Search This Blog

Monday 31 May 2021

पॉझिटीव्हीटी दर 10 पेक्षा कमी झाला तरच निर्बंध होणार शिथील

 

पॉझिटीव्हीटी दर 10 पेक्षा कमी झाला तरच निर्बंध होणार शिथील

Ø नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

Ø निर्बंधाबाबत यापूर्वीच्याच आदेशाला मुदतवाढ

चंद्रपूरदि.31 मे : कोरोनाची मानवी साखळी तोडण्यासाठी तसेच प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्यावतीने काही निर्बंध घालण्यात आले आहे. या निर्बंधास जिल्ह्यात 15 जून 2021 च्या सकाळी 7 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

शासनाच्या 30 मे च्या सुधारीत निर्देशाप्रमाणे जिल्हास्तरावर निर्बंध शिथिल करण्याची मुख्य अट म्हणजे जिल्ह्याचा मागील आठवडयाचा पॉझिटीव्हीटी दर हा 10 किंवा त्यापेक्षा कमी असला पाहिजे. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात हा दर 10 पेक्षा जास्त असल्यामुळे मागील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहे.

      तसेच निर्बंध शिथिल करण्याची दुसरी अट म्हणजे जिल्ह्यात एकूण ऑक्सीजन बेडच्या 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त  ऑक्सीजन बेड रिक्त असणे आवश्यक आहे. निर्बंधात शिथिलता आणण्यासाठी पॉझिटीव्हीटी दर हा 10 किंवा त्यापेक्षा कमी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे यापूर्वी निर्गमित केलेल्या आदेशास जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी 15 जून 2021 च्या सकाळी 7 वाजेपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

आजपासून (दि.31) येत्या शुक्रवारपर्यंत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10 किंवा त्यापेक्षा खाली आला तर शासनाच्या सुधारीत निर्देशाप्रमाणे जिल्ह्याला दिलासा मिळू शकतो. त्याकरीता नागरिकांचे सहकार्य आवश्यक असून नागरिकांनी कोरोना बाबतच्या नियमांचे पालन करावे. दैनंदिन मास्कचा वापर, वारंवार हात स्वच्छ धुणे, गर्दी टाळणे, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.

            सर्व संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुखांनी उपरोक्त आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. सदर आदेशाची कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा संघटना यांनी अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा, भारतीय दंड संहिता तसेच साथरोग नियंत्रण कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

000000


जिल्ह्यात बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या 374 ने जास्त

 

जिल्ह्यात बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या 374 ने जास्त

Ø गत 24 तासात  553 कोरोनामुक्त, 179 पॉझिटिव्ह तर 06 मृत्यू

चंद्रपूर, दि.31 मे : जिल्ह्यात गत 24 तासात 553 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 179 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली असून बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या 374 ने जास्त आहे. तसेच जिल्हयात  6 बाधितांचा मृत्यू झाला आहे.

आज (दि. 31) बाधित आलेल्या 179 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पा‍लिका क्षेत्रातील 48रुग्ण, चंद्रपूर तालुका 28, बल्लारपूर 28, भद्रावती 09, ब्रम्हपुरी 10, नागभिड 03, सिंदेवाही 08, मूल 16, सावली 02, पोंभूर्णा 01, गोंडपिपरी 04, राजूरा 02, चिमूर 00, वरोरा 04, कोरपना 07, जिवती 02 व इतर ठिकाणच्या 07 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 82 हजार 784 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 78 हजार 739 झाली आहे. सध्या 2हजार 598 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 71 हजार 286 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 86 हजार 229 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

 जिल्ह्यात आतापर्यंत 1447 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 1342, तेलंगणा दोन, बुलडाणा एक, गडचिरोली 38, यवतमाळ 48, भंडारा 11, वर्धा एक, गोंदिया दोन आणि नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील 45 वर्षीय महिला. भद्रावती तालुक्यातील चिंचोली येथील 60 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला, समर्थ वार्ड येथील 65 वर्षीय पुरुष. राजुरा तालुक्यातील देशपांडे वाडी परिसरातील 50 वर्षीय महिला. तर गोंडपिपरी तालुक्यातील किरमिरी येथील 45 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

प्रशासनाचे आवाहन : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला किंवा कोरोना पूर्णपणे संपला, या मानसिकतेतून नागरिकांनी बाहेर यावे. कोरोनाची मानवी साखळी तोडण्यासाठी दैनंदिन मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे, या त्रिसुत्रीचा नियमित वापर करावा. तसेच स्वत:ची व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी. 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

०००००००

म्युकरमायकोसीस हा संसर्गजन्य आजार नाही

 

म्युकरमायकोसीस हा संसर्गजन्य आजार नाही

Ø कोव्हीड पश्चात 16796 जणांना कॉल तर 21193 जणांना एसएमएस

Ø  लक्षणे आढळताच उपचार घेण्याचे आवाहन

चंद्रपूर दि. 31 मे : कोविडचा प्रादुर्भाव हा एकमेकांच्या संपर्कात आल्याने होत असला तरी कोविड पश्चात होणारा म्युकरमायकोसीस हा आजार संसर्गजन्य नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता लक्षणे आढळताच त्वरीत वैद्यकीय उपचार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे. विशेष म्हणजे कोव्हीडमधून बरे झालेल्या 16796 जणांना कॉल तर 21193 जणांना म्युकरमायकोसीस बाबत जिल्हा प्रशासनाच्यावतीने एसएमएस करण्यात आला आहे.

जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या प्रसाराबाबत नागरिकांच्या शंकांचे व समस्यांचे समाधान करण्यासाठी आणि कार्यवाहीत सुसूत्रता आणण्यासाठी कॉल सेंटर स्थापन करण्यात आले आहे. या कॉल सेंटरच्या माध्यमातून  कोरोना आजारातून बरे झालेल्या आतापर्यंत 16 हजार 796 रुग्णांना कॉल करण्यात आले आहे. त्यापैकी 36 लोकांमध्ये म्युकरमायकोसीस सदृश्य लक्षणे आढळून आलेली असून सदर रुग्णांना उपचारासाठी डॉ.वासाडे रुग्णालय व क्राईस्ट रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी काही रुग्णांवर शस्त्रक्रिया देखील करण्यात आल्या आहेत.

            जिल्ह्यात आतापर्यंत म्युकरमायकोसीस  आजाराचे  69 रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 56 रुग्णांवर उपचार सुरू असून 12 रुग्ण या आजारातून बरे झाले. तर एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णांना म्युकरमायकोसीस आजाराबाबतची माहिती, लक्षणे व इतर आरोग्यविषयक माहीती देण्यासाठी  जिल्हाधिकारी कार्यालयातील राष्ट्रीय सुचना केंद्रातून माहे मार्च ते एप्रिल या कालावधीत 21 हजार 193 नागरिकांना एसएमएस पाठविण्यात आलेले आहे.

म्युकरमायकोसीसची लक्षणे : 

या रोगाची लक्षणे पुढीलप्रमाणे आहे. चेह-याचे स्नायू दुखणे, चेह-यावर बधिरपणा येणे, अर्धशिशी (डोक्याची एक बाजू दुखणे), नाक चोंदणे, नाकावर सूज येणे, एका नाकपुडीतून रक्तस्त्राव, काळपट स्त्राव येणे, चेहरा अथवा डोळ्यावर सूज येणे, एक पापणी अर्धी बंद होणे, डोळा दुखणे, वरच्या जबड्याचे दात दुखणे किंवा हलू लागणे, अस्पष्ट दिसणे, ताप येणे.

काय करावे (प्रतिबंधात्मक उपाय) :

रक्तातील साखरेवर काटेकोरपणे नियंत्रण ठेवणे, कान, नाक, घसा, नेत्र व दंत तज्ज्ञाकडून एका आठवड्यानंतर तपासणी करणे, वरील लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क करणे, डॉक्टरांनी सांगितल्यापेक्षा जास्त दिवस स्टिरॉईड न घेणे, टूथब्रश / मास्क वरचेवर बदलणे, दिवसातून एकदा गुळण्या करणे, वैयक्तिक व परिसरातील स्वच्छता ठेवणे, जमिनीखाली लागणा-या भाज्या नीट स्वच्छ धुवून खाव्यात. मातीत काम करतांना व खतांचा वापर करतांना पूर्ण बाह्यांचा शर्ट, फुलपॅन्ट, हातात ग्लोव्हज घालावे. तसेच नाकातोंडावर मास्क घालावा.

हे करू नये :

छोट्या छोट्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. घरगुती उपायांचा पर्याय निवडू नये. वैद्यकीय सल्ल्यानेच स्टिरॉईड व इतर औषधांचे सेवन करावे.

०००००००

लसीकरणाचे गावनिहाय नियोजन करा – जिल्हाधिकारी गुल्हाने

 

लसीकरणाचे गावनिहाय नियोजन करा – जिल्हाधिकारी गुल्हाने

Ø काँटॅक्ट ट्रेसिंग व टेस्टिंग वाढविण्याचे निर्देश

चंद्रपूरदि.31 मे : कोविड प्रतिबंधात्मक लस ही पूर्णपणे सुरक्षित आहे. याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. शासकीय यंत्रणेसोबतच सामाजिक संघटना, प्रतिष्ठित नागरिक यांच्यामार्फत लसीकरणाचा संदेश गेला पाहिजे. तसेच जिल्ह्यात जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभागाने गावनिहाय नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोविडबाबत आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, पोलिस उपअधिक्षक शेखर देशमुख, उपजिल्हाधिकारी (रोहयो) पल्लवी घाटगे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश टेकाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत आदी उपस्थित होते.

लसीकरणाबाबत पसरविण्यात येणा-या अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन करून जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने म्हणाले, कोव्हीड लसीकरणाला कमी प्रतिसाद मिळणा-या भागात जास्त लक्ष केंद्रीत करून नागरिकांना लसीकरणाचे महत्व्‍ पटवून द्या. ज्या गावात एकही पॉझेटिव्ह रुग्ण आढळून आला नाही, अशा गावातसुध्दा लसीकरण करणे गरजेचे आहे. चंद्रपूर महानगर पालिकेसह जिल्‍ह्यातील इतर शहरी भागात संबंधित पालिकेने वॉर्डनिहाय नियोजन करून लसीकरणावर भर द्यावा, अशा सुचना त्यांनी केल्या.

सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दर 10 पेक्षा जास्त आहे. काँटॅक्ट ट्रेसिंग आणि टेस्टिंग वाढविली तरच पॉझेटिव्हीटी दर कमी होईल. शिवाय मृत्युदरही कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांच्या तपासण्या करा. जिल्ह्यातील प्रत्येक उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय येथे ऑक्सीजनयुक्त 30-40 बेड तर प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात किमान पाच ते सात बेडचे नियोजन करावे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुस-या लाटेच्या अनुभवातून तिसरी लाट थोपविण्यासाठी प्रत्येक तालुक्यात काय उपलब्ध आहे, आणखी कशाची आवश्यकता आहे आदींचा आढावा घेऊन जिल्हास्तरीय आराखडा तयार करावा. जेणेकरून प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविता येतील, असे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले.

बैठकीला जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम, पालिका प्रशासन अधिकारी अजितकुमार डोके यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

०००००००

Sunday 30 May 2021

जिल्ह्यात कोरोना बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या 255 ने जास्त

 


जिल्ह्यात कोरोना बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या 255 ने जास्त

Ø 24 तासात 553 कोरोनामुक्त298 पॉझिटिव्ह तर 02 मृत्यू

Ø आतापर्यंत 78,186 जणांची कोरोनावर मात

चंद्रपूरदि.30 मे : जिल्ह्यात कोरोनातून बरे होणाऱ्यांच्या संख्येत नियामितपणे वाढ होत असून जिल्ह्यसाठी ही दिलासादायक बाब आहे. गत 24 तासात 553 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 298 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या 255 ने जास्त आहे. तसेच जिल्ह्यात दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

आज (दि. 30) बाधीत आलेल्या 298 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 71 रुग्णचंद्रपूर तालुका 26बल्लारपूर 54भद्रावती 24ब्रम्हपुरी 8नागभिड 02सिंदेवाही 06मूल 05सावली 04पोंभूर्णा 09गोंडपिपरी 05राजूरा 27चिमूर 02वरोरा 22कोरपना 29जिवती 01 व इतर ठिकाणच्या 03 रुग्णांचा समावेश आहे. तसेच आज मृत झालेल्यांमध्ये चंद्रपूर शहरातील बगड खिडकी परिसरातील 74 वर्षीय पुरुष तर 65 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 82 हजार 605 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 78 हजार 186 झाली आहे. सध्या 2 हजार 978 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 70 हजार 446 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 85 हजार 187 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत 1441 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 1336तेलंगणा राज्यातील दोनबुलडाणा एकगडचिरोली 38यवतमाळ 48भंडारा 11वर्धा एकगोंदिया दोन आणि नागपूर येथील दोन बाधितांचा समावेश आहे.

प्रशासनाचे आवाहन : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला किंवा कोरोना पूर्णपणे संपलाया मानसिकतेतून नागरिकांनी बाहेर यावे. कोरोनाची मानवी साखळी तोडण्यासाठी दैनंदिन मास्कचा वापरवारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणेया त्रिसुत्रीचा नियमित वापर करावा. तसेच स्वत:ची व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी. 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावीव प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावेअसे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

0 0 0

Saturday 29 May 2021

गत 24 तासात 644 कोरोनामुक्त

 

गत 24 तासात  644 कोरोनामुक्त,

110 पॉझिटिव्ह तर 09 मृत्यू

Ø आतापर्यंत 77,633 जणांची कोरोनावर मात

Ø ॲक्टीव पॉझिटिव्ह 3,235

चंद्रपूरदि.29 मे : जिल्ह्यात मागील 24 तासात 644 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे तर 110 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 09 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 82 हजार 307  वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 77 हजार 633 झाली आहे. सध्या  3 हजार 235 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 68 हजार 701 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 83 हजार 383 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील खुटाळा येथील 54 वर्षीय महिलासमता नगर येथील 75 वर्षीय पुरुषपरसोडी येथील 72 वर्षीय पुरुष. बल्लारपूर तालुक्यातील 38 वर्षीय महिला. Bवरोरा तालुक्यातील 70 वर्षीय पुरुष. सिंदेवाही तालुक्यातील 70 वर्षीय पुरुष. गोंडपिपरी तालुक्यातील 73 वर्षीय पुरुष. चिमूर तालुक्यातील ताडगाव येथील 58 वर्षीय पुरुष. चामोर्शी तालुक्यातील 63 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

 जिल्ह्यात आतापर्यंत 1439 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 1334तेलंगणा दोनबुलडाणा एकगडचिरोली 38यवतमाळ 48भंडारा 11वर्धा एकगोंदिया दोन आणि नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 110  रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 22चंद्रपूर तालुका 07बल्लारपूर 15भद्रावती 02ब्रम्हपुरी 18नागभिड 01सिंदेवाही 03मूल 07सावली 01पोंभूर्णा 00गोंडपिपरी 02राजूरा 11चिमूर 04वरोरा 04कोरपना 12जिवती 00 व इतर ठिकाणच्या 01 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापरवारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावास्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावीव प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

0 0 0

म्युकरमायकोसिस ग्रस्तांच्या उपचारासाठी आता खनिज विकास निधीतून मदत

 म्युकरमायकोसिस ग्रस्तांच्या उपचारासाठी आता खनिज विकास निधीतून मदत

पालकमंत्र्यांनी दिली 5 लक्ष रुपयापर्यंत इंजेक्शनच्या खर्चास मंजुरी

चंद्रपूरदि.29 मे : कोरोनापासून मुक्त झालेल्या परंतु अनियंत्रित मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य घातक आजाराचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. लवकर निदानशस्त्रक्रिया व उपचार या आजाराचे मुख्य घटक आहेत. म्युकरमायकोसिस या घातक बुरशीजन्य आजारावर उपचार करण्यासाठी महागडी इंजेक्शन लागतात. प्रति रुग्ण हा एकत्रित खर्च 7 लक्ष रुपयांच्या वर आहे. जिल्ह्यातील रुग्णांना दिलासा देण्यासाठी तसेच त्यांच्यावरचा आर्थिक कमी करण्याच्या उद्देशाने खनिज विकास निधीतुन रु.5 लक्षपर्यंत इंजेक्शनच्या खर्चास राज्याचे आपत्ती व्यवस्थापनमदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्यक्ष लाभ 29 मे पासून सुरू होणार आहे.

म्युकरमायकोसिस आणि इतर बुरशीजन्य संसर्गाच्या सर्व रुग्णांना आरोग्यविषयक हमी व आर्थिक दिलासा मिळावायासाठी जिल्ह्यातील रुग्णालयांना एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालयांना मान्यता देण्यात आलेली आहे. या अंतर्गत क्राइस्ट रुग्णालय व डॉ.वासाडे रुग्णालय या दोन खाजगी रुग्णालयामध्ये 40 बेड कार्यान्वीत करण्यात आले असून म्युकरमायकोसिस आणि इतर बुरशीजन्य संसर्गाच्या आजाराकरिता रुग्णांवर शस्त्रक्रिया व उपचार करण्यात येत आहे. या रुग्णालयांत म्युकरमायकोसिसग्रस्त रुग्णांना उपलब्ध 19 पॅकेजेस अंतर्गत मोफत उपचार तसेच शस्त्रक्रिया पुरविण्यात येत असून अॅम्फोटेरिसिन-बी हे इंजेक्शन शासनाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र रुग्णांना मोफत पुरविण्यात येत आहे.

असा आहे म्युकरमायकोसिस रुग्णांच्या उपचाराचा एकत्रित खर्च :

म्युकरमायकोसिस या घातक बुरशीजन्य आजारावर उपचार करण्यासाठी महागडी इंजेक्शन लागतात. खाजगी रुग्णालयामध्ये म्युकरमायकोसिस ग्रस्त रुग्णांच्या उपचाराकरिता अॅम्फोटेरिसिन-बी (लिपोसोमल) इंजेक्शनची प्रती नग किंमत 6247 रुपये असून प्रतिदिनप्रति रुग्णाला 6 इंजेक्शन देणे आवश्यक आहे. या आजारावरील रुग्णाला वीस दिवस इंजेक्शन द्यावयाचे असते. त्यामुळे एका रुग्णाला 7 लक्ष 49 हजार 640 इतका एकत्रित खर्च येत असतो. यामुळे रुग्णांना आर्थिक भार सोसावा लागत आहे. सदर रुग्णांवरील आर्थिक भार कमी करण्याच्या दृष्टिकोनातून रुग्णांना आवश्यक असलेले अॅम्फोटेरिसिन-बी हे इंजेक्शन जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध साठ्यानुसार (अॅम्फोटेरिसिन-बी प्लेनइमल्शन आणि लिपोसोमल ) अधिकतम 5 लक्ष रुपयांपर्यंतचे इंजेक्शन रुग्णांना मोफत पुरविण्यात येईल.

म्युकरमायकोसिस आजाराच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी क्राइस्ट रुग्णालय येथे 9 तज्ञ डॉक्टरांची टीम नेमण्यात आलेली आहे. त्यासोबतच उपचारासाठी लागणारी उपकरणेसाधनसामुग्रीसुसज्ज ऑपरेशन थेटरआयसीयू बेडव्हेंटिलेटर बेड उपलब्ध करण्यात आलेले आहे.

या आजाराची माहिती व्यापक प्रमाणात व्हावी यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे व्हाट्सअप ग्रुप कार्यान्वित करण्यात आले असून ग्रामस्तरावर सरपंचग्रामसेवक यांच्या माध्यमातून कोरोनातुन बरे झालेल्या व डिस्चार्ज झालेल्या रुग्णांच्या आरोग्याची माहिती एस.एम.एसद्वारे दैनंदिन घेतल्या जात आहे. रोगप्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या व्यक्तींनी वरचेवर तपासणी करावीरक्तातील साखरेवर काटेकोर नियंत्रण ठेवणेतसेच इतर आरोग्य विषयक सूचना जिल्हा प्रशासना मार्फत दैनंदिन देण्यात येत आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत म्युकरमायकोसिस या आजाराचे 69 रुग्ण आढळून आलेले आहे. आजपर्यंत 48 रुग्णांवर उपचार सुरू असून 8 रुग्ण या आजारातून बरे झालेले आहे त्यापैकी वरोरा तालुक्यातील एका रुग्णाचा या आजारामुळे मृत्यू झालेला आहे. म्युकरमायकोसिस आजाराची लक्षणे दिसल्यास तात्काळ तपासणी करून घ्यावी. योग्य वेळी उपचार झाल्यास हा आजार बरा होऊ शकतो.

0 0 0

Friday 28 May 2021

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते रुग्णवाहिकांचे लोकार्पण

 

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते रुग्णवाहिकांचे

लोकार्पण ; गंभीर रुग्णांना मिळणार दिलासा

चंद्रपूर दि. 28 मे : कोरोना महामारीच्या काळात नागरिकांना आरोग्य सुविधा तत्परतेने उपलब्ध व्हाव्यात व आरोग्य यंत्रणा अधिक बळकट व्हावी, तसेच रुग्णांना वेळेत इतर ठिकाणी हलविणे सोयीचे व्हावे, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या स्थानिक विकास निधीतून दोन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 18 लक्ष रुपये खर्च करून सिंदेवाही नगरपंचायतीला एक तर सावली नगरपंचायतीला एक अशा दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले .

यावेळी सिंदेवाहीच्या नगराध्यक्षा आशा गंडाते, जिल्हा परिषद सदस्य रमाकांत लोंढे, तहसीलदार गणेश जगदाळे, विस्तार अधिकारी श्री. घाटोळे, वैद्यकीय अधिकारी श्री.झाडे, सावली पंचायत समिती सभापती विजय कोरेवार, विजय मुत्यलवार, संदीप गड्डमवार, बंडू बोरकुटे, दिनेश चिटनुरवार, सावलीचे तहसीलदार परिक्षित पाटील, न.प.मुख्याधिकारी मनीषा वझाडे, गटविकास अधिकारी निखिल गावडे प्रामुख्याने उपस्थित होते.

रुग्णवाहिकेमुळे गंभीर रुग्णांना उपचारासाठी इतर ठिकाणी हलविणे सोयीचे होणार आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, या रुग्णवाहिकेमुळे रुग्णांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळून त्यांचा जीव वाचवण्यास मदत होईल. कोरोना महामारीचा कठीण काळ सुरू आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. अशा परिस्थितीत रुग्णांसाठी रुग्णवाहिकेची मोठ्या प्रमाणावर गरज भासत असून रूग्णांच्या सेवेसाठी ती आजपासून उपलब्ध झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधी कार्यक्रमाअंतर्गत 18 लक्ष रुपये खर्च करून सिंदेवाही व सावली नगरपंचायतीना रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे.

00000

‘काश, मास्क ठिक से पहना होता’ कोरोनाविषयक जागृती मोहिमेचा प्रारंभ

 ‘काश, मास्क ठिक से पहना होता

कोरोनाविषयक जागृती मोहिमेचा प्रारंभ

नागपूर, दि. 28 :  कोरोनापासून वाचायचे असेल तर मास्क घालणे अत्यावश्यक आहे. एक छोटीशी मुखपट्टी (मास्क) कोणाचातरी जगण्याचा आधार, कोणाचेतरी छत्र हिरावण्यापासून वाचवू शकते. परंतु नागरिकांमध्ये असलेली बेफिकरीमुळे अनेकांना आपले प्राणसुध्दा गमवावे लागले आहेत. कोरोनाला दूर ठेवायचे असेल तर मास्कची आवश्यकता सर्वसामान्य नागरिकांना कळावे यासाठी ज्येष्ठ छायाचित्रकार व कलावंत विवेक रानडे यांच्या कल्पकतेतून जनजागृती मोहीम साकारली आहे. या विशेष मोहिमेचा शुभारंभ विभागीय आयुक्त     डॉ. संजीव कुमार यांच्या हस्ते झाला.

कॅलामेटी रिसपॉन्स ग्रुप नागपूर व माहिती व जनसंपर्क विभाग हे संयुक्तपणे कलात्मक कोरोनाविषयक जाहिरात मोहीम राबविणार आहे. या मोहिमेला जिल्हा प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य मिळणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात एक छोटेखानी कार्यक्रमात कोरोनाविषयक जनजागृती मोहिमेची सुरुवात झाली. यावेळी विवेक रानडे, अमित पंचेमेतीया, माहिती संचालक हेमराज बागुल, माध्यम समन्वयक अनिल गडेकर, दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्राच्या उपसंचालक गौरी पंडीत-मराठे आदी उपस्थित होते.

कोरोनाच्या पहिल्या लाटेपासूनच मास्क घालणे, हात साबणाने स्वच्छ धुणे व सामाजिक अंतर पाडणे या त्रिसुत्रीचा अवलंब करण्याचे निर्देश आयसीएमआरने दिले होते. नागरिकांकडून मास्क न घालण्याबद्दल स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस प्रशासनाने दंडात्मक कारवाई सुध्दा सुरु केली आहे. परंतु मास्क न घालणे व घातला असल्यास व्यवस्थीत न घालणे याबद्दल बेफिकरीची वृत्ती सर्वत्र दिसून येत आहे. मास्क घातला तर आपले अमूल्य प्राण वाचू शकते या कल्पनेच्या आधारे विवेक रानडे यांनी कलात्मक जाहिरात मोहीम तयार केली आहे. ही माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचावी यासाठी प्रशासनातर्फे पुढाकार घेण्यात आला आहे.

कोरोनामुळे आई, वडील, भाऊ, मित्र, आजी, आजोबा आदी आपतजन आपण गमावले आहे. कोरोना प्रतिबंधक नियमाचे आपण काटेकोर पालन केले असते तर या सर्वांचे प्राण वाचवू शकलो असतो. दुसऱ्या लाटेनंतर तरी आता जागृत होण्याची वेळ आली आहे. मुखपट्यांचा वापर करणे आवश्यक आहेच परंतु मुखपट्टी वापरताना ती केवळ दंडात्मक कारवाई होवू नये ऐवढयापुरतीच नसून कोरोनापासून संरक्षणासाठी आहे. याची जाणीव करुन देणे आवश्यक आहे. तिसऱ्या लाटेची तिव्रता आदीच्या लाटेपेक्षा अधिक राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी मुखपट्यांचा योग्य व शास्त्रोक्त करावा यासाठी ही मोहीम सुरु करण्यात आली आहे.

कोरोनापासून बचावासाठी मुखपट्टी हेच शस्त्र राहणार आहे. मुखपट्टी घाला नाही तर कोरोना होण्याचे प्रमाण वाढेल, आपले कुटुंब सुरक्षित राहण्यासाठी मुखपट्टीचे महत्त्व या जागृती मोहिमेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, नागपूर यांनी पुढाकार घेतला आहे.

00000

गत 24 तासात 261 कोरोनामुक्त

गत 24 तासात 261 कोरोनामुक्त,

187 पॉझिटिव्ह तर 07 मृत्यू

Ø  आतापर्यंत 76,989 जणांची कोरोनावर मात

Ø ॲक्टीव पॉझिटिव्ह 3,778

चंद्रपूर, दि.28 मे : जिल्ह्यात मागील 24 तासात 261 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे तर 187 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 07 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 82 हजार 197 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 76 हजार 989  झाली आहे. सध्या 3 हजार 778 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 66 हजार 643 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 81 हजार 438 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील साईबाबा वार्ड,सिव्हिल लाईन परिसरातील 48 वर्षीय महिला, 55 वर्षीय पुरुष, मित्र नगर परिसरातील 68 वर्षीय महिला. बल्लारपूर तालुक्यातील 53 वर्षीय पुरुष. मूल तालुक्यातील 55 वर्षीय पुरुष. कोरपना तालुक्यातील 33 वर्षीय पुरुष तर ब्रह्मपुरी तालुक्यातील 50 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

 जिल्ह्यात आतापर्यंत 1430 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 1326, तेलंगणा दोन, बुलडाणा एक, गडचिरोली 37, यवतमाळ 48, भंडारा 11, वर्धा एक, गोंदिया दोन आणि नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

आज बाधित आलेल्या 187 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 47, चंद्रपूर तालुका 10, बल्लारपूर 39, भद्रावती 15, ब्रम्हपुरी 15, नागभिड 06, सिंदेवाही 01, मूल 02, सावली 00, पोंभूर्णा 01, गोंडपिपरी 01, राजूरा 16, चिमूर 03, वरोरा 18, कोरपना 07, जिवती 00 व इतर ठिकाणच्या 06 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

Thursday 27 May 2021

गत 24 तासात 571 कोरोनामुक्त

 

गत 24 तासात 571 कोरोनामुक्त,

220 पॉझिटिव्ह तर 12 मृत्यू

Ø आतापर्यंत 75,483 जणांची कोरोनावर मात

Ø ॲक्टीव पॉझिटिव्ह 4,627

चंद्रपूर, दि.27 मे : जिल्ह्यात मागील 24 तासात 571 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे तर 220 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 12 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 82 हजार 10 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 76 हजार 728  झाली आहे. सध्या 3 हजार 859 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 63 हजार 698 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 78 हजार 862 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील दाताळा येथील 62 वर्षीय पुरुष, 51 व 55 वर्षीय पुरुष, पडोली येथील 65 वर्षीय पुरुष. भद्रावती तालुक्यातील 46 व 65 वर्षीय महिला. बल्लारपूर तालुक्यातील 65 वर्षीय पुरुष. नागभीड तालुक्यातील जनकापूर येथील 65 वर्षीय महिला, 55 वर्षीय महिला. राजुरा तालुक्यातील 28 वर्षीय महिला. पोंभुर्णा तालुक्यातील आष्टा येथील 65 वर्षीय महिला. गडचांदूर येथील 63 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

  जिल्ह्यात आतापर्यंत 1423 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 1319, तेलंगणा दोन, बुलडाणा एक, गडचिरोली 37, यवतमाळ 48, भंडारा 11, वर्धा एक, गोंदिया दोन आणि नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

 आज बाधित आलेल्या 220 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 56, चंद्रपूर तालुका 17, बल्लारपूर 27, भद्रावती 37, ब्रम्हपुरी 03, नागभिड 02, सिंदेवाही 10, मूल 14, सावली 05, पोंभूर्णा 08, गोंडपिपरी 13, राजूरा 02, चिमूर 01, वरोरा 08, कोरपना 15, जिवती 01 व इतर ठिकाणच्या 01 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

 


सुधारित दौरा कार्यक्रम

पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

चंद्रपूर दि. 27 मे: राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार दि. 28 मे 2021 रोजी, सकाळी 8:00 वाजता कमलाई निवास,रामदासपेठ,नागपूर येथून सिंदेवाही जि. चंद्रपूरकडे प्रयाण करतील. सकाळी 10:00 वाजता सिंदेवाही येथे आगमन व नगरपंचायत सिंदेवाहीस पालकमंत्री यांच्या स्थानिक विकास निधीतुन प्राप्त झालेल्या रुग्णवाहिकेचे श्रवण लॉन सिंदेवाही येथे लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 10:20 वाजता श्रवण लॉन, सिंदेवाही येथे तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित कार्यक्रमास उपस्थिती.

दुपारी 1:00 ते 1:30 वाजेपर्यंतचा वेळ राखीव राहील. दुपारी 1:30 वाजता सिंदेवाही येथून सावलीकडे प्रयाण करतील. दुपारी 2:00 वाजता तहसील कार्यालय, सावली येथे आगमन व नगर पंचायत सावलीस पालकमंत्री यांच्या स्थानिक विकास निधीतून प्राप्त झालेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 2:30 वाजता सावली येथून व्याहाड खुर्द कडे प्रयाण करतील. दुपारी 2:45 वाजता व्याहाड खुर्द येथे आगमन व पालकमंत्री यांचे जनसंपर्क कार्यालय, व्याहाड खुर्द येथे  तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित कार्यक्रमास उपस्थिती.

सायंकाळी 4:30 निलसनी पेठगाव ता. सावली येथे आगमन व सांत्वनपर भेट देतील. सायंकाळी 5:00 वाजता जाम बु.ता.सावली येथे आगमन व सांत्वनपर भेट देतील. सायंकाळी 5:30 वाजता जाम बु.ता.सावली येथून गडचिरोलीकडे प्रयाण करतील. सायंकाळी  6:30 वाजता  शासकीय विश्रामगृह रानफुल निवास गडचिरोली येथे आगमन व मुक्काम.

शनिवार दि. 29 मे 2021 रोजी, सकाळी 10:00 वाजता आरमोरी वरून ब्रह्मपुरीकडे प्रयाण करतील. सकाळी 10:30 वाजता शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे आगमन तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 4:00 वाजता ब्रह्मपुरी येथून नागपूरकडे प्रयाण करतील. सायंकाळी 6:30 वाजता कमलाई निवास, रामदासपेठ, नागपूर येथे आगमन व मुक्काम राहतील.

000000