Search This Blog

Wednesday 24 January 2024

अनोळखी मृत महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन

 अनोळखी मृत महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन

चंद्रपूरदि.24: रेल्वे स्टेशन,चंद्रपूर येथे एक 60 वर्षीय अनोळखी महिला मृत अवस्थेत आढळून आली. अनोळखी मृत  महिलेच्या नातेवाईकाचा शोध घेतला असता उपयुक्त माहिती मिळून आली नाही. सदर  मृत  महिलेची  ओळख  पटविण्याचे  आवाहन  रेल्वे  पोलीस चौकीबल्लारपूर मार्फत करण्यात येत आहे.

मृतक महिलेचे वर्णन पुढीलप्रमाणे:

वय अंदाजे 60 वर्षरंग निमगोराउंची 5 फुट 1 इंचडोक्याचे केस पांढरेचेहरा लांबटनाक सरळअंगात पांढरी व पोपटी साडीकथ्या रंगाचा ब्लाऊज घातलेला असून उजव्या व डाव्या हातावर गोंदलेले असून अस्पष्ट आहे.

या वर्णनावरुन सदर मृतक महिलेला कोणी ओळखत असल्यास रेल्वे पोलीस चौकीबल्लारपूर येथे संपर्क साधावाअसे कळविण्यात आले आहे.

000000

No comments:

Post a Comment