Search This Blog

Monday 3 October 2022

युवक-युवतींकरीता स्वयंरोजगार विकास प्रशिक्षण कार्यक्रम

 


युवक-युवतींकरीता स्वयंरोजगार विकास प्रशिक्षण कार्यक्रम

चंद्रपूर, दि. 3 आक्टोबर : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राद्वारे 7 वी पास व 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवक-युवतींकरीता स्वयंरोजगार विकास प्रशिक्षण कार्यक्रम दि. 15 ते 30 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 12 ते सायं.4 वाजेपर्यंतच्या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे.

या प्रशिक्षणामध्ये उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, ग्रामीण व निमशहरी भागात करता येण्यासारखे विविध उद्योग, व्यवसायसंधी मार्गदर्शन, शेतीवर आधारित उद्योग, दुग्ध व दुग्धजन्य पदार्थ निर्मिती, केमिकल प्रॉडक्ट, पॅकेजिंग, पशुधनावर आधारित उद्योगसंधी, शेळीपालन, दुग्धव्यवसाय व कुक्कुटपालन यामधील उद्योगसंधी तसेच शासनाच्या विविध अनुदानित योजना, यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन, पशुधन विकास कार्यालयाच्या योजना व व्यवसायसंधी आदी विषयांवर विशेषतज्ञ व शासकीय अधिकारी वर्गाद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

सदर प्रशिक्षणात प्रवेश घेण्याकरिता इच्छुक युवक-युवतींनी www.mced.Co.in या वेबसाईटवर दि. 14 ऑक्टोबर 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी के. व्ही. राठोड 9403078773, 07172-274416, कार्यक्रम आयोजिका लक्ष्मी खोब्रागडे 9309574045 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी के. व्ही. राठोड यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment