चंद्रपूरदि. 21 ऑक्टोबर : पोलिस स्मृतीदिनानिमित्त पोलिस मुख्यालय मैदानावर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी सीपोलिस अधीक्षक अरविंद साळवेपोलिस उपअधीक्षक (गृह) राधिका फडकेशेखर देशमुख (आर्थिक गुन्हे शाखा)उपविभागीय पोलिस अधिकारी सर्वश्री आयुष नोपानीसुधीर नंदनवारश्री. नाईक यांच्यासह पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

21 ऑक्टोबर 1959 रोजी लदाख हद्दीत भारत सीमेवर 16 हजार फूट उंचीवर कडाक्याच्या थंडीत केंद्रीय राखीव पोलिस दलाची 10 शिपायांची तुकडी गस्त घालीत असतांना त्यांच्यावर अकस्मात हल्ला झाला. हल्ल्याची चाहूल लागतात सीमेच्या रक्षणार्थ अपुरे मनुष्यबळ व अपुरे शस्त्रास्त्रांची पर्वा न करता 10 पोलीस जवान प्राणपणाने लढले व मातृभूमीच्या रक्षणार्थ या शूरवीरांनी मोठ्या संख्येने असणाऱ्या शत्रूशी लढा देत स्वतःचे प्राण अर्पण केले. 24 दिवसानंतर म्हणजेच 13 नोव्हेंबर 1956 रोजी चीनने या वीर पोलीस जवानांचे मृतदेह भारताच्या स्वाधीन केलेतेव्हा संपूर्ण देश हळहळला. हॉटस्प्रिंग येथे ज्या ठिकाणी या शूरवीरांनी प्राण अर्पण केले तेथे संपूर्ण भारतातील पोलिसांनी या वीरांचे स्मारक उभारले आहे.

यावर्षी संपूर्ण भारतातून एकूण 264 पोलीस अधिकारीकर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावित असताना आपल्या मातृभूमीच्या संरक्षणार्थ प्राणाची आहुती दिली आहे.

हुतात्मा झालेले पोलीस अधिकारी अंमलदार व कर्मचाऱ्यांना यावेळी पोलीस प्रशासनाकडून मानवंदना देण्यात आली. व हुतात्मा झालेल्या शूर वीरांची नावे वाचून दाखवण्यात आली.

000000

Thursday 20 October 2022

जिल्ह्यातील चार लाखांच्या वर शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत दिवाळी किट वाटपाचे नियोजन

 

जिल्ह्यातील चार लाखांच्या वर शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत दिवाळी किट वाटपाचे नियोजन

Ø अंत्योदय आणि प्राधान्य गटातील कार्डधारकांना मिळणार लाभ

Ø प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि पामतेलाचा समावेश

चंद्रपूर, दि. 20 ऑक्टोबर : ऑक्टोबर 2022 मध्ये दिवाळी सणानिमित्त शासनाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अंत्योदय लाभार्थी व प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधापत्रिधारकांना नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त 100 रुपयांत शिधाजिन्नस संच (दिवाळी किट) उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील 4 लक्ष 9 हजार 275 शिधापत्रिकाधारकांना सदर दिवाळी किट देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यात अंत्योदय योजनेंतर्गत 1 लक्ष 38 हजार 393 शिधापत्रिकाधारक तर प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेंतर्गत 2 लक्ष 70 हजार 882 असे एकूण 4 लक्ष 9 हजार 275 शिधापत्रिकाधारक आहेत. या कुटुंबांना दिवाळीनिमित्त एक किला रवा, एक किला चणाडाळ, एक किलो साखर आणि एक लीटर पामतेल या चार शिधाजिन्नसांचा समावेश असलेला संच जिल्ह्यातील सर्व रास्त भाव दुकानांत दिवाळी किट उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

पुरवठा विभागाच्या गोदामानुसार, बल्लारपूर येथे अंत्योदय योजना कार्ड संख्या व प्राधान्य गट योजना कार्ड संख्या अशी एकूण कार्ड संख्या 22855 आहे. भद्रावती 24686, ब्रम्हपूरी 36352, चंद्रपूर 24427, बाबुपेठ 33866, चिमूर 21765, नेरी 16021, गोंडपिपरी 18071, जिवती 13268, कोरपना 21472, मूल 25033, नागभीड 14984, तळोधी 13914, पोंभुर्णा 12676, राजूरा 24710, सावली 10082, पाथरी 14555, सिंदेवाही 24823 आणि वरोरा 32715 असे एकूण 4 लक्ष 9 हजार 275 नियोजन करण्यात आले आहे.

सर्व रास्त भाव दुकानात सदर दिवाळी किटचे पीओएस मशीनद्वारे वितरण सुरू असून सर्व शिधापत्रिकाधारकांनी याचा लाभा घ्यावा. 100 रुपयांत दिवाळी किट प्राप्त करून घेतांना रास्तभाव दुकानदारांकडून पीओएस मशीनद्वारे निघणारे बील प्राप्त करून घेऊन त्या बिलाप्रमाणेच पैसे द्यावे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

दानशूर व्यक्ती, सामाजिक संघटनांनी दिवाळी किटसाठी समोर यावे : गरीब आणि वंचितांची दिवाळी साजरी होण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती तसेच सामाजिक संघटनांनी स्वत:हून समोर येऊन मोफत दिवाळी किटचे वाटप करावे, असे आवाहन जिल्हा प्रशसनाच्या वतीने करण्यात आले आहे.

०००००००

छट पूजा महोत्सव उत्साहात संपन्न व्हावा यासाठी शासन पूर्णपणे पाठीशी






छट पूजा महोत्सव उत्साहात संपन्न व्हावा यासाठी शासन पूर्णपणे पाठीशी

Ø सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला विश्वास

Ø भाविकांच्या सुरक्षेसंदर्भात तडजोड नकोनियमांचे करा पालन

मुंबई / चंद्रपूर, दि. 20 ऑक्टोबर : निर्जल उपवास आणि सूर्यदेवाची आराधना करून सुख, शांती आणि संपन्नतेची प्रार्थना करणाऱ्या तसेच छट पूजेसाठी येणाऱ्या भाविकांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन द्याकायदा आणि सुव्यवस्थेचे भान ठेवून सहकार्य करा, असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. हा महोत्सव उत्साहात संपन्न व्हावा यासाठी शासन आपल्या सोबत आहे, असा विश्वासही त्यांनी दिला.

28 क्टोबरपासून प्रारंभ होणाऱ्या छट पूजा उत्सवाचा आढावा घेण्यासंदर्भात बुधवारी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. बैठकीला आमदार आशिष शेलारसांस्कृतिक विभागाचे सचिव सौरभ विजयमुंबईचे जिल्हाधिकारी राजीव निवतकरजिल्हाधिकारी निधी चौधरीसहायक पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटीलमुंबई मनपाचे अति. आयुक्त संजीव कुमारअमरजीत मिश्रा यांच्यासह पोलिस अधिकारीसांस्कृतिक विभागाचे अधिकारी  उपस्थित होते.

यावेळी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबई येथील छट पूजेत सहभागी होणाऱ्या भाविकांना विशेषतः महिलांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी विशेष लक्ष देण्याच्या सुचना केल्या. सुटसुटीत पार्किंग,  प्रकाश व्यवस्थाफिरते स्वच्छता गृहवाहतूक व्यवस्थाआपातकालीन स्थितीत कोस्टल सेफ गार्डजागोजागी सूचना फलककायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिस बंदोबस्त चोख असावा व मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सर्व सूचनांचे पालन व्हावे, असे निर्देश सर्व संबंधित विभागांच्या प्रमुखांना देण्यात आले.

मुंबई शहरात 80 ठिकाणी छट पूजा संपन्न होते. त्यापैकी कुलाबाजुहु यांसारख्या अधिक गर्दीच्या ठिकाणी काळजीपूर्वक व्यवस्था हाताळण्यात याव्या असेही ते म्हणाले. राज्यातील इतर जिल्ह्यात देखील जेथे छट पूजा उत्सव साजरा होतो, तेथेही सुरक्षेची व इतर सर्व काळजी घेण्यासंदर्भात निर्देश दिले जातील, असे श्री. मुनगंटीवार यांनी बैठकीत सांगितले. आमदार आशिष शेलार यांनी देखील बैठकीत सूचना मांडल्या. त्यावर कार्यवाही करण्याचे संबंधित अधिकाऱ्याना सांगण्यात आले.

'हाय टाईडअसल्यास सावध रहा : दरम्यान हवामान खात्याशी सतत संपर्कात राहून या पर्वात समुद्रकिनारी पूजा करणाऱ्या भाविकांनी सावधगिरी बाळगावी. हाय टाईडची स्थिती असल्यास प्रशासन ज्या सूचना देईल त्यांचे पालन करावे, असे आवाहन देखील मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

००००००० 

मेंढपाळांच्या समस्यांबाबत शासन संवेदनशील - वनमंत्री मुनगंटीवार

 

मेंढपाळांच्या समस्यांबाबत शासन संवेदनशील मंत्री मुनगंटीवार

मुंबई / चंद्रपूर, दि.20 : राज्यातील मेंढपाळांच्या समस्यांबाबत राज्य शासन संवेदनशीलतेने विचार करीत असून लवकरच पुन्हा बैठक घेवून सकारात्मक निर्णय घेतला जाईलअसे आश्वासन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मेंढपाळ बांधवांना दिले.

मेंढ्यासाठी चराई कुरण राखीव करणेबाबत व मेंढपाळांच्या इतर समस्यांबाबत मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीला आमदार गोपीचंद पडळकरआमदार संजय गायकवाडवन विभागाचे सचिव वेणुगोपाल रेड्डीवरिष्ठ अधिकारी व मेंढपाळ समाजाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी मेंढपाळाच्या समस्या जाणून घेत त्या सकारात्मक दृष्टीने सोडविण्याची तयारी दर्शविली. मेंढ्यासाठी चराई कुरण राखीव करण्याबाबत इतर राज्यांच्या धोरणांचा अभ्यास करण्याच्या सूचना सचिवांना दिल्या. समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या सूचनामेंढपाळांच्या मागण्यांचा सविस्तर आढावा घेवून त्यावरील उपाययोजना कराव्यात. तसेच मेंढीपालन व चराई कुरण राखीव करण्यासंदर्भात अस्तित्वात असलेल्या कायद्यातील तरतूदीनियमांचा कायदेशीर अभ्यास करण्यासाठी विधि व न्याय विभागाचे अभिप्राय घेण्यात यावेअशा सूचना श्री. मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

मेंढपाळ्यांच्या मागण्यांसंदर्भात सचिव स्तरावर प्राथमिक बैठक घ्यावी. पुढील 20 दिवसानंतर पशुसंवर्धनगृह आणि वन विभागाची पुन्हा संयुक्त बैठक घेवून शासन सकारात्मक निर्णय घेईलअसेही श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

शासकीय जमिनीवर मेंढी चराई करणाऱ्या मेंढपाळांना वन कर्मचाऱ्यांकडून मारहाण होत असल्याच्या तक्रारी यावेळी करण्यात आल्या. त्यावर वन कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याचा अधिकार नाही असे स्पष्ट करून मेंढपाळांनी अशा घटनांविरोधात पोलिसांत तक्रार द्यावीअसेही श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

०००००००००