मदतीसाठी सर्वानी पुढे येण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
चंद्रपूर, दि. 17 ऑगस्ट : महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले. कित्येक कुटुंबांची वाताहात झाली. पुरग्रस्त भागातील विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी व सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) या डॉक्टरांच्या चंद्रपूर शाखेने आपल्या सदस्यांतर्फे रूपये पंचवीस हजार २५०००/- चे धनादेश चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांचेकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यासाठी सुपुर्द केले.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये हा निधी जमा करण्यात येणार आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांना या घटनाक्रमामध्ये पुराची झळ पोहोचली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध संस्था दानशूर व्यक्ती नागरिकांनी निसर्गाच्या या धक्क्यातून सावरण्यासाठी मदत करावी,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे. मुख्यमंत्री सहायता निधीच्या मार्फत ही मदत पूरग्रस्तांना पर्यंत पोहोचवण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली आहे. निमा संघटनेने पुढे येऊन ही मदत केल्याबद्दल या संस्थेचे कौतुक जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
निमा चंद्रपूर शाखेने मागच्या वर्षी सुध्दा केरळ पुरग्रस्तांसाठी मदत एकवीस हजार रुपये जिल्हाधिकारी मार्फत पाठविले होते.
यावेळी चंद्रपूर निमा शाखेचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीनारायण सरबेरे, सचीव डॉ विजय भंडारी, कोषाध्यक्ष डॉ अमित कोसुरकर, निमा केंद्रीय शाखेचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. राजु ताटेवार, निमा महाराष्ट्र राज्य शाखेचे सहसचिव डॉ. दिपक भट्टाचार्य, नागपूर विभागीय सचिव डॉ. सुधीर मत्ते, सदस्य डॉ मनोहर लेनगुरे, डॉ. यशवंत सहारे, डॉ. मेघराज चंदनानी, डॉ. भूपेंद्र लोढीया, डॉ. प्रदीप मोहुर्ले, डॉ. स्वप्न दास, डॉ. प्रदीप ठाकरे, डॉ. नितीन बिश्वास, डॉ. गोपाल सरबेरे, डॉ. नेकचंद खांडेकर, डॉ.शील दुधे, डॉ कुणाल पांढरे, डॉ रूपेश कुमरवार, डॉ. वैभव अडगुरवार, डॉ. दिपाली चिंतावार, डॉ. अमृता बदनोरे यांची उपस्थिती होती.
00000000
No comments:
Post a Comment