Search This Blog

Wednesday 12 May 2021

कोविड रुग्णांसाठी 200 ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर तातडीने उपलब्ध

 

कोविड रुग्णांसाठी 200 ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर तातडीने उपलब्ध

कोविड रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक त्या

सर्व उपाययोजना करणार- ना.विजय वडेट्टीवार

चंद्रपूर,दि. 12 मे : चंद्रपुर जिल्ह्यातील कोविड रुग्णांची प्रकृती ऑक्सीजन अभावी गंभीर होत असल्याचे बघून  राज्याचे  आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी वेळोवेळी लक्ष घालून संबंधितांसोबत संपर्क साधून तातडीने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पुरवठा करण्याचे सांगितले. त्यांच्या प्रयत्नाला यश आले असून चंद्रपूर जिल्ह्यासाठी 10 लिटर क्षमतेचे 200 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर तातडीने उपलब्ध झाले आहे. त्यांच्या या प्रयत्नामुळे कोविड रुग्णांसाठी निश्चितच फायदा होणार असल्याने कोविड रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना दिलासा देणारी बाब असल्याचे मत रुग्णांच्या नातेवाईकांनी व्यक्त केले.

कोविड विषाणूचा चंद्रपूर जिल्ह्यात वाढता फैलाव लक्षात घेता कोरोना विषाणूच्या संसर्गावर मात करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार हे अहोरात्र काम करून कोरोना रुग्णांना दिलासा देण्याचे काम करीत आहे. कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी त्यांचा फोन म्हणजे कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी देवदूत असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता आरोग्यसुविधा अपुऱ्या पडू लागल्या त्यामुळे ना.वडेट्टीवार यांनी दर आठवड्यात चंद्रपूर येथे ठाण मांडून आरोग्य यंत्रणा अधिक प्रभावी व सक्षम करण्यात भर देऊन निधीची कमतरता पडू दिली नाही. शहरासह, तालुक्यातील ग्रामीण भागात कोविड रुग्णांवर वेळेवर उपचार होण्यासाठी वडेट्टीवार यांनी आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करून कोरोनावर मात करून रुग्ण बरे होण्यासाठी विविध उपाययोजना  केल्या. कोविड रुग्णांना त्यांच्या घरून ने-आण करण्यासाठी स्वतःकडून स्वखर्चाने ब्रम्हपुरी, सावली व सिंदेवाही येथे मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या. तालुक्याच्या ठिकाणी ऑक्सिजन प्लॉन्टची निर्मिती, ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा,  बेडची संख्या वाढविणे, औषधांचा पुरवठा, रेमडेसिविर इंजेक्शन या बाबीकडे स्वतः लक्ष घालून आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या. जिल्ह्यातील बहुतांश कोविड सेंटरला भेट देऊन कोविड रुग्णांच्या अडी-अडचणी जाणून घेत त्या सोडविण्याचे प्रयत्न त्यांनी केले. जिल्ह्यातील ऑक्सिजन सिलेंडरची कमतरता बघता कोविड रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन उपलब्ध होण्यासाठी 200 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर तातडीने उपलब्ध करून दिले असून त्यात ब्रम्हपुरीसाठी 30, सावलीसाठी 15,  सिंदेवाहीसाठी 15,  गोंडपिपरीसाठी 10,  कोरपणासाठी 15,  गडचांदूरसाठी 15,  भद्रावतीसाठी 15, मुलसाठी 15,  वरोरासाठी 15,  चिमुरसाठी 10, नागभीडसाठी 10,  बल्लारपूरसाठी 15,  चंद्रपूरसाठी 30 अशाप्रकारे 10 लिटर क्षमतेचे 200 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देण्यात आले आहे. ही जिल्ह्यासाठी दिलासा देणारी बाब असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

0 0 0

No comments:

Post a Comment