Search This Blog

Monday 29 January 2024

गर्भलिंग निदान होत असलेल्या सोनोग्राफी केंद्रावर कडक कारवाई करा -जिल्हाधिकारी विनय गौडा




 गर्भलिंग निदान होत असलेल्या सोनोग्राफी केंद्रावर कडक कारवाई करा

-जिल्हाधिकारी विनय गौडा

चंद्रपूरदि.29:जिल्ह्यात स्त्रीभ्रूणहत्या टाळून लिंग गुणोत्तराच्या प्रमाणातील दरी कमी करण्यासाठी पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. याकरीता बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या केंद्राची गोपनीय माहिती घेऊन गर्भलिंग निदान चाचणी होत असलेल्या सोनोग्राफी केंद्रावर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात दक्षता पथकाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सनअपर पोलीस अधीक्षक रीना जनबंधूमनपा आयुक्त विपिन पालीवालउपमुख्य कार्यकारी अधिकारी संग्राम शिंदेजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अशोक कटारेजिल्हा शल्य चिकित्सक डॉ.महादेव चिंचोळेअधिष्ठाता डॉ. कांबळेशिक्षणाधिकारी (माध्य.) कल्पना चव्हाणजिल्हा समाज कल्याण अधिकारी सुरेश पेंदाममनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवारनिवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद किन्नाकेमाता व बाल संगोपन अधिकारी डॉ. प्राची नेहुलकरसहाय्यक सल्लागार कैलाश उईके आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणालेजिल्ह्यातील सोनोग्राफी केंद्राची माहिती अदयावत ठेवावी. जिल्ह्यात एक व दोन मुलीवर किती गर्भपात झालेयाची काटेकोरपणे तपासणी करावी व याबाबत सखोल माहिती घ्यावी. संबंधित यंत्रणेने जिल्ह्यातील तसेच मनपा क्षेत्रातील प्रत्येक सोनोग्राफी केंद्राला भेट देऊन तपासणी करावी. यासाठी पोलीस प्रशासनाची मदत घ्यावीपोलीस विभागाने बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या केंद्राची गोपनीय माहिती घ्यावी. सदर केंद्र दोषी आढळून आल्यास पीसीपीएनडीटी कायद्यान्वये कार्यवाही करावी.

जिल्ह्यातील स्त्री-पुरुषांचे लिंग गुणोत्तर संतुलित राहण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे. यासाठी महानगरपालिका क्षेत्रात अनधिकृतपणे लिंगनिदान होत असल्यास कठोर कारवाई करावी. जिल्ह्यात पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी व्यापक जनजागृती करावी. सोनोग्राफी केंद्र तसेच गर्भपात केंद्रावर माहिती देणारे फलक दर्शनी भागात लावावेतअशा सूचना देखील जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी बैठकीत संबंधित यंत्रणांना दिल्या.

राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त जिल्हा कृती दल समितीचा आढावा:

राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा उद्देश ते 19 वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्रस्तरावर जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणेपोषण स्थितीशिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी शिक्षण विभागाची भूमिका महत्त्वाची आहेयासाठी शिक्षण विभागाने प्रत्येक शाळा व महाविद्यालय स्तरावर नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. तसेच या मोहिमेचे सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या.

सदर मोहीम 13 फेब्रुवारी तर मॉप अप दिन 20 फेब्रुवारी 2024 रोजी राबविण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक विभागांनी आपापली जबाबदारी पार पाडावी. तालुकानिहाय लाभार्थ्यांची यादी उपलब्ध ठेवावी. वस्तीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती घेऊन त्याबाबत नियोजन करावे. शाळाबाह्य विद्यार्थी देखील सुटता कामा नये. जंतनाशक गोळ्या वितरित करण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांचा तालुकानिहाय टेबल तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी यावेळी संबधित यंत्रणाना दिल्या.

000000

13 फेब्रुवारी रोजी आयटीआय मधील निरुपयोगी साहित्यांचा लिलाव

 13 फेब्रुवारी रोजी आयटीआय मधील निरुपयोगी साहित्यांचा लिलाव

चंद्रपूर, दि. 29 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ब्रह्मपुरी येथील विविध व्यवसायातील निरुपयोगी, कालबाह्य झालेली निर्लेखित संयत्रे, साहित्य, उपकरणे आहे त्याच अवस्थेत विक्री करावयाचे आहे. याकरीता दि. 13 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 1 वाजता लिलाव आयोजित करण्यात आला आहे.

इच्छुक निर्लेखित साहित्य खरेदीदारांनी लिलावात सहभागी होण्यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, खेड रोड, शिवाजीनगर, ब्रह्मपुरी येथे अधिकृत लेख्यासह उपस्थित राहावे. असे ब्रह्मपुरी, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य आर.एम. डांगे यांनी कळविले आहे.

०००००००

शेतकऱ्यांनी वखार महामंडळाच्या गोदामात शेतमालाची साठवणूक करुन सोयी-सुविधांचा लाभ घ्यावा

 शेतकऱ्यांनी वखार महामंडळाच्या गोदामात शेतमालाची साठवणूक करुन सोयी-सुविधांचा लाभ घ्यावा

चंद्रपूर, दि. 29 : वखार महामंडळाद्वारे शेतकऱ्यांना शेतमाल तसेच शेतीसाठी लागणारी बी-बियाणे, कीटकनाशके यांची शास्त्रोक्त पद्धतीने सुरक्षित साठवणूक करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाते.

महामंडळाची मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, औरंगाबाद व लातूर हे 8 विभाग आहेत. राज्यातील महामंडळाची एकूण 205 वखार केंद्रावर 1 हजार 173 गोदामांची साठवणूक क्षमता 20.40 मे.टन आहे. नागपूर विभागातंर्गत भंडारा जिल्ह्यात तुमसर, चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी, पडोली, चंद्रपूर (औ) व वरोरा, गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली व वडसा, गोंदिया जिल्ह्यात आमगाव व अर्जुनी (मोरगाव), नागपूर जिल्ह्यात वाडी-हिंगणा, बुट्टीबोरी, काटोल व सावनेर तसेच वर्धा जिल्ह्यात आर्वी, हिंगणघाट, कारंजा (घाडगे), वर्धा (शिवनगर) आणि वर्धा (औ) या 6 जिल्ह्यात एकूण 18 वखार केंद्रावर 114 गोदामे असून साठवणूक क्षमता 2.03 मे. टन इतकी आहे.

शेतमाल उत्पादनाबरोबरच शेतमालाची सुरक्षित साठवणूक व त्याची विक्री व्यवस्थापन देखील महत्त्वाचे आहे. सुगीच्या हंगामात बाजारपेठेत शेतमालाची आवक जास्त होत असल्याने शेतकऱ्यांना कमी दरात शेतमालाची विक्री करावी लागते. अशावेळेस कृषी मालाच्या साठवणूकीस प्राधान्य देऊन महामंडळ राज्यातील सर्व ठिकाणच्या गोदामामध्ये या हंगामात नियोजन करीत आहे. महामंडळाच्या सर्व गोदामामध्ये शास्त्रोक्त पद्धतीने शेती औद्योगिक मालाची साठवण केली जाते. ठेवीदारांना दिलेली महामंडळाची वखारपावती परक्राम्य लेख असल्याने ती बँकेकडे तारण ठेवल्यास ठेवीदारांना बँकेकडून त्वरीत कर्ज उपलब्ध होते. त्याआधारे, शेतकऱ्यांना हंगामात अर्थसहाय्य व नंतर बाजारभाव येईपर्यंत गोदामात साठवणुकीची सोय मिळते. शेतकऱ्यांनी चालू पिकाचा 7/12 उतारा दिल्यानंतर वखार भाड्यात प्रचलित साठवणदरात 50 टक्के सवलत देऊन 25 टक्के जागा आरक्षित करण्यात येते. तसेच प्रत्येक पंधरवाड्यामध्ये कीड प्रतिबंधात्मक तसेच दर 3 महिन्यांनी उपचारात्मक कीटकनाशकांचा वापर करून माल सुरक्षित ठेवण्यात येतो. साठवणुकीस असलेल्या मालाला 100 टक्के विमा संरक्षण दिल्या जाते. त्यामुळे नुकसान झाल्यास योग्य ती भरपाई दिल्या जाते.

वखार महामंडळ व महाराष्ट्र सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने, शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्याकरीता अभिनव ऑनलाईन तारण कर्ज योजना राबविण्यात येते. याअंतर्गत, पात्र शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्यांना वखार पावतीवरील शेतमालाच्या किमतीचे 70 टक्के कर्ज बँकेकडून खात्यात जमा करण्यात येते. तारण कर्जाचा व्याजदर 9 टक्के असून इतर बँकेच्या तुलनेत सर्वात कमी आहे. कर्जाची मर्यादा 10 लाख प्रती शेतकरी व 75 लाख प्रती शेतकरी उत्पादक कंपनी इतकी आहे. महामंडळाच्या गोदामात साठवणुकीस ठेवण्यात येणाऱ्या शेतमालाच्या वखार पावतीवर ऑनलाईन तात्काळ कर्ज उपलब्ध होत असल्याने सबंधित शेतकरी, ठेवीदार यांच्या वेळेची बचत होऊन कागदपत्रासाठींच्या प्रवास खर्चात बदल होण्यास मदत होते. शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांनी या सुविधांचा लाभ घ्यावा. सुगीच्या काळात व्यापाऱ्यांना माल न विकता तो वखार महामंडळाच्या गोदामात ठेवावा. असे आवाहन महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे विभाग प्रमुख सुभाष पुजारी यांनी केले आहे.

००००००

Sunday 28 January 2024

मुल मध्ये उभे राहणार 100 खाटांचे अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालय

 मुल मध्ये उभे राहणार 100 खाटांचे अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालय

ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे 107 कोटी 29 लक्ष मंजूर

प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय जारी

चंद्रपूरदि. 28 : जिल्ह्यात आरोग्याच्या उत्तमोत्तम सुविधा असाव्यातयेथील रुग्णांना उपचारासाठी नागपूरमुंबईच्या चकरा माराव्या लागू नये तसेच स्थानिक स्तरावरच रुग्णांना अत्यल्प दरात आरोग्याच्या अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध होण्यासाठी राज्याचे वनेसांस्कृतिक कार्यमत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार नेहमीच प्रयत्नशील असतात. याच अनुषंगाने मुल येथीाल 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालयाचे  100 खाटांमध्ये श्रेणीवर्धन करण्यासाठी मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांना यश प्राप्त झाले असून मुल येथे आता 100 खाटांचे अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालय उभे राहणार आहे. यासाठी शासनाने 107 कोटी 29 लक्ष रुपयांच्या प्रशासकीय मान्यतेला मंजुरी दिली असून तसा शासन निर्णय जारी केला आहे.

सद्यस्थितीत मूल येथील उपजिल्हा रुग्णालय 50 खाटांचे आहे. या रुग्णालयाचे 100 खाटांमध्ये श्रेणीवर्धन करण्यासाठी पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे आता मुल येथे 100 खाटांचे नवीन उपजिल्हा रुग्णालय स्थापित होणार आहे. सदर रुग्णालय हे तळमजला आणि त्यावर तीन माळे असे एकूण 15 हजार चौ. मीटरवर तर वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचा-यांसाठी 4 मजली निवासस्थान राहणार आहे. तसेच 100 खाटा करिता लागणारी नवीन पदनिर्मिती या रुग्णालयासाठी करण्यात येईल. यामध्ये नेत्रतज्‍ज्ञबालरोगतज्‍ज्ञस्त्रीरोगतज्‍ज्ञअस्थिरोगतज्‍ज्ञसर्जनभूलतज्‍ज्ञ आणि इतर वैद्यकीय अधिकारी अशी एकूण  14 वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे निर्माण होतील. सोबतच चतुर्थ श्रेणी कर्मचारीपरिचारिकातांत्रीक पदेसुद्धा पदे निर्माण होतील.

रुग्णालयामध्ये राहणार अत्याधुनिक सोयीसुविधा : रुग्णालयामध्ये नवीन विशेषउपचार कक्षसर्व प्रकारच्या विशेषज्‍ज्ञ सेवा पुरविता येणे शक्य होईल. या ठिकाणी डोळ्यांच्या व अस्थिरोग शस्त्रक्रियासाठी नवीन शस्त्रक्रियागृह निर्माण करण्यात येणार आहे. नव्याने कार्यान्वित होणाऱ्या विशेष उपचार कक्षाकरिता आधुनिक  वैद्यकीय उपकरणे व यंत्रसामुग्री उपलब्ध होतील. या ठिकाणी डिजिटल सोनोग्राफी तसेच  एक्स-रे आणि सर्व प्रकारच्या प्रयोगशाळा चाचण्या होतील. सुसज्ज माता-बाळ उपचार यंत्रणाअपघात विभागात आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व साधनसामुग्रीबाह्य रुग्ण विभागामध्ये रुग्णांचा ऑनलाईन डाटा गोळा करणे.  गंभीर शस्त्रक्रियेसाठी आय.सी.यूमॉड्यूलर ऑपरेशन कक्षमहिलापुरुष व बालकांसाठी तसेच गरोदर माता व बाळंतपण झालेल्या मातांसाठी स्वतंत्र कक्षमॉड्यूलर औषधी वितरण कक्षब्लड बँकआयुर्वेदयुनानी व होमीओपॅथी रुग्णांच्या उपचारासाठी बाह्य व आंतररुग्ण सेवापिण्याचे शुध्द पाणी व स्वच्छतेच्या उपाययोजना राहणार आहे.

रुग्णांच्या नातेवाईकांसाठीसुध्दा सुविधा : रुग्णालयात रुग्णांसोबत येणा-या नातेवाईकांसाठी जेवणाचीबसण्याची व आराम करण्यासाठी सर्व सुविधायुक्त प्रतिक्षा कक्षनातेवाईकांसाठी स्वतंत्र शौचालयआंघोळीकरीता बाथरुमरुग्णांचे नातेवाईक तसेच रुग्णालयामधील अधिकारी व कर्मचा-यांसाठी स्वतंत्र वाहनतळ व्यवस्था राहणार आहे.

0000000

सर्वांगीण विकासातून मुल तालुका महाराष्ट्रात अव्वल करणार - पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार










सर्वांगीण विकासातून मुल तालुका महाराष्ट्रात अव्वल करणार - पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

Ø नगर परिषद क्षेत्रातील विविध विकासकामांचे लोकार्पण

चंद्रपूरदि. 28 : मुल तालुक्यात विविध लोकोपयोगी विकासकामे हाती घेण्यात आली आहे. मुख्य रस्तापाणीपुरवठा योजनास्टेडियमडॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयतसेच शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालयकृषी महाविद्यालयमहिलांच्या पंखांना बळ देणारे सर्वोत्कृष्ट शुरवी महाविद्यालय यासारखे मोठे प्रकल्प उभे राहत आहे. मुल तालुक्याचा चेहरा- मोहरा बदलविण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता असून सर्वांगिण विकासातूनच हा तालुका महाराष्ट्रात अव्वल करण्याच्या दृष्टीने कार्य करण्यात येत असल्याचे राज्याचे वनेसांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

मुल नगरपरिषद क्षेत्रातील विविध विकासकामांच्या लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मूलचे उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्रामतहसीलदार रवींद्र होळीनगर परिषदेचे मुख्याधिकारी यशवंत पवारसार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रशांत वसुलेहरीश शर्मादेवराव भोंगळेसंध्या गुरनुले,  प्रभाकर भोयररत्नमाला भोयरचंदू मारगोनवारनंदू रणदिवे आदी उपस्थित होते.

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हजारो शहिदांनी प्राणाची आहुती दिलीअसे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणालेदेशाला संविधान अर्पण होऊन 74 वर्षे पूर्ण झालीत. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दायित्वकर्तव्य व जबाबदाऱ्या संविधानामध्ये लिखित स्वरूपात दिल्या. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष असून मुलचा गौरव वाढवीत छत्रपती शिवाजी महाराज व्यापार संकुलाची निर्मिती करण्यात आली.

सर्वप्रथम जेव्हा स्व.दिलीप पारधी यांच्यासमवेत मुल येथे आठवडी बाजार बघण्यासाठी आलो. तेव्हा चिखलकच्चा रस्ता व घाणीचे साम्राज्य होते. आता या ठिकाणी सुसज्ज अशा आठवडी बाजाराची निर्मिती करण्यात आली. महात्मा ज्योतिबा फुले या नावाने हे आठवडी बाजार सेवेसाठी लोकार्पित करीत आहे. महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक लिहून शेतकऱ्यांसाठी असलेला भाव व्यक्त केला. हा बाजार येथील शेतकरी बांधवासाठी निश्चितच सेवा देईल,असा विश्वास मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

महर्षी वाल्मिकीच्या नावाने मुख्य रस्त्यावर प्रवेशद्वार उभारण्यात आले. प्रवेशद्वाराची निर्मिती व्हावीयासाठी भोई समाजाच्या नागरिकांची मागणी होती. सदर प्रवेशद्वारासाठी 50 लक्ष रुपये मंजूर केले. मात्रजागेअभावी 25 लक्ष रुपये खर्च करून गेटची निर्मिती झाली. या प्रवेशद्वारातून जातांना महर्षी वाल्मिकीचे स्मरण निश्चितच होईलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच शिल्लक 25 लक्ष रुपयात श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने दुसरे अटल गेट उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

22 जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाली. मंदिर ट्रस्टचे सचिव श्री.चंपतराय यांनी संकलित केलेल्या पवित्र वस्तूबाबत माहिती देतांना चंद्रपूर जिल्ह्यातून पाठविण्यात आलेल्या लाकडाचा उल्लेख केला. 'सियावर रामचंद्र की जयया अकरा अक्षरी मंत्राचा देशात पहिला विश्वविक्रम झाला. गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद करण्यात आली. प्रभू श्रीरामचंद्रांच्या नावात चंद्र आहेत्या चंद्रपूर जिल्ह्यानेच हा विश्वविक्रम केला. रामायणात रावणाने सीता मातेचे हरण केले तेव्हा एक जटायु होता. प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या औचित्याने ताडोबात 10 जटायू सोडण्यात आले. त्याठिकाणी त्यांचे संवर्धन व त्यांच्या अधिवासामुळे पर्यावरणाचे संरक्षण होईलअसेही ते म्हणाले.

पुढे बोलतांना श्री. मुनगंटीवार म्हणालेदिवाणी व फौजदारी न्यायालयासमोर शहीद स्मारकाची (म्युरल) निर्मिती करण्यात आली. या स्मारकामध्ये शहीद भगतसिंगाची प्रतिकृती आहे. स्वातंत्र्यासाठी मेरा रंग दे बसंती चोला म्हणत भगतसिंग हसत-हसत फासावर गेले. ते स्मारक येथील तरुण-तरुणींच्या आयुष्याचे उद्दिष्ट ठरवेल. या तरुणांमध्येही देशासाठी काही करावयाचे आहेहा भाव निर्माण होईल.

मूल येथे मुख्य रस्ताकर्मवीर मा.सा. कन्नमवार सभागृहतहसील कार्यालयपंचायत समितीची इमारतपाणीपुरवठा योजनास्टेडियमडॉ श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयइको पार्कस्विमिंग टॅंकआठवडी बाजार असे विविध विकासकामे तालुक्यात झाली. 100 खाटांच्या मुल उपजिल्हा रुग्णालयाला मान्यता मिळाली. सोमनाथ येथे भव्य कृषी महाविद्यालय उभे राहत आहे. तसेच मुलींसाठी शुरवी महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. येणाऱ्या 5 वर्षात जिल्ह्यातील महिलांच्या पंखांना बळ देणारे शुरवी महाविद्यालय सर्वोत्कृष्ट होईल. जगातल्या उत्तम विद्यापीठाशी हे महाविद्यालय जोडण्यात येईल. या माध्यमातून मुलची विद्यार्थिनी प्रशासकीय अधिकारी होऊन मुलचा गौरव वाढवेल.

चंद्रपुरातील मोरवा येथे फ्लाईंग क्लब सुरू करण्यात येत असून एअरपोर्ट विकसित करण्यात येत आहे. गरीब कुटुंबातील मुलगीही वैमानिक व्हावी आणि ती चंद्रपूर जिल्ह्यातील असावीअसा निश्चय केला आहे.चंद्रपूर विकासाच्या बाबतीत इतर जिल्ह्याच्या तुलनेत पुढे आहे. मात्रमागील दोन वर्षात जिल्हा विकासाच्या बाबतीत मागे राहिला. त्यामुळे जे मागे राहिले ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले. मुल येथे 28 तलाठी कार्यालय होत आहे. 600 कोटी रुपयांच्या एस.एन.डी.टी विद्यापीठाला मान्यता आणली व 62 कौशल्याधारीत प्रशिक्षण महिलांना देण्यात येणार आहे. उपविभागीय अधिकारीतहसीलदारनायब तहसीलदार व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी निधी मंजूर केला आहे. मुल पोलीस स्टेशनचे डिझाईन तयार करण्यात येत असून पोलिसांचे निवासस्थान देखील उत्तम करण्यात येईल. तसेच मुल तालुक्यातील नागरिकांचे पट्टे व घरकुलांचा प्रश्न देखील निकाली काढण्यात येईल. मुल तालुका महाराष्ट्रात सर्वोत्कृष्ट असला पाहिजेहा संकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने कार्य करण्यात येत असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

मुल नगरपरिषद क्षेत्रातील विविध विकासकामांचे लोकार्पण : 9 कोटी रुपये निधीतून 61 गाळ्याचे छत्रपती शिवाजी महाराज व्यापार संकुल उभारण्यात आले. यामध्ये तळ मजल्यावार 23 गाळेपहिला व दुसरा मजला प्रत्येकी 19 गाळेतसेच प्रसाधनगृहजिनालिफ्टस्ट्रक्चरल ग्लेझींगअतंर्गत व बाह्य विद्युतीकरण व सोलर सिस्टीम आदी सुविधा करण्यात आल्या आहे.नगर परिषद मुल येथे वैशिष्ट्यपुर्ण निधीतून 25 लक्ष रु. खर्ची करुन मुख्य रस्त्यावरील वाल्मिकी नगरातील स्वागत गेटचे बाधंकाम करण्यात आले. तसेच नगर परिषदांना वैशिष्ट्यपुर्ण कामासाठी विशेष अनुदानातुन आठवडी बाजार व मटन मार्केटचे बांधकाम करण्यात आले. यामध्ये भाजी बाजारासाठी 45 आच्छादीत ओटेमटन मार्केट साठी 8चिकनसाठी  14 गाळेफिश मार्केट स्लॉटरच्या इमारतीचे बांधकामपेव्हींग  ब्लॉकपाईप नालीसुरक्षाभिंतीचे बांधकाम करण्यात आले.आदींचे लोकार्पण पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.

ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार : गिरीजाबाई मेश्रामरामाजी मेश्रामकाशिनाथ बावनकरमहादेव कर्नेवारअंबादास अमदूर्तीवार नागरिकांचा पालकमंत्री श्री मुनगंटीवार यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन ऐश्वर्या भालेराव तर आभार सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अभियंता श्री. साखरे यांनी मानले.

000000

Saturday 27 January 2024

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे दूर झाला चिमुकलीचा श्रवणदोष !


पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे दूर झाला चिमुकलीचा श्रवणदोष !

पुन्हा मिळाले ऐकण्याचे वरदानविशेष बाब म्हणून जिल्हा वार्षिक

योजनेतून ७ लक्ष ५० हजार रुपये

चंद्रपूरदि. २७ : सात वर्षाच्या चिमुकलीला जन्मापासूनच श्रवणदोष होता. आपल्या लेकीला ऐकायला येत नसल्याचे कळल्यापासून कुटुंबीय हताश होते. एक शस्त्रक्रिया तर आटोपलीपण शंभर टक्के श्रवणदोष दूर होण्यासाठी कॉक्लर न्युक्लियस ८ साऊंड प्रोसेसर घेण्यासाठी आर्थिक अडथळा निर्माण झाला. अशात वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार देवदूतासारखे धावून आले आणि तात्काळ मदतीचे आदेश दिले. आई-वडिलांनी आवाज दिल्यानंतर चिमुकलीने प्रतिसाद दिला आणि कुटुंबियांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा होता.

 राज्याचे वनेसांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री  सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे पिपरी (तालुका कोरपना) येथील एका सात वर्षीय चिमुकली युवानी तिखट हिला पुन्हा ऐकण्याचे वरदान प्राप्त झाले आहे. ती जन्मापासूनच दोन्ही कानांनी ऐकण्यास असमर्थ होती. युवानीवर कॉक्लर इम्प्लांट सर्जरी करण्यात आली होती. परंतु ऐकू येण्यासाठी न्युक्लियस साऊंड प्रोसेसर इम्प्लांटवर राहणे नितांत गरजेचे होते. शस्त्रक्रियेनंतर मिळालेले साऊंड प्रोसेसर खराब झाल्याने तिला पुन्हा ऐकण्यास अडथळा येऊ लागला. कॉक्लर न्युक्लियस साऊंड प्रोसेसर घ्यायला जवळपास ७ लक्ष ५० लक्ष रुपयांचा खर्च होता. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने कुटुंबियांसाठी एवढा पैसा जमवणे केवळ अशक्य होते.

त्यामुळे तिखट कुंटुंबाने राजुरा येथे देवराव भोंगळे यांची भेट घेतली. देवराव भोंगळे यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना यासंदर्भात सहकार्य करण्याची विनंती केली. श्री. मुनगंटीवार यांनी क्षणाचाही विलंब न लावता युवानीला आर्थिक मदत करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. विशेष बाब म्हणून जिल्हा वार्षिक योजना सन २०२३ -२४ या निधीतून ७ लक्ष ५० हजार रूपये मंजूर करण्याचे आदेश सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. निधी प्राप्त होताच कॉक्लर न्युक्लियस साऊंड प्रोसेसर घेऊन देण्यात आल्याने तिला आता पुन्हा ऐकायला येऊ लागले आहे.

श्री. मुनगंटीवार नव्हे देवदूतच!

कॉक्लर इम्प्लांटमुळे १०० टक्के श्रवणदोष असलेल्या मुलांनाही ऐकू यायला लागते. परंतु शस्त्रक्रिया झाल्यानंतर लागण्यात येणाऱ्या कॉक्लर न्युक्लियस साऊंड प्रोसेसर महागडे असल्याने अनेक पालकांपुढे आर्थिक गणित जुळविण्याचे मोठे आव्हान असते. अशात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार देवदूतासारखे धावून आल्याने युवानीला आता ऐकता येणे शक्य झाले आहे. तिखट कुटुंबीयांसह कोरपना तालुक्यातील नागरिकांनी देखील श्री. मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.

000000

Friday 26 January 2024

स्वत:मधील देशभक्त जागविण्याचा संकल्प करूया ! - पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

 









स्वत:मधील देशभक्त जागविण्याचा संकल्प करूया ! - पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

Ø प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम

Ø विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणा-यांचा सन्मान

चंद्रपूरदि. 26 : भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष आजपासून सुरू झाले आहे. संविधानाने आपल्याचा जसे अधिकार दिले, तसेच कर्तव्य आणि दायित्वाचीसुध्दा जाणीव करून दिली आहे. या देशासाठी प्राणाची आहुती देऊन स्वातंत्र्याचा मंगलकलश ज्यांनी आपल्या हाती दिला आहे, त्या शहिदांचे स्मरण करून देशाला व लोकशाहीला पुढे नेण्यासाठी स्वत:मधील देशभक्त जागविण्याचा संकल्प करूया, असे आवाहन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

पोलिस मुख्यालय येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात ध्वजारोहण करतांना ते बोलत होते. यावेळी आमदार सुधाकर अडबाले, किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम. यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

भयमुक्त, भूकमुक्त, विषमतामुक्त भारत हा भाव संविधानात आहे, असे सांगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, सर्व व्यसनांपासून मुक्त होऊन अमृत कलश हातात घेण्याचा संकल्प करणे, हाच खरा प्रजासत्ताक दिन आहे. आपल्याकडे नुकत्याच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे जिल्हा प्रशासनाने उत्कृष्ट नियोजन केले. त्यासाठी जिल्हाधिकारी व संपूर्ण प्रशासन अभिनंदनास पात्र आहे. अयोध्या येथे झालेल्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला चंद्रपूरकरांनी ‘सियावर रामचंद्र की जय’ हा मंत्र लिहून एक आगळावेगळा विश्वविक्रम केला. त्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉडमध्ये नोंद झाली आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात आता वाघांच्या संरक्षणासोबतच जटायूचे संवर्धन करण्यात येणार आहे.  

चंद्रपूर जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा असून 1 लक्ष 84 हजार हेक्टरवर धानाची शेती केली जाते. राज्य सरकारने आता धानाचा बोनस वाढवून 20 हजार रुपये हेक्टरप्रमाणे दोन हेक्टरपर्यंत 40 हजार रुपये मंजूर केले आहे. ऐकार्जुना येथे 31 कोटी 90 लक्ष रुपयांत भाजीपाला संशोधन केंद्र उभे राहणार आहे. अजयपूर येथे पंजाब नॅशनल बँकेने 15 कोटी रुपये शेतीपयोगी आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यासाठी उपलब्ध करून दिले आहे. सोमनाथ (ता. मूल) येथे कृषी महाविद्यालयासाठी 135 कोटींची मान्यता प्राप्त झाली आहे. येत्या दोन वर्षात चंद्रपूर जिल्ह्यात 5001 कि.मी. चे बळीराजा समृध्दी मार्ग शेतपाणंद रस्ते पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

नक्षलग्रस्त व आदिवासी जिल्ह्यातील युवक-युवतींना वैमानिक होता यावेयासाठी मोरवा (ता. चंद्रपूर) येथे फ्लाईंग क्लब स्थापन करून त्याचे लवकरच उद्घाटन करण्यात येणार आहे. केंद्रशासन पुरस्कृत अमृत 2.0 अभियानांतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेच्या 542.05 कोटीच्या मलनि:स्सारण प्रकल्पासाठी प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वातंत्र संग्राम सैनिक कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. ध्वजदिन निधी संकलनात चंद्रपूर जिल्ह्याने (172 टक्के) उत्कृष्ट कार्य केल्यामुळे यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांचा तसेच रमाई आवास योजनेंतर्गत 100 टक्के घरकूल पूर्ण केल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांचा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विशेष सन्मान केला. तत्पुर्वी कार्यक्रमाच्या सुरवातीला तंबाखु मुक्त शपथ देण्यात आली.

 विविध मिशनच्या माध्यमातून जिल्ह्याचा कायापालट : ‘मिशन फिट’ अंतर्गत जिल्ह्यात आरोग्याच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला गती देण्यात आली आहे. 140 खाटांचे कॅन्सर हॉस्पीटल तसेच बल्लारपूर येथे कामगारांसाठी 100 खाटांचे ई.एस.आय.सी. हॉस्पीटल उभे राहात आहे. ‘मिशन स्वावलंबन’ अंतर्गत पी.एम. विश्वकर्मा योजना, कौशल्य विकासासाठी निधीची तरतुद करण्यात आली आहे. तसेच एम.आय.डी.सी.च्या धर्तीवर आता एफ. आय.डी.सी. ची निर्मिती होणार असून 48 कोटी रुपये मंजूर झाले आहे. ‘मिशन कल्पवृक्ष’ अंतर्गत बांबु पॅलेटचा उपयोग करण्यासाठी वनशेती, बांबु शेतीला प्रोत्साहन देण्यात येत आहे.

जिल्ह्यात विकासाची 225 कामे : चंद्रपूर जिल्ह्यात अपूर्ण राहिलेल्या पायाभुत सुविधांचा विकास वेगाने पूर्ण करून आरोग्य संस्थांचे बळकटीकरण, शिक्षण, सिंचन, जैव विविधता उद्यान, दळणवळणाची उपलब्धता आदींची कामे त्वरीत पूर्ण करण्यात येत आहे. तसेच सैनिकी शाळा, वन अकादमी, देखनी बसस्थानके, अनेक ठिकाणी ई- लायबरी,  बॉटनिकल गार्डन, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, नियोजन भवन, कोषागार भवन, अभ्यासिका,  वसतीगृहे,  प्राथमिक आरोग्य केंद्र,  जिल्हा क्रीडा संकुल,  वन विभागाची आकर्षक विश्रामगृहे,  इको पार्क,  मेडिकल कॉलेज,  कॅन्सर हॉस्पिटल,  प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण भागातील काँक्रीट रोड असे जवळपास 225 कामे सुरू आहेत. यापैकी काही पूर्ण झाली असून काही प्रगतीपथावर आहे.

महानाट्य व महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन : छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य आणि पराक्रमाची नव्या पिढीला जाणीव करून देण्यासाठी चंद्रपूर येथे 2, 3 आणि 4 फेब्रुवारी रोजी ‘जाणता राजा’ हे महानाट्य आणि 17, 18 व 19 फेब्रुवारी रोजी महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.

पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित मान्यवर : विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणा-या अधिकारी व कर्मचा-यांचा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आश्विनी लोनगाडगे, विष्णुवर्धन येरनी, राहुल पोहाणे, सुहास बनकर, 67 व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा व्हॉलीबॉल स्पर्धेतील सखी दोरखंडे, सई घिवे, कौशल्य, रोजगार व नाविण्यता विभागातर्फे विवेक अटलकर, अमियो दास, प्रिती पर्वे, सुरज गौरकार, प्रशंसनीय सेवेबद्दल पोलिस महासंचालकांचे विशेष सेवापदक पोलिस उपअधिक्षक राधिका फडके, पोलिस निरीक्षक सर्वश्री राजेश मुळे, शिवाजी कदम, प्रवीणकुमार पाटील, महेश कोंडावार, भरोसा सेलच्या पोलिस उपनिरीक्षक अश्विनी वाकडे, पोक्सो कायद्याची प्रभावी जनजागृती केल्याबद्दल दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) तसेच विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी, उत्कृष्ट आशा स्वयंसेविका म्हणून ममता भिमटे, यशोदा राठोड, संदेश मामीडवार आदींचा समावेश होता.

०००००००

Thursday 25 January 2024

सुदृढ लोकशाहीसाठी मतदार जागरूक असणे आवश्यक – जिल्हाधिकारी विनय गौडा








 

सुदृढ लोकशाहीसाठी मतदार जागरूक असणे आवश्यक  – जिल्हाधिकारी विनय गौडा

Ø सायकल रॅलीतून मतदार जनजागृतीचा संदेश

चंद्रपूरदि. 25 : निवडणूक हा लोकशाहीचा केंद्रबिंदू आहे. राज्यघटनेने आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे. हा अधिकार सर्वांनी निर्भीडपणे बजावून कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता आगामी निवडणुकीत मतदान करावे. सुदृढ लोकशाहीसाठी मतदार जागरूक असणे अत्यंत आवश्यक आहे, असे मत जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी व्यक्त केले.      

नियोजन सभागृह येथे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., अपर पोलिस अधिक्षक रिना जनबंधू, तहसीलदार विजय पवार, प्रभारी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) अतुल जताळे, पॅरा ऑलंपिकमध्ये सूवर्ण पदक विजेते व निवडणूक विभागाचे ब्रॅन्ड ॲम्बेसेडर नईमुद्दीन शेख उपस्थित होते.  

‘नथिंग लाईक व्होटिंग, आय व्होट फॉर शुअर’ हे यावेळेसच्या मतदार दिनाचे घोषवाक्य आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीत जिल्ह्यात संक्षिप्त मतदान पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. अर्हता दिनांक 1 जानेवारीप्रमाणेच आता वर्षभर 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर या तारखेपर्यंतसुध्दा मतदार यादीत नाव नोंदणी करता येते.

लोकशाही प्रक्रियेमध्ये मतदानाला सर्वात जास्त महत्व आहे. त्यासाठी आपले नाव मतदार यादीमध्ये असणे आवश्यक असून आपले नाव अचूक आहे का, यासाठी मतदारांनी यादी तपासून घ्यावी. नि:पक्ष आणि मुक्त वातावरणात निवडणूका पार पाडणे ही सर्वांची जबाबदारी आहे.  कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता सद्सद् विवेक बुध्दी वापरून नागरिकांनी मतदान करावे. आपला हक्क अतिशय पारदर्शकपणे वापरला तरच देश मजबूत होईल. चंद्रपूर शहरात गत निवडणुकीत मतदानाची टक्केवारी कमी होती. त्यामुळे येणा-या निवडणुकीत मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले.

मतदार यादीत नाव नोंदवा : अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे

लोकसभा आणि इतर निवडणुका आता जवळ आल्या आहेत. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार यादीत आपले नाव असणे आवश्यक आहे. नवमतदारांनी आपले नाव नोंदवून आपल्या आजूबाजूच्या नागरिकांनाही नाव नोंदविण्यास सांगावे, असे श्री. देशपांडे म्हणाले.

यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक रिना जनबंधू म्हणाल्या, 18 वर्षांवरील सर्वांनी मतदान करावे. आताच आपण सर्वांनी शपथ घेतली आहे. आगामी निवडणुकीत पारदर्शकपणे मतदान करा. तर सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम. म्हणाले, भारतीय लोकशाही जगात सर्वात मोठी आहे. मतदान करणे ही आपली जबाबदारी आणि कर्तव्यही आहे.

तत्पूर्वी जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी उपस्थितांना मतदार जागरुकतेची शपथ दिली. तसेच निवडणूक विभागाचे ब्रँड ॲम्बेसेडर नईमुद्दीन शेख यांचा सत्कार केला.

उत्कृष्ट कार्याबद्दल यांचा झाला सत्कार : मतदान प्रक्रियेमध्ये उत्कृष्ट कार्य करणा-या अधिकारी व कर्मचा-यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात आनंद मगर, प्रशांत लोखंडे, विजया राऊत, मनोज सातभाई, रमेश कोकरे, रामकृष्ण नागरगोजे, राजेश पवार, प्रकाश होळंबे, ललिता रायपुरे, मोरेश्वर मेश्राम, संगिता ढेंगळे, अरुण कोवे, दिलीप आत्राम यांचा समावेश होता.

 नवमतदारांना निवडणूक ओळखपत्र : वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्या आणि मतदार यादीमध्ये नव्यानेच नाव नोंदविणारे तेजस्विनी भोयर, प्रिया भोयर आणि विवेक झाडे या नवमतदारांना निवडणूक ओळखपत्र देण्यात आले. 

सायकल रॅलीतून मतदार जनजागृतीचा संदेश : लोकशाहीत मतदानाच्या अधिकाराबद्दल नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद व चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे जिल्हाधिकारी कार्यालय ते महानगर पालिकेपर्यंत सायकल रॅली काढण्यात आली. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, महानगरपालिका आयुक्त विपिन पालीवालसहायक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., तहसीलदार विजय पवार, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले आदी उपस्थित होते.

००००००