Search This Blog

Sunday 29 August 2021

जिल्ह्यात 24 तासात 5 कोरोनामुक्त

 जिल्ह्यात 24 तासात 5 कोरोनामुक्त, 4 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यु

Ø ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 49

चंद्रपूर, दि. 29  ऑगस्ट :  गत 24 तासात जिल्ह्यात 5 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 4 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच एका बाधिताचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे.

आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 4 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 1, चंद्रपूर तालुका 0, बल्लारपूर 2, भद्रावती 0, ब्रम्हपुरी 0, नागभीड 1, सिंदेवाही 0, मुल 0, सावली 0, पोंभूर्णा 0, गोंडपिपरी 0, राजूरा 0, चिमूर 0, वरोरा 0, कोरपना 0, जिवती 0 व इतर ठिकाणच्या 0 रुग्णांचा समावेश आहे. आज मृत झालेल्यामध्ये राजुरा तालुक्यातील एका महिलेचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 642 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 53 झाली आहे. सध्या 49 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 6 लाख 72 हजार 588  नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 5 लाख 82 हजार 131  नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1540 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

 

वीज बिलासाठी ग्रामपंचायतीना 50 टक्के निधी देणार - पालकमंत्री वडेट्टीवार



 वीज बिलासाठी ग्रामपंचायतीना 50 टक्के निधी देणार

                            - पालकमंत्री वडेट्टीवार

Ø जिल्हा नियोजन समितीतून तरतूद करण्याच्या सुचना

Ø वीज कनेक्शन कापण्याच्या पार्श्वभुमीवर तातडीची बैठक

चंद्रपूर दि. 29 ऑगस्ट : ग्रामपंचायतीअंतर्गत येणा-या सार्वजनिक पथदिव्यांचे कनेक्शन कापण्यासंदर्भात जिल्हाभरातून अनेक तक्रारी येत आहे. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे विंचू – काटे, तसेच अंधाराचा फायदा घेत वन्यप्राण्याच्या हल्ल्याची भीती नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे जीवितहाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभुमीवर पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी तात्काळ बैठक बोलावली असून ग्रामपंचायतींना थकीत वीज बिल भरणा करण्यासाठी यापुढे जिल्हा नियोजन समितीतून 50 टक्के निधी देण्यात येईल, असे सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला  जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, मनपा आयुक्त राजेश मोहिते, महावितरणच्या अधीक्षक अभियंता संध्या चिंवडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी( पंचायत) कपिल कलोडे  प्रामुख्याने उपस्थित होते.

ग्रामपंचायत स्तरावर गावांमध्ये विजेसाठी पथदिवे बसविण्यात आले आहे, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांचे बील यापूर्वी शासनामार्फत भरण्यात येत होते. मात्र आता ग्रामपंचायतीच्या स्वनिधीतून 50 टक्के थकित वीज बिलाचा भरणा करावा लागणार आहे. तर उर्वरीत भरणा करण्यासाठी 50 टक्के निधी जिल्हा नियोजन समितीमधून उपलब्ध करून देण्यात येईल. काही ठिकाणी ग्रामीण भागातील पथदिवे दिवसभर सर्रासपणे सुरू असतात. त्यामुळे मोठया प्रमाणात विजेची बिले येतात. ग्रामीण भागातील पथदिवे किती वाजता सुरू व्हावे व किती वाजता बंद, यासाठी टाइमर सेन्सर लावणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने ग्रामपंचायत स्तरावर टायमर सेंसर लावून घ्यावे.

ग्रामपंचायतीने थकित वीज बिलाचा भरणा न केल्यामुळे विद्युत विभागाकडून कनेक्शन कापण्यात आले. मात्र याबाबत पुरेसा वेळ न देता विजेचे कनेक्शन कापण्याबाबत पालकमंत्र्यांनी संताप व्यक्त केला. यापुढे ग्रामपंचायतीचे वीज कनेक्शन कापण्यापूर्वी जि.प.मुख्य कार्यकारी अधिका-यांना दोन-तीन दिवसाआधी अवगत करावे. जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतीमध्ये सेन्सर लावल्यास विजेची बचत तर होईलच सोबतच 50 टक्के वीज बिलात कपातसुद्धा होईल. तसेच पुनर्वसित गावे सोडल्यास कोणत्याही गावात नवीन विद्युत पोल उभारणीला परवानगी देऊ नये, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. जिल्ह्यातील पाच हजार लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये सोलर सिस्टीम लावण्याचे प्रयोजन करणार असल्याची माहितीही पालकमंत्री श्री.वडेट्टीवार यांनी दिली.

त्यासोबतच ग्रामपंचायतीकडे थकित असलेल्या वीज बिलाचा भरणा करण्यासाठी स्त्रोत उपलब्ध असून त्यातून 50 टक्के प्रमाणात सदर ग्रामपंचायतीकडून थकित असलेल्या वीज बिलाचा भरणा करता येईल, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी यावेळी दिली.

00000

चंद्रपूर शहरातील झोपडपट्टीधारकांना नझूलचे पट्टे वाटप करणार - पालकमंत्री विजय वडेट्टीवार





चंद्रपूर शहरातील झोपडपट्टीधारकांना नझूलचे पट्टे वाटप करणार

                          - पालकमंत्री विजय वडेट्टीवार

Ø 13 झोपडपट्टीचे नकाशे मंजूरीकरीता तात्काळ पाठविण्याचे निर्देश

Ø झोपडपट्टीधारकांना मिळणार दिलासा

चंद्रपूर, दि. 29 ऑगस्ट : चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात शासकीय जमिनीवर एकूण 14 झोपडपट्टया आहेत. यापैकी बाबानगर येथील झोपडपट्टीला नगर रचनाकार यांनी मान्यता दिली आहे. उर्वरीत 13 झोपडपट्टीचे नकाशे मंजूरीकरीता सहसंचालक नागपूर यांना तात्काळ पाठवावे. जेणेकरून शहरातील झोपडपट्टीवासियांना नझुलचे पट्टे वाटप करणे सोयीचे होईल व नागरिकांना दिलासा मिळेल, असे प्रतिपादन राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झोपडपट्टीधारकांच्या नझुल पट्टे वाटपासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मनपा आयुक्त राजेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन लोंढे, नगर रचनाकार आशिष मोरे आदी उपस्थित होते.

शहरातील झोपडपट्टीधारकांना नझूलपट्टे वाटपाबाबत नागपूरच्या धर्तीवर तोडगा काढण्यात येईल, असे आश्वस्त करून पालकमंत्री म्हणाले, सर्व झोपडपट्ट्यांचा त्वरीत सर्व्हे करा. त्यांचे नकाशे मंजूरीकरीता नागपूर येथील सहसंचालक कार्यालयाला त्वरीत पाठवा.

शहरातील 14 झोपडपट्ट्यांमध्ये एकूण 4815 कुटुंबांचे वास्तव्य आहे. 17 नोव्हेंबर 2018 च्या शासन निर्णयानुसार प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लाभ मिळण्यास पात्र असलेल्या कुटुंबांची संख्या 380 आहे.  झोपडपट्टी अभिन्यासामध्ये आवश्यक ती खुली जागा तसेच विकास नियंत्रण नियमावलीनुसार आवश्यक रुंदीचे रस्ते प्रस्तावित करण्यास मंजूरी प्रदान करण्याबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे. तसेच शिथिलीकरण प्रस्तावात खुली जागा, रस्त्यांची रुंदी, त्यांचे मोजमाप, रस्त्याचे रुंदीकरण, प्रत्येक भुखंडास पोचमार्ग आदी त्रृट्यांची पुर्तता करून सुधारितरित्या प्रस्ताव पाठविण्याचे आदेश देण्यात आले असून त्यानुसार नगर रचना कार्यालयाकडून कारवाई सुरू असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

 

पालकमंत्र्यांच्या हस्ते लसीकरण वाहनांचे उद्घाटन : महापारेषणच्या सीएसआर फंडातून जिल्ह्याला मिळालेल्या 30 लसीकरण वाहनांचे उद्घाटन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलतांना पालकमंत्री म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यासाठी उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या प्रयत्नातून 30 लसीकरण गाड्या उपलब्ध झाल्या आहेत. प्रत्येक तालुक्यात दोन गाड्या याप्रमाणे जिल्ह्यातील 15 तालुक्यांना या गाड्या देण्यात येतील. त्यामुळे निश्चितच लसीकरणाचा वेग वाढेल. विशेष म्हणजे गावागावातील जे नागरीक प्रवास करून लसीकरणाकरीता येऊ शकत नाही, त्यांच्यापर्यंत हे वाहन पोहचणार आहे. आरोग्य यंत्रणा मजबूत करणे व जास्तीत जास्त पात्र नागरिकांचे लसीकरण करणे, हा यामागचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलिस मुख्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाला जि.प.अध्यक्षा संध्या गुरनुले, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, पोलिस अधिक्षक अरविंद साळवे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत आदी उपस्थित होते.

0000000

Saturday 28 August 2021

शनिवारी जिल्ह्यात 7 कोरोनामुक्त


शनिवारी जिल्ह्यात 7 कोरोनामुक्त, 9 पॉझिटिव्ह

Ø ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 51

चंद्रपूर, दि. 28 ऑगस्ट : गत 24 तासात जिल्ह्यात 7 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 9 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात शनिवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.

आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 9 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 3,  चंद्रपूर तालुका 1, बल्लारपूर 1, भद्रावती 0, ब्रम्हपुरी 0, नागभीड 0, सिंदेवाही 1, मुल 0, सावली 0, पोंभूर्णा 0, गोंडपिपरी 0, राजूरा 0, चिमूर 0, वरोरा 3, कोरपना 0, जिवती 0 व इतर ठिकाणच्या 0 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 638 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 48 झाली आहे. सध्या 51 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 6 लाख 70 हजार 939 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 5 लाख 80 हजार 403 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1539 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे

00000

Friday 27 August 2021

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायद्यांतर्गत 26 पानठेल्यांवर कारवाई



तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायद्यांतर्गत 26 पानठेल्यांवर कारवाई

Ø अपर जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात धडक मोहीम

चंद्रपूर, दि. 27 ऑगस्ट : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्या मार्गदर्शनात 26 पानठेल्यांवर कारवाई करण्यात आली. कोटपा कायदा 2003 ची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने चंद्रपूर शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही मोहीम राबविण्यात आली.

जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर अंतर्गत्‍ आरोग्य विभाग, अन्न  व औषध प्रशासन विभाग तसेच पोलीस विभागामार्फत शासकीय कार्यालये, हॉस्पिटल, शाळा परिसरातील पानठेल्यावर सदर कार्यवाही  करण्यात आली आहे. जास्तीत जास्त लोकांना तंबाखुमूळे होणाऱ्या दुष्परिणामाची माहिती व जाणीव होईल. तसेच नवीन पिढी तंबाखूच्या आहारी जाणार नाही, हा उद्देश सफल होईल. कोटपा कायदा 2003 ची अंमलबजावणी तसेच जास्तीत जास्त लोकांना यांच्या दुष्परिणामाची जाणीव होणे हासुध्दा या कारवाईचा उद्देश आहे.   यावेळी “ करा तंबाखू, सिगारेट, जर्दा  याला  नकार, करा सुदृढ आरोग्याचा स्वीकार  हा कानमंत्र देण्यात आला.                 सदर कार्यवाहीमध्ये जिल्हा तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हा सल्लागार डॉ. श्वेता सावलीकर, अन्न निरीक्षक श्री. सातकर , पोलीस निरीक्षक श्री. अंभोरे, पोलीस उपनिरीक्षक श्री. चव्हाण तसेच राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत येणारे समुपदेशक मित्रंजय निरंजने, सामाजिक कार्यकर्ता तुषार रायपुरे, अतुल शेंद्रे, दुर्गाप्रसाद बनकर यांनी मोलाची कामगिरी केली

00000

शुक्रवारी जिल्ह्यात 3 कोरोनामुक्त, 14 पॉझिटिव्ह

 

शुक्रवारी जिल्ह्यात 3 कोरोनामुक्त, 14 पॉझिटिव्ह

Ø ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 49

चंद्रपूर, दि. 27 ऑगस्ट : गत 24 तासात जिल्ह्यात 3 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 14 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात शुक्रवारी एकाही बाधिताचा  मृत्यू झाला नाही.

आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 14 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 2, चंद्रपूर तालुका 0, बल्लारपूर 7, भद्रावती 2, ब्रम्हपुरी 0, नागभीड 0, सिंदेवाही 0, मुल 1, सावली 0, पोंभूर्णा 0, गोंडपिपरी 0, राजूरा 0, चिमूर 0, वरोरा 1, कोरपना 1, जिवती 0 व इतर ठिकाणच्या 0 रुग्णांचा समावेश आहे.

 जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 629 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 41 झाली आहे. सध्या 49 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 6 लाख 69 हजार 56 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 5 लाख 78 हजार 349 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1539 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा


पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

चंद्रपूर दि. 27 ऑगस्ट : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार 29 ऑगस्ट रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

रविवार दि. 29 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 10.15 वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे आगमन, सकाळी 10.30 वाजता पोलिस ग्राउंड मैदान, येथे मिशन लसीकरण अंतर्गत 30 रुग्णवाहिकेच्या लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती, सकाळी 11.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नवीन बांधकाम, पाण्याचे नियोजन, विद्युत पुरवठा तसेच युजी व पीजीसाठी पर्यायी जागा यासह कामांची आढावा बैठक, सकाळी 12.30 वाजता चंद्रपूर शहरातील नझुल पट्टेवाटपाबाबत आढावा बैठक, दुपारी 1.30 ते 2 वाजेपर्यंतचा वेळ राखीव, सायंकाळी 6 वाजता चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण.

00000

विभागीय आयुक्तांनी घेतला वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाचा आढावा

 




विभागीय आयुक्तांनी घेतला वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाचा आढावा

Ø पाणी व विद्युत पुरवठ्यासह जलदगतीने बांधकाम करण्याचे निर्देश

चंद्रपूर, दि. 27 ऑगस्ट : चंद्रपूर येथील निर्माणाधीन असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या बांधकामाचा नागपूर विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे - वर्मा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. प्रस्तावित बांधकामात पाणी पुरवठा व विद्युत पुरवठ्याचे योग्य नियोजन करून जलदगतीने बांधकाम करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

बैठकीला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मनपा आयुक्त राजेश मोहिते, सा.बां. विभागाच्या अधिक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, महावितरणच्या अधिक्षक अभियंता संध्या चिवंडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. अविनाश टेकाडे, प्रकल्पाचे बांधकाम महाव्यवस्थापक चंदनकुमार, उपमहाव्यवस्थापक अमितेश खोत, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता के.आर.घोडमारे आदी उपस्थित होते.

सदर वैद्यकीय रुग्णालयाचे बांधकाम कधीपर्यंत पूर्ण होणार आहे, असे विचारून विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे म्हणाल्या, संभाव्य तिस-या लाटेमध्ये बांधकामावर परिणाम होऊ देऊ नका. अशा परिस्थितीतही कामगार उपलब्ध असले पाहिजे. त्यासाठी त्यांचे बांधकाम साईटवर लसीकरण, त्यांच्या राहण्याची व्यवस्था आदींचे नियोजन करावे. निर्माणाधीन इमारतीचे बांधकाम होत असलेल्या परिसरात पाण्याचा स्त्रोत बघा. या भागात भुजल सर्वेक्षण विभागाकडून पाण्यासंदर्भात काही निरीक्षणे असतील तर त्या तपासा. वैद्यकीय महाविद्यालयाला प्रतिदिन नऊ लक्ष लीटर पाण्याची आवश्यकता राहणार आहे. त्याची पुर्तता होण्यासाठी योग्य पाण्याचा स्त्रोत त्वरीत शोधा. तसेच याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करा. विद्युत पुरवठ्याचे कामही जलदगतीने करा. तसेच बांधकामाच्या प्रगतीचा अहवाल नियमितपणे जिल्हाधिका-यांकडे सुपूर्द करणे आवश्यक आहे, अशा सुचना त्यांनी केल्या.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम हे 100 एकरवर होत असून या प्रकल्पाला 19 मे 2019 रोजी सुरूवात झाली. एकूण 598 कोटींचे हे बांधकाम आहे. यापैकी 230 कोटी रुपये प्राप्त झाले असून एकूण बांधकामाच्या 45 टक्के काम पूर्ण झाले आहे. तसेच मुख्य रुग्णालयाच्या इमारतीचे 35 टक्के बांधकाम पूर्ण, निवासी वसाहत टाइप- 2 आणि 3 चे 88 टक्के बांधकाम, वसतीगृहाचे 79 टक्के बांधकाम, मुलींच्या वसतीगृहाचे 69 टक्के बांधकाम, निवासी डॉक्टरांच्या वसतीगृहाचे 68 टक्के, लायब्ररी व प्रशासकीय इमारतीचे 61 टक्के, वैद्यकीय प्रयोगशाळेचे 48 टक्के बांधकाम, इतर कार्यालयांचे 58 टक्के बांधकाम पूर्ण झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.  

0000000

Thursday 26 August 2021

जिल्ह्यात आतापर्यंत 6 लाख 66 हजारांच्यावर नमुने तपासणी

जिल्ह्यात आतापर्यंत 6 लाख 66 हजारांच्यावर नमुने तपासणी

Ø 24 तासात सहा कोरोनामुक्त, चार पॉझिटिव्ह

Ø ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 38

चंद्रपूर, दि. 26 ऑगस्ट : जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाची सुरुवात झाली तेव्हापासून तर आजपर्यंत एकूण 6 लाख 66 810 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून यापैकी 5 लाख 76 हजार 568 नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. गत 24 तासात जिल्ह्यात सहा जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच चार जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात गुरुवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.

आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 4 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 0,  चंद्रपूर तालुका 0, बल्लारपूर 0, भद्रावती 0, ब्रम्हपुरी 0, नागभीड 0, सिंदेवाही 0, मुल 1, सावली 1, पोंभूर्णा 0, गोंडपिपरी 1, राजूरा 1, चिमूर 0, वरोरा 0, कोरपना 0, जिवती 0 व इतर ठिकाणच्या 0 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 615 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 38 झाली आहे. सध्या 38 बाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1539 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने नेत्रदानासाठी पुढे यावे - डॉ. निवृत्ती राठोड

नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने नेत्रदानासाठी पुढे यावे -         डॉ. निवृत्ती राठोड

Ø जिल्हा सामान्य रुग्णालयात 36 व्या नेत्रदान पंधरवड्याचा शुभारंभ

चंद्रपूर दि. 26 ऑगस्ट : कोविडच्या प्रादुर्भावामुळे नेत्रदान करणाऱ्यांचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. त्यामुळे अफवेला बळी न पडता स्वयंस्फूर्तीने नेत्रदानासाठी पुढे यावे व अंध व्यक्तीच्या जीवनात प्रकाश निर्माण करावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी  केले. 36  व्या नेत्रदान पंधरवाड्याच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी रक्त संक्रमण अधिकारी डॉ.अंनत हजारे, नेत्र शल्य चिकित्सक डॉ. सरोदे, डॉ. पटेल, डॉ. वाघमारे, मानसिक आरोग्य कार्यक्रमाचे कर्मचारी  तसेच नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थिनी व रुग्ण उपस्थित होते.

नेत्रदान पंधरवाड्याचा उद्देश सांगताना डॉ. दूधे म्हणाले की, बुब्बुळाच्या आजाराने अंध असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यावर एकच उपाय म्हणजे मृत व्यक्तीचा निरोगी बुब्बुळ प्रत्यारोपण करणे हा होय. दरवर्षी या रुग्णांमध्ये वाढ होत असते. याकरिता जास्तीत जास्त मरणोत्तर नेत्रदान करून बुब्बुळाची मागणी व पुरवठा यामधील तफावत दूर करणे आवश्यक आहे. तसेच व्यक्तींनी जिवंतपणी  रक्तदान तर मरणोत्तर नेत्रदान करणे आवश्यक असल्याचेही डॉ. दूधे म्हणाले.

            नेत्रदान कोणालाही करता येते, नेत्रदान मृत्यूनंतर सहा तासाच्या आत करता येऊ शकते. कुटुंबात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास आधी इच्छापत्र भरले नसेल तरीही नातेवाइकांच्या संमतीने नेत्रदान करता येते. याकरीता जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे संपर्क साधावा. तसेच डॉक्टरांची टीम येईपर्यंत रुग्णांच्या पापण्या झाकून ठेवाव्यात व डोळ्यावर थंड पाण्याचा कपडा ठेवावा, असे नेत्र शल्य चिकित्सक डॉ. सरोदे यांनी सांगितले.

00000

Wednesday 25 August 2021

चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे बांधकाम पूर्ण करावे

 


चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे बांधकाम पूर्ण करावे

Ø डॉक्टर व कर्मचारी यांची पदे तातडीने भरावीत पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे मागणी

            मुंबई/चंद्रपूर दि.25 ऑगस्ट : चंद्रपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व  रूग्णालयाचे बांधकाम दिलेल्या कालावधीत पूर्ण  करा तसेच शासकीय महाविद्यालयातील डॉक्टर (विषय तज्ज्ञ) व कर्मचारी यांची पदे तातडीने भरावीत अशी मागणी  इतर मागास बहुजन कल्याण विकास मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार  यांनी  वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली.

चंद्रपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व  रूग्णालय बांधकामाच्या समस्यांबाबत मंत्रालयातील वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या दालनात बैठक पार पडली. या बैठकीला इतर मागास बहुजन कल्याण विकास मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय  शिक्षण संचालक डॉ.दिलीप म्हैसेकर, दूरदृश्यप्रणालीव्दारे चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे, चंद्रपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.अविनाश टेकाडे यासह एचएससीसी या कंपनीचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

           मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, चंद्रपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व  रूग्णालयाचे बांधकाम अत्यंत संथ गतीने सुरू आहे, हे काम तातडीने पुर्ण करण्यात यावे. जिल्ह्यातील जनतेला आरोग्य सुविधा उत्कृष्टरित्या मिळावी यासाठी शासकीय महाविद्यालयातील डॉक्टर (विषय तज्ज्ञ) व कर्मचारी यांची पदे तातडीने भरावीत, जेवढ बांधकाम पुर्ण झाले आहे त्यामध्ये विद्युतीकरण व पाणीपुरवठा ही सुरळीत करण्यात यावा व पुर्ण झालेल्या इमारती शासनाकडे हस्तांतरित करण्यात याव्यात. शासकीय महाविद्यालयाचा पाण्याचा प्रश्नदेखील तातडीने सोडवावा. वैद्यकीय महाविद्यालय व  रूग्णालयाकरिता पूर्णवेळ अधिष्ठाता पदाची भरती व्हावी, हाफकीनकडून जी औषधे खरेदी  केली जातात त्याबाबतच्या नियमावलीमध्ये शिथिलता देण्यात यावी अशी मागणी  मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली.

              मंत्री अमित देशमुख यावेळी म्हणाले, चंद्रपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व  रूग्णालयाचे बांधकाम दिलेल्या मर्यादेत पूर्ण करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून कार्यवाही करण्यात येईल. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे लवकरच वर्ग 1 व वर्ग 2 ची पदभरती प्रक्रिया सूरू होणार आहे. तर वर्ग 3 ची पदभरती वैद्यकीय शिक्षण संचालक कार्यालयाकडून होईल. तसेच अधिष्ठाता यांच्या अखत्यारित त्यांना वर्ग 4 ची पदे भरता येतील. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे बांधकामासाठी अपु-या असलेल्या जागेच्या प्रश्नासाठी जिल्हाधिकारी यांनी स्थानिक प्रशासनासोबत बैठक घेवून तातडीने कार्यवाही करावी. ज्या इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे, अशा निवासी इमारतींचे विद्युतीकरण व पाणीपुरवठा सुरळीत करून त्यांचे तातडीने  संबधित विभागाकडे हस्तांतरीत  करण्यात येतील,अशी ग्वाही यावेळी मंत्री अमित देशमुख यांनी दिली.

00000

बुधवारी जिल्ह्यात 3 कोरोनामुक्त, 3 पॉझिटिव्ह


बुधवारी जिल्ह्यात 3 कोरोनामुक्त, 3 पॉझिटिव्ह

Ø ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 40

चंद्रपूर, दि. 25 ऑगस्ट : गत 24 तासात जिल्ह्यात 3 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 3 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात बुधवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.

आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 3 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 0,  चंद्रपूर तालुका 0, बल्लारपूर 1, भद्रावती 0, ब्रम्हपुरी 0, नागभीड 0, सिंदेवाही 0, मुल 0, सावली 1, पोंभूर्णा 1, गोंडपिपरी 0, राजूरा 0, चिमूर 0, वरोरा 0, कोरपना 0, जिवती 0 व इतर ठिकाणच्या 0 रुग्णांचा समावेश आहे.

 जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 611 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 32 झाली आहे. सध्या 40 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 6 लाख 64 हजार 786 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 5 लाख 74 हजार 437  नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1539 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000


--

Tuesday 24 August 2021

मतदार याद्या अद्ययावत करण्याबाबत विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम


 

मतदार याद्या अद्ययावत करण्याबाबत विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम

Ø मतदार यादीत नाव नोंदविण्याचे आवाहन

चंद्रपूर दि. 24 ऑगस्ट : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील 70- राजुरा, 71-चंद्रपूर, 72- बल्लारपूर, 73- ब्रह्मपुरी, 74- चिमूर व 75- वरोरा या सहा विधानसभा मतदार संघातील मतदार याद्यांचा 1 जानेवारी 2022 या अहर्ता दिनांकावर आधारित संक्षिप्त विशेष पुनरिक्षण कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.

उपरोक्त कार्यक्रमानुसार दि. 1 नोव्हेंबर 2021 रोजी संबंधित मतदान केंद्रावर  छायाचित्र मतदार याद्या प्रारूपरीत्या प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तरी ज्या पात्र व्यक्तींना दि. 1 जानेवारी 2022 रोजी किंवा त्यापूर्वी 18 वर्षे पूर्ण झाली आहेत, परंतु मतदार यादीत ज्यांचे नाव नाहीत, अशा पात्र मतदारांनी मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी दि.1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत नजीकच्या मतदान केंद्रावर किंवा संबंधित तहसील कार्यालयात नमुना 6 मधील अर्ज पासपोर्ट आकाराच्या रंगीत छायाचित्रासह भरून देता येईल. त्याबरोबर ज्या मतदारांचे फोटो मतदार यादीत नाही अशा मतदारांकडून रंगीत पासपोर्ट आकाराचे फोटो प्राप्त करून मतदार यादीत अपलोड करण्यात येणार आहे.

प्रारुप छायाचित्र मतदार यादीत समाविष्ट असलेल्या मतदारांच्या तपशिलात दुरुस्ती करावयाची असल्यास किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बदली झाली असल्यास, नजीकच्या मतदान केंद्रावर तसेच मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी किंवा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, तहसीलदार यांच्या कार्यालयात जाऊनसुद्धा विहित नमुन्यात अर्ज भरून देता येईल. विहीत नमुन्यातील अर्ज मतदान केंद्रावर नेमणूक करण्यात आलेल्या पदनिर्देशित अधिकाऱ्यांकडे उपलब्ध करून देण्यात आले असून सदर अर्ज विनामुल्य प्राप्त करून घ्यावे.

सदर मोहीम ही दि. 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत राबविण्यात येत असून या संधीचा मतदारांनी लाभ घ्यावा. तसेच प्रारूप छायाचित्र मतदार यादीमध्ये समाविष्ट असलेल्या मृत, स्थानांतरीत व दुबार मतदारांची नावे वगळण्यात येणार आहेत.

असा आहे पूर्व-पुनरीक्षण उपक्रम व कालावधी

दुबार समान नोंदी, एकापेक्षा अधिक नोंदी, तार्किक त्रुटी दूर करणे इत्यादी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या द्वारा घरोघरी भेट देऊन तपासणी व पडताळणी, योग्यप्रकारे विभाग, भाग तयार करणे आणि मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण करणे यासाठी दि. 9 ऑगस्ट ते 31 ऑक्टोबर 2021 हा कालावधीत निश्चित करण्यात आला आहे.

तर पुनरिक्षण उपक्रम दि. 1 नोव्हेंबर 2021 रोजी एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करणे, दि. 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी, विशेष मोहिमेच्या कालावधीत मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांनी निश्चित केलेले दिवस, दि. 20 डिसेंबर 2021  पर्यंत दावे व हरकती निकालात काढणे तर 5 जानेवारी 2020 रोजी  अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे.

तरी मतदारांनी छायाचित्र मतदार यादी अद्यावत होण्याच्यादृष्टीने नियुक्त करण्यात आलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार यांना आवश्यक ते सहकार्य करावे व या संधीचा मतदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

जिल्ह्यात महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 36 लागू

 जिल्ह्यात महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 36 लागू

चंद्रपूर दि. 24 ऑगस्ट : जिल्हयात दि. 30 व 31 ऑगस्ट 2021  रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी  हा सण साजरा करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने दि.29 ऑगस्टच्या रात्री 12 वाजतापासून ते दि. 1 सप्टेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंतच्या कालावधीत महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 36 लागू करण्यात आले आहे.

या कालावधीत सार्वजनिक शांततेला व सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये, तसेच सार्वजनिक ठिकाणी वागणुकीबाबत, वाद्य वाजविण्याबाबत, सभेचे आयोजन व मिरवणूक काढण्याबाबत, त्याठिकाणी रस्ते निश्चित करण्याबाबत, लाऊड स्पीकर वापरण्याबाबत योग्य निर्बंध व निर्देश देण्याचे अधिकार चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी यांना प्रदान करण्यात येत आहे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी  कळविले आहे.

हे आहेत अधिकार :

मिरवणूक व सभेच्या ठिकाणी त्यातील लोकांच्या वागणुकीबाबत योग्य निर्देश देण्याचे अधिकार, मिरवणुकीचा रस्ता व वेळ निर्धारित करणे तसेच धार्मिक पूजास्थानाच्या जवळ लोकांच्या वागणुकीस निर्बंध घालण्याचे अधिकार, मिरवणुकीस बाधा होणार नाही याबाबतचे आदेश तसेच धार्मिक पूजा स्थळी लोकांच्या वागणुकीवर निर्बंध घालण्याचे अधिकार,  सार्वजनिक रस्त्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी वाद्य वाजवणे, गाणी गाणे, ढोल ताशे वाजविणे इत्यादी निर्बंध घालण्याचे अधिकार, रस्ते व इतर सर्व सार्वजनिक ठिकाणी सुव्यवस्था ठेवण्यासाठी निर्देश देण्याचे अधिकार, सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर लाऊड स्पीकर वाजविण्यावर

निर्बंध तसेच मर्यादा घालण्याचे अधिकार, तसेच कलम 33, 35 ते 40 व 45 मुंबई पोलिस अधिनियमान्वये काढण्यात आलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे व सूचना देण्याचे अधिकार प्रदान करण्यात येत आहे.

सदर आदेश लागू असतांना सभा, मिरवणुकीत वाद्य वाजवणे, लाऊड स्पीकर वाजविणे, मिरवणुकीत नारे लावणे, मिरवणुकीचा रस्ता व वेळ निर्धारित करण्यासाठी संबंधित ठाणे अंमलदार यांची परवानगी घ्यावी. सर्व बाबतीत पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच त्यांच्यापेक्षा कनिष्ठ दर्जाचे सर्व पोलिस अधिकारी यांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करावे. सदर आदेश दि. 29 ऑगस्ट 2021 चे रात्री 12 वाजेपासून दि. 1 सप्टेंबर चे रात्री 12 वाजेपर्यंतच्या कालावधीपर्यंत अंमलात राहील.

00000