Search This Blog

Wednesday 12 May 2021

गत 24 तासात 1540 कोरोनामुक्त

 

गत 24 तासात 1540 कोरोनामुक्त,

1049 पॉझिटिव्ह तर 39 मृत्यू

Ø  आतापर्यंत 61,516 जणांची कोरोनावर मात

Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 11,682

चंद्रपूर, दि. 12 मे : जिल्ह्यात मागील 24 तासात 1540 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1049 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 39 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 74 हजार 363 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 61 हजार 516 झाली आहे. सध्या 11हजार 682 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 21 हजार 887 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 43हजार 873 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील पठाणपुरा वार्ड येथील 70 वर्षीय पुरुष, घुटकाळा वार्ड येथील 48 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला, 56 वर्षीय पुरुष, 48 वर्षीय पुरुष, तुकुम परिसरातील 58 वर्षीय पुरुष, बालाजी वार्ड येथील 35 वर्षीय पुरुष, गजानन महाराज मंदिर चौक परिसरातील 70 वर्षीय पुरुष, नगीनाबाग परिसरातील 52 वर्षीय पुरुष, बाबुपेठ येथील 68 वर्षीय पुरुष, 63 व 65 वर्षीय महिला, 75 वर्षीय पुरुष, 36 वर्षीय महिला.  कढोली येथील 40 वर्षीय पुरुष, लोहारा येथील 47 वर्षीय पुरुष, शेगाव 65 वर्षीय पुरुष. भद्रावती तालुक्यातील घोसरी येथील 55 वर्षीय पुरुष, आष्टी येथील 41 वर्षीय पुरुष, घोडपेठ येथील 58 वर्षीय महिला, आंबेडकर वार्ड माजरी येथील 60 वर्षीय पुरुष व 77 वर्षीय पुरुष. वरोरा तालुक्यातील एकार्जूना येथील 63 वर्षीय पुरुष. सावली तालुक्यातील 30 वर्षीय पुरुष. गडचांदूर येथील 60 वर्षीय महिला. कोरपना तालुक्यातील वनोजा येथील 45 वर्षीय पुरुष. राजुरा तालुक्यातील सोमनाथपूर येथील 48 वर्षीय महिला व साखरी येथील 55 वर्षीय पुरुष. बल्लारपूर तालुक्यातील 52 वर्षीय महिला, 34 वर्षीय पुरुष. ब्रह्मपुरी तालुक्यातील 60 वर्षीय पुरुष, माळडोंगरी येथील 60 वर्षीय पुरुष, कोसंबी येथील 60 वर्षीय पुरुष. सिंदेवाही तालुक्यातील 65 वर्षीय पुरुष. मूल तालुक्यातील 52 वर्षीय पुरुष. गोंडपिपरी तालुक्यातील वढोली येथील 42 वर्षीय पुरुष. वणी येथील 43 वर्षीय पुरुष, 75 वर्षीय महिला तर लाखांदूर येथील 65 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 1165 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 1075 , तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 35, यवतमाळ 37, भंडारा 11, वर्धा एक, गोंदिया दोन आणि नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

 आज बाधीत आलेल्या 1049  रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 251 , चंद्रपूर तालुका 59, बल्लारपूर 138, भद्रावती 119 , ब्रम्हपुरी 37, नागभिड 16, सिंदेवाही 19, मूल 70, सावली 34, पोंभूर्णा 42, गोंडपिपरी 34, राजूरा 48, चिमूर 24, वरोरा 75, कोरपना 53, जिवती 10 व इतर ठिकाणच्या 20 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

0 0 0

No comments:

Post a Comment