Search This Blog

Thursday 13 October 2022

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे लायसन्स कॅम्प आयोजित

 

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे लायसन्स कॅम्प आयोजित

चंद्रपूर, दि. 13 ऑक्टोबर : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे जिल्ह्यांतर्गत लायसन्स कॅम्प आयोजित करण्यात येत आहे. सदर कॅम्पमध्ये शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्के अनुज्ञप्ती पूर्वनियोजित ऑनलाइन अपॉइंटमेंट नुसार देण्यात येणार आहेत. तरी, जिल्ह्यातील नागरिकांनी उपलब्ध संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी केले आहे.

ही आहेत शिबिराची स्थळे:

दि. 17 ऑक्टोबर 2022 रोजी आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन वरोरा, 18 ऑक्टोबर रोजी एन.एच. महाविद्यालय ब्रह्मपुरी, 19 ऑक्टोबर रोजी शासकीय विश्रामगृह गोंडपिपरी, 20 ऑक्टोबर रोजी शरद पवार महाविद्यालय, गडचांदुर तर 21 ऑक्टोबर रोजी शासकीय विश्रामगृह, चिमूर या ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment