Search This Blog

Monday 19 August 2019

कौशल्य विकास मार्गदर्शन केंद्रात सत्कार व मार्गदर्शन समारंभ


शासनाच्या कौशल्य विकास मार्गदर्शन केंद्रामुळे नोकरी मिळवता आली : पूजा गरमळे

चंद्रपूरदि. 19 ऑगस्ट: वडील वाढई काम करत असल्याने घरची आर्थिक स्थिती फरशी मजबूत नव्हती. त्यामुळे पैसे भरून स्पर्धा परीक्षांचे क्लासेस लावता येत नव्हते. परंतु शासनाच्या आदिवासी मुलांसाठी स्पर्धा परीक्षा मोफत मार्गदर्शन केंद्रातील अनुभवी शिक्षक तसेच अधिकारी यांच्या मार्गदर्शनामुळे मला  नोकरी मिळवता आलीअशी भावना 2017 यावर्षी वर्धा येथे कारागृह पोलीस शिपाई म्हणून रुजू झालेल्या पूजा मधुकर गरमडे यांनी व्यक्त केली. दिनांक 19 ऑगस्ट 2019 रोजी जिल्हा कौशल्य विभागाच्या कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्रातील यशस्वी माजी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्रामार्फत जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना साडेतीन महिने स्पर्धापरीक्षेविषयी मार्गदर्शनाचे मोफत वर्ग आयोजित केले जातात. तसेच त्यांना प्रतिमहिना एक हजार रुपये मानधनही दिले जाते. अशाच 2015-16 च्या बॅचमधील पूजा गरमडे यांनी प्रशिक्षण घेतले व 2017 च्या पोलिस भरतीमध्ये त्यांची पोलीस कॉन्स्टेबल म्हणून निवड झाली. त्यामुळे तिच्या सत्कार समारंभाचा कार्यक्रम आज प्रशिक्षण केंद्रात आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी तिने आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा कौशल्य विभागाच्या कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक भैयाजी येरमे यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक  केले तसेच उपस्थित  विद्यार्थ्यांना संबोधित केले .त्यामध्ये त्यांनी  अनुसूचित जमातीच्या  विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शन केंद्राचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा व सतत आपली प्रगती करत राहावीअसे आवाहन  केले.
याप्रसंगी उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी भाग्यश्री वाघमारेप्रियंका कन्नाके तसेच केंद्रातील प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशांत जिवतोडे यांनी तर प्रास्ताविक सचिन सावसाकडे व आभार विजय गराटे यांनी मानले.
000

चंद्रपूर येथे बँक ऑफ इंडिया तर्फे ग्राहक संमेलन


चंद्रपूरदि. 19 ऑगस्ट: अर्थव्यवस्थेला चालना देण्याकरिता बँकेच्या विविध उत्पादनाची  उपभोग करण्याकरिता ग्राहकांना प्रोत्साहित करण्यातसाठी चंद्रपूर येथे बँक ऑफ इंडिया तसेच चंद्रपूर क्षेत्रीय कार्यालयातर्फे जिल्ह्यातील सर्व ग्राहकांसाठी ग्राहक संमेलन 14 ऑगस्ट 2019रोजी आयोजित करण्यात आले. यावेळी बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक जयेश दाभाडे अग्रणी जिल्हा प्रबंधक एस. एन. झा यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी उपस्थित ग्राहकांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. ग्राहकांना बँकेच्या इतिहासाबद्दल थोडक्यात माहिती देण्यात आली. जिल्ह्यात बँकेच्या 37 शाखा असून 1971 पासून जिल्ह्यातील विकासात बँक अग्रणी भूमिका राबवत आहे. ग्राहकांना बँकेच्या व केंद्र शासनाच्या विविध योजनांची अद्यावत माहिती देण्यात आली. केंद्र शासनाच्या नामांकित योजना जसे प्रधानमंत्री मुद्रा योजनावित्तीय समायोजन जसे प्रधानमंत्री जनधन योजनाप्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजनाप्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनाअटल पेन्शन योजना याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली.
 तसेच बँकेच्या विविध ठेवी योजनात्यावर मिळणारे व्याजदरवरिष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध फायदे व व्याजदर याबद्दल सविस्तर माहिती ग्राहकांना देण्यात आली. केंद्र सरकारच्या डिजिटल धोरणाची पृष्ठभूमी व भविष्यात त्याचा होणारा विस्तार आणि व्यापाबद्दल सांगण्यात आले. त्याचप्रमाणे बँकेच्या विविध डिजिटल उत्पादनाबद्दल जसे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, पॉस मशीन, इंटरनेट बँकिंग, पिक कर्ज व अन्य कृषी कार्याकरिता मिळणाऱ्या विविध कर्ज व नवीन अग्री वेल्कम ऑफर बद्दल माहिती देण्यात आली. सुक्ष्मलघु व मध्यम उद्योगाकरिता बँकेच्या विविध योजनायामध्ये एसएमई वेलकम ऑफरकॉर्पोरेट वेलकम ऑफरएसएमई रिक्षाकॉन्ट्रॅक्टर क्रेडिट लाईनएसएमई डॉक्टर प्लसएसएमई ऑटो एक्सप्रेसएसएमई लिक्विड प्लसएसएमई एज्युकेशन प्लसस्टार व्यापारस्टॅन्ड अप इंडियास्टार्ट अप इंडियाजीएसटी प्लसस्टार लघु उद्यमी समेकीत लोनआर्टिझन क्रेडिट कार्डप्रियदर्शनी योजना याबद्दल ग्राहकांना माहिती देण्यात आली. याप्रसंगी ग्राहकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील देण्यात आली व त्यांच्या शंकांचे समाधान करण्यात आले. यावेळी बँक ऑफ इंडियाच्या क्षेत्रीय कार्यालयाचे कर्मचारी तसेच अग्रणी कार्यालयाचे कर्मचारी व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000

निमा चंद्रपूर शाखेतर्फे पुरग्रस्तांना मदत


मदतीसाठी सर्वानी पुढे येण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
          
             चंद्रपूरदि. 17 ऑगस्ट : महाराष्ट्रातील विविध  जिल्ह्यांत  अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले. कित्येक कुटुंबांची वाताहात झाली. पुरग्रस्त भागातील विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी व सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) या डॉक्टरांच्या चंद्रपूर शाखेने आपल्या सदस्यांतर्फे  रूपये  पंचवीस हजार २५०००/- चे धनादेश चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांचेकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यासाठी सुपुर्द केले.
           मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये हा निधी जमा करण्यात येणार आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांना या घटनाक्रमामध्ये पुराची झळ पोहोचली आहे. त्यामुळे  जिल्ह्यातील विविध संस्था दानशूर व्यक्ती नागरिकांनी निसर्गाच्या या धक्क्यातून सावरण्यासाठी  मदत करावी,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे. मुख्यमंत्री सहायता निधीच्या मार्फत ही मदत  पूरग्रस्तांना पर्यंत पोहोचवण्यात येईलअशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली आहे. निमा संघटनेने पुढे येऊन ही मदत केल्याबद्दल या संस्थेचे कौतुक जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
    निमा चंद्रपूर शाखेने मागच्या  वर्षी सुध्दा  केरळ पुरग्रस्तांसाठी मदत   एकवीस हजार रुपये जिल्हाधिकारी  मार्फत  पाठविले  होते.
           यावेळी  चंद्रपूर  निमा  शाखेचे  अध्यक्ष डॉ. लक्ष्मीनारायण सरबेरेसचीव डॉ विजय भंडारीकोषाध्यक्ष डॉ अमित कोसुरकरनिमा केंद्रीय शाखेचे  वरिष्ठ  उपाध्यक्ष डॉ. राजु ताटेवारनिमा महाराष्ट्र राज्य शाखेचे सहसचिव डॉ. दिपक भट्टाचार्यनागपूर विभागीय  सचिव डॉ. सुधीर मत्तेसदस्य डॉ मनोहर लेनगुरेडॉ. यशवंत सहारेडॉ. मेघराज  चंदनानीडॉ. भूपेंद्र लोढीयाडॉ. प्रदीप मोहुर्लेडॉ. स्वप्न दासडॉ. प्रदीप ठाकरेडॉ. नितीन बिश्वासडॉ. गोपाल सरबेरेडॉ. नेकचंद खांडेकरडॉ.शील दुधेडॉ कुणाल पांढरेडॉ रूपेश कुमरवारडॉ. वैभव अडगुरवारडॉ. दिपाली चिंतावारडॉ. अमृता बदनोरे यांची उपस्थिती होती.

00000000

समान हक्काची ,सशक्त स्त्री समाजासाठी आवश्यक : अमृता फडणवीस




चिमूरच्या क्रांती भूमीत हजारो महिलांच्या साक्षीने शहिदांना अभिवादन
शहीद दिनरक्षाबंधन कार्यक्रमाचे चिमूरमध्ये शानदार आयोजन
दिवंगत प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांना क्रांती भूमीत अभिवादन
चिमूर दि. 16 ऑगस्ट (जि. चंद्रपूर ): चिमूरच्या क्रांतिभूमीमध्ये शहिदांना अभिवादन करताना जमलेल्या तमाम महिला भगिनींना माझी विनंती आहे कीत्यांनी रक्षाबंधनाला आपल्या भावाकडून समान हक्काच्यासशक्त स्त्री समाजाच्या निर्मितीचे अभिवचन घ्यावेतशी ग्वाही आपल्या भावाकडून घ्यावी व आपणही त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावीअसे आवाहन श्रीमती अमृता फडणवीस यांनी आज येथे केले. चिमूरच्या क्रांतिभूमीत शहिदांना अभिवादन केल्यानंतर हजारोच्या संख्येने जमलेल्या महिला समुदायाला संबोधित करताना त्या बोलत होत्या.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दरवर्षी क्रांती दिनाला चिमूर येथे शहिदांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. या वर्षी त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती अमृता फडणवीस या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या होत्या. चिमूरच्या बीपीएड कॉलेज मैदानावर आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्या मार्गदर्शनात शहिदांना आदरांजलीरक्षाबंधन तसेच दिवंगत प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रथम पुण्यतिथी दिनाला अभिवादन करण्याचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला परिसरातील हजारोच्या संख्येने महिला प्रामुख्याने उपस्थित होत्या.
यावेळी व्यासपीठावर चिमूर गडचिरोलीचे खासदार अशोक नेतेजिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळेमाजी आमदार मितेश कुमार भांगडियाज्येष्ठ नेते रवी भुसारीजिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष क्रिष्णा सहारेवसंत  वारजुरकरमायाताई नन्नावरे ,डॉ. दीपक यावले,सुमनताई पिंपळापुरेनगराध्यक्ष उमाजी हीरेगणेश तळवेकररेखाताई कारेकारमनोज मामीडवार यांच्यासह चिमूर क्रांतीतील शहीदांचे नातेवाईक व्यासपीठावर उपस्थितीत होते.
दुपारी तीन वाजता अमृता फडणवीस यांचे चिमूर येथे आगमन झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम शहिदांना हुतात्मा स्मारककिल्ल्यावरील शहीद स्मारक येथे अभिवादन केले. या ठिकाणी शहिदांच्या पुतळ्यांना अभिवादन केले.  तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर येथील बीपीएड कॉलेज मैदानावर आयोजित जाहीर सभेमध्ये उपस्थित महिलांना संबोधित केले.
दरवर्षी 16 ऑगस्ट रोजी येथे क्रांती भूमीत शहिदांना अभिवादन केल्या जाते. चिमूर येथे 16 ऑगस्ट 1942 रोजी इंग्रजांविरुद्ध उठाव झाला होता या लढ्याचे हे 77 वर्ष आहे.
 आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी रक्षाबंधनानिमित्त या वर्षी परिसरातील महिलांना या सोहळ्यासाठी खास आमंत्रित केले होते. त्यामुळे मोठ्या संख्येने महिला एकत्रित झाल्या होत्या. यावेळी महिलांना संबोधित करताना अमृता फडणवीस यांनी सर्वप्रथम दिवंगत प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांना अभिवादन केले. या देशाला लाभलेले अतिशय हळवेकविमनाचे मात्र तेवढेच कणखर प्रधानमंत्री म्हणून ते इतिहासात अमर आहेत. या देशाच्या परराष्ट्र धोरणालाआर्थिक संपन्नतेला व शैक्षणिक प्रगतीला त्यांच्या काळात गती मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
अमृता फडणवीस यांच्या भाषणापूर्वी सर्व वक्त्यांनी रक्षाबंधनानिमित्त बहिणीच्या रक्षणाचे अभिवचन आपल्या भाषणात दिले होते. हा धागा पकडून त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करताना आता भावांकडून केवळ रक्षा करण्याचे आश्वासन नकोतर समानतेने ,समान अधिकारानेप्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या बहिणीला अज्ञानापासूनगरिबीपासूनवाईट प्रथापरंपरेपासून रक्षण करण्याचे अभिवचन आपल्या भावांकडून घ्यावेअसे आव्हान त्यांनी यावेळी महिलांना केले.
यावेळी उपस्थित महिलांशी संवाद सांगतांना त्या म्हणाल्याया ठिकाणी ज्या महिला आल्या आहेत.त्यांनी विशेषत: आपल्या मुलींच्या शिक्षणाकडे अधिक लक्ष द्यावे. मुलगा-मुलगी समान असे धोरण अवलंबून मुलींना देखील त्याच सक्षमतेने समाजापुढे उभे करावेप्रगत देशासाठी सशक्त महिला समाज अतिशय आवश्यक आहे. प्रत्येक महिलेने त्यासाठी वेगळे काहीतरी केले पाहिजे. आज शहिदांना अभिवादन करून क्रांतिभूमीमधून घरी परत जाताना सक्षम महिला जगाच्या निर्मितीचा  निश्चय करावा. आपल्या गावाचेआपल्या शहराचेआपल्या भागाचेनाव जागतिक स्तरावर नेण्यासाठी स्त्रियांनी पुढे यावे.
आपल्या स्त्री सक्षमीकरणाचा मुद्दा आणखी समर्थपणे मांडताना त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप दिवंगत प्रधानमंत्री अटल बिहारी बाजपेयी यांच्या "कदम मिला कर चलना होगा " या कवितेच्या ओळीने केला.
या कार्यक्रमाचे आयोजक कीर्तीकुमार उपाख्य बंटी भांगडिया यांनी संबोधित करताना रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाच्या आवाहनानंतर मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या आपल्या मतदारसंघातील भगिनींचे आभार मानले. यावेळी पंचायत समिती प्रशासकीय इमारतसामाजिक न्याय विभागांतर्गत नवनिर्मित चिमूर येथील शासकीय मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह,  चिमूर वडाळा पैकु येथील शहीद बालाजी रायपूरकर यांच्या भव्य सभागृह आणि महावितरण अंतर्गत नवनिर्मिती चिमूर तालुक्यातील जांभुळ घाट येथील 33 केव्ही उपकेंद्राचे लोकार्पण अमृता फडणवीस यांच्या हस्ते झाल्याची घोषणा केली.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपालक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात चिमूर मतदारसंघांमध्ये गेल्या पाच वर्षात झालेल्या विकास कामाचा आढावा सादर केला. मुख्यमंत्री महोदयांनी नव्या जिल्ह्यांच्या घोषणेमध्ये चिमूरला अग्रस्थान दिले आहे. ज्यावेळी राज्यातील अन्य जिल्ह्याची घोषणा होईल त्यात चिमूर जिल्हा असेल असे स्पष्ट अभिवचन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची आठवण उपस्थित जनसमुदायाला दिली. तसेच चिमूर येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय व उपविभागीय पोलिस अधिकारी पदाची निर्मिती झाली असल्याचे सांगितले. चिमूरच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. यावेळी माजी आमदार मितेश कुमार भांगडियाज्येष्ठ नेते रवी भुसारी यांनी देखील संबोधित केले. खासदार अशोक नेते यांनी यावेळी उपस्थित जनसमुदायाचे लोकसभा विजयासाठी आभार मानले. तसेच या मतदारसंघांमध्ये रेल्वेचे जाळे अधिक घट्ट करण्यासाठी आपण वचनबद्ध असून त्यासाठी संसदेच्या पटलावर प्रयत्न करणार असल्याचे अभिवचन त्यांनी यावेळी दिले. राष्ट्रगीताने या कार्यक्रमाचा समारोप झाला.
0000000

Thursday 15 August 2019

पाच वर्षात जिल्ह्याला पाणीदार बनवण्याकरिता जलसत्याग्रह चळवळ सुरू करणार : ना. सुधीर मुनगंटीवार







आठ दिवसात चंद्रपूर जिल्हा राज्यातील पहिला गॅस युक्त जिल्हा
जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिन सोहळा
चंद्रपूरदि. 15 ऑगस्ट: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांनी  शेतकऱ्यांचे उत्पन्न  दुप्पट करण्याचे स्वप्न बघितले असून त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यात विविध सिंचन प्रकल्प पूर्णत्वास आले आहे. जलसाक्षरता अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील 870 ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून जिल्हा पाणीदार करण्यासाठी जलसत्याग्रह चळवळ उभी करण्यात येणार असून याकरिता सर्वांनी सहकार्य करावेअसे आवाहन राज्याचे वित्तनियोजन विशेष सहाय्यवनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. भारतीय स्वातंत्र्याचा 72 व्या वर्धापन दिन सोहळ्याचे शानदार आयोजन जिल्ह्याधिकारी कार्यालयात करण्यात आले होते.यावेळी ते बोलत होते. या सोहळ्याला खासदार  सुरेश उर्फ बाळूभाऊ धानोरकरचंद्रपूर विधानसभाचे आमदार  नानाभाऊ श्यामकुळेजिल्हा परिषदेचे अध्यक्ष  देवराव भोंगळेमहापौर अंजलीताई घोटेकरजिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनारजिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डीमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिलेअतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रेनिवासी उपजिल्हाधिकारी घनश्याम भुगावकरव जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरस्वातंत्र्य संग्राम सैनिक प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले कीशाहिदांनी प्राणाची आहुती देऊन स्वातंत्र्याचा मंगल  कलश आपल्या हाती दिला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटल्याप्रमाणे या दिवशी आपल्याला काय अधिकार मिळाले याचा विचार न करता भारत निर्माण करिता कर्तव्याचा विचार करणे आवश्यक आहे. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या या देशात स्वतःचा परिचय भारत देशाच्या नावाने द्यायचा महत्वपूर्ण निर्णय प्रधानमंत्र्यांनी घेतला आहे. जिल्ह्याचा विचार केल्यास येथील जनतेने जिल्हा पुढे जावा याकरिता भरपूर प्रयत्न केले आहेत. महाराष्ट्र सरकारने अनेक योजना राबवलेल्या असून  बीपीएल मध्ये नाव नसेल तरीही 2 रुपये 3 रुपये किलो अन्नधान्याचे वाटप करण्यासाठी निर्णय घेतलेला आहे. तसेच संपूर्ण राज्य चूलमुक्त व धूरमुक्त करून गॅसयुक्त करण्याकरिता अभियान राबवलेले आहे. जनसामान्यांना गॅस कनेक्शन देण्यात  राज्यात आपला जिल्हा प्रथम क्रमांकावर असून यावेळी घोषित करू इच्छितो की येत्या आठ दिवसात चंद्रपूर जिल्हा गॅस युक्त झालेला राज्यातील पहिला जिल्हा असेल.
जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या विकासाकरिता विविध सिंचन योजना पूर्णत्वास आल्या असून यामध्ये चीचडोह प्रकल्पामुळे चंद्रपूर तसेच गडचिरोली जिल्ह्याला फायदा होणार आहे. सोबतच कोटगलपळसगाव-आमडीचिंचाळा प्रकल्पही पूर्णत्वास आले आहे. मोठ्या प्रमाणावर बंधाऱ्याचे काम या जिल्ह्यात सुरू झाले आहेत. प्रत्येकाच्या शेतापर्यंत पाणी पोहचून आपला जिल्हा येत्या पाच वर्षात पाणीदार व्हावा याकरिता संकल्प केला असून 4 ऑगस्ट रोजी जलपुरुष राजेंद्र सिंह व सुप्रसिद्ध अभिनेता आमिर खान यांच्या उपस्थितीत जलसाक्षरता अभियानाला गती देण्यासाठी संकल्प केला असून जिल्ह्यातील 870 ग्रामपंचायतीच्या सहभागाने जलसत्याग्रह चळवळ सुरू करण्यात येणार आहे. याकरिता सर्वांनी सहकार्य करावेअसे आवाहन त्यांनी यावेळी केले.
राज्यातील निराधारविधवाघटस्फोटितापरित्यक्ता महिलांचे अनुदान 600 रुपयेहुन  1000 रुपये व दोन मुले असल्यास 1200 रुपये पर्यंत वाढवले आहे. अण्णाभाऊ साठे यांचे हे शंभरावे जयंती वर्ष असून त्यांच्या नावाने भारतीय डाक विभागाशी  प्रयत्नपूर्वक  संपर्क करून डाक तिकीट सुरू केले आहे. त्यांचं प्रसिद्ध असणारे वाक्य हे आझादी झुठी है देश कि जनता भुकी है उच्चारले होते. त्यांच्या जयंतीचे शंभरावे वर्ष साजरा करताना आपल्या जिल्ह्यात कोणीही उपाशी राहू नये. याकरिता सर्वांनी संकल्प करावाअसे आवाहन त्यांनी यावेळी केले.
            सोबतच महात्मा गांधींचे हे 150 वे जयंती वर्ष आहे. 1923 मध्ये महात्मा गांधी या जिल्ह्यात दोन दिवस मुक्कामी होते. त्यावेळी त्यांनी नागविदर्भ चरखा  समिती सोबतच देशात स्वदेशी चळवळ राबविण्याकरिता अनेक उपक्रम सुरू केले. महाराष्ट्र सरकारने सोलर चरख्याकरिता 8 कोटी 90 लाख रुपयांची तरतूद केली आहे. यूपीएससी एमपीएससी परीक्षेत जिल्ह्यातील विद्यार्थी पास होऊन आयएएसआयपीएसआयआरएसआयएफएस व्हावेत याकरिता मिशन सेवा हा उपक्रम सुरू केला आहे. तसेच जिल्ह्यातील युवकांनी 2024 मधील ऑलिंपिक मध्ये पदक मिळावे याकरिता मिशन शक्ती अभियान सुरू केले आहे. मिशन शौर्यच्या माध्यमातून जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर केले आहे. जिल्ह्यात मिशन मंथनची सुरुवात करण्यात येणार असून या माध्यमातून आयआयटी संस्थांशी सामंजस्य करार करण्यात येणार आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आयआयटीसाठी प्रशिक्षित करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील युवक इन्कम टॅक्स भरतील. मिशन सक्षम महिला या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील बचत गटांसाठी  विविध योजना राबविण्यात येत आहे. माजी प्रधानमंत्री स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान असा नारा दिलातर स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनी जय जवान जय किसान जय विज्ञान असा नारा दिला. तर आजचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जय जवान जय किसान जय विज्ञान जय अनुसंधान असा नारा दिला आहे. याला अनुसरून देशात विविध अनुसंधान केंद्रे स्थापन करण्यात येणार असून महाराष्ट्रात दोन अनुसंधान केंद्र यवतमाळ व चंद्रपूर येथे स्थापन करण्यात येणार आहे. याकरिता टाटा ट्रस्टशी सामंजस्य करार करण्यात आला असून 189 कोटी रुपये या अनुसंधान केंद्रासाठी टाटा ट्रस्टने दिले आहेतअशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
चंद्रपूर जिल्हा प्रत्येक जाती-धर्माचा सन्मान करणारा जिल्हा आहे. जिल्ह्यात सैनिकी शाळा सुरू झाली असून भविष्यातील आर्मीचीफ व लष्कराच्या वरिष्ठ पदावर असलेला अधिकारी चंद्रपूर जिल्ह्यातील सैनिकी शाळेत शिकलेला असेलतेव्हा आपल्यासाठी अभिमानाची बाब असेल. जागतिक सोयीसुविधांनी परिपूर्ण अशी वनअकादमी निर्माण करण्यात आली आहे. बीआरटीसीच्या माध्यमातून विविध प्रकल्प राबवले जात आहे. वैद्यकीय महाविद्यालय व कॅन्सर हॉस्पिटल तयार करण्यात येणार येत आहे. बांबू हँडीक्राफ्ट आर्ट युनिटच्या माध्यमातून अगरबत्ती प्रकल्प सुरू केलेला आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक प्रकल्प सुरू करण्यात येणार असून सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. कारण जिल्ह्याचा गौरव वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा तेव्हाच देशात जिल्ह्याचा गौरव वाढेलअसे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
या सोहळ्यात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या अनेक कर्मचारी व अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये जिल्हा नियोजन विभागात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मुजीब शेखअशोक राऊतज्ञानू लवटेअजय राठोड तसेच शंभर टक्केपेक्षा जास्त महसूल गोळा केल्याबद्दल अनुप हंडाभारवी जिवनेआशिष राठोडरमेश गुज्जनवारपौर्णिमा उईकेगजानन भुरसेभगवान रणदिवेअरविंद डाहुलेसूर्यकांत ढाकणेप्रफुल्ल चिडेविभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभागामार्फत सीमा मामीडवार छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत उथळपेठआठवीमध्ये राज्य गुणवत्ता यादीमध्ये नववे स्थान संपादन केल्याबाबत वेदांत येरेकरआरोग्य विभागात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल डॉ. सूर्यकांत बाबरडॉ. जिनी पटेलडॉ. उल्हास सरोदेसंवर्ग विकास अधिकारी श्री. बागडीडॉ. संदीप गेडामडॉ. सुधीर मेश्रामछाया पाटीलकेंद्र शासनाचे गृह विभागाकडून उत्तम जीवन रक्षा पदक प्राप्त डॉ. चरणजीतसिंग सलुजापोलीस विभागामार्फत शेखर देशमुखहृदयनारायण यादवप्रकाश कोकाटेस्वप्निल धुळेदीपक गोतमारेकिसन शेळकेविठ्ठल मुत्यमवारधर्मेंद्र जोशीए. एम. सय्यदमहेश कोंडावारमहेंद्र आंभोरेप्रशांत केदारविकास मुंडेनीलेश वाघमारेसंदीप कापडेसंदीप मिश्रादिलीप लोखंडेआकाशकुमार  साखरेतीर्थराज निंबेकरसुधीर बंडावारकुणाल रामटेके यांना विशेष सेवा पदक तर भीमा वाकडेरमेश पढालएस. खैरकर यांना महासंचालक यांचे विशेष सन्मान चिन्ह पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. उत्कृष्ट कार्यालयीन कामाकरिता विवेक कोहळे तसेच आपत्ती निवारणाकरिता शोध व बचाव पथकाचाही यावेळी सन्मान करण्यात आला. यामध्ये  सुनील नागतोडे,  शरद बनकर,  गजानन पांडे,  अजय यादव,  राहुल पाटील,  विपिन निंबाळकर,  मयूर चहारे,  मोरेश्वर भरडकर,  निळकंठ चौधरी,  राष्ट्रपाल नाईक,  पुंडलिक ताकसांडेटी.डी. मेश्राम,  इन्द्रपाल बैसके.  एम. वलेकरव्ही. एन. ढुमणे यांचा समावेश आहे.
चांदा- कृषी मोबाईल अॅपचे उद्घाटन
            ध्वजारोहणाच्या मुख्य कार्यक्रमानंतर कृषी ॲपचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय व आत्मा कार्यालय यांच्यावतीने चांदा कृषी मोबाईल ॲप सुरू करण्यात आले. या ॲपच्या मार्फत जिल्ह्यातील विविध कृषी योजना तसेच लाभार्थ्यांची माहितीकृषी विषयक सल्लाशेतकऱ्यांनी साकारलेले प्रयोगत्यांच्या यशकथा याबाबतची माहिती या ॲप मार्फत दिली जाणार आहे.
        यावेळी पालकमंत्री यांनी कृषी विभागातील सर्व अधिकाऱ्यांना संबोधित करताना शासकीय नव्हे मानवीय दृष्टिकोनातून काम करावेअसे आवाहन केले. कृषी ॲप हा दीर्घकाळ चालावा व यावर टाकण्यात येणाऱ्या पोस्टच्या माध्यमातून शेतकऱ्यांची अधिकाधिक सेवा व्हावीअशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.उदय पाटीलकृषी उपसंचालक रवींद्र मनोहरे  यांची उपस्थिती होते.
यावेळी पालकमंत्र्यांनी स्वातंत्र्य सैनिकांची भेट घेतली तसेच वृक्षारोपण करून रुग्णवाहिकेचा लोकार्पणसोहळा पार पाडण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सभापती व सदस्यपंचायत समिती सभापती व सदस्यमहानगरपालिका सदस्य विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000